Skip to main content

सोलापूर, तुळजापूर, पंढरपूर व विजापूर - सहलिबाबत मार्गदर्शन

लेखक विक्रान्त कुलकर्णी यांनी सोमवार, 12/10/2015 14:34 या दिवशी प्रकाशित केले.
सोलापूर, तुळजापूर, पंढरपूर व विजापूर असे दिवाळीनंतर पाच ते सहा दिवस फिरायचे ठरवीत आहे. मी ठाण्याला राहतो. सोलापूरला मुख्य मुक्काम ठेऊन आजूबाजूची ठिकाणे पाहणे सोयीस्कर ठरेल असे एकंदरीत वाटते. तर वाहतुकीच्या सोयी, राहण्याची व जेवणाची व्यवस्था तसेच वरील उल्लेखाव्यतीरिक्त आणखी कोणती पाहण्याची ठिकाणे आहेत का? याबाबत जाणकारांनी मार्गदर्शन करावे.

वाचने 30802
प्रतिक्रिया 106

प्रतिक्रिया

मंगळवार पेठेतील डोसा विविध प्रकारात मिळतो.सेट डोसा,कट डोसा,दावणगिरी डोसा इत्यादी.खान्याच्या बाबतीत सोलापूर एक नंबर आणि इतर ठिकानंपेक्षा स्वस्त आहे.

बिजापुरला १ दिवसापेक्षा जास्त वेळ देउ नका. बिजापुर जवळ १८ किमि वर कुमुटगी म्हणुन जागा आहे तिला नक्कि भेट द्या. तिथे राजाचे विश्राम ग्रुह आहे, शेजारीच तलाव आहे. त्याकाळची शॉवर पद्धत बघता येईल.ए.एस.आय. चा कर्मचारी उत्तम माहिती देईल (तिथे गाईड नाही). बाकि कुठेही गाईड करु नका, फसवतात आणि काहिही विशेश माहिती देत नाहीत. उप्पुळी बुरुज वर एक म्हातारे आजोबा १०० घेउन बर्‍यापैकी चांगली माहिती देतात.बिजापुरला राहणार असाल तर हॉटेल पर्लचा विचार करु शकता तिथुन गोल घुमट पायी जाण्याइतपत जवळ आहे. ११०० रु/नाईट (आम्हाला सवलतित ७०० रु मध्ये मिळाली. अजुन काही मदत असल्यास नक्की विचारा. बदामि, ऐहोळे पट्टडकल जाणार असाल तर तिथली माहिती देऊ शकेन. ह्या भागात जाण्यापुर्वि कंजुस काकांचा हा धागा नीट वाचुन काढा... http://www.misalpav.com/node/28762

In reply to by भुमन्यु

तुम्ही सन्गितल्याप्रमाणे हॉटेल पर्लचा नक्की विचार करेन.मला एक दिवस नळदुर्गला पण जायचे आहे. त्यासाठी कसे जावे लागेल ?

In reply to by विक्रान्त कुलकर्णी

१. जेवणात जर तिखट कमी खात असाल तर तशी पुर्व कल्पना द्या. ओव्हरऑल उत्तर कर्नाटकात तिखट जास्त खातात. २. पर्ल हॉटेल जवळ कामत हॉटेल आहे, तिथेही जेवण चांगले मिळते.

अबे अभ्या.... लईच दंगा झाला बे इथं..असो, विक्रांत, या सोलापुरला जरुर या, स्वागत आहे. पुर्वीपासुनच सोलापुर हे एक तुम्ही लिहिलेल्या धार्मिक ठिकाणांचं केंद्र म्हणुन सोयीचं आहे. सोलापुरात येताय तर खाणंपिणं मजेत करा.. जमल्यास, दातेंच्या गणपतीचं दर्शन घेउन या, देवळाच्या बाहेरुन देखील दर्शनाची सोय आहे, आणि त्यांचं ऑफिस तिथं मागंच आहे, विनंती केल्यास ते देऊळ उघडुन दर्शन घेउ देतात. पुर्वभागातलं, म्हणजे अक्कलकोटलनाक्याच्या अलीकडं बालाजीचं मंदिर आहे, तिथं जाउन या. बा़ळीवेशीतलं मल्लिकार्जुन मंदिर आणि माणिकचॉकाजवळ्चं जैनमंदिर ही जस्ट ५-१० मिनिट जाउन यायची ठिकाणं आहेत. सिद्धेश्वर तलावाच्या बाजुचा घाटावरचा गणपती देखील असाच आहे. अजुन ह.दे.प्रशाला बघा, आजकालचे शिक्षणसम्राट तेवढ्या जागेत १२-१४ संस्था उभ्या करतील खाण्यापिण्याचं म्हणाल तर खरंच सोलापुरसारखी ओरिजनल जागा नाही... सातरस्त्याजव़ळ राजमहाल मध्ये इडली खायला जा, तिथं तेलमसाला वेगळा मिळ्तो चटणीवर घालुन खायला, तिथुन रंगभवनकडं येताना इंडिया टि हाउस आहे, फक्त चहा घेउन जरा लांब जावं लागतं. पुढं विजापुर वेशीत २-३ पायनापल कोल्डिंकची दुकानं आहेत ती ट्राय करा. सावरकर मैदानावर पैलवान कडचं आइस्क्रिम खा, तिथुन पुढं बागेच्या गेटसमोर सिद्धेश्वरमध्ये चहा प्या इथं केटी घ्या, नुसता चहा नको. वर सांगितलेली भैयाची भेळ हा आमच्या शाळेच ऑफिशियल पाणीपुरी वाला होता, अगदी शाळेच्या कॅम्पसमध्ये होता तो. डिस्कोभजी हा प्रकार ओरिजनल साखर पेठ आणि भवानी पेठेत मिळेल्,पार्कवर ठिक आहे. चादरी बद्दल सगळ्यांनी सांगुन झालंय, पुर्वभाग राम मंदिराच्या जवळ चाटलांच शोरुम् आहे तिथं जाउन या. व्हेज जेवणासाठी स्टेशनच्या थोडंसं पुढं सुगरण आहे, सोलापुरी शेंगाच्या पोळ्या आणि खवाच्या पोळ्या खाउन या तिथं. नाश्ट्याला, मधला मारुतीच्या जवळ अप्पा हलवाई कंडं एक पुरी भाजी आणि एक प्लेट कुंदा खाउन या. स्वताचया गाडीनं जाणार असाल तर, सोलापुरच्या अलीकडं लांबोटीला चिवडा, कुंदा आणि बाकरवड्या घेउन या. फक्त दुधातला चहा ही तिथली स्पेशलिटि आहे. अजुन उद्या...

In reply to by ५० फक्त

एवढे सगळे पदार्थ खायचे म्हणजे सोलपूरातील मुक्काम वाढवावा लागेल असे दिसते. नळदुर्गला कसे जायचे व प्रवास किति वेळाचा लागेल याबद्दल काही माहिती मिळेल का ?

सोलापूर म्हंजे मजाच मजा. भरपूर खाणं आणि चित्रपट बघणं. जर का सुभाष चौकातल्या कुठल्या हॉटेलात राहिलात तर बर्याच गोष्टी पायी फिरून बघता येतील. किल्ला समोरच आहे. बाजारपेठा, पार्क मैदान, सिद्धेश्वर देऊळ, ह्दे प्रशाला, संगमेश्वर कॉलेज, वारद बंगला अर्थात ईंद्रभुवन अर्थात सोलापूर (म्?)न.पा.कार्यालय, आणि भरपूर टॉकिजेस. सोलापूर म्हंजे खायला पर्वणी. सुप्रजा, स्वाद,नट्स चाट चा ठेला पण मस्त. त्याच्यानंतर दत्ताच्या देवळाजवळ आलं की आनंदाश्रम होतं. तिथला डोसा उर्फ दोसाई अफलातून होता.किल्ल्यासमोर रस्त्यावर्च्या गाड्यांवर चटणी सँडवीच प्रचंड भारी!!! आता मिळतं का कल्पना नाही. पूर्वी हाटेलातली जेवणं पण मस्त होती, अजूनही बर्यापैकी घरगुती चव टिकून आहे. अर्थात मागच्या ३ वर्षातले बदल माहीत नाहीत. पार्क मैदानाजवळ दूध पंढरीचे पेढे आणि फ्लेवर्ड दूध जरूर प्या.बाजारपेठेत दाणे खात खात भटका. लक्ष्मी मंडईत जा. माणिक चौक, सहकार पेठपर्यंत पायी फिरा. पूर्वी मी लकी (बंद झालं),गदग ग्रँड (मजा गेली आता), मुक्ताई मिठाई इ. ठीकाणी मनमुराद खाल्ले आहे. तेंव्हा सकाळी सकाळी गरम गरम ईडली, द्वाशी आणि वडा सांबार देणारी एक गाडी लागायची. तूफान मजा यायची सकाळी सकाळी ते खाताना. मस्त शहर आहे आणि मस्त लोकं आहेत.

सोलापुरकरांनो चांगली माहिती सांगितलीन की.असं आहे की जोरदार प्रमोशन झालं पाहिजे एकेका जिल्ह्याचं.एक सांगायचं राहिलंच की चादरी इतकंच महत्त्वाची शाळूची ( पांढराशुभ्र चमकदार मऊ जोंधळा , यावरूनच शेतं पिकली मोत्यावानी कल्पना आली ) भाकरी,तीन चार सुक्या चटण्या.कारळे शेंगदाणे तीळ. वर करडईचं तेल. मला मनपा इमारत फार आवडली होती.

In reply to by दुर्गविहारी

नळदुर्ग -तुळजापूर असा रस्ताही आहे व बस ही पुष्कळ आहेत. पावसाळ्यात नळदुर्ग च्या किल्यात धबधबा असतो आता माहिती नाही. जाताना अणदूर येथेही खंडोबा मंदिर आहे. सोलापूर -हैदराबाद रोड -नळदुर्ग - तुळजापूर असे पण जाऊ शकता.

सोलापुरकर मन्ड्ळी बरीच आहेत मिपावर. छान कट्टा होइल सोलापुरात.अभ्याभाऊ घ्या पुढाकार.