शेजारचा बायो कॉलेजात जाता
शेजारचा बायो कॉलेजात जाता तोंडाक मेकअप लिप्स्टिक लावता चलताना हडे – थडे बघित चलता रस्त्यान जाताना नुसता मिरावता मिरावता तर मिरवाने, तुझा काय जळता? शेजारचा बायो कॉलेजात जाता||१|| केसांची बट डोळ्यार उडवता जीन्सवर तोकडा टी-शर्ट घालता बघताना डोळ्यांच्या कोपर्यातून बघता शेजारच्या माणसांका अनोळखी भासवता भासवल्यान तर भासवने, तुझा काय अडता? शेजारचा बायो कॉलेजात जाता||२|| पायात बूट तर कधी सॅण्डल घालता खांद्यात मॅचिंग पर्स अडकवता डोळ्यांका आयलायनर लावता बघणार्यांचा काळीज हलवता हलवता तर हलवने, तुझा कित्या हलता? शेजारचा बायो कॉलेजात जाता||३|| बघुचा तेव्हा कानाक हेडफोन लावता आपल्याच धुंदीत, जगाक इसारता घरातली झोपल्यार चॅटिंग करता २४ तास हातात मोबाईल धरता धरता तर धरू दे, तुझा काय झरता? शेजारचा बायो कॉलेजात जाता||४|| हल्ली घरातल्या कामात लक्षच नसता मित्र-मैत्रिणींबरोबर फिरफिर फिरता दर वर्षी नेमान पास मातर होता माका कळना नाय, अभ्यास कधी करता? करूचो तेवा करता, तुझा काय सरता? शेजारचा बायो कॉलेजात जाता||४|| - श्री. मनमोहन रोगे, ठाणे. डिसेंबर २०१४
दिवाळी अंक वर्ष
वाचने
16627
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
जबरदस्त रोगे साहेब.
मस्त !!!
छानच कविता .पहिलीतर उत्तमच.एक
मालवणी मसाला आवडला! मस्त आहेत
:)
छान!
दोन्ही कविता
जबरी राव , लै भारी
आडंस... !!!
भारी लिहिल्यात हो अगदी!!
मालवणी तडका.
मस्त
मस्त!!
सुरेख ! :)
मस्त
आवडला.
:)
आवडल्या. पण थोडे अवांतर
धरलो तर धावता आणि सोडलो तर पळता