अव्यक्त
कितीदा तरी रे आले होते,
खूण ओळखीची शोधत होते,
नाहीच झाली पण भेट आपली,
मी उम्बर्यातच थिजले होते.
किती जपून आणले शब्द होते,
तुझ्या ओंजळीत ते द्यायचे होते,
मौनात वेदना डोळ्यांत विझल्या,
शब्द कधीच रे निसटले होते.
किती अंतर चालून आले होते,
आता कुठे बघ विसावले होते,
दिशा साऱ्या का अंधारून आल्या,
की गावच तुझे बदलले होते.
अस्पष्ट जे मनास स्पर्शुन गेले होते,
मूर्त रूप मी त्याला देत होते,
कधीच नाही केले व्यक्त तू ज्याला,
ते अव्यक्त प्रेम माझे आयुष्य होते.
छान. पहिलं कडवं खूप आवडलं.
उंबर्यातच थिजून द्विधा
आवडलं.
छान !
निव्वळ अप्रतिम
खुप छान. .सुरेख
वा वा!
छान कविता.
आवडेश!
छान !
भावकविता मस्त आहे.
सर्वांचे धन्यवाद!