
................................
कुंकवाच्या धन्यानं अशी रात जागवली
सखे काय सांगू.
कुंकवाच्या धन्यानं अशी रात जागवली
ना डोळ्यास डोळा. ना पापणी मिटू दिली
घेता मिठीत त्याने,आग अंगास लावली
अधराने अधरावर प्रेम कविता कोरली
सुटले भान पदराचे, गळून पडली चोळी
कुंकवाच्या धन्यानं अशी रात जागवली
ना डोळ्यास डोळा. ना पापणी मिटू दिली
स्पर्शिता उरोज त्याने,श्वास माझे थांबले,
धुंद मिटल्या नयनी,रम्य स्वप्न तरळले
गात्र गोजिरी स्वप्ने फुलली,ग्लानी आली
कुंकवाच्या धन्यानं अशी रात जागवली
ना डोळ्यास डोळा. ना पापणी मिटू दिली
डवरला होता पारिजात,गंध भिने तनूत
शरद चांदणे जणू ,निथळत होते देहात
मोहरला गौर देह,कळ सुखाची आली
कुंकवाच्या धन्यानं अशी रात जागवली
ना डोळ्यास डोळा. ना पापणी मिटू दिली
अंगास भिडले अंग,ना दुजाभाव राहिला
कमळात जसा भ्रमर,तसा गात्रात प्रवेशला
वादळी आवेग त्याचा,तनू रतिसुखाने भिजली
कुंकवाच्या धन्यानं अशी रात जागवली
ना डोळ्यास डोळा. ना पापणी मिटू दिली
अधरावर दंतव्रण ,वक्षावर नखक्षते कोरली
तनूत स्वर्ग सुखाची लाटे वर लाट आली
कुंकवाच्या धन्यानं अशी रात जागवली
ना डोळ्यास डोळा. ना पापणी मिटू दिली

हायला....भन्नाट....जब्राट..
In reply to हायला....भन्नाट....जब्राट.. by टवाळ कार्टा
+१
अगा गागा गागा गं. हा नक्की
अश्लील कविता ! टीन एजर ने
आवडली.
धीट, स्पष्ट पण व्हल्गर शब्द न
बोल्ड आणि ब्युटीफुल .. !
In reply to बोल्ड आणि ब्युटीफुल .. ! by मनीषा
नेमके
शीर्षक वाचून फसगत झाली.
अश्लील नाही वाटली.
कुंकवाच्या धन्यानं
छान!
सुंदर कविता.
मिपाकरांचे वय