Skip to main content

[साडीवाले]

लेखक माईसाहेब कुरसूंदीकर यांनी शनिवार, 10/10/2015 15:40 या दिवशी प्रकाशित केले.
विजूभाउंच्या 'आय्टीवाले'च्या धर्तीवर- परवा एक लेख वाचण्यात आला. त्यात साडीविक्रेते लोकांच्या रोजच्या जीवनमानाबद्दल लिहीले होते. त्यां लेखाचा मतितार्थ असा की साड्या विकणारे लोक खूप स्वच्छंद जगतात. त्याना हव्या तेवढ्या साड्या उपलब्ध असतात मात्र नशिबात वडिलांचा कोट-टाय घालण्याचे सूख मात्र नसते. एकूणातच समाजातील साडीवाले हा एक छोटा वर्ग लोकांच्या चर्चेचा नेहमीच विषय असतो. यातील काही कॉमन अभिप्राय/प्रश्न असे आहेत. तुम्हालाही असे अनुभव आले असतील्.तुम्हाला काय वाटतंय या अभिप्रायांबद्दल? लोकांच्या मते १)साडीवाले भरपूर साड्या विकतात. २) दुकानात बसून फक्त बायकांना बघायचे हेच तर नुस्ते काम असते. बाकी काय करतात? ३) गोड गोड बोलायचे यात कसले आले काम ? ४)साड्या विकणार्या लोकांकडे भरपूर साड्या असतात त्यामुळे त्यांच्या बायका पैसे कसेही उडवतात. त्यामुळे महागाइ वाढते. पटोला,कांजीवरम,मैसूर सिल्क पासून पैठणी,डिझायनर साड्यांचे दर वाढण्यामागे कारण हे साडी विक्रेते आहेत. ५) तुमची काय मज्जा आहे एकदा सकाळी एक डिझायनर साडी,लग्नाचा शालू विकला की नुसते पैसे छापायचे असतात. वर्षाकाठी पन्नास एक लाख काय सहज मिळतात तुम्हाला. ६) सगळे साडीवाले साड्या खरेदी करायला सूरतला जातात. ७)तुम्हा साडीवाल्यांमुळे सलवार-कमीझ विकणार्या दुकानदारांना धंदा मिळत नाही.. ८)साडी विकणार्या पुरुषांना कोट-टाय्,जीन्स अजिबात घालता येत नाही. ९) भारत साड्यांतील महसत्ता आहे तर आपले भारतीय साडीवाले 'ली','रॅन्गलर' इतक्या मोठे का नाहीत? इतकी वर्षे आपण फक्त साड्या का विकतो आहोत? अजूनपर्यन्त डॉकर्स्,ओल्ड नेव्हीसारखे एकही भारतीय प्रॉडक्ट आपण का बनवू शकलो नाही १०)सगळ्या परदेशस्थ भारतीय स्त्रियांनी फक्त साड्या नेसायच्या ठरवल्या तर लिवाईस्,डेनिझनचा सगळा माज एका फटक्यात उतरेल.

वाचने 14008
प्रतिक्रिया 67

प्रतिक्रिया

ट्ठो =)) =)) =)) माईंच्या ह्यांचे मत मात्र पाहिजे होते ह्यात. बाकी विडंबन तरी मस्तच जमलेय बरं का माई.

मामोऑ- छानच गं मायडे..जमलय विडंबण..बाकी तु लिहीती झालीस याचा आंनद झाला बघ..'ह्यांना'.(हलकट मेले)- मामोऑ

मस्त विडंबन माई! फक्त >>> साड्या विकणार्‍या पुरुषांना कोट-टाय्,जीन्स अजिबात घालता येत नाही. हे काही झेपलं नाही.

नवरात्री अगोदरच " अदिमाया प्रकट दिन"
माईची साडी चोळी देऊन ओटी भरा रे शतकी सत्काराला!
या बरोबरच नानुडीसाठी गुढग्यांना लावायला नारायण तेल आणि माईंसाठी खास तुळशीबागेतून सहाण आणिक छोटुसा खल-बत्ता देणे अनिवार्य आहे. खु ला से दा र आ ग्र ही मा ग णी

In reply to by नाखु

आधी नानांच्या कवळीसाठी कॉन्ट्री काढा. बोलून बोलून झिजल्यात... नविन करायच्या आहेत.

In reply to by तर्राट जोकर

नको नको.नानांची कवळी मी करुन देणार. फुकट.न झिजणारी ;) आणि कथा लिहिणार ,माईच्या साड्या नानांची कवळी.

In reply to by अजया

त्यांच्या फुजि, दादा दरेकर, हितेसभाय, काउ वगैरे मिपावासी/हेवनवासी पिल्लावळीसाठी काय लिहिणार? शतशब्दकथा?

In reply to by बोका-ए-आझम

पुस्तकाचे शीर्षक तेव्हढे न चूकता मुद्रीत शोधन करून घेणे कारण कधीकधी चुकीचा शब्द टंकल्याने गोंधळ होतो हो. ,माईच्या साड्या नानांची कवळी. आता इथे कवळीतल्या क च्या जागेवर ट पडला तर कसे होईल याचा विचार करा. सदरहू दोन्ही पुस्तकांचे पिंची मध्ये वितरणाची जबाबदारी आमची राहिल याची नोंद घेणे हि विनंती.

In reply to by नाखु

आता इथे कवळीतल्या क च्या जागेवर ट पडला तर कसे होईल याचा विचार करा.
हॅ हॅ हॅ. बोका-ए.आझमचे आभार मानताना त्याच्या नावात क च्या जागेवर च टाकू नकोस हो.!

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माईसाहेब असा खानदानी पणा सोडायचा नाही बरं.... इतके दिवस तुमचं खरंच कौतुक वाटत होतं. नेव्हर हिट बिलो बेल्ट. योर प्रतिसाद्स वेअर ऑल्वेज गिवन इन राईट स्पिरिट. नका करु असं.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

अरेरे माई! तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. पार तोडलीत इमेज आज तुमचीच!

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माईंच बेवरिंग सुटलं आहे असं म्हणवत नाही. काही काही म्हातार्‍या बायकांना अत्यंत गचाळ शिव्या देताना ऐकलं आहे. (माईंचा फ्यान), अनुप

In reply to by अनुप ढेरे

ओ माई याला रागवा! हा तुम्हाला म्हातारी म्हणतोय बघा!

In reply to by बोका-ए-आझम

नाय, नाय. शतशब्दकथा नाय काय. त्येंचे "शतडुआयडीकथा" ल्हीण्याचे प्रेत्न्य लै जोरात सुरू हैत !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

शतजन्म शोधिताना शतआयडी व्यर्थ झाल्या। शतसूर्य मालिकांच्या दीपावली विझाल्या।। ;)

In reply to by बोका-ए-आझम

त्यांच्या अल्लातालाने चाहा तो दादुस और फुजी भाईजानसाठी कवळी बनवणार.खायचे आणि दाखवायचे दात वेगळे असणारी!!

In reply to by अजया

दादुस और फुजी दोन्ही एकच असल्याने त्यांच्या "एकावर एक कवळी फुकट द्या" अश्या फसव्या मागणीस बळी पडू नये :)

माईंनी इतक्या दिवसांनी प्रतिसाद प्रतिसाद खेळायचं थांबून पहिला धागा काढला तो सरळ सरळ साडीला हात घालणारा ! =))

काहीच्या काही विडंबन. अजिबात जमलेले नाहीये! मिपाच्या महान विडंबनांच्या महान परंपरेला ठिगळ लावणारा धागा. अभ्यास वाढवा आणि लेखनाचा जर्दा उंचवा. (शंभरची सुपारी वाढवा रे. डब्बल करा. ही: ही: ही:)

In reply to by खटपट्या

ओ माई तुमचा एक फोटो डकवा ना(गडे) इथे... इचीभन... हॅहॅहॅ.. हॅहॅहॅ. ;) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- मैं तो भूल चली बाबुल का देस पिया का घर प्यारा लगे... :- सरस्वतीचन्द्र

माईंचा पहिला धागा म्हणजे इतर चर्चिल्या जाणार्‍या सर्व विषयांपेक्षा हा विषय माईंना फारच जिव्हाळ्याचा वाटत असावा.. माईंचे 'हे' साडीवाले आहेत काय? ;)

In reply to by पिशी अबोली

माईंचे 'हे' साडीवाले आहेत काय? ;)/strong> साडीवाले आहेत की नाही हे माहीत नाही. पण माडीवाले नक्कीच आहेत.

अग्गोबाई माईंनी धागा टाकला आँ!!!!!!!!!!!!!!!!! लॉगाउट करुन नेहेमीच्या अकाउंटला लॉगिन करायला विसरले काकाय णाणासाहेब.

कुरसुंदीच्या माईसाहेब साड्या घ्यायला या या। दरेकरांचे दादू तुम्ही साड्या घ्यायला या या। नाना रूपे फुजि तुम्ही साड्या घ्यायला या या। माबोवरच्या काउ तुम्ही साड्या घ्यायला या या। पूर्ण मिपा हे अलिकडं आणि डु आयडी पलीकडं। काय संमं शी वाद तो झाला आणि आयडी हेवनात गेला!

In reply to by बोका-ए-आझम

मिपाच्या गडा वाजे चौघडा वाजे चौघडा पूर्ण मिपा हे अलिकडं आणि नानुडी पलिकडं रुप दावून माई गेली स्वारी नानाची येडी झाली माईबाईचं येडं लागलं नानुडी गेला नानुडी येडपट येटपट बोलति हो दरेकर भंडारा उधळिती फुजिभाऊ पोचला गडाला हो हितेशभाय तिक्डं सापडला बोला हो कुणि बोला नानुच्या नारीला ट्रोलिंग करते मिपाला हो कुरसुंदी गावाला!!

In reply to by सूड

माईमुरळीला नाना प्रकारचे फुलथ्राॅटल वाघ्या शोधून देणं ही आता आपली णैतिक जबाबदारी हय!

साडीवाले भरपूर साड्या विकतात. २) दुकानात बसून फक्त बायकांना बघायचे हेच तर नुस्ते काम असते. बाकी काय करतात? बस इतकंच??? देवा, परमेश्वरा, या लोकांना माहित नाही ते काय बोलताहेत. त्याना माफ़ कर. गोड गोड बोलायचे यात कसले आले काम ? ४)साड्या विकणार्या लोकांकडे भरपूर साड्या असतात त्यामुळे त्यांच्या बायका पैसे कसेही उडवतात. त्यामुळे महागाइ वाढते. पटोला,कांजीवरम,मैसूर सिल्क पासून पैठणी,डिझायनर साड्यांचे दर वाढण्यामागे कारण हे साडी विक्रेते आहेत. ५) तुमची काय मज्जा आहे एकदा सकाळी एक डिझायनर साडी,लग्नाचा शालू विकला की नुसते पैसे छापायचे असतात. आमच्या दुकानाचे झाहीर निमंत्रण. प्रत्यक्ष अनुभव घेऊन खात्री करावी भारत साड्यांतील महसत्ता आहे तर आपले भारतीय साडीवाले 'ली','रॅन्गलर' इतक्या मोठे का नाहीत? इतकी वर्षे आपण फक्त साड्या का विकतो आहोत? अजूनपर्यन्त डॉकर्स्,ओल्ड नेव्हीसारखे एकही भारतीय प्रॉडक्ट आपण का बनवू शकलो नाही संपादक मंडळास् येथे एक डोके खाजवनारि (कन्फ्यूज्ड) स्मायली टाकावी, असा आदेश देण्यात येत आहे. सगळ्या परदेशस्थ भारतीय स्त्रियांनी फक्त साड्या नेसायच्या ठरवल्या तर लिवाईस्,डेनिझनचा सगळा माज एका फटक्यात उतरेल. हा हा हा. ठ्ठो. अखिल भारतीय साडी विक्रेता संघाचे अध्यक्ष हभप बाबा योगिराज. ढूसक्लेमेर:- हे वाचून कुणाला राग आला तर मिपच्या टेम्पोत बसवून, फाट्यावर नेउन पोकळ बाम्बूचे फटके देण्यात येतील.

माईसाहेब, तुमच्या "ह्यां"चं काय मत आहे लेखाबद्दल? :) सदस्यांना एक प्रश्न - माईंच्या "ह्यां"नी जर ५० शशक लिहिल्या तर लोक त्याला काय म्हणतील? . . . "हे" वर्ड्स फाईव्ह थाऊजंड :) (५० शशक म्हणजे ५००० शब्द / वर्डस आणि ते लिहिलेत "ह्यां"नी म्हणून :) )

In reply to by मांत्रिक

आरे जगाच् सापड़ना, हारावलो का काय मी???? . कुंकड़ यायच हाय समजाना. . माला एक बियर ठ्वा..... सम्पू नका.

In reply to by बोका-ए-आझम

आधि काँग्रेस आणि गांधिजी यांना इथे चर्चेत आणा , बघा श्रीगुरुजी कसे धावत येतात ते!