Skip to main content

तुम्हाला मिपावरचा कुठला आयडी आवडतो आणि का?

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी रविवार, 01/11/2015 18:50 या दिवशी प्रकाशित केले.
आजपर्यंत मिपावर हजारो आयडी आले आणि गेले असतील…. काही या भाऊगर्दीतही टिकून (की टिच्चून ???) राहिले…. त्यातले बरेचसे प्रामाणिक, पारदर्शक आणि मनापासून विचारप्रवाह मांडणारे आहेत. डू आयडीची पिल्लावळ नक्की कधी सुरु झाली ते माहित नाही पण हळू हळू मिपाच्या घरातल्या माणसांपेक्षा चपलांचे जोड वाढू लागले. मतमतांतराचा भाग आपसूकच मिपावर येतो. आयडी बरोबरच एक व्यक्तिमत्वही आलेच … त्या आयडीच्या नावामागे (खर्या आणि डू आयडी सुद्धा) एक मन असते… विचार असतात… काही ना काही ध्येयही असते… असे वेगवेगळे आयडी वाचल्यावर मनात कुठले न कुठले विचार उमटतातच… उदाहरणार्थ : आदूबाळ म्हटले की डोळ्यासमोर एक आज्ञाधारक, हुशार आणि चुणचुणीत व्यक्तिमत्व उभे राहते… सतीश गावडे म्हटले की एक प्रामाणिक आणि सरळ माणसाची प्रतिमा दिसते …. अभ्या म्हटले की एक खूप जिवलग आणि अडीअडचणीला धावून येणारा मित्र भेटल्यासारखे वाटते… सगळ्यांचे विचार आणि स्वभाव आयडीवरून ओळखता येतातच असे नाही, पण बर्याच वेळा हे आपण अंदाजाने सांगू शकतो. ही उदाहरणे वानगीदाखल आहेत …असे कितीतरी आयडी तुमच्याही मनात काहीतरी विचार उत्पन्न करीत असतीलच… तर तुम्हाला कुठला आयडी आवडतो आणि का ते थोडक्यात सांगू शकाल का ? कुठलीही चिखलफेक किंवा वैयक्तिक आरोप न करता निखळपणे विचार मांडावेत ही विनंती …व्यक्तिश: भेटलेली व्यक्ती शक्यतो टाळा कारण त्या आयडीचा मूळ स्वभाव बराचसा माहित झालेला असतो. ज्या आयडीबद्दल ते मत व्यक्त केलेले असेल त्या आयडीने (तो अस्तित्वात असल्यास) ते अंदाज बरोबर की चूक हेही सांगितल्यास मजा येईल… चला तर मग !
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 57304
प्रतिक्रिया 316

प्रतिक्रिया

लैच रोचक विषय.. प्रचंड मोठी लिस्ट आहे.. आणि ही 'क्रमांकवार' लिस्ट नाहीये.. ;-) १. धमाल मुलगा : नावाप्रमाणे धमाल करणारा आयडी.. दिलखुलास.. २. परीकथेतला राजकुमार : आणखी एक मस्त माणूस. जबरा लेखक आणि रोखठोक. ३. सुहास.. : हा खरोखरच 'इंट्रेस्टींग' आहे. थोडा तुसडा, पण दुनियादारी पाहीलेला वाटतो. ४. टारझन : एकच नंबर.. Pretty witty.. ५. गवि : अष्टपैलू व्यक्तिमत्व जाणवतं त्यांच्या लिखाणातून.. दर्दी माणुस.. ६. पैसाताई : अगदी ताई/ मावशी टायपातली मायाळू व्यक्ती वाटते. ७. रामदासकाका : क्या कहने.. अत्यंत 'गहीरं' व्यक्तिमत्व.. ८. डॉ. सुहास म्हात्रे उर्फ इस्पिकचा एक्का : ह्यांच्या लिखाणातुन एक ज्ञानी आणि तरीही नम्र असा जीवनरसाने ओथंबून भरलेला माणूस नजरेसमोर येतो.. ९. डॉ. सुबोध खरे : नावाप्रमाणेच सुबोध आणि खरे.. अत्यंत प्रामाणिक माणूस.. १०. बॅटमॅन : ह्याच्या भाषाप्रभुत्वाचे आम्ही फॅन आहोत.. ११. वल्ली : ह्याच्याबरोबर भटकायची प्रचंड इच्छा आहे. १२: बिका : अत्यंत जबाबदार आणि संतुलित माणूस.. १३. आतिवास : ह्यांच्या अष्टपैलुत्वाचे, स्थितप्रज्ञतेचे, संवेदनशीलतेचे आणि 'आन्जी'तून डोकावणार्‍या निरगसतेचे कौतूक करावे तित्के थोडे.. १४. आळश्यांचा राजा : प्रशासकीय अनुभवात बाप माणूस.. १५. विसोबा खेचर उर्फ तात्या : ह्यांचे अनुभवविश्व अत्यंत रोचक आणि लेखनशैली अत्यंत रोखठोक होती. कुठंसा तात्यांनु?

आळश्यांचा राजा आणि चिगो हे दोघे विसरलो. प्रशासकीय सेवेतल्या अनुभवांच्या कहाण्या एक नंबर जबराट असतात.

१०० नंबरी सोन्याची माणसे. १००व्या प्रतिसादाला. आमचे मालक नीलकांत अन प्रशांत. खरे मित्र. जिवलग, अडीअडचणीला धावून येणारे, प्रत्येक गोष्ट समजून घेणारे. कीतीही बिझी असले तरी ऐकुन घेणारे, दिलदार अन दिलखुलास दोन देखणे मित्र. केवळ यांच्यासाठी मिपावर राहायचे. नाहीतर बाकी काही ठेवले नाही.

आमच्या लाडक्या चेसुगुंचे नाव कोणीही घेतले नाह्ही याच णिषेढ

डॉ सुबोध खरे, सोन्यबाप्पू, आतिवासतै, पेठकरकाका: (अत्यंत आदरणीय आय्डी) अनुभवसमृद्ध जीवनातून येणारे लेख व प्रतिसाद गणपा व सानिकास्वप्निलः स्वर्गीय पाककृती व औटॉफधिसवर्ल्ड सादरीकरण स्पा/स्वॅप्स्/ऊप्सः फोटोग्राफी वल्ली: मिपाचे इंडियाना जोन्स: महाभारत/रामायण, लेणी, सातवाहन आणि तत्सम गोष्टींचा मिपाकोष बॅटमॅन/मृत्युंजयः व्यासंग.. संदर्भग्रंथातले रेफरन्सेस मुखोद्गत असतात. संदीप डांगे: अत्यंत पोटतिडकीने एखादा मुद्दा मांडणारे पैतै: प्रतिसादातून कधी पुणेकरांना चिमटे(!) तर कधी वादग्रस्त धाग्यांवर ठाम पण संयमित भूमिका चित्रपट परीक्षणः समीरसूर आणि फारएण्ड

In reply to by तुषार काळभोर

(अत्यंत आदरणीय आयडी) छातीत सूक्ष्म कळ आली. ईसीजी, टू डी आणि स्ट्रेस टेस्ट नंतर तो हार्ट अ‍ॅटॅक नाही असे निदान झाले. पण, 'कोणाचेही अवाजवी कौतुक इतके मनावर घेऊ नका' असा सल्ला डॉक्टरसाहेबांनी दिला. असो. धन्यवाद पैलवानसाहेब.

तुमचा / आमचा / आपला अभ्या की अभिषेक असे काही कंफ़्युजिंग आयडीज आहेत .. त्यातला नक्की कुठला चांगला ते आठवत नाहीये :-) बाकी मगाच्या कमेंटीत सगा उर्फ धन्या, नाना चेंगट आणि रामाताराम राह्यले त्याच्यासाठी पुरवणी .. :-)

हा आयडी आवडतो कारण, जग फिरावं आणि त्या त्या जागांची माहिती असावी ते ह्यांच्या सारखे … अवांतर : डाॅ. सुहास म्हात्रे आणि इस्पिकचा एक्का हे एकच ना ??

मिपावर येण्याचे प्रमुख कारण चांगले वाचायला मिळणे हे असल्याने चांगले लेखकच आपसुक आवडते आयडी आहेत. मी आले तेच गविंच्या लेखावर प्रतिक्रिया द्यायला. म्हणुन त्यांचा पयला नंबर! एक्काकाका, पेठकर काका, क्लिंटन, विकास, चतुरंग ह्यांचे समतोल लिखाण आवडते. राजकारणावरचे लेख आवर्जुन वाचत नाही पण त्यावर काही मंडळी समोरच्याची अक्कल न काढताही उत्तम प्रतिवाद करतात म्हणुन आवडतात. रामदास ह्यांची बातच और..! जयंत कुलकर्णी काकांच्या "नथ" सारख्या कथांनी वेड लावले होते! पंत श्रीरंग जोशी ह्यांची सिन्सियरिटी आवडते. नेहमी व्यवस्थित लिंका वगैरे देणार, त्यापण नव्या टॅब मध्ये उघडणार्‍या! अलीकडेच जव्हेरगंज ह्यांच्याही कथा आवडत आहेत. अतिवास ताईंचे लिखाण आवर्जुन वाचले जातेच. शशक खास आवडतात. आदुबाळ ह्यांचेही "अठरा पावलांचा स्टार्ट" आणि दुसर्‍या एका संस्थळावरील २६३ अशी काहिशी कथा होती, त्याही खुप आवडल्या होत्या. वल्ली ह्यांचे लिखाण अभ्यासपुर्ण असते. ते ही शक्यतो नजरेतुन सुटत नाही. सुरन्गीताईंच्या लेखमालिकेचीही खुप वाट पाहिली जाते. मोदकच्या लेखाला अर्थातच विसरु शकत नाही. अत्यंत अभ्यासपुर्ण लेखन! पाकॄ हा वेगळाच विषय आहे.. कुणीही पाकॄ देवो, धागा उघडल्या जातोच.. फोटोंसाठी!! म्हणुन सानिका, मृणालिनी, स्वातीताई, दिपक, गणपा, पेठकर काका इ अनेक जण आवडतात. काही जणी खुप जवळच्या मैत्रिणी आहेत.. त्यांच्याबद्दल बोलणे म्हणजे घरातलीच माणसे आवडतात असे सांगण्यासारखे होईल! पण पैसा ताई, रेवाक्का, स्रुजा, मधुरा, अजया अशा अनेक जणी लेखक आणि माणुस म्हणुनही खुप आवडतात. इथे पुर्वी अनेक फार्फार फेमस आयडी होते ज्यांची फार आठवण काढली जाते. पण त्यांचे नाव सतत न पाहिल्याने पटकन नाव आठवत नाही. पण असे अनेक आयडी आहेत ज्यांचे लेख आवडले होते. बाकी वरीलपैकी काहिही नसताना, केवळ बेअरिंग आणि मार्मिक बोलण्यासाठी "माईसाहेब" आयडी फार आवडतो! (अनेकांची नावे राहिली असणारेत...पण ती माझ्या स्मरणशक्तीची मर्यादा समजा न एकडाव माफी द्या!)

मिपावरचा प्रत्येक आयडी या न त्या कारणाने चांगला आहे. लिस्ट करणं कठीण होईल!! आतापर्यंत इतके कट्टे झाले, या न त्या कारणाने काही ठराविक चेहरे प्रत्येक कट्ट्याला कॉमन झाले, ओळखीचे झाले. खरं सांगायचं तर मिपाकरांमुळे पुण्यात रूळायला वेळ लागला नाही. पुण्यात आल्यानंतरचे सुरुवातीचे काही दिवस या ना त्याकारणाने कट्टे होत होते. त्यानिमित्ताने पुण्यातली वेगवेगळी ठिकाणं बघायला मिळाली, रस्ते ओळखीचे होत गेले. पुणं ओळखीचं होत गेलं. मुंबईत इतकी वर्ष राहून अजिबात शक्य न झालेले ट्रेक करता आले. इथल्या लोकांनी मला अगदी बाईक शिकवण्यापासून ते बाईक मुंबईहून पुण्यात आणेपर्यंत सगळं केलेलं आहे. अगदी आताचं सांगायचं तर घर घेताना पण सल्लामसलत करायला इथल्या लोकांची डोकी मी खाल्ली आहेत आणि लोकांनी न कंटाळता आपापले अनुभव शेअर केले आहेत. लिहायला गेलं तर बरंच आहे. असा अमुक एक आयडी सांगता येणार नाही. प्रत्येक आयडीवर वेगळा लेख मात्र होऊ शकेल. असो, आणखी भावूक व्हायच्या आत इति अलम्!!

काल मला एका स्त्री आयडीने आयडीने "मज्याशी मयतरी कर्नार क?" असा व्यनी पाठवलाय....त्यामुळे तो आयडी सध्ध्या माझा सग्ग्ळ्यात आवडता आयडी आहे ;)

In reply to by टवाळ कार्टा

त्या ताईला म्हणावं, "मज्याशीच जर मय्तरि करयचि तर व्यनि मज्याला पाठव की. मला कायले पाठवू राह्यली?" =))

अवघे एक महिना वय असूनसुद्धा जाणतेपणी सर्व आयडींची वैशिष्ट्ये सांगणारा सालस हा एका ताईंचा डुआयडी माझा सर्वांत आवडता आहे.

ग्रेटथिंकर ,नानासाहेब नेफळे , फुलथ्रॉटल जिनियस, हितेश, दादा दरेकर यांचा वावर अतिशय मुद्देसुद आणि नेमका होता, जागोमोहनप्यारे यांचे टायमिंग तर अफलातून असायचे ,कुठे गेली हि सर्व मंडळी????? मिपावर सध्या माइसाहेबांचे प्रतिसाद उत्तम असतात,त्या माझ्या चांगल्या परिचयाच्या आहेत,त्यांचे पती माझे चांगले मित्र आहेत.

In reply to by काकासाहेब केंजळे

अच्चा म्हणजे तुम्हीच का माईसाहेबांचा नवा अवतार? =)) रच्याकने, जागोमोहनप्यारे = हितेश = दादादरेकर = मोगा (फॉर द टाईम बीइंग).

माझ्या आवडत्या आयडीचे नाव आहे चिगो ह्याच आयडीचे लिखाण मी सुरुवातीला मिपावर वाचले, अत्यंत ओघवती आणि प्रांजळ निवेदन शैली आहे त्यांची. त्यानंतर बिका यांचे खोबार वाचले आणि खूप आवडले. नंतर ही इतर आयडीजचे बरेच लेखन आवडले. पण सुरुवात चिगो ह्यांच्या लेखवाचनामुळेच झाली.

उत्तम लेखक, माहितीपूर्ण लेखन करणारे (टेक्निकल), पाकसिद्धी असणारे, संयमित प्रतिसाद देणारे, ग्रामिण बाजाचे, शेतकर्‍यांची कणव असणारे, जातीभेद न मानणारे, आगलावे प्रतिसाद न देणारे, नकारात्मकता न पसरविणारे सर्वच आयडी मला आवडतात. अशा सर्व आयडींनी माझे जीवन समृद्ध केले आहे. पूर्वी मी इथे नविन असताना अनेक आयडींना अडखळलो आहे पण आता अनुभवातून आणि निवडक वाचनातून न अडखळता चालू शकतो आहे. त्यामुळे आता नावडता असा आयडी उरला नाही.

माझ्या आवडत्या आयडी... १. ज्या माहितीपूर्ण, मुद्देसूद आणि परखड लिहितात... मग विषय कोणताही असो. २. ज्यांचे लेखन वाचून "वाह!" असे म्हणावेसे वाटते... मग विषय कोणताही असो. ३. ज्या लेखात अथवा प्रतिसादात काही विनोदी लिहून नकळत पटकन विकेट काढतात... ज्यात व्यक्तीगत टीकेपेक्षा जास्त लेखनातली विसंगती दाखविण्याचा प्रयत्न किंवा केवळ मजाही असून शकते... मग त्यामागे थोडासा टारगटपणा असला तरी हरकत नाही. (इतर अनेक कारणे असतील पण या "सौम्य गुदगुल्या करणार्‍या ते खदखदा हसवणार्‍या" एकमेव मिपागुणविशेषामुळे मी मिपावर स्थिरावलो असे म्हणायला हरकत नाही!) ४. ज्या पूर्वग्रहदुषित असलेले व एकांगी लेख अथवा प्रतिसाद लिहित नाहीत... मुद्दे मला बरोबर वाटणारे अथवा पटणारे असलेच पाहिजे अशी अट अजिबात नाही. पण, मुद्दा भरकटवायचा हेतुपुर्रसर प्रयत्न नसावा हे नक्की. आणि बरेच काही... पण वरची कारणे महत्वाची... वरचे एक किंवा अनेक गुण असलेल्या अनेक आयडीज मिपावर वावरत आहेत आणि दिवसेंदिवस माझे मिपाशी नाते घट्ट करत आहेत... इतकी नावे आहेत की नक्कीच काही विसरली जातील... काहींची नावे लिहावी तर इतरांना विसरल्याचा दोष लागण्याची भिती आहे. शिवाय, मानवी स्वभावाप्रमाणे बरेच जण आज या तर उद्या त्या कारणाखाली बसणारे लेखन करतात... पण कोणी का लिहीना, जेव्हा-केव्हा ते वरच्या कारणांत बसते तेव्हा-तेव्हा ती ती आयडी आवडतेच आवडते!

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

या प्रतिसादासाठी एक्काकाकांना मिपाचे मिपाचे पॉवरकाका असा किताब द्यावा असा मी इथे प्रस्ताव मांडतो ;)

सर्वच मिपा आयडी आवडतात. बऱ्याच जणांकधून काही गोष्टी शिकाव्याशा वाटतात. त्यातले आत्ता आठवतायत ते १ मुवि -दिलखुलासपणा २ पैताई- स्पष्टवक्तेपणा ३ जयंतराव- अभ्यासपूर्ण लिखाण ४ हितेश/ दादा दरेकर- चिकाटी(मान लिया उस्ताद!) ५ मारवा- कुठेही आक्रामक न होता, वा पातळी न सोडता आपले म्हणणे मुद्देसूदपणे मांडणे ६माई- तर्कसंगत ७ नाखु- अत्यंत सकारात्मक दृष्टिकोण 8अतिवास , मार्गी, अभ्या, पेठकर काका-वेगळा मार्ग चोखाळायचे धैर्य ९ तात्या, रामदास- लिहावे कसे याचे उत्तम उदाहरण १० बुवा, टक्या - समोरच्याचा अपमान न होऊ देता चेष्टामस्करी करणे ११ मांत्रिक, बिंगाण्णा - भाबडेपणा बाकी ज्यांचे लेखन आवडते असे अनेक जण.

विशेष म्हणजे 'अत्रुप्त' यांच्या विनोदी स्मायलीज . . . मी तसा नवा सदस्य आहे त्यामुळे मला ज्या आयडी लक्षात येतील तसे खाली टंकतो आहे . . . नीलकांत,डाॅ बिरूटे,पैसा,डाॅ म्हात्रे,सुबोध खरे, मुवि,मृत्युंजय,बॅटमॅन,प्रचेतस,कॅप्टन जॅक स्पॅरो, तर्राट जोकर,वेल्लाभट,चित्रगुप्त,नाद खुळा,प्रगो, दत्ता जोशी,तुडतुडी,दादादरेकर,फुलथ्राॅटल जिनिअस, श्रीगुरूजी,टवाळ कार्टा,अन्या दातार,पिलियन रायडर, स्नेहांकिता,अजया,माईसाहेब,आणि इतर बरेच. . . .आणि आणि स्वतः मी

ज्याक ड्यानियल्स या आयडीमागचा माणूस गळ्यात दोन चार धामण, डोक्यावर एक नाग, कमरेला एक घोणस अशा अवतारातच डोळ्यासमोर येतो...

In reply to by स्वप्नज

धन्यवाद ! लवकरच लिहायला आणि सापांवर संशोधनाला परत सुरवात करायची आहे , ती केली की तुम्ही म्हणता तो अवतारच धारण करीन . खरे म्हणजे ,मी कधी गळ्यात साप घालून फोटोच काढला नाही, त्यात काही शौर्य आहे असे वाटले नाही.

In reply to by जॅक डनियल्स

"साप गळ्यात घालून फोटो ज काढायला तू काही मिलींदांचा सोमण सोमण थोडीच आहेस तू तर त्यांचा मित्र-मदतनीस आहेस, तू नको लक्ष्य देऊ या पोरांकडे!,पुण्यात आलास की येताना तेव्ह्ढे घोरपडीचे तेल आण यांच्यासाठी (घुडगे दुखतात ना फार), मामो ऑफ....

In reply to by नाखु

अरेच्चा मला जॅक डॅनियल कोण हा संदर्भ माहीत नव्हता. मला मिलिंद सोमण सारखाच प्रकार वाटला होता. आता कळले की हा मिपा आयडी आहे. त्यांचे धागेही पाहिले. कृपया गैरसमज नकोत.

In reply to by नाखु

मिलिंद सोमण ने गळ्यात किंग कोब्रा घातला असता तरी लोकांनी लक्ष दिले नसते …त्या बाईपाई ती स्टोरी फ़ेमॉस झाली. घोरपड काय मिपाकरांसाठी कमोडो सरड्याचे पण तेल आणून घरपोच पोहचवले जाईल.

बाब्बौ लय प्रेम उतू चाललय इथं. :) आता धागा उघडला की कभी खुशी कभी ग़मचं हैप्पीवाला म्यूजिक वाजल अशी सोय करा संपादक दादा ताई लोकहो :)

In reply to by रातराणी

अतापासुन रारा आयडीपण आमच्या लाडक्या आयड्यांमधे सामिल करण्यात आलेला आहे =)) तसा मी तुमचा फॅन ऐलवणी विचारपुस धाग्यापासुनचं आहे.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

ती मी नव्हेच कॅप्टन! आतापर्यंत दोन आयडी म्हणले रारा आयडी आवडतो म्हणून. आता मेरे दो अनमोल रतन वाजवा! :)

In reply to by रातराणी

अरारारारारारारा!! त्या स्वप्नांच्या राणी नै का? बरं जौंदे तुम्हाला डिफेव्हरेट करुन टाकतो लगेचं =))

In reply to by प्यारे१

ना प्यारेजी कौनो तकलीफ नाही. वो राणी अलग ये राणी अलग! जो हम नही वो है केहनेकी गलती ना होगी हमसे :)

In reply to by रातराणी

हम वो बारे में नहीं पूछे. किसी का मुँह खोलकर कोई तारीफ़ करे तो कुछ दिक्कत हो जायगा का? गाना बजाना का सुझाव दिए आप?

In reply to by प्यारे१

हाणतो बघ आता लै हिंदी फाडायला तर. म्हैते आम्हाला तुला अवधी, भोजपुरी, व्रज, हरयानवी, पंजाबी, खडी, बिहारी सगळ्या हिंद्या येतेत म्हणून. बास अता.

In reply to by प्यारे१

बाप्पूसाहेब आर्मीमन हायेत. आमचे फेवरेट आयडी आहेत. त्यांना काय बोलायचं काम नै. त्यांची हिंदीच असते रोज वापरात. तू तुझी सातारी बोल.

In reply to by प्यारे१

आदत से मजबूर प्यारेअंकल :) खुशी के मारे हम गाना गुणगुना बैठे तो आपको लगा हमको इन लोगोके मिलीभगत अच्छी ना लागी. आयडी एक डूआयडी अनेक मिलजुलकर सब आये मिपापर हम सभी एक है!

इथे जेंव्हा नविन नविन आलेलो,तेंव्हा मला पहिल्यांदा भुरळ घातली ती इथल्या काहि विशिष्ट नावं धारण केलेल्या आय.डींनीच..म्हणूनच तर मी इथे रमलो..लहानपणी चांदोबा-मधे जसा रमलेलो होतो तसा! त्यामुळे आवडते आय.डी म्हणजे प्राथमिकरित्या माझ्यासाठी ते आय.डींच्या नावांच्यापासूनच सुरु होतात. पैकी काहि :- पं.गा.,काळा पहाड्,विसोबा खेचर,पाषाणभेद,टारझन,नर्मदेतला गोटा,परिकथेतील राजकुमार.. :- ही सारी नावं वाचताच असं वाटायचं की मिपा हे एक वेगळच जग आहे. रोजच्या धावपळी दगदगीपासून काहि अंतरावर दूर नेणारं..कधी पिकनिक स्पॉट वाटणारं..कधी शांत देवालयासारखं भासणारं. नंतर नंतर यांच्यासह सगळ्यांचे प्रतिसाद वाचू लागल्यावर काहिसं वेगळेपणही जाणवू लागलं..आणि मग खराखुरा चॉइस तयार झाला.. मग ह्यातले काहि लोक्स आवडते मधे आणि काहि अर्थातच नावडते मधे सिलेक्ट झाले. आवडते आय डी(पहिल्या टोळीतले... ;) आपलं ते हे ..फळीतले :D :- परिकथेतील राजकुमार.. ,विसोबा खेचर, घासूगुर्जी,आमचा पां डुब्बा =)) उर्फ स्पा, नंतर आद्य खाद्य साहित्तिक गंपू पैलवान उर्फ गणपा..,यक्कू, Nile ता ;) आवडतेच परंतू काहि दुत्त दुत्त आय.डी. :- सगळ्यात पहिली बालिका उर्फ जेनी,मग जिल्बुचा उर्फ पियुषा, मग पैसा तै, मग दुत्त दुत्त आ..नंन्दिता, खाटुकम्यान उर्फ बॅटमॅन, दू दू चिमण,आणि सगळ्यात शेवटी (हो! शेवटीच.. =)) दू दू आगोबा,उर्फ वल्ली उर्फ प्रचेतस उर्फ ..... (म्हैत्ये सगळ्यांना =)) असो! ) आणि जसे वाटले..तसेच भेटल्यानंतर निघालेले..असे :- चौकटराजा,प्रभाकर पेठकर