✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

रिमझिम झरती श्रावण धारा

म
मानस यांनी
Mon, 01/14/2008 - 23:09  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5893 वाचन

💬 प्रतिसाद (6)

प्रतिक्रिया

स
सुनील Mon, 01/14/2008 - 23:20 नवीन

रिमझिमच असावे

"रिमझिम पाऊस" असाच वाक्प्रचार आहे, "झिमझिम पाऊस" असा नाही. नाच रे मोरा या गाण्यातदेखील - पावसाची रिमझिम थांबली रे... अशाच ओळी आहेत. सुमन कल्याणपूरांचे गाणे ऐकताना "झिमझिम" असे ऐकू येते? मी "रिमझिम" असे ऐकत होतो!! अवांतर - पूर्वी रिमझिम नावाचे एक कोल्ड्रींक मिळत असे. आता मिळते का ठाऊक नाही. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 01/14/2008 - 23:39 नवीन

विषयांतर ? झीम-झीम पाऊस चालू आहे.

गाण्यात कोणते शब्द आहेत हे आम्हाला माहित नाही. पण, काय झीम-झीम पाऊस चालु आहे असा शब्दप्रयोग ऐकलाय बॉ ......!!! ( खेडेगावात तर ब-याचदा झीमझीम पाऊस पडतो .....या पावसाने पार रेंदाडी होते आणि असा पाऊस ब-याचदा उपयोगाचाही असतो ) रिमझिम हा शब्द ब-याचदा कवितेत आणि गाण्यात दिसतो. सारांश :- आमच्याच चर्चेवरुन आमचे असे मत बनले आहे की, गाण्यात बहूतेक रिमझिम हा शब्द असेल !!! अवांतर :- रिमझिम आणि झिमझिम या शब्दाच्या बाबतीत पावसाच्या पडणा-या थेंबावर तर हा फरक नसेल ? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
स
स्वाती राजेश Tue, 01/15/2008 - 01:45 नवीन

मला वाटते हे गाणे असे आहे.

रिमझिम झरती श्रावणधारा धरतीच्या कलशात प्रियाविण उदास वाटे रात बरस बरस तू मेघा रिमझिम, आज यायचे माझे प्रियतम आतुरलेले लोचन माझे बघती अंधारात प्रासादी या जीवलग येता, कमळमिठी मध्ये संग भेटता बरस असा की प्रिया न जाईल, माघारी दारात मेघा असशी तू आकाशी, वर्षातून तू कधी वर्षसी वर्षामागून वर्षती नयने, करसी नीत बरसात
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 01/15/2008 - 09:07 नवीन

वा वा!

फारच छान गाणं आहे! आमचे मुक्तसुनितराव गातात हे आम्हाला माहीत नव्हतं! छुपे रुस्तुम निघाले की! ऐकलं पाहिजे एकदा त्यांचं गाणं..:) तात्या.
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Tue, 01/15/2008 - 09:26 नवीन

गाणं असे आहे.

झिमझिम झरती श्रावणधारा धरतीच्या कलशात प्रियाविण उदास वाटे रात बरस बरस तू मेघा रिमझिम, आज यायचे माझे प्रियतम आतुरलेले लोचन माझे बघती अंधारात प्रासादी या जिवलग येता, कमळमिठीमधि भृंग भेटता बरस असा की प्रिया न जाइल माघारी दारात मेघा असशी तू आकाशी, वर्षातुन तू कधी वर्षसी वर्षामागुन वर्षति नयने, करिती नित बरसात गीत - मधुकर जोशी संगीत - दशरथ पुजारी स्वर - सुमन कल्याणपूर साभार: आठवणीतील गाणी.कॉम
  • Log in or register to post comments
म
मानस Tue, 01/15/2008 - 20:03 नवीन

सर्वांना

सर्वांना धन्यवाद, आठवणीतील गाणी ह्या साईटवर 'झिमझिम' असे आहे, पण ते कितपत बरोबर आहे? अजुनही उत्तराच्या शोधात मानस
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा