साहित्य-
१ वाटी हिरवे वाटाणे, १ मोठा चमचा धने, १ छोटा चमचा जिरे, ५-७ लवन्गा, ८-१० मिरी, १ वाटी सुके/ओले खोबरे, १ इन्च आले, १०-१२ पाकळ्या लसूण, ५-६ कान्दे, तेल, हळद, तिखट, डाळीचे पीठ, भावनगरी, बारीक शेव, पाणी, मीठ, ७-८ कढीपत्त्याची पाने, पाव
कृती-
आदल्या दिवशी वाटाणे भिजत घालावेत. मिसळ करतेवेळी ते उकडून घ्यावेत. ४ कान्दे उभे चिरून घ्यावेत. खोबरे किसून घ्यावे. मग धने, जिरे, लवन्गा, मिरी, कान्दा, खोबरे भाजून वाटून घ्यावे. आले-लसणीची पेस्ट करून घ्यावी. एका कढईत तेल टाकून त्यात आले-लसणीची पेस्ट व वाटलेला मसाला घालावा व परतून घ्यावे. थोडी हळद घालून त्यात वाटाणे घालावेत. पाणी घालावे. आवडीनुसार मीठ व तिखट घालावे. डाळीच्या पिठात पाणी घालून त्याची गुळगुळीत पेस्ट करून कढईत घालावी. कढीपत्त्याची पाने घालून १ उकळी आणावी.
तर्री-
एका कढल्यात तेल घालून ते तापल्यावर त्यात थोडी हळद व आवडीप्रमाणे तिखट घालून ग्यास लगेच बन्द करावा. ही तर्री कढईतल्या मिसळीवर ओतावी.
एका बोल मधे मिसळ घालून त्यावर भावनगरी, बारीक शेव, बारीक चिरलेला कान्दा घालून पावाबरोबर गरम गरम खावयास द्यावी.
वाचने
12884
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
झकास
सह्ही!
उत्तम
वाह वाह,
खरं सांगू?
मिसळ-मामलेदार स्पेशल
In reply to खरं सांगू? by पिवळा डांबिस
बरोबर आहे.
In reply to मिसळ-मामलेदार स्पेशल by वृंदा
कसचे..कसचे..
In reply to बरोबर आहे. by पिवळा डांबिस
(मग खवय्या
In reply to खरं सांगू? by पिवळा डांबिस
अवांतर
In reply to (मग खवय्या by विसोबा खेचर
:)
In reply to (मग खवय्या by विसोबा खेचर
बादलीभर
एक वेगळ्या प्रकारची मिसळ..
हम्म..
खरंच!!
In reply to हम्म.. by priya