Skip to main content

कांद्याच्या पातीचा घोळाणा

लेखक हेमंत लाटकर यांनी गुरुवार, 15/10/2015 19:07 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्याकडे नेहमी मेथी, पालक याचा घोळाणा करतात. त्याबरोबर कांद्याच्या पातीचा घोळाणा सुद्धा करतात. पोळी बरोबर खायला छान लागतो. साहित्य: 1. कांद्याची पात 2. शेंगदाण्याची पुड 3. मीठ 4. साखर 5. तेल कृती: कांद्याची पात बारिक चिरून घ्या. एका बाऊल मध्ये चिरलेली कांद्याची पात,शेंगदाण्याची पुड,मीठ,साखर,तेल (सर्व अंदाजाने)टाका. सर्व मिश्रण चमच्याने एकत्र करा.

वाचने 8094
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

घोळणा दोनदा आलाय तरी इथेच प्रतिसाद देते. ही पाकृ वाचून गायब मिपाकर शाल्मलीची आठवण आली. तिने ही कांदापातीची कोशिंबीर म्हणून दिली होती व फारच टेस्टी लागते असे अनुभवास आले आहे.

घोळाणा माझा आवडता पदार्थ आहे. पाकृसाठी धन्यवाद. पण फोटो मात्र हवाच. जेव्हाही उपलब्ध होईल तेव्हा प्रतिसादात प्रकाशित करा.

असाच घोळाणा मेथीचाही करता येतो.सेम कृती आहे

याला खरंतर पचडी (कन्नड) म्हणतात, त्यात दही घालतात, आणि ती मेथी किंवा पालकची करतात!!!

मी "मराठी पचडी" देखील खाल्लेली आहे. पचडी हे नामकरण कदाचि़त दक्षिण महाराष्ट्रातले किन्वा उत्तर कर्नाटकातले असावे. चवीसाठी भिजलेली मुगाची डाळ किन्वा मोड आलेले मूगही त्यात घालता येतील.