Skip to main content

छोटी छोटी बातें

लेखक बाजीगर
शनिवार, 17/10/2015 या दिवशी प्रकाशित केले.
काही समस्या खूप कमी महत्वाच्या असतात्त , तरीही त्यावर काही उपाय मिळतो का यावर मी विचार करतो (१) ओला कचरा बास्केट : आजकाल सगळीकडे एवढे तरी प्रबोधन झाले आहे की कचरा ओला (किचन वेस्ट , फळे/भाजीपाल्याची साले,देठ इत्यादी )आपण पुण्यात वेगळ्या बास्केट मध्ये गोळा करतो ,हे जेव्हा सफाई कर्मचारी रिकामी करून आपल्याला परत देतो तेव्हा त्या बास्केट च्या तळाशी कचरा चिकटलेला असतो,त्यावर उपाय काय? काही जण प्लास्टिकच्या पिशवीत ओला ठेवतात ,त्याचा सफाई कर्मचार्या ला त्रास होतो .तो चिकट ओला कचरा वेगळा काढून ,प्लास्टिकपिशवी सुक्या कचर्यात टाकण्याचे किचकट काम त्याला करावे लागते. उपाय काय?? Ideally मला वाटते कि एक केळीचे पान बास्केट मध्ये ठेवावे, गोल कापून तळाशी आणि दुसरा तुकडा गोलाकार फिरवून बास्केट च्या आतून साईडला , पण रोज केळीचे पण कुठे मिळणार मग त्या ऐवजी पत्रावळी विकत घेऊन ठेवल्या तर काम सोपे होईल . ओल्या कचर्याच्या आतून पत्रावळी लावायच्या ,तळाशी अन आतून बाजूने, मग दिवसभर ओला कचरा साठवून सफाई कामगाराचे काम सोपे होईल, नुसती बास्केट उलटी केली कि सर्व ओला कचरा रिकामा होईल व आपल्याला स्वच्छ बास्केट परत मिळेल. दुसरा विचार: ओल्या कचर्यासाठी जर बास्केट ऐवजी Nonstic pan ठेवली तर ??! (२) bag च्या तळाचे हायजीन /स्वच्छता कशी सांभाळायची ? आपण bag कुठेही ठेवलेली असते, रस्त्यावर , गाडीत,Toilet मध्ये सुद्धा, भारतात आपले बांधव कुठेही थुंकत असतात, who knows आपण आपली bag काही वेळ अश्या गलिच्छ ठिकाणी ठेऊन शेवटी घरी आणत असतो. मग bag च्या तळाचे हायजीन /स्वच्छता कशी सांभाळायची ? जर आपण प्रत्येक वेळी घरी आल्यावर पाण्याने bag स्वच्छ धुवत असलो तर ठीक आहे. पण अन्यत: काही दुसरा उपाय आहे का? सोचो सोचो … जर आपण वेल्क्रोव ने तळाशी एक कागद चिकटवला आणि घरी प्रवेश करण्याआधी तो कागद काढून फेकून दिला तर ?

वाचने 4098
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

चांगला विषय चर्चेला घेतलाय. विषयाची व्याप्ती प्रचंड आहे. आगामी भारतीय रोजच्या जीवनासाठी कळीचा मुद्दा. केळ / पत्रावळीची कल्पना चांगली आहे. केळ / पत्रावळीची स्वस्त दरात उपलब्धता अन अंमलबजावणी निकराने करावी लागेल. ओला कचरा वर्गीकरण / विघटन व सुक्या कचर्‍याचा पुनर्वापर हे आगामी काळात महत्वाचे नव्हे अतिमहत्वाचे मुद्दे असतील

कौस्तुभ ताम्हनकर नावाच्या एका व्यक्तीने गेल्या बरा वर्षात शुन्य कचरा निर्मिती केलीय. त्यांच्या घराबाहेर "येथे कचरा तयार होत नाही " अशी पाटी आहे . त्यांच्याविषयी माहिती. kaustubh tamhankar त्यांना संपर्क करू शकता

मी बर्याच ठिकाणी बघितले आहे कि काळी carrybag टोपलीमध्ये टाकून त्यावर कचरा जमा करतात ,नंतर लोक तोच कचरा फेक्तातात ,टोपली स्वच्छ राहते ,जाणकारांनी अधिक माहित टाकावी

घरगुती कचरा निर्मिती व व्यवस्थापन हा अगदी महत्त्वाचा विषय आहे. लिहण्यासारखे बरेच आहे,. सवडीने लिहिन....