एक आजोबा मिशी काढून...
लहानग्या चिंतामणी उर्फ चिंटू च्या घरात लगबग होती..
दिवाळी साठी खुपा दिवसाने सारे जमले होते..
धाकटा शशी काका व शशी आत्या..थोरली यमु आत्या..अन वत्सला आत्या
बाबा सदाशिव व आई सविता...
दुपारची जेवणे झाली अन गप्पांचा फड रंगला होता...
आज्जी आराम खुर्चीत बसून कौतुकाने मुलांच्या गप्पा ऐकत होती..
.
तेव्हढ्यात खिडकीतून गुपचुप उडी मारून आजोबा आत आले..दीर्घ श्वास घेतला..
अन पुणेरी जोडे टॉक टॉक वाजवत आत आले...
डोक्यावर पुणेरी पगडी ...हातात काठी.. मिशा.. ढगळ सदरा...
आजोबांना पाहताच आजी कौतुकाने म्हणाली..
"अग्गोबाई ..किती छान म्हणायचे"
सगळेजण कौतुकाने आजोबा कडे बघत होते..
"काय गं यमे ..तु कधी आलीस?""’
खर्जातल्या आवाजात आजोबानी यमीला विचारले..
अन आजोबाची नकली मिशी गळून पडली....
"अहो आजोबा तुमची मिशी गळून खाली पडली बघा" यमी म्हणाली
अन एकच हास्य कल्लोळ घरात उडाला...
.
अन आजोबा पण हसू लागले..
लहानग्या चिंटूने मग आजोबांची पुणेरी पगडी टेबलावर ठेवली...
काठी खुंटीला अडकवली..
अन धावत जात आज्जीला बिलगला...
आजीने त्याला कवेत घेत कौतुकाने डोक्यावर हात फिरवत म्हणाली..
"अगदी आजोबाचे रूप घेतले आहे अन गमत्या स्वभाव पण.."
सगळे घर कौतुकाने हसत होते..चिंटूंचं ते नाटक बघून...
.
आतल्या खोलीत आजोबा अंमळ जेवण जास्त झाल्याने दुपारची वामकुक्षी घेत होते...
बैठकीच्या खोलीत कसला दंगा चालू आहे याची त्यांना खबर पण नव्हती
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
प्रतिक्रिया
वय्यं मोठं खोटं.
ऑ...अच् जाल तल !?
:-)
आतल्या खोलीत आजोबा अंमळ जेवण
@"धाकटा शशी काका व शशी आत्या" हे कस काय बुवा ?
धाकटा शशी काका व शशी आत्या
छान!
अजून या काळात पुणेरी पगडी
@अजून या काळात पुणेरी पगडी घालणारे आजोबा आहेत ?
पुभाप्र ...
:)))
छान आहे
छान कथा