राम-राम मंडळी, मिपावर जेव्हा एकापेक्षा एक सुंदर कविता, कधीतरी सुंदर लेख, कधीतरी सुंदर शब्दरचना आपण वाचतो तेव्हा, एखाद्याकडे अलौकिक प्रतिभा असते म्हणजे काय असते त्याचा साक्षात्कार होतो. कवीला एखादी कल्पना सुचते कशी ? याबाबत कायमच कुतूहल असते. दैनंदिन जीवनव्यवहारात तुम्ही आम्ही जे शब्द वापरतो तेच शब्द वापरुन एखाद्याला कवितेसाठी नेमके शब्द सुचतात. ती कविता एक वेगळा अनुभव आणि आनंद देते. त्यातल्या प्रतिभा शक्तीचे सतत आश्चर्य वाटत असते. म्हणून कवी जन्मावा लागतो असे म्हणावे का ! कवितेला कारण असलेली शक्ती प्रतिभाशक्ती दैवी असते का ! कवीजवळ असणारी निर्मितीची क्षमता सर्वसाधारण व्यक्तीकडे नसते हा अर्थ खरा आहे का ? मात्र त्या शक्तीला दैवी म्हणायला लोक तयार होणार नाहीत. पण विज्ञान आणि दैवाच्या सिमारेषेवर असल्यामुळे अशा अलौकिक स्पर्शांना दैवी म्हणायला आम्ही सर्वसाधारण माणसे कधी-कधी तयार होतो. सर्वच माणसे प्रतिभावंत नसतात, म्हणजेच त्यातले इतर सर्वसाधारण असतात. दररोज स्वयंपाक घरात वावरणा-या स्त्रीला वाफेमुळे भगूण्यावरचे (पातेलं ) झाकण खाली वर होते हे काय माहित नव्हते, पण ते वाफेच्या शक्तीमुळे होते हे सुचण्यासाठी जेम्स वॅट जन्माला यावा लागला. प्रत्येक फेकलेली वस्तू जमिनीवर पडते. पण गुरुत्वाकर्षण शक्ती समजण्यासाठी न्युटन जन्माला यावा लागला. यांना हे सर्व सुचले कसे. कोणत्या केमीकल लोच्यामुळे हे घडते. भाषिक कोट्या करणारे श्री.कृ. कोल्हटकर, रा.ग.गडकरी, अत्रे, यांना भाषिक कोट्या सुचतात कशा ? एखादा वक्ता खिळवून ठेवील अशी भाषा वापरतो. तेव्हा त्याच्याकडे कोणती अशी विलक्षण प्रतिभा असते.
कलानिर्मितीच्या वेळी माणसाच्या विचारात कोणती अलौकिकता असावी लागते. जन्म, संस्कार, परिस्थिती, या गोष्टी माणसाच्या हातात नसतात. पण जे प्रतिभावंत असतात त्यांच्या संवेदनक्षमता सूक्ष्म, तीव्र स्वरुपाच्या असाव्यात. ते जे जे पाहतात त्याचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम होतो. त्याचबरोबर प्रतिभावंताची अनुभव घेण्याची प्रक्रिया कल्पना, विचार, भाव अशा व्यवहारातून सतत चालू असते.तेव्हाच अलौकिक कलाकृती जन्माला येते. त्यांच्या मनात सतत काहीतरी वाजत असते त्याचा आवाज फक्त निर्मात्यालाच येत असावा आणि तो अनुभव जेव्हा प्रकट होतो, तेव्हा तो कोणी अलौकिक प्रतिभावंत आहे याची आपणास जाणीव होते. इतरांच्या अनुभवांशी कल्पनाशक्तीच्या बळावर व तीव्र संवेदनामुळे तो त्याच्याशी एकरुप होतो. दुस-याच्या अंतरंगात प्रवेश करण्याचे सामर्थ्य त्याला प्राप्त होते. त्यामुळेच साहित्यव्यवहारातील विलक्षन अनुभव निर्माण होतात.
'नवनवोन्मेषालिनी प्रज्ञा' नित्यनुतन असे निर्माण करणारी प्रज्ञा म्हणजे प्रतिभा, हे प्रतिभेचे वैशिष्टे, समीक्षकाला, टीकाकाराला कलाकृतीतील दोष अथवा उणिवा दाखविता येतात. पण लेखन करता येणार नाही. एकंदर प्रतिभा ही दैवी शक्ती असते निसर्गत: उपजत असते या विचारापासून आम्हाल अजून दूर होता आलेले नाही.
कवी जन्मावा लागतो, कलावंत जन्मावा लागतो, वक्ता जन्मावा लागतो अशा भुमिका घेतल्या की विलक्षण बुद्धीमत्ता असलेली दुर्मीळ माणसे म्हणजे दैवी चमत्कार म्हणन्याचा मोह होतो. मुळात माणसाजवळ असणारी बुद्धिमत्ता सरावाने विकसित होऊ शकते असेही वाटत असते. असा सराव करण्यासाठी अनुकूल वातावरण हवे असते. व्यक्तीच्या बालपणापासून असा सरावाबरोबर इच्छाशक्तीही असली पाहिजे. या सर्व बाबींचा एकत्रित परिणाम व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीवर होत असतो. म्हणून परिश्रमाने घडलेली माणसेही आपल्यासमोर वावरत असतात. जीवनशैलीचे 'प्रतिभा' एक वैशिष्टे असते. जीवनशैलीतून विकसित होणारी कल्पनाशक्ती हीच लेखनकृतीचे स्वरुप घडवते; या विचारातून प्रतिभाशक्ती दैवी असते हेही मानायला आम्ही तयार नसतो. दोस्त हो, वरील विचारासंबधी आमच्याच मनात प्रचंड गोंधळ आहे. तेव्हा या वादाचे करायचे काय ? यावर उत्तम मार्ग म्हणजे मिपा सदस्यमित्रांशी चर्चा करणे, त्यासाठीच हा काथ्याकुटाचा प्रपंच !!!
प्रतिभा म्हणजे काय असते ?
वाचने
29573
प्रतिक्रिया
46
मिसळपाव
प्रतिक्रिया
प्रतिभा ....
सहमत आहे.
In reply to प्रतिभा .... by टुकुल
जिव्हाळ्याचा विषय.
म्हणजेच
In reply to जिव्हाळ्याचा विषय. by अरुण मनोहर
प्रतिभा
प्रतिभा वेडाची बहीण
In reply to प्रतिभा by सहज
बघा त्या पोष्ट मन ला
In reply to प्रतिभा by सहज
घाईला पण थोडा वेळ लागतो.
प्रतिभा उरी धरूनी मी काव्य करीत रहावे
आण्खी काय काय
सर चांगला
नानांशी सहमत आहे!
In reply to सर चांगला by अवलिया
वा
आम्हाला तर
उत्तम
सहमत आहे.
In reply to उत्तम by प्रकाश घाटपांडे
प्रतिभा :)
छान!
प्रतिभा दैवी असते.. हे चुकीचे विधान आहे!
याचसाठी केला अट्टाहास :)
In reply to प्रतिभा दैवी असते.. हे चुकीचे विधान आहे! by प्रमोद देव
बव्हंशी सहमत
In reply to प्रतिभा दैवी असते.. हे चुकीचे विधान आहे! by प्रमोद देव
प्रतिभा म्हणजे....
प्रतिभा ही
उदबोधक चर्चा
एका चांगल्या आणि तितक्याच गोंधळवून टाकणार्या
मला वाटते, ज्या मनुष्याच्या
http://misalpav.com/node
प्रतिभा ही एखाद्या अनामिक
प्रतिभा हा अॅटीट्युड असला
आजच हा लेख वाचून प्रतिक्रिया दिली आणि
प्रतिभा ही प्रयत्नसाध्य आहे
च्यायला ?
प्रतिभा ओव्हररेटेड नाहीच ........
प्रतिसाद आवडला
In reply to प्रतिभा ओव्हररेटेड नाहीच ........ by सुधीर कांदळकर
कट्यार काळजात घुसली.
फांर्मूला
सुंदर
In reply to फांर्मूला by बाजीगर
उलटे मत
चित्रानुभूतीत जगण्याची धुंदी
दोन चित्रे
अरे वा!! मोनेगुर्जी तर वॉकिंग
In reply to दोन चित्रे by चित्रगुप्त
वाचतो आहे.
छान धागा... व प्रतिसाद.
हा प्रतिसाद चूकून इथे पडला.
In reply to छान धागा... व प्रतिसाद. by तर्राट जोकर
छान लिहिलेय!
छान लेख आणि तसेच काही उद्बोधक