"समुद्र" - अथांग नात्याचे नेटके सादरीकरण
भास्कर आणि नंदिनी हे विवाहीत जोडपं एका समुद्रकिनार्यावरील रीसॉर्टवर ट्रीपसाठी आलंय. दोघांच्या लग्नाला १० वर्षे उलटून गेली आहेत. एक मुलगा आहे, परंतु भास्करच्या आग्रहामुळे त्याला शिक्षणासाठी बोर्डींग मध्ये ठेवलंय.
भास्कर एक छोटी फॅक्टरी चालवितो. सांपत्तिक स्थिती चांगली आहे. नंदिनी गृहिणी आहे. मुलगा जवळ नसल्याने तिला एकटेपण डाचतंय. भास्कर टिपिकल कारखानदार वृत्तीचा. स्वतःची फॅक्टरी मनापासून चालविणे, व्यवसाय आणि उत्पादन वाढविणे यातच त्याचा बराचसा वेळ जातो. वृत्तीने फारसा रसिक नाही.
नंदिनी त्याच्या उलट. घरी रिकामी बसलेली. पण तिला लोकात मिसळायला आवडतं. जुनी मंदीरे, त्यांचा अभ्यास हा तिचा आवडता विषय. या विषयाची आवड असलेल्यांचा तिने एक ग्रुप जॉइन केलाय. तो ग्रुप अधूनमधून जुन्या मंदिरांना भेट देऊन तिथला अभ्यास करून आपली हौस भागवितो. तिला वाचनाची, पुस्तकांची देखील आवड आहे. अशा "बौद्धिक" विषयांवर तिला भास्कर बरोबर चर्चा करता येत नाही कारण तो सदैव कामात गढलेला आणि या विषयात फारसे गम्य नसलेला.
ते ट्रिपला बदल म्हणून आलेत. परंतु भास्करच्या मनात काहीतरी वेगळंच खदखदतंय. नंदिनीची तिच्या ग्रुपमधल्या गणेश राजोपाध्ये नावाच्या एका व्यक्तीशी जवळीक होत आहे असा त्याचा संशय बळावतोय. गणेशने एकदा तिचे हात धरलेले देखील त्याने पाहिले होते. त्या दोघात नक्की काय होतं या विचाराने तो अस्वस्थ आहे.
रीसॉर्टसमोर अथांग समुद्र पसरलेला आहे. त्याच्या सान्निध्यात त्याची खदखद उफाळून बाहेर येऊ पाहते. आमच्यात तसे काहीही नव्हते असे नंदिनी त्याला समजावू पहाते. गणेशची आता मद्रासला बदली झाली असून तो आता इथे नाही हेही ती सांगते. माझे मन त्याला समजत होते, त्याला जुनी मंदिरे या विषयाबद्दल सखोल माहिती होती, त्याच्याशी चर्चा करायला मला आवडायचे असे ती त्याला सांगते.
परंतु त्या दोघात फक्त "इतकेच" होते याबद्दल भास्कर साशंक असतो. तिला एकटे रहायला आवडते. आपण तिच्याशी "बौद्धिक" चर्चा करू शकत नसल्याने तिला आपल्याबरोबर रहायला फारसे आवडत नाही असे त्याचे मत होऊ लागले असते.
दोघात याच विषयावर सातत्याने बोलणे होत असताना ती अचानक गौप्यस्फोट करते. आपले गणेशशी काही वेळा "संबंध" आले होते याची ती कबुली देते.
हे ऐकल्यावर भास्करला धक्का बसतो. त्यांचे संबंध इतके पुढे गेले होते या कबुलीने तो अंतर्बाह्य हादरतो. आपल्यात शारीरिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या किंवा इतर कोणत्याही दृष्टीने कोणतीही कमतरता नसताना, नवरा व बाप म्हणून आपण सर्व कर्तव्ये व्यवस्थित पार पाडत असताना तिला गणेशचा मोह पडला या कबुलीने तो दु:खी होतो आणि संताप व अपमानाच्या भावनेने काही काळ हिंस्त्रही होतो.
नंदिनी मात्र झाल्या प्रकाराबद्दल अजिबात अपराधी वाटत नसते. जे झाले ते त्या ओघात होऊन गेले. भास्करमध्ये कोणत्याही दृष्टीने कोणतीही कमतरता नव्हती, तरीसुद्धा गणेशबरोबर आपला संबंध आला हे तिला अगदी सहज होऊन जाणारी गोष्ट वाटते. गणेशबद्दल आपल्याला कोणतेही शारीरीक आकर्षण असे नव्हते, तो आपल्याशी आपल्या आवडत्या विषयाबद्दल जे बोलायचा ते अगदी आपल्या मनातलेच असायचे, त्याच्याशी बोलून आपली बौद्धिक भूक भागत होती व त्याचे बोलणे आपल्याला आवडायचे व त्यातूनच त्याच्याशी आपला संबंध आला आणि हे अगदी न ठरविता सहज घडून गेले व त्यामुळे आपल्याला त्याबद्दल अपराधी वाटत नाही हे ती पुन्हा पुन्हा भास्करला सांगत रहाते. आपला नवरा म्हणून भास्कर आपल्याला अतिशय आवडतो, त्याच्यात काहीही कमी नाही पण तरीसुद्धा आपले गणेशशी संबंध आले हे अगदी स्वाभाविक घडावे तसेच घडले असे ती सांगत रहाते.
अंतर्बाह्य हादरलेल्या भास्करला आता पुढे काय करावे हेच कळत नाही. मी काहीच चूक केली नाही पण मग मला शिक्षा का करून घ्यायची, नंदिनीला शिक्षा द्यायची तर ती कशी द्यायची, मुळात तिला आपण अपराधी आहोत असे वाटतच नसल्याने शिक्षा देऊन तरी काय फायदा, तिच्यापासून वेगळे व्हावे का अजून काय करावे या प्रश्नांची उत्तरे तो शोधत रहातो.
विचार करत करत तो रात्रभर किनार्यावर बसून रहातो. समुद्राचा अथांगपणा, पृष्ठभागावरची खळबळ परंतु अंतरंगातील शांतता, असंख्य गोष्टी स्वत:च्या उदरात सामावून घेऊन सुद्धा स्वतःचे वेगळेपण हरवू न दिलेला समुद्र भास्करला वेगळाच विचार देऊन जातो.
मिलिंद बोकील हे मराठीतले एक ताकदवान कादंबरीकार आहेत. त्यांच्या "शाळा" या गाजलेल्या पुस्तकावर निघालेल्या चित्रपटानंतर "समुद्र" या दीर्घकथेवर आधारीत "समुद्र" हे नाटक खूप छान जमलेले आहे. चिन्मय मांडलेकरने स्वतःच या दीर्घकथेचे नाट्यरूपांतर केले आहे. नाट्यसंहिता अतिशय ताकदीने लिहिलेली आहे. या नाटकात दोनच पात्रे आहेत - भास्कर (चिन्मय मांडलेकर) आणि नंदिनी (स्पृहा जोशी). दोघांनी अतिशय उत्कृष्ट काम केले आहे. चिन्मय मात्र काही वेळा संवादफेकीत काहीसा लाऊड वाटतो. बरेचसे संवाद आठवून आठवून बोलल्यासारखा वाटतो. काहीवेळा ओव्हरअॅक्टिंगही वाटते. स्पृहा जोशीने मात्र संपूर्ण नाटकात उत्कृष्ट काम केले आहे. परंतु एकंदरीत दोघांनीही आपापल्या भूमिकेला पूर्ण न्याय देऊन एक उत्कृष्ट नाटक दिले आहे. नाटकाचे संगीत मात्र संहितेशी विसंगत व कर्कश्य वाटते.
हे नाटक खूपच छान जमलेले आहे. सर्वांनी एकदातरी नक्की बघावे.
सूचना - नाटक १२ वर्षांखालील मुलामुलींना बघायला परवानगी नाही. नाटकाच्या पूर्वार्धात काही बोल्ड प्रसंग आहेत. १२ वर्षांवरील मुलांबरोबर सुद्धा ते प्रसंग बघणे योग्य वाटणार नाही. केवळ पतिपत्नींनीच बघण्याचे हे नाटक आहे.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
उत्तम परीक्षण.
नाटकाची ओळख आवडली. बघण्याची
परीक्षण आवडले.
मला वाटतं या नाटकाची समिक्षा
आधीचे परीक्षण
हे आधीचे परीक्षण पूर्वी
ओह
अथांग नेत्याचे नेटके सादरीकरण
अवांतर प्रतिसादः
अतुल कुलकर्णी आणि केतकी थत्ते
हेच ते नाटक का ते माहित नाही.
हो, हेच ते नाटक .पुर्वी त्यात
ते वेगळे आणि हे वेगळे
छान आहे विषय
स्त्री करते ते नकळत संबंध..
या संदर्भात, अँटी-समुद्र
परिक्षण आवडले. बघायला जाणार.
मला मुळात "हे अगदी न ठरविता
त्यामुळे तिला अपराधी न वाटणंच
ह्म्म.. हे खूप गोंधळात
व्वा रे ! छान विचार आहेत आपले
खिक्क...आता आसूड ओढला जाणार
अहो आधी लपुन छपुनच झालं ना..?
तुम्ही चक्क एका स्त्रीला चूक
< फास्टर फेणे मोड ऑन > टॉ़क्क
तितकीही सहज घडत नाही.
-आकर्षण निर्माण होऊ शकतच.
पण कारण काहिही असलं तरी हे
पिरा तै, जे आम्ही लिहिलंय तेच
मला नक्की काय म्हणायचंय ते
मला नक्की काय म्हणायचंय ते
प्रचंड सहमत
ओके.. हे मान्य आहे की तो "च"
(अगदी आमच्या मनातलं ओळखून
दादा, मी प्रतिसादच नको का देऊ
अलिबाबा आणी चाळीशीतले चोर,
धन्यवाद!
परंतु भरत नाट्य मंदिरात हे
भरत नाट्य मंदीराचे वाईट अनुभव
परीक्षण आवडले!
मुळ कल्पनाच चुकीची वाटते
एकमेकांबद्दल संपूर्ण विश्वास ही सुखी वैवाहिक जीवनाची
नेटके सादरीकरण म्हणजे कथा
मुळ पुस्तकातील पात्रांची वयं
समुद्र
कोणता विचार ?
शेवट सांगितला तर नाटक
भास्कर टिपिकल कारखानदार
नाटकातल्या संवादातूनच हे
>>>> बौद्धिक भूक भागविण्याचा