Skip to main content

बुर्जी कशी आणि कुठली आवडते + तुमचे अनुभव

लेखक पांथस्थ यांनी बुधवार, 17/12/2008 14:00 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 1457
प्रतिक्रिया 25

प्रतिक्रिया

आवडत्या बुर्ज्या कुठल्या ते सांगता येतील, कशा ते नाही कारण खालीलपैकी कोणत्याही ठिकाणची कशीही बुर्जी तेवढीच सुपरहिट असते. टॉप ३ १. शिवाजीनगर एस्.टी. स्टॅड च्या समोरच्या बोळात मिळणारी; मात्र रात्री २ नंतर मिळणारीच कुठेही नाईट आउट टाकून आलो की सीओईपी होस्टेल मधे जाण्याआधी ही बुर्जी खाणे मस्ट २. टिळक रोड वरचा अंडा राईस वाला याच्याकडे मिळणारा अंड्याचा एकूण एक पदार्थ क्र. १ असतो. येथे आम्ही कित्येक वेळा जेवण म्हणून बुर्जी खाल्ली आहे. ३. दुर्गा, कोथरुड (हो तेच फेमस कोल्ड कॉफी वालं) येथे त्यांची पुण्यातली वर्ल्ड फेमस कॉफी आणि बुर्जी यांचा आस्वाद घेत आजूबाजूंची प्रेक्षणीय स्थळे बघणे (आणि ती ज्यांच्याबरोबर आहेत त्यांचा दु:स्वास करणे व त्यांना समजून पावाचा तुकडा तोडणे) यासारखे दुसरे सुख नाही (आतापर्यंत हजारो प्रेक्षणीय बुर्ज्या पाहिलेला) खालिद आमच्या येथे सर्व जिवंत क्रिकेट सामन्यांचे दुवे मिळतील

In reply to by खालिद

खालिद, सीओईपी हॉष्टेलला लागूनच श्रीकल्प समोर 'श्री. उद्धव महाराज भुरजी सेंटर' होते. तिथली भुरजी खाल्ली का? शिवाजीनगरची चांगलीच होती पण उद्धव महाराज उधारी मान्य करायचा हो. आणि मस्त बॉडी बिल्डर होता. त्याच्या मते अंड्यातला पिवळा बलक हा बॉडी बिल्डिंगसाठी सर्वोत्कृष्ट. मात्र नंतर नंतर, रात्री त्याच्या गाडीजवळ विशिष्ट व्यवसाय करणाऱ्या स्रियांची वर्दळ वाढू लागल्यामुळे त्याच्याकडची विद्यार्थ्यांची गर्दी कमी झाली असे आठवते आपला (आवाज कोणाचा, सीओईपीचा) आजानुकर्ण विश्वेश्वरय्या

In reply to by आजानुकर्ण

>> तुमची कोणती बॅच कुठली बॅच लेकांनो ? आयला अख्खी सीओईपी जमली आहे काय इथे ???
सीओईपी हॉष्टेलला लागूनच श्रीकल्प समोर 'श्री. उद्धव महाराज भुरजी सेंटर' होते. तिथली भुरजी खाल्ली का? शिवाजीनगरची चांगलीच होती पण उद्धव महाराज उधारी मान्य करायचा हो.
+++++१, आयला हे मी कसं काय विसरलो ? एकदम झॅक्क प्रकरण होते हे, शिवाय देवा उद्धव महाराजांअक्डचा "अंडा राईस" विसरलात काय येक्स्ट्रा कांदा टाकुन ??? एकदम शॉल्लेट ...! अजुन एक होते, मंगला शिन्माजवळ, पुलाखाली , कॉर्पोरेशन चौकात रात्रीच्याला भुर्जी खाल्ली आहे काय ? ------ ( विश्वेशरय्यांच्या एफ-१०१ मध्ये १ वर्ष अनाधिकॄतपणे टेचात राहिलेला ) छोटा डॉन

In reply to by आजानुकर्ण

मी २००६ चा पास आउट (मेटालर्जी ) तुमची बॅच कोणती? सद्ध्या वास्तव्य कोठे? (बोट क्लब हीच पंढरी असणारा) खालिद

आमच्यातर्फे भरः शहर : पुणे १.पप्याची गाडी: डेक्कनचा झेड ब्रिज सुरु होतो तिथे. एकदम झक्कास भुर्जी मिळण्याचं ठिकाण...वेळ रात्री २ पर्यंत (आता मामालोकांमुळं साडेअकरा-बारालाच गाशा गुंडाळतात) हाफ-फ्राय (उच्चार:हाप्प फ्राय) देखील फर्मास...फक्त त्याला एकच सांगावं लागतं.. "पलटी मारुन नको!" :) २.जय महाराष्ट्रः शिवाजीनगर एस्.टी. स्टॅड च्या समोरच्या बोळात मिळणारी; मात्र रात्री २ नंतर मिळणारीच! पहाटे साडेचारवाजेपर्यंत चालु असायची ही गाडी, साडेचारला भुर्जीवाले काका जायचे आणि भानुदास तिथं चहाची गाडी लावायचा...हल्ली कितीवाजेपर्यंत असतं ठाऊक नाही! इथे जायचं तर भुर्जी खात खात इतका वेळ लावायचा की भानुदास येऊन पहिला चहाचा ग्लास त्यानं आपोआप आपल्यापुढं केला पाहिजे....निस्ता सर्गसुखाचा आणंद!!!! ३.एस.पी.कॉलेजच्या पार्किंगगेटापासची गाडी: "आमच्या येथे सर्व पदार्थ रिफाइन्ड तेलातच केले जातात" अशी पाटी! चव उत्तम!, अंडा-राईस खायचा असेल तर ह्या बाबाकडं जाण्याशिवाय पर्याय नाही! वेळ :शक्यतो सव्वादहा-साडेदहापर्यंतच जावे, नंतर हे संपलं ते संपलं असं ऐकून घ्यावं लागतं. ४.निगडी नाका: रात्रभर कधीही मिळते...ठीकठाक असते. ५.कात्रज डेपो: हल्ली दिसत नाही, पण पुर्वी बर्‍याचदा 'पूना भुर्जी सेंटर' नावाची गाडी असायची...ह्याची पेश्यालिटी मिरची चुरुन घातलेलं ऑम्लेट! जाळ काढायचा हो जाळ!!!!! तुर्त इतकेच आठवताहेत.

In reply to by धमाल मुलगा

जय महाराष्ट्रः शिवाजीनगर एस्.टी. स्टॅड च्या समोरच्या बोळात मिळणारी; मात्र रात्री २ नंतर मिळणारीच!
ये हुवी न बात!!! --घाटावरचे (मठ्ठ) भट आम्ही मठ्ठ असल्याकारणाने आम्हांस मराठीखेरीज इतर भाषा समजत नाहीत. क्षमस्व.

कात्रजसे निगडीतक हम सब भुर्जीयाँ खाए हुए है... | वाह वाह...| काय हा अभ्यास...| ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

निगडीपाशीच कुटं थांबता? देहुरोडः भोलेनाथ ढाबा! ह्याच्याकडेही भुर्जी मस्त मिळते... (की ती जेव्हा जेव्हा खाल्लीये तेव्हा चखणा म्हणूनच त्यामुळे 'लय भारी' लागायची कोण जाणे ;) ) आणि इकडं कात्रजकडं पुढे शिरवळला...पण जास्तवेळा नाय जाता आलं :( एका डबल भुर्जीपायी लिटरभर पेट्रोल जाळणं परवडायचं नाय तेव्हा! >>| वाह वाह...| काय हा अभ्यास...| :) त्या अभ्यासापायीच तर आमचा 'सी' ल्यांग्वेजचा पेपर लटकलेला....पण पर्वा इल्ले...भुर्जी मत्वाची..क्काय? अवांतरः "छ्या, अंड वास मारतं!" ह्याला एक मत! च्यायला, कोण आहे रे तो???? बघु का??? आँऽऽऽ चला माझ्याबरोबर, ही सगळी मतं फाट्टकन बदलतील की नाही बघा :)

एस.पी.कॉलेजच्या गाडीला भेट देणार.......

In reply to by निखिलराव

वा! असेच म्हणते.

कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकाबाहेर पूर्वी भुर्जीच्या आणि बिर्याणीच्या अनेक गाड्या होत्या, हल्लीचे माहीत नाही. त्या गाड्यांवर अपरात्री भुर्जी खाणे म्हणजे ब्रह्मानंदच!

In reply to by अनंत छंदी

काय आठवण काढलीत!!! स्टँडच्या बाहेर गाडीवर मिळणारी बिर्याणी खासच. एक काळ अनेकांचे जेवण तिथेच असायचे. माझ्या परिचयातला एक गाडीवाला तर चक्क एम. बी. ए. झालेला होता. दिल्ली राईसची बिर्याणीही खास असायची. अशाच गाड्या शिवाजी पुतळ्यापाशीही लागत असत. भुर्जीचा तर प्रश्नच नाही. कांदा परतत बसायचे ते गाडीवाले तेव्हा त्या वासानेच पोट खवळत असायचे. किमान दहा ते बारा मिनिटे कांदा खरपूस परतत असत. मग त्यात अंडे. तेवढा वेळ धीर रहायचा नाही. तिथल्या मार्केटमध्ये (महापालिकेच्या जवळ) पातळभाजी पाव मिळायचा. लिंबू बाहेरून न्यावे लागत असे. सकाळचा नाश्ता तोच.

स्थळ - मॉडेला चेक नाका वेळ - रात्री बारानंतर कधीही स्थिती - किमान तीन बियर किंवा एक क्वार्टर, कमाल कितीही Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

१. सीओईपी हॉस्टेल : तसे मुळचे आम्ही ( पुण्यात यायच्या आधी ) "कट्टर शाकाहारी" अगदी अंड्याचं नाव सुद्धा काढणे हे "अब्राम्हण्यम" ह्या सदरात मोडत होते ( एके काळी ). तर पहिल्यांदा "अंडे" ह्या पदार्थाचा चस्का लागला तो " सी ओ ई पी हॉस्टेलच्या मेस" मध्येच ... त्यामुळे भुर्जीवरचं "पहिलं प्रेम" सीओईपी हॉस्टेलच्या मेसवरच्याच ... (कॉलेजला लेक्चर करण्याचा प्रश्नच नसल्याने ) मस्त दुपारी झोपेतुन उठायचे, तोंडावर पाणी मारत साधारणता ४ च्या सुमारास मेस गाठायचीए. तिथे आधीच मेसच्या पाटील मामांना मुलांचा वेढा पडलेला असायचा, तेव्हा तिथे आपल रोल नं. सांगायची पद्द्धत होती त्यामुळे त्याचा असा पुकारा व्हायचा की एखाद्याला वाटेल की जणु "म‍टक्याचा आकडा" आत्ताच फुटला आहे व त्याचीच गडबड आहे. असो. त्या गोळातुन कसेबसे "एक डब्बल भुर्जी + बोर्नव्हिटा" ची पावती ( कधी आपल्या नावावर , कधी दुसर्‍यच्या नावावर ) जमेल तशी घ्याय्ची व रांगेत उभे रहायचे ... अंड्याच्य पदार्थांचा विभाग संभाळणारा "रमेश" २ हातांनी १० हाताची कामे करत असायचा, आपला नंबर आला की पावती द्यायची, मग तो भराभरा हाताच्या मुठीत बसेल ह्या हिशोबात कांदा, टॉमेटो तव्यावर टाकत. "रमेश थोडा कट मार " म्हणले की आपल्याकडे चकण्या डोळ्याने बघत बचकभर तीखट जास्तच पडे त्या मिश्रणात, मग एकदा मस्त रंग आला की त्यात २ अंडे फोडुन गरागरा तवा फिरवत भुर्जी कधी प्लेटमध्ये आली ते समजत नाही ... मग ती "रसरशीत थोडीशी ओली, लालसर प्लेटभर भुर्जी + लुशलुशीत ब्रेड" घेऊन एखादा कोपरा गाठायचा आणि आरामात तब्येतीत बसुन खायचे, मधुन मधुन बोर्नव्हिटाचे घोट व चवीला "भाजी खावी ह्या प्रमाणात" टॉमेटो सॉस व तोंडाचा पट्टा अखंड चालु असा "भुर्जी सोहळा"संप्पन व्हायचा .. ... आपली आधी संपली तरी काळजी नको, दुसर्‍या मित्राची ताजी ताजी आलीच असते. ( जेव्हा सगळ्या ओळखीच्या मुलांच्या ताटातल्या भुर्ज्या संपतील तेव्हा )चर्चरणार्‍या जिभेने व भरलेल्या पोतने व तृप्त मनाने हा कार्यक्रम संपायचा .... आहाहा , गेले ते दिवस. असो. २. शिवाजीनगर स्टेशन : साधारणता मध्यरात्रीचा पिक्चरचा शो संपला की म्हणजे १ ते ३ किंव गेम खेळुन बोटे दुखायला लागली की कुणाला तरी चहा प्यायची तल्लफ यायची. चहा हे फक्त निमीत्त, रात्रीचा चहा हा प्रकार "हाय टी" मध्ये मोडतो म्हणजे त्यात चहाबरोबर ओघानेच " भुर्जी , ऑम्लेट, क्रीमरोल , सिगारेट, बिस्कीटे " वगैरे प्रकार येतात. रात्री २ ला शिं. स्टेह्स्नावर जाऊन जो नुस्ता चहा पिऊन येईल त्याच्यासारखा नतद्रष्त तोच ... मग धिंगाणा करत तिकडे पोहचले की पोलीस आहेत की नाही याचा अंदाज घेत एका एकदम कोपर्‍यातल्या बोळात शिरायचे, तिथे आपल्याच कॅटेगिरीतली जन्ता आधीच पोहचलेली असते. करीम / मन्सुर ( ही त्यांची नावे ) मुरारबाजीच्या आवेशात अंड्यावर सपासप वार करत भुर्जी, ऑम्लेट्सचा खच पाडत असतो, त्याचा वासच १०० फुट लांबपर्यंत येत असतो. बोळात मधी झोपलेल्यांच्या पायावर/ अंगावर पाय न देता ढकलाढकली करत त्या गाडीपाशी पोहचायचे , कुणाला काय पाहिजे याची काडी इतकी चौकशी न करता फटाफट "४-५ भुर्ज्या, २-४ ऑम्लेट्स, एखादा हाप्पफ्राय " अशी ऑर्डर देऊन टाकायची, बाकी वर्णन वर धमाल ने केले आहेच. मग मस्त जळजळीत भुर्जी तशीच गरमगरम तोंडाला चटके बसुस्तोवर झात रहायचे, दर ही अगदी माफक , त्यामुळे काळजी नाही . मध्येच एखादा चहा-शिग्रेटीचा राउंड मारुन पुन्हा भुर्जीचा दुसरा हप्ता सुरु... साधारणता १.५-२ तास हा कार्यक्रम चालला की मग आत स्टेशनात जाऊन "ताजा पेपर " आणायचा व त्यावर चर्चा करत, शिग्रेटी फुकट जन्ता (हॉस्तेलच्या भिंतीवरुन उडी मारुन, हा एक महत्वाचा कार्यक्रम ) परत आपापल्या खोलीत गुडुप्प ... ३. पुणे स्टेशन भुर्जी : सारंजाम सगळा शिं. स्टेशनासारखाच पण जायचा वेळ आणि कारण वेगळे. कुठेतरी तो "मयखाना बंद होईपर्यंत" बसल्यावर मग शेवटी भुक लागल्याची जाणीव होते, तेथले कुक लोकं अधीच शेगड्या बंद करुन चिडीचुप्प त्या शेगडी / टेबलाला टेकुन झोपलेले असतात ... मग तसेच झुलत झुलत "पुणे स्टेशनला" यायचे, तिथे तर भुर्जीप्रेमी आणि "नाईट आऊट वीरांची" आधीच मांदीयाळी जमली असते. मग तिथे हॉस्टेलची जन्ता, लास्ट शो मारुन आलेले पब्लिक, गरिब लोकं ह्यापासुन मोठ्ठ्या मोठ्ठ्या पबात मनोसोक्त थिरकुन पोटाची भुक भागवायला (आपापल्या बॉयफ्रेंडस बरोबर ) "मर्सीडीज किंवा तत्सम महागड्या गाड्यातुन" आलेल्या ललना असा पार विसंवादी समुह असायचा ... इथे येण्याचे कारण म्हणजे "पुन्यातले लै भारी आयट्म्स आणि बिग शॉट" लोकं इकडे सर्सास पहायला मिळतात ... बाकी मज्जा तीच ... असो. तुर्तास एवढेच, बाकी सवडीने ... भुर्जी खायची .... सॉरी सॉरी ...चहा मारायची वेळ झाली ...! ------ छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

बरोबर, अंड्याचे पदार्थः आमलेट, भुरजी, हाफ फ्राय, फ्रेंच टोस्ट हे सगळे पदार्थ म्हणजे रमेशचे राखीव कुरण. मेसचे ब्रेडही फार लुसलुशीत असत. कुठून मिळत होते काय माहीत. आपला (एफ ई क्लब आणि एफ एक्स क्लब भुरजीचा चाहता) आजानुकर्ण

आमची आवडती ठिकाणे (पुणे) १. गरवारे कॉलेज जवळ, जनता सहकारि बँके लगतच्या फुट्पाथवर २. डेक्कन ला बोरावकेच्या बाजुला एक निरेचे दुकान आहे त्याच्या समोर ३. कोणत्यापण इराणी हॉटीलात (मसालेदार नसते पण वेगळी चव) ४. पुणे ठेशन च्या बाहेर कुठेपण ५. गरवारे शाळेच्या मागच्या बाजुला डेक्कन कार्नर च्या बसस्टॉप च्या आसपासचे ६. बालगंधर्वच्या जरा पुढे (संभाजी उद्यानाकडे येतांना) बसस्टॉपच्या बाजुला ७. पुर्वी विद्यापठाच्या समोर चायनीत च्या गाड्या लागायच्या तिथे बुर्जीवालेहि होते (अश्या एका बुर्जीवाल्या कडे माझे काका गेले होते, तो त्याचा पहिलाच दिवस आणि काका त्याचे पहिले गिर्‍हाईक होते. त्यामुळे त्याने काकांकडुन कधिच पैसे घेतले नाहित) काहि काहि बुर्जीवाले तळलेले मासेहि ठेवतात, ते पण मस्त असतात. - पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...

In reply to by पांथस्थ

>>डेक्कन ला बोरावकेच्या बाजुला एक निरेचे दुकान आहे त्याच्या समोर >>बालगंधर्वच्या जरा पुढे (संभाजी उद्यानाकडे येतांना) बसस्टॉपच्या बाजुला माझी पण आवडीची ठिकाणे.... --घाटावरचे (मठ्ठ) भट आम्ही मठ्ठ असल्याकारणाने आम्हांस मराठीखेरीज इतर भाषा समजत नाहीत. क्षमस्व.

भरपूर बारिक चिरलेल्या तिखटजाळ मिरच्या, भरपूर कांदा, एक जुडी ताजी मेथी, मीठ आणि अंडी. लोण्यात सगळं परतून वरून अंड फोडून घातलेली भुर्जी. मिरच्यांमुळे १-२ दिवसांची 'सोय' झालेली.

मी एकदा एका भुर्जीवाल्याकडे उकडलेल्या अंड्याची भुर्जी खाल्ली होती आणि ती सॉलीड आवडली होती. उकडलेली अंडी बारीक चिरून त्याने हा प्रकार केला होता. भुर्जीत जर कोणत्याही झणझणीत उसळीचा रस्सा टाकला तर अगदी खिम्यासारखा लागतो. जेव्हा झुणकाभाकर केंद्रे चालू होती तेव्हा भुर्जी+रस्सा हे कॉम्बिनेशन आणि गरमागरम भाकरी मनसोक्त हादडण्याचे उद्योग आम्ही केलेले आहेत

In reply to by अनंत छंदी

१. अंडे बुर्जीमधे फोडले - कच्ची बुर्जी २. उकडलेल अंडे वापरले - पक्की बुर्जी
भुर्जीत जर कोणत्याही झणझणीत उसळीचा रस्सा टाकला तर अगदी खिम्यासारखा लागतो.
हे जबरीच... - पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...

काल रात्री एस.पी.कॉलेजच्या गाडीवर जाउन आलो. मामा आणि सुनिल दोघांचे हात पटापट चालत होते, तरी पण १५-२० मी. वेट करावा लागला. पण खरंच नंबर १.

श्री स्थानक स्थळ - तलाव पाळी वेळ - रात्री नऊनंतर अकरा परयन्त ठिकाण- याकुबची गाडी. खासियत- बटर भुर्जी , बटर आम्लेट, आणि बोइल्ड मसाला अन्डा फ्राय......... वा वा वा........................................

कासवाच्या अंड्यांची बुर्जी खाल्ली आहे का कधी? (अंड्याची चव ही माहीती नसलेला) आप्पा लै मिसळ खाल्ली कि मुळव्याध होते

In reply to by अप्पासाहेब

कुठे मिळते? आपण खाल्ली आहे का?
अंड्याची चव ही माहीती नसलेला
बर बर अस्सं आहे का! - पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...

In reply to by अप्पासाहेब

कासवाच्या अंड्यांची बुर्जी हा तुमच्या मुळव्याधीला जालिंम उपाय होउ शकतो काय ?