Skip to main content

ढगाला लागली कळ...

लेखक धम्मकलाडू यांनी गुरुवार, 18/12/2008 15:08 या दिवशी प्रकाशित केले.
मला आदरणीय दादा कोंडके यांच्या एका चित्रपटातली 'ढगाला लागली कळ...' हे अप्रतिम गीत देवनागरी लिपीत हवे आहे.... कृपया इथे कुणी देऊ शकेल का ? आजही हे गाणे आठवले की रोमांच येते, काटा येतो. या अप्रतिम गाण्याचा रसास्वाद करून दिल्यास मी आभारी राहीन. गांधीवादाचा किंवा संघवादाचा वैचारिक प्रभाव या गाण्यावर कसा आहे किंवा नाही हेदेखील सांगावे.

वाचने 41084
प्रतिक्रिया 90

प्रतिक्रिया

In reply to by धम्मकलाडू

पॉन्टिग धम्मकलाडू, पूजा आपणच बांधली आहे... आम्ही नाही. (हरभजन) एकलव्य

In reply to by एकलव्य

तुम्हाला काहीच कसे समजलेले दिसत नाही! तुम्हाला काय समजावणार? तुम्हाला कोण समजवणार? दादा तुम्हीच यांना समजावा बरे! ..... शिवार फुलतंय झोकात डुलतंय खुशीत नाचतोय धोतरा तुरीच्या शेंगा दावतात ठेंगा लपलाय भूईमूग भित्रा मधे वाटाणा बघ वळवळ पाणी थेंब थेंब गळं ..... "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

In reply to by एकलव्य

उपहास आणि भाबडेपणा अश्या दोन चाकांवर चर्चेची गाडी चालू आहे हे पाहून अंमळ करमणुक झाली. -- लिखाळ. गोळीबाराचे लक्ष्य चर्चेचा विषय न ठरता बंदूकच चर्चेचा विषय ठरली.

In reply to by लिखाळ

अपरंपार फसलेल्या चर्चेचा हा एक उत्तम विनोदी नमुना ठरावा! L) ~X( #:S (खुद के साथ बातां - असंच काही नाही हं रंगा, कदाचित जाणूनबुजून पांघरलेल्या भाबडेपणाचा विजयही असेल का? B) ) चतुरंग

In reply to by चतुरंग

मी तरी या चर्चेत जाणूनबुजून असे काहीही केलेले नाही. माझे दैवत दादा कोंडके यांच्याबाबत भाबडेपणे बोलण्याऐवजी मी जॉन रॉब्लिंग सस्पेन्शन ब्रिजवरुन ओहायो नदीत उडी घेणे पसंत करीन आपला (कट्टर) आजानुकर्ण पुणेकर

In reply to by आजानुकर्ण

मुळात ती प्रतिक्रिया तुमच्यासाठी नव्हतीच, आजानुकर्ण! :T मी ही एक दादा प्रेमी आहे त्यामुळे यू आर ऑफ दि हुक! #o चतुरंग

In reply to by चतुरंग

अपरंपार फसलेल्या चर्चेचा हा एक उत्तम विनोदी नमुना ठरावा! का बरे? चर्चा उत्तम आहे याबद्दल शंकाच नाही. पण विनोदी नमुना कसा दिसला तुम्हाला. या चर्चेत मला तरी कुठलाच विनोद अपेक्षित नव्हता. ही चर्चा माझ्यादृष्टीने तरी तुफान यशस्वी झाली आहे. तुम्हाला फसलेली वाटावी याचे आश्चर्य वाटते. जमून आलेल्या चर्चेला उत्तम विनोद नमुन्याचे लेबल लावण्याच्या केविलवाण्या प्रयत्नाचा मी धिक्कार करतो. दादांचा विजय असो! चर्चेतून जे काही निष्पन्न झाले आहे ते मी थोडक्यात काही दिवसांत मांडीनच. या तुफान यशस्वी चर्चेत सहभागी झाल्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. काही जणांचे प्रतिसाद लाभले असते तर आवडले असते. (गझनीचा मेहेमूद) धम्मकलाडू "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

दादांच्या खांद्यावर बंदूक हे, दादांच्या खांद्यावरून बंदूक असे हवे होते का? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

दादांनी नाडी/नाडा चा यशस्वीरित्या वापर केला होता.

थट्टा, टिंगल, टवाळी ह्या सर्व दुतर्फा असतात. तुम्ही दुसर्‍यांच्या दैवतांची यथेच्छ रेवडी उडवण्याचे स्वातंत्र्य उपभोगलेत तर, तुमची दैवतेही त्यापासून मुक्त राहू शकत नाहीत, हा एक महत्त्वाचा धडा ह्या चर्चेने दिला आहे. सबब, आता ही चर्चा थांबवावी असे सुचवावेसे वाटते. (तटस्थ) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

थट्टा, टिंगल, टवाळी ह्या सर्व दुतर्फा असतात. तुम्ही दुसर्‍यांच्या दैवतांची यथेच्छ रेवडी उडवण्याचे स्वातंत्र्य उपभोगलेत तर, तुमची दैवतेही त्यापासून मुक्त राहू शकत नाहीत, हा एक महत्त्वाचा धडा ह्या चर्चेने दिला आहे.
कुणी कुणाच्या कुठल्या दैवतांची यथेच्छ रेवडी उडवण्याचे स्वातंत्र्य उपभोगले व कुणाची कुठली दैवते मुक्त राहू शकत नाहीत? कळेल का?
सबब, आता ही चर्चा थांबवावी असे सुचवावेसे वाटते.
दादांचा यथोचित आदर होतो असला, त्यांच्या राष्ट्रकार्याची लोकांना ओळख होत असली तर ते उत्तमच नाही काय? पण तुम्ही म्हणत असाल तर ही एव्हढी चांगली उद्बोधक चर्चा सुरू आहे ती थांबवायला माझी तरी हरकत नाही. "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

आद्यमराठी नाडीकार म्हणुन दादाचे नाव घ्यावे लागेल.त्यानी नाडी/नाडा ह्या शब्दाला मराठीत प्रथमच व्यापक अर्थ दिला(काय दिला ते माहित नाही आणि कोणी विचारण्याचा प्रयत्न करु नये) तसेच दादा आमचे दैवत आहे. आम्ही आमच्या लहानपणापासुन दादाचे सिनेमे बघत आहे.काय राव तुम्ही चेश्टा करताय आमची. हे बर काय बर नाही.आमच्या वर दादाच्या विचाराचे लहानपणा पासुन संस्कार आहेत.म्हणुन आम्ही आता जादा बोलत नाही. वेताळ

In reply to by वेताळ

आद्यमराठी नाडीकार म्हणुन दादाचे नाव घ्यावे लागेल.त्यानी नाडी/नाडा ह्या शब्दाला मराठीत प्रथमच व्यापक अर्थ दिला(काय दिला ते माहित नाही आणि कोणी विचारण्याचा प्रयत्न करु नये)
खरेच की. दादांचे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय क्षेत्रातले कार्य माहीत आहे. एकंदर नाडीशास्त्रातले त्यांचे योगदान दुर्लक्षित झालेले आहे हे खरे. या कार्यावर प्रकाश पाडल्याबद्दल धन्यवाद. "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

In reply to by वेताळ

या संदर्भातले अधिक प्रश्न नाडी ग्रंथांचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन शंका उपस्थित करणाऱ्यांचे समाधान या चर्चेत येतील. शशिकांत ओक या विषयातले तज्ज्ञ आहेत. (गझनीचा मेहेमूद) धम्मकलाडू "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

दादांची स्टाईल -- अगदी द्वर्थी स्टाईलही -- डायरेक्ट. उगाच दुधाला जाऊन दांडू लपविणारं खुसपट नाही. दादांची साततोटी चौकातील शिवसेना-भाजपाच्या उमेदवारांच्या प्रचारसभेतील भाषणे पुसटशी आठवतात ती अशी (चुभूद्याघ्या भर घाला)...
  • दादा उवाच - १> लोक म्हणतात तुम्ही इकडे कसे? म्हटलं आम्हीही हाफपॅटवाले आणि हेही तसेच. आजही हाफपॅन्ट घालून येणार होतो पण म्हटलं नको स्टेज उंचावर आहे उगाच फुकटचा शो कशाला?
  • दादा उवाच - २> एकदा एका सफेद टोपीला विचारलं बाबारे तुजं नाव काय? तर म्हणे - "सर्वधर्मसमभाव". मी म्हटलं मग बापाचे नाव काय "सगळा गाव"?
एकलव्य (मुक्काम मंगळवार पेठ)

In reply to by एकलव्य

* दादा उवाच - १> लोक म्हणतात तुम्ही इकडे कसे? म्हटलं आम्हीही हाफपॅटवाले आणि हेही तसेच. आजही हाफपॅन्ट घालून येणार होतो पण म्हटलं नको स्टेज उंचावर आहे उगाच फुकटचा शो कशाला? * दादा उवाच - २> एकदा एका सफेद टोपीला विचारलं बाबारे तुजं नाव काय? तर म्हणे - "सर्वधर्मसमभाव". मी म्हटलं मग बापाचे नाव काय "सगळा गाव"?
माहितीपूर्ण प्रतिसाद. धन्यवाद. असेच आणखी प्रतिसाद वाचायला आवडतील. (गझनीचा मेहेमूद) धम्मकलाडू "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

दादांना कायद्याची नाडी पक्की महिती होती सवकार पद्ध्ती विरोधात केलेली ग्राम जग्रुती कोण विसरेल ??? राहिल त्याचे घर, कसेल त्याची जमीन - कयदे-तज्ञ गंगाराम जर प.बंगाल मध्ये दादांना समकालीन सज्ञान समर्थक भेटले अस्ते तर आज करात ... बसू. .. ममता .. ई. कोण ??? असेच म्हणावे लागले असते. (नक्की काय म्हणायचे आहे ?? च्या.. ईथे नाड्यांचा गूंता झाला आहे) असो.. प्रासंगिक विनोद, समयसुचकता, अतिहजरजवाबीपणा, नाड्या अवळने हि दादांची किमया ... मी तर म्हणेन मराठी सिनेस्रुष्टीला लाभलेल भाग्यच

मिपावर नवा पिक्चर येतो आहे http://misalpav.com/node/5208 'ढगाला लागली कळ' येउद्या त्यात ---- सखाराम गटणे © २००८, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

प्रातःस्मरणीय दादा कोंडकेंच्या वादातीत, कालातीत अशा कार्याची (आणि अर्थातच त्यांच्या अर्ध्या चड्डीचा मोठेपणा) ओळख चर्चेमुळे अधिकच गहिरी झाली. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे, समरसतावादी, समतावादी विचारसरणीचे अनेक पैलू वाचकांपुढे आले, असे मला वाटते. या ऐतिहासिक अशा चर्चेत सहभागी झालेल्या सगळ्यांचा मी फार आभारी आहे. परम पूजनीय व प्रातःस्मरणीय दादा कोंडकेंच्या स्मृतीला अभिवादन करून मी माझ्यातर्फे ही चर्चा संपल्याचे जाहीर करतो. जय हिंद. () धम्मकलाडू "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"