म न से.................
महाराष्ट्र नवनिर्माण सेना ( म न से) : काही वर्षापूर्वी वाजत गाजत गर्जत स्थापन झालेल्या या पक्षाबद्दल मराठी लोकांना फार अपेक्षा होत्या.
विषेषतः मुम्बैतील बिहारी/बांगलादेशीय लोकांबद्दलच्या राज ठाकरेंच्या पावित्र्यामुळे हा पक्ष नेहमीच चर्चेत राहिला.
राज ठाकरेंचे भाषण कौषल्य हे बाळासाहेबांच्या प्रमाणेच आहे. त्यांची एखाद्या प्रश्नास थेट भिडण्याची शैली लोकाना आवडायची.या पक्षास सुरुवातीला उत्तम यश मिळाले. त्यावेळेस काँग्रेस च्या विरुद्ध जनमत असूनही शरद पवारानी केलेल्या खेळीत प्यादे म्हणून मनसे ला वापरले गेले आणि सेनाभाजपाच्या उमेदवारांची मते कमी झाली. काँग्रेस -राष्ट्रवादी पुन्हा सत्तेवर आले.
मध्यंतरी मनसे ने लोकसभे साठी उमेदवार उभे केले. त्यात तळ्यात मळ्यात भूमिकेमुळे मतदारानी त्याना भ्रमनिरास होण्याइतपत लांब ठेवले.
विधानसभे साठी मनसे चे पानिपतच झाले. राज यांच्या पेक्षाही सर्वार्थाने नवख्या केजरीवालानी मोदिंसारख्या विरोधकावर मात करत दिल्ली सर केली. पण मनसे त्याच्या एक विसांशही यश मिळाले नाही.
कल्याण डोंबिवली म न पा च्या निवडणूकीत पुन्हा तेच चित्र ठळक झाले.
मनसे पुढे सध्या कसलाच अजेंडा नाही. शिवसेने वर टीका करावी तर शिवसेना हा काही फार मोठा मुद्दा उरलेला नाही.
तेलकट वडे की चिकन सूप असल्या घरगुती भांडणाचे संदर्भ देवून राज यानी स्वतःचेच हसे करून घेतले आहे.राज यांची भाषणे अजूनही शैलीदार होतात पण त्यात कोणतेच मुद्दे असत नाहीत.
खरेतर सरकार ला धारेवर धरता येतील असे अनेक मुद्दे असताना ( उदा: रस्ते , शिक्षण , शेतकर्यांच्या आत्महत्या , बेरोज्गारी , बंद पडणारे उद्योग, पोलीसांच्या समस्या , पाण्याचा वाटपाचा प्रश्न ) असतानाही मनसेने टोल सारखा दुय्यम मुद्दा उगाळलाय.
एक मात्र मान्य करायला हवे राज ठाकरेंबद्दल लोकांच्या मनात अजून ही प्रेम आहे. उद्धव ठाकरेंकडे त्यांच्यासारखा करिष्मा नाही हे सर्वमान्य आहे. मनसे मधे प्रभावी नेत्यांची दुसरी फळी सेनेतही तीच अवस्था आहे.अशा परिस्थितीत "मनसे" चे भावितव्य काय असेल असे तुम्हाला वाटते?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
कार्यशैली
करून दाखवा ! मग ठरेल भवितव्य.
खरयं .. राजला पाठींबा आहे
राज ठाकरेंचे व्यासपिठावरुन
*मराठी माणसाला प्रोत्साहन
संघर्षाची/आत्मपरिक्षणाची गरज आहे.
मनसे
मनमानी करत दुकान चालवणारा
राज बद्दल आमचे काही निरीक्षण
व्हेरी ट्रू
नारळ युद्ध
दोन्ही पक्षांचे मुख्यालय
सहमत एकदम
आळशी
नाशिक मध्ये संधी मिळुन
राज ठाकरे यांनी आत्मपरीक्षण
पुरोगामी वा नावापुरती तशी
.बिच्चारे ! अपयशी सोंग
पिढी
मनसे हा संपण्याच्या मार्गावर
राज ठाकरे..
सुरुवातीला यांना
जव्हेरगंज दुर्दैवाने तुमचे
@विजुभाऊ
नाशिकमधील वस्तुस्थिती काय आहे?
खरेच विकास झाला का नाही???????
हलवा आणि "टोल"वा