आमदार संपतरावांनी उदघाटन केले आणि सोनटाकळी ते बोरगाव रस्त्याचे काम चालु झाले. कांट्रेक्टर कासलीवालला साहेबांनी स्पेशल सूचना देऊन महीनाभरात कोसभराचा पक्का डाम्बरी रस्ता करवुन घेतला. दोन गाव एकमेकांना जोडली गेली. तालुक्याला जायला सोपं झालं. खाजगी वहानांची वर्दळ वाढली. जिथे दिवस जायचा ते काम घंटयात होउ लागलं. लोक आपल्यावर जाम खुश असणार असा विचार करुण साधारणता महिनाभराने संपतरावांनी सोनटाकळीचा दौरा करायचं ठरवलं. साहेबांना त्या कोसाभराच्या नव्या कीरिंग रोडवर साधारणता सात ते आठ स्पीडब्रेकर लागले म्हणजे गाडी आदळतच टाकळीला आली. चौकशी केल्यावर समजले की सात ते आठ ठिकाणी तो नवा किरिंग रोड कापला गेलाय. साहेब संतापले. सरपंचाला विचारल्यावर तो म्हणाला, सड़क झाल्यावर दोन दिवसांनी रमनला कालव्यातून पाइपलाइन करायचे सुचले नंतर जगनला सुचले, चार दिवसांनी शेतात राहणाऱ्या चंपा अत्याच्या गनुने समोरच्या तारेवर अकड़ा टाकून 'अंडरसड़क' वायरिंग केले. मग असच काही वस्तीवर राहणाऱ्यांनी वाहनं जोरात पळतात, मुलं ख़ेळत असतात, म्हणून कुदळीने खनुन स्पीडब्रेकर तयार केले. या चार दोन लोकामुळे साहेबांच्या आनंदावर विरजन पडले ते आणखी भडकले. त्यांनी ग्रामसेवकाला अधिक चौकशीसाठी पाठवले. चौकशीतले जबाब:
"मी एकटाच दिसलो का तुमाला? बाकीच्यायनि खनले ते बघा ना?" रमन.
"पाइपलाइन का अभाळातुन करूं मंग?" जगन.
"कुंत्या कलेक्टराची गाडी इनार हाय कनु ह्या रोडाव्हर?" चंपाअत्या.
"भौ सरकारी पैका मजी आपलाच पैका. काय बीघडलं उलसक् खंदलं मनून. शेवटी लेकरं आदिक की रोड आदिक?" वस्तीवाले.
"भौ मह्याजवाळ कुठं कार हाय, माही बैलगाड़ी त् कश्यातुन बी पळती. कहयाला बांधला रोड? पोट्टे आंधळ्यावाणी गाड्या हानत्याय." दूसरा वस्तीवाला.
शेवटी निवडणुका जवळ आल्यात, ही बी मानसच हाइत असा विचार करुण संपतराव आल्यावाटेने आदळत आदळत वापस गेले.
वाचने
3956
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
फक्त शेवट दणकट हवा. कथा जबराट
जम्या.
बघू. करू प्रयत्न
In reply to जम्या. by बाबा योगिराज
हां हे असं आवडतं आपल्याला.
मी म्हटलं सडक चित्रपटाचे
रीमेक आला का काय?
In reply to मी म्हटलं सडक चित्रपटाचे by द-बाहुबली
सडक?
In reply to मी म्हटलं सडक चित्रपटाचे by द-बाहुबली
चांगलय..
हाहा! मस्त!
आता
In reply to हाहा! मस्त! by बोका-ए-आझम
सही
लई भारी राव
ही काल्पनिक कथा आहे की....?
.
In reply to ही काल्पनिक कथा आहे की....? by सामान्यनागरिक
मुंबईतही नळासाठी रस्ते खोदुन
पळसाला पाने तीन
In reply to मुंबईतही नळासाठी रस्ते खोदुन by मराठी_माणूस
.
एकदम करेक्ट
In reply to . by अजया
एकदम करेक्ट
एकदम झ्याक..
thank you
In reply to एकदम झ्याक.. by चिगो
मस्त!