सर्व मिपाकरांना नमस्कार
मला चांगला मोबाईल घ्याचा आहे. बजेट 10,000रु/- फक्त(?)
Yu Yureka Plus घ्यावा हा विचार आहे.
तरीही सर्व मिपाकरांनी योग्य मॅाडेल सुचवा.
मोबाईल कडून अपेक्षा (Requirement)
1.चांगले बॅटरी बॅकअप.
2.उत्तम कॅमेरा
वाचने
33641
प्रतिक्रिया
85
मिसळपाव
प्रतिक्रिया
नको.
YU Yuphoria घ्या. युरेका प्लस पेक्षा चांगला आहे. युरेका प्लस फार गरम होतो. बॅटरी बॅकप मधेच गंडतो मधेच चांगला चालतो. सहा हजारात मिळेल.
दुसरे, तुम्ही आधीपासून वापरत असलेली सर्वच अँड्रॉईड अॅप्स चालतीलच असे नाही. सायनोजेन मॉड ऑस असली तरी रूट केल्याशिवाय पर्याय नाही.
माफ करा, स्वयंसंपादन इथे उपलब्ध नाही.
In reply to नको. by आनंदी गोपाळ
युफोरिया सहा हजारात मिळेल. असे म्हणायचे होते.
YU Yuphoria विषयी तेच मत आहे,
YU Yuphoria विषयी तेच मत आहे, बॅटरी खुप गरम होते. मित्राने अॉनलाइन मागवलेला. परत करायच्या विचारात आहे.
एखादा samsung निवडा. सध्यातरी तोच ऊत्तम. :)
लेनोवो के ३ नोट
लेनोवो के ३ नोट.
किम्मत १००००/-
१.७ गीगा बाइट प्रोसेस्सर.
२ गीगा बाईट रैम.
चांगला १३ मेगा पिक्सल चा क्यामेरा.
३००० MAH बैटरी.
१६ गीगा बाईट मेमोरी आहे.
साडे पाँच इंच स्क्रीन आहे.
विचार करायला हरकत नाही.
उत्तम फोन आहे.
+१
In reply to लेनोवो के ३ नोट by बाबा योगिराज
Best choice
वापरतोय..
In reply to लेनोवो के ३ नोट by बाबा योगिराज
सध्या K3 वापरतो.. भन्नाट फिचर आहे.. स्क्रीन तर जबरदस्त.. फक्त गरम होतो फार.. ५ मिनिटे जरी बोलले ना , तरी कान गरम करतो. आणि खिशात इस्त्री ठेवल्यासारखा पेटतो... त्यामुळे फक्त क्वलिंग असेल, तर हा फ़ोन न घेतलेलाच बरे.. SAR १.५९ आहे.. खुप जास्त.
लेनोवो के ३ नोट
लेनोवो के ३ नोट.
किम्मत १००००/-
१.७ गीगा बाइट प्रोसेस्सर.
२ गीगा बाईट रैम.
चांगला १३ मेगा पिक्सल चा क्यामेरा.
३००० MAH बैटरी.
१६ गीगा बाईट मेमोरी आहे.
साडे पाँच इंच स्क्रीन आहे.
विचार करायला हरकत नाही.
उत्तम फोन आहे.
बाबा योगिराज यांनी एक धागा
बाबा योगिराज यांनी एक धागा काढला होता तो पहा.
लिंक द्याल का ?
In reply to बाबा योगिराज यांनी एक धागा by एस
लिंक द्याल का ?
हा घ्या दुवा
In reply to लिंक द्याल का ? by कट्टापा
मोबाईल मोबाईल.......
फोनखरेदीसाठी शुभेच्छा!!
http://www.misalpav.com/node
In reply to लिंक द्याल का ? by कट्टापा
https://www.misalpav.com/node/32174
सॅमसंग ???
सॅमसंग फार हँग होतो :(
ऐकावे जनाचे करावे मनाचे
.
दहा हजाराच्या आत बजेट असेलतर
दहा हजाराच्या आत बजेट असेलतर windows phone घ्यावा
विंडोज 5** seriesच्या फोनात
विंडोज 5** seriesच्या फोनात Qualcom 200 प्रसेसर आहे तो स्लो आहे.630 चांगला आहे ( होता) आता बंद झालाय.640 नवीन आणि चांगला आहे परंतू रु अकरा हजारला आहे.
युफोरिया वगैरे गुगल स्टोर साठी कामाचा नाय प्रत्येकवेळी ५०MB data खातो.
Lumia ५३५ किंवा ५४० चांगले
In reply to विंडोज 5** seriesच्या फोनात by कंजूस
Lumia ५३५ किंवा ५४० चांगले आहेत
१०००० पेक्षा कमी किमतीचे
In reply to विंडोज 5** seriesच्या फोनात by कंजूस
१०००० पेक्षा कमी किमतीचे Android मोबाइल लवकर यान टाकतात
काय टाकतात?
In reply to १०००० पेक्षा कमी किमतीचे by धनावडे
काय टाकतात?
यान?
अंतराळ्यान?
कसं काय? कसे बाहेर पडते त्यातून यान?
कटप्पां
भौ, पैले ये बोलो कि तुमने, बाहूबलीको क्यू मारा ?
तबीच आपुन तेरेकु मोबैल के बारेमें बातायेगा !
Yu Yureka मी बायकोसाठी घेतला
Yu Yureka मी बायकोसाठी घेतला आहे. एवढा चांगला नाही. तुम्ही Lenovo K3 note किंवा Mi Redmi 2 prime चा विचार करा.
Mi Redmi 2 prime चा विचार करा.
Mi Redmi 2 prime चा विचार करा. ++१ एकदम मस्त फोन...
ASUS Zen phone 2 or ASUS Zen
ASUS Zen phone 2 or ASUS Zen phone 5
Best mobile in Budget
उत्तम सर्विस साठी नोकिया(मायक्रोसोफ्ट) घ्या!
लूमिया ५३५ चा अनूभव चांगला आहे
मोटो एक्स प्ले
थोडे २० पर्यंत बजेत ताणता आले तर मोटो एक्स प्ले घ्या. आजच मी एका कलिगकडे पाहिला आणि एकदम अप्रतिम वाटला...
१० च्या आत हवा असेल तर कुलपॅड नोट ३ चा विचार करा. सध्या अॅमॅझॉन वर हा फोन आहे आणि याचे रिव्हूज चांगले वाटत आहेत.
रेड मी २ प्राईम
xiaomi चे फोन्स चांगले आहेत रेड मी २ प्राईम चा विचार करावा hardware आणि software ची क्वालिटी इतर फोन्स पेक्षा चांगली आहे
ब्लॅकबेरी १०
रिलायबिलिटी अन सुरक्षितता या बाबी महत्वाच्या वाटत असतील तर बजेट अॅडजस्ट करून ब्लॅकबेरी १० वर चालणारे फोन घ्या. मी गेली अडीच वर्षे ब्लॅकबेरी झेड १० वापरत आहे.
थोडे थांबा
In reply to ब्लॅकबेरी १० by श्रीरंग_जोशी
रिलायंस ला ४जी लॉन्च करू दया. २० टक्के कमी किमतीत वरील फ़ोन मिळतील०
रेड मी २, द बेस्ट!
काहीही विचार न करता बिनधास्त घ्या.
कोणताही घ्या
कोणताही घ्या पण , माझ्या मते तो मोबाइल एंड्रॉइड os असलेला घ्यावा...
कालच्या रिपोर्टप्रमाणे
कालच्या रिपोर्टप्रमाणे लुमियाचा सेल पन्नास टक्के कोसळला आहे.
सॅमसंग: होपलेस कॅम्रे,ड्यूल सिमची खोटी जाहिरात.
सोनी : मिडियाटेक प्रसेसर तरीही महाग.
चाइनिज कंपन्यांचे फोनस: प्रॅाब्लेम आल्यास कुठे जाणार?
मायक्रोमॅक्स : भारुड अॅपस चिकटवलेले.
कार्बन : कशाला घेतला?
युरेका( मायक्रोमॅक्सचा ) : धड अॅन्ड्राइड नाही धड गुगल नाही.
माइक्रोसॅाफ्ट :काही मल्टिमिडिया दरवाजे बंद परंतू सेफ.
ब्लॅकबेरी: महाग
अॅपल: महागडं खेळणं.
मोबाईल घेणार असाल { अँड्रॉइड
मोबाईल घेणार असाल { अँड्रॉइड / विंडोज } तर त्या फोनची बॅटरी काढता येता आली पाहिजे असा पहा, कारण फोन हार्ड बुट करण्यासाठी हा पर्याय फार कामी येतो. { फोन हार्ड बुट करण्याचा कोणता दुसरा उपाय आहे का ? }
अँड्रॉइड फोन घेण्याचा विचार असेल तर... Marshmallow व्हर्जनचे फोन बाजारात येइ पर्यंत वाट पाहणे शक्य असेल तर नक्कीच थांबा. त्यामुळे लॉलिपॉप ओएसवाल्या फोनची किंमत नक्कीच खाली येइल, तसेच ४ जी मॉडेलचा सेल जास्त असल्याने बाकीच्या { ४ जी } नसलेले हॅडसेट्सच्या किंमती अजुन वेगाने खाली येतील असा अंदाज आहे.
विंडोजचा घेणार असाल तर विंडोज १० ओएस असलेला घ्या.
*हल्लीच अनेक अँड्रॉइड फोनचे विविध मॉडेल्सचे अनेक युजर आणि युसेज रिव्हू वाचलेत, त्यात सर्वात जास्त एक मुद्दा अनेक फोन्सच्या बाबतीत प्रकर्षाने लक्षात आला... तो म्हणजे फोन गरम होणे !
बाकी सध्या Asus ZenFone 2 रेड कलरचा फोन डिमांड मधे असल्याचे दिसते, कारण इतर कलर मॉडेल पेक्षा रेड कलर मॉडेलची किंमत जास्त आहे.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- टुटी-फ्रुटी हुं में... ;) :- Karachi Se Lahore Tak
लुमिया फोन हँगला असताना हार्ड
In reply to मोबाईल घेणार असाल { अँड्रॉइड by मदनबाण
लुमिया फोन हँगला असताना हार्ड रिसेट करायसाठी आधी सॉफ्ट रिसेट करावा लागतो.
सॉफ्ट रिसेट करायसाठी अनलॉक बटन + व्हॉल्युम कमी करायचं बटण दाबावं. सुमारे २०-२५ सेकंदानी फोन व्हायब्रेट होउन रिस्टार्ट होईल. ह्यानंतर दोन पद्धतीनी फोन हार्ड रिसेट करता येउ शकतो. एक म्हणजे थेट सेटिंग मधे जाउन फॅक्टरी रिसेट मारणं (सेटिंग्स>अबाउट> फॅक्टरी रिसेट) किंवा दुसरं म्हणजे खालच्या पद्धतीने रिसेट करणं.
१. फोन स्विच ऑफ करुन स्विच ऑन करायचा
२. फोन रिस्टार्ट होउन होम स्क्रीन ला आला की पॉवर की फोन व्हायब्रेट होईपर्यंत होल्ड करायची
३. व्हायब्रेट झाल्याझाल्या व्हॉल्युम डाउन चं बटण दाबुन धरायचं.
४. काही सेकंदांनी स्क्रीन्वर एक्स्क्लेमेशन मार्क (!) दिसेल.
५. ह्या स्क्रीन वर खालच्या क्रमाने बटणं दाबायची व्हॉल्युम अप> व्हॉल्युम डाउन> पॉवर> व्हॉल्युम डाउन.
दुसरी पदधत वापरायला किचकट आहे. पण माहिती असावी. काही वेळेला फोन गंडला की सेटिंग ला जायच्या आतमधेचं हँगतो. त्यावेळेला दुसरी पद्धत वापरायची. अदरवाईज पहिली पद्धत जिंदाबाद.
लुमिया फोन हँगला असताना हार्ड
In reply to लुमिया फोन हँगला असताना हार्ड by कॅप्टन जॅक स्पॅरो
लुमिया फोन हँगला असताना हार्ड रिसेट करायसाठी आधी सॉफ्ट रिसेट करावा लागतो.
फोन हँग झाल्यावर सॉफ्ट बुट करता येत नाही, डायरेकट बॅटरी काढुनच हार्ड बुट करावा लागतो... आता पर्यंत अँड्रॉइड आणि लुमिया या दोन्ही फोन्स ना हा पर्याय वापरुन फोन परत चालु करता आला आहे. हार्ड बुट करायची वेळ तेव्हाच येते जेव्हा ओएस कोणत्याही पद्धतीने प्रतिसाद देत नाही, त्यामुळे फोनची कुठलीही बटन्स अशा वेळी काम करत नाहीत. फॅक्टरी रिसेट मारणे हा पूर्णपणे वेगळा प्रकार आहे,आणि तो हार्ड बुटचा पर्याय नाही.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- जान ओ बेबी... ;)
android 1
एंड्रॉइड वन चे तीन मोबाइल आहेत .micromax aone , karbonn sparkle आणि एक स्पाइस चा आहे .माझ्या कडे micromax aone आहे तो updated असून त्यात marshmell आहे मि तो 5200 ला घेतला होता. आता तो स्वस्त झाला असेल
गूगल ने लॉन्च केलेले update लगेचच मला भेटत असल्या मुळे नविन फोन घेउशि वाटत नाहि ...सद्य स्तीतित फक्त नेक्सस च्या नवीन मोबाइल ला marshmellow आहे आणि android one सेरीस ला त्यामूळे कमी पैश्यात जास्त काहि हव असेल तर android one ला पर्याय नाहि......
सहमत.
4G वगळता, उत्तम फोन
Chinese फोन्स खराब होतात असा
Chinese फोन्स खराब होतात असा कोणी सांगितला तुम्हाला . आणि जरी बिघडलाच तर त्यांचे service center आहेतच की.micromax , लावा , कार्बन, आणि इतर फोन्स पेक्षा xiaomi केव्हाही चांगला . xiaomi ला china चा apple म्हणतात.
xiaomi ला china चा apple
In reply to Chinese फोन्स खराब होतात असा by स्वप्क००७
शाहिद कपूर ला गरीबोंका शाहरूख म्हणतात.
लेनोवो K 3 note किंवा लेनोवो
लेनोवो K 3 note किंवा लेनोवो A 6000 plus घ्या, मी स्वतं lenovo A6000 वापरत आहे, मख्खन आहे फोन एकदम, खासकरुन display quality चांगली आहे, २ GB ram सफिशियंट आहे.बेस्ट लक.
फोन हँगला तर सिम कार्ड काढून
फोन हँगला तर सिम कार्ड काढून पाच मिनिटांनी पुन्हा टाकल्यास चालू होतो.हे प्रथम करा.
लुमिया मध्ये शक्य नाही
लुमिया मध्ये शक्य नाही कारण सीम कार्ड battery च्या खाली असते, त्यामुळे बात्तेर्य काढल्यावर फोन रीसेट होतो
धागा वर काढण्याचे कारण कि
कुठला मोबाईल घेऊ ?
मोटो जी ४ प्लस
का
झीओमी रेडमी ३
दोन्हींपैकी कुठला फोन घ्यावा ?
३२ जीबी मध्ये आणखी कुठला चांगला ( आणि स्वस्त) असा फोन आहे का ?
दोन्ही चांगलेत ,कुठलाही घ्या.
In reply to धागा वर काढण्याचे कारण कि by सामान्य वाचक
दोन्ही चांगलेत ,कुठलाही घ्या.
नाना माईंचा आणखी एक डूआयडी
In reply to दोन्ही चांगलेत ,कुठलाही घ्या. by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
मिपावय १ वर्ष ५ महिने! मिपावर याने नक्की किती डूआयडी घेतले आहेत? किमान डझनभर तर नक्की असतिल.
कुठलाही घ्या हो!!
घेतल्यावर थोडे दिवसांनी अजुन चांगला फोन त्याच बजेटमध्ये मिळेल किंवा त्याच फोनची किंमत अजुन कमी होईल. त्यामुळे पस्तावायची पाळी येणारच.बाकी बॅटरी लवकर संपणे, फोन गरम होणे,स्क्रीन खराब होणे हे प्रकार कमी अधिक प्रमाणात सर्व फोनबाबत होतातच.
तुमच्या शहरात ज्याची सर्विस सेंटर असतील अशापैकी एक फोन घ्या म्हणजे झाले.
हेही खरे आहे
In reply to कुठलाही घ्या हो!! by राजेंद्र मेहेंदळे
पण तरीही नवीन वस्तू घेताना जर चार ठिकाणी चार हुशार लोका ना विचारावेसे वाटते
coolpad note ghya
coolpad note ghya
मोटो जी ४ प्लस घ्या ...
मोटो जी ४ प्लस घ्या ...
लेनोव्हो के४ नोट
लेनोव्हो के४ नोट
विंडोज फोन बाजारातून जवळपास
विंडोज फोन बाजारातून जवळपास अद्रुश्य झालेले आहेत. आणि आता माझ्या विंडोज फोनच्या बॅटरीचं पोट सुटायला लागलंय. त्यामुळे नवा फोन घेण्याची वेळ येऊ घातलीय असं दिसतंय.
माझ्या अटी मोजक्याच.
०. किंमत १०००० पेक्षा कमी. चीपर द बेटर.
१. विंडॉज ओएस (ही अट इन्व्हॅलिड आहे) त्यामुळे बदलून अँड्रॉईड असं लिहितो. शक्यतो मार्श्मेलो.
२. जास्तीत जास्त बॅटरी (४००० असल्यास उत्तम) जाणकारांनी ३००० आणि ४००० मधे किती फरक पडेल, ते सांगावं अशी विनंती.
३. छोट्यात छोटा स्क्रीन (म्हणजे आजकाल ५ इंच. साला ४.५ ४.३ मिळतच नाहीत) मी मोबाईलवर पिक्चर इत्यादी बघण्याचा फ्यान नसल्याने मला स्क्रीन छोटी हवी, जेणेकरून एका हाताने टाईप करता येईल.
४. चांगल्यात चांगला प्रोसेसर व रॅम. - ३ जीबी किंवा अधिक असावं असं लोकांचे अनुभव ऐकून मत झालेलं आहे.
स्टोरेज, कॅमेरा यांच्याशी शून्य घेणंदेणं आहे.
सध्या तीन पर्याय बघतोय
१. पॅनासॉनिक एलूगा रे (३जीबी ४००० एएमएच मीडीयाटेक प्रोसेसर १६ जीबी इनबिल्ट)
२. रेड एम आय ३ एस प्राईम (३ जीबी ४१०० एएमएच आणि स्नॅपड्रॅगन ४३० ३२ जीबी)
३. लेनेवो के ६ पॉवर - याच्या माउथपीसचा एका अपडेटनंतर प्रॉब्लेम होतो असं ऐकलंय वाचलंय गूगलवर त्यामुळे साशंक आहे.
४. यू युनिकॉर्न/युरेका एस
कुणी अनुभव, माहिती सांगेल का?
सल्ला हवाय.
रेड एम आय ३ एस प्राईम !
अगदी डोळे झाकून घे !