घरापसुन लांब राहायला लागल कि आयत मिळणार जेवण आपोआप बंद होत आणि मग मेस किंवा कधी परवडेल तसे हॉटेल हा दिनक्रम मागे लागतो. काही दिवसांनी या सगळ्याचाही कंटाळा येऊ लागतो आणि शेवटी, बास झाल! आता आपण स्वतः जेवण बनवायचं हा विचार डोक्यात येतो. पण लागणार सामान आणि कष्ट बघून मग बरेच दिवस तो नुसता डोक्यातच राहतो!
पण जे लोक या विचाराला प्रत्यक्षात आणू इच्छितात त्यांच्यासाठी पाककृती वरदानच असतात. त्यामुळे हे भले काम आपण पण करावे असा विचार डोक्यात आला. इथे मी कमीत कमी सामानात बनू शकणार्या आणि बनवायला सोप्या असणाऱ्या (मला पण तेवढ्याच येतात!) पाककृती देण्याचा प्रयत्न करेन...
तर सुरुवात अशा गोष्टीपासून करूया ज्या पदार्थाने अनेकांचे संसार थाटायला मदती केली आणि अजूनही करत आहे!
कांदे पोहे...
लागणारे साहित्य:
१. जाड पोहे: शक्यतो वाटीने पोहे मोजताना अंदाज येत नाही त्यामुळे सरळ ताटात घेऊन पाहावेत कि आपल्याला किती पुरतील. इथे मी एका माणसाला पुरतील इतके घेणार आहे. (पोह्यांचे बरेच प्रकार मिळतात बर्यापैकी जाड पोहे निवडावेत, खास करून दक्षिण भारतात शक्यतो पातळ पोहे मिळतात त्यामुळे आधीच तपासून घ्यावे)
२. कांदे: एक कांदा पुरेसा आहे
३. २-३ मिरच्या
४. मुठभर शेंगदाणे
५. हळद (एक छोटा चमचा)
६. जिरे, मोहरी : (प्रत्येकी एक छोटा चमचा)
७. मीठ (एक छोटा चमचा)
८.कोथिम्बिर (नसली तरी चालू शकेल)
९. लिंबू (नसले तरी चालू शकेल)
१०. कडीपत्त्याची पाने (असली तर उत्तम)
कृती:
१.पोहे पाण्यात भिजवा. आता आपल्याकडे चाळणी असेलच असे नाही त्यामुळे पोहे भिजवताना त्याचा चिखल होऊ नये म्हणून थोडे थोडे पाणी त्याच्यावर टाकून सावकाश भिजवा. ५-१० मिनिट भिजू द्या.
२. कांदा आणि मिरची कापून ठेवा. आता छोटे काप कि मोठे काप तुम्हीच ठरवा, कसेही चालेल!
३. एका कढईमध्ये शेंगदाणे भाजून घ्या. भाजल्यानंतर त्यांना एका डिशमध्ये काढून ठेवा.
४. त्याच कढईमध्ये तेल ओता, खूप तेल ओतण्याची गरज नाही.
५. तेल जरा गरम होऊ द्या, फोडणी देण्यासाठी जिरे मोहरी त्यात टाकायची आहे. तेल पुरेसे गरम झालाय का बघायला उगीच एक मोहरी त्यात टाकून बघा. तडतडू लागली तर तेल व्यवस्थित तापले आहे.
६. आता प्रत्येकी एक छोटा चमचा अशी जिरे, मोहरी तेलात टाका आणि होणारा तडतड आवाज एन्जोय करा!
७. त्यातच कडीपत्ता आणि भाजलेले शेंगदाणे टाका.
८. चिरलेला कांदा कढईमध्ये टाका.
९. त्याच्यामध्ये चमचाभर मीठ टाका. कांद्याला हळूहळू पाणी सुटू लागेल आणि मग त्याचा रंग थोडासा बदलेपर्यंत परतून घ्या.
१०. आता त्यात हळद टाका आणि व्यवस्थित सगळे मिश्रण एक दोन मिनिट ढवळत रहा.
११. आता कढईमध्ये भिजवलेले पोहे टाका आणि व्यवस्थितपणे परतून घ्या.
१२. पोह्यांचा रंग बदलून तो हलका पिवळसर होऊ लागेल. एक दोन मिनिट गरम करत रहा आणि तुमचे पोहे तयार!
१३. याच्यावर तुम्ही चिरलेली कोथिम्बिर टाकू शकता आणि लिंबू हि पिळू शकता(उप्लब्ध असेल तर)
शेगडी जरी बंद केली असली तरी तुम्ही ज्या भांड्यात पोहे तयार केले आहेत ते गरमच असते त्यामुळे तळाचे पोहे खरपूस होऊ नयेत म्हणून सगळे पोहे दुसर्या भांड्यात काढलेले उत्तम!
वेन्जोय! :)
वाचने
9794
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
वो मामा, मी पैला. बस इतकंच.
ही पाकृ मालिका असणार आहे का?
धन्यवाद!
In reply to ही पाकृ मालिका असणार आहे का? by रेवती
फोटोच्या लिंक कुठेतरी
वर रतलामी शेव
इंदूरी पोह्यांचे नांव पण काढू नका...
In reply to वर रतलामी शेव by चित्रगुप्त
उपयुक्त टिप्स ! चाळणी वगैरे..
वा कांदेपोहे! एव्हरग्रीन
पाककृती अजब लिहिलीये
छान झालेले दिसताहेत पोहे.किप
हे काय एव्हढेस्से पोहे
हाहा!
In reply to हे काय एव्हढेस्से पोहे by मनीषा
अरे वा कांदे पोह्यांची
In reply to हाहा! by शब्दबम्बाळ
मस्तं दिसताहेत पोहे.
जवळजवळ अशाच पद्धतीने बनवत
छान दिसताहेत पोहे