कुत्रे (निबंध)
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
कुत्रे सगळीकडे सापडतात. ते सहसा एकेकटे येत नाहीत झुंडीने येतात .समोरच्यावर भुंकून भुंकून हैराण करतात . मग त्यांच्या कंपू प्रमुखाला हुक्की येते चावायची . मग सगळे चावू लागतात . बिचाऱ्या भक्षाचा प्रतिकार अपुरा पडतो. लचके तोडून तोडून जीव घेतात . आणि मग एकमेकांची पाठ थोपटतात . एकमेकांना चाटायला लागतात . लाळ गाळायला लागतात . गल्लीत नवीन आलेला माणूस यांचं आवडत खाद्य . यातून तावून सुलाखून निघणारा क्वचितच. बाकी बिचारे गल्ली सोडून तरी जातात किंवा खालमानेने गुपचूप राहू लागतात . गल्ली म्हणजे आपलच राज्य ही घमंड त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसत असतो .
एक वाईट गोष्ट म्हणजे कधी कधी एकदा कुत्र्याच्या तावडीत सापडलेली लोक नन्तर आपलं माणूसपण विसरून त्या झुंडीत जाण्यासाठी धडपडतात . आला कुणी नवीन की त्या कुत्र्यांच्या बरोबरीने भुंकायला सुरवात करतात. कधी काळी झालेल्या जखमा, दु:ख सगळं विसरून .
वाईट याचं वाटत की गल्लीतले जुने जाणते सज्जन लोक हे शांतपणे बघत असतात . एखाद्याला भक्ष बनलेले पाहून दगड उचलणं सोडाच पण हाड हाड सुद्धा करत नाहीत . खरं तर चार चांगली माणस मिळून हा प्रकार नक्कीच थांबवू शकतात . पण "जाऊ द्या माझं काय जातंय उगा कशाला पंगा घ्या" ही वृत्ती कुत्र्याचं सामर्थ्य खरेतर उपद्रवीपणा वाढवायला कारण ठरतं .
कुत्र्यांची झुंड अभद्र समजतात . कारण यांची संख्या वाढली की माणसाला जगण अशक्य . सुदैवाने कुत्रे संख्येने कमी आहेत . ते वाढू नयेत ही सदिच्छा .
सुरेश भटांची एक गझल आहे जी खास या कुत्र्यांना समर्पित
एकमेकांना कसे हे चावती कुत्रे
हाडकांसाठी कसे हे भांडती कुत्रे
हालती या शेपट्याही नेमक्या वेळी
हे जरी संतापलेले वाटती कुत्रे
जन्मले कुत्रे कधी का गर्जण्यासाठी?
लोकहो, ऐका जरा-- हे भुंकती कुत्रे!
का करावी माणसांनी एवढी चिंता
एकमेकांना जरी हे फाडती कुत्रे
जी मिळे ती घाण खाती रोज कोठेही
मात्र दिल्लीचाच साबू मागती कुत्रे
प्रश्न हा जो तो विचारू लागला आहे-- "
पाय कोणाचे आता हे चाटती कुत्रे?"
हाय, कुत्र्याचा निघाला शेवटी पंजा
नाव सिंहाचे जरी हे सांगती कुत्रे
हा जुना कुत्रा असो वा तो नवा कुत्रा
शेवटी कुत्र्या प्रमाणे वागती कुत्रे!
सुरेश भट
प्रतिक्रिया
हॅहॅहॅ. गझल भारी आहे.
=))
अरेरे ! बरेचदा कुत्र्यांचा
सुरेश भट द्रष्टे खरंच.
बाकी कुत्र्यापेक्षा त्यांचे
प्यारे काका ,कोण चावल??
ही प्यारी २ आहे रे
शरीर वेगळ असल तरी आत्मा एकच
हा तुमचा भ्रम आहे.
तुम्हाला मुद्दा कळाला नाही:-/
चालूदे तुमचे आत्मकुंथन!
ल्लुलुलुलुलु..
हम्म..
ही गल्ली आता "शेफ" राहिली नाय.....
.......
लय भारी मस्तच
अगदी अगदी. काही कुत्री
कुत्र्यांच्या अभ्यास चांगला
+१केप्टन शी बाडिस् ,मला
ती गल्लीतल्याच कुत्र्यांची
पिवशे,
एकूण लेख म्हणजे एखाद्या
@(कंपूरेबीजपीडित) बॅटमॅन.>>
बराच अभ्यास दिसतोय..
प्यारे काकू प्यारे काका काय
कुत्रे
अपमान
"कुत्रे सगळीकडे सापडतात. (...
घाव बहुत गेहरा है कन्फ्युज्ड
बरोबर!!.. धन्यवाद..
यंदाच्या दिवाळीत
आपल्या लेखात नकारात्मक विचार
आफ्रिकेत कुत्रे?
अरे बापरे
छान हं प्यारीकाकू, तुमचे
??
मला पण थोडा आसाच अनुभव आला
मग स्त्री प्रजातीने तुझी मदत
तवर त्याला त्याच्या सो कॉल्ड
=))
अय्यो, टका, आधी स्त्री
अरे ए टकया न स्पैरो , तुमच्या
हे स्त्रीजातीचं स्पेसिमन
वश कसली, डोक्यावर मिरे वाटेल.
तू गप्राव रे वशाड मेलो ;)
;) ;) ;) ;)!!!
पूर्वानुभव ?
naaaaaheeeeeeeeeeeeeeeeeeeeee
स्पारया, सुडया ,अमड़या तमड़या
महाशँपल हा शब्द भयानक
Pagination