शेअर्स मार्केट म्हणजे काय रे भाऊ
शेअर मार्केट म्हणजे काय रे भाऊ?
छोटू आणि गोटू या दोन भावांचा संवाद
छोटू--शेअर मार्केट म्हणजे काय रे भाऊ?
गोटू--अरे शेअर मार्केट म्हणजे किनई ,एक प्रकारचा बाजार असतो,
जिथं एक माणूस तंयाचं डोकं ठिकाणावर नसल्यासारखं सतत
कांहीतरी विकत घेतो,थोड्या वेळानं तीच वस्तु डबल विकतो किंवा
त्याचया उलटहि करतो,दुसरा, तिसरा ,चौथाहि हेच करतो.ना इथं
प्रत्यक्षात कोणी माल वा पैसे रोख देतो वा घेतो.
छोटू--म्हणजे वेड्यांचा बाजार काय रे भाऊ?
जिथे एकजण म्हणतो मी ताजमहाल विकत घेतला,
दुसरा म्हणतो पण मी कुठे विकला?
गोटू--अरे नव्हे नव्हे!शेअर मार्केट म्हणजे एक प्रकारचा बाजार आहे.
जिथे बाप मुलगा सुद्धा आपापसात खरेदी विक्री करतात.
छोटू--हं हं ! म्हणजे एक मुलगा त्याच्या मित्राला म्हणतो,
“हे बघ माझ्या आजोबांचे घड्याळ “दुसरा म्हणतो ,
आजोबानी तुला बक्षिस दिले काय?पहिला म्हणतो
“नाही नाही आजोबानी त्यांच्या अंत्य समयी मला विकले.
हाच शेअर बाजार काय रे भाऊ?
गोटू--अरे नव्हे नव्हे!, शेअर बाजार म्हणजे एक खेळ असतो.जो पैसे लाऊन
खेळला जातो.जिथे कांहीं तो खेळतात,तर कांहीं माणसे त्याना म्हणतात,
तुम्ही खेळा आमही तुमचे कपडे सांभाळू,पण अखेरीस शेवटी कपडेच नाही तर त्यांची
लंगोटीहि ती माणसे काढून घेतात.
छोटू-- म्हणजे जत्रेत असतो तसा चक्री जुगार का रे भाऊ?
गोटू--अरे नव्हे नव्हे!आता तुला कसे बे सांगावे?
अरे शेअर बाजार म्णजे किनई त्यास आधुनीक भाषेत, गुंतवणूक केंद्र असेहि म्हणतात.
जिथे पैसे लगेचच दुप्पट तिप्पट होतील म्हणून लोक पैसे गुंतवतात.पण बहुतेक वेळा
त्यांचे पैसे निम्मेच होतात.तरीहि लोक पुन्हा पुन्हा तिथे पैसे गुंतवतात,खरे तर घालवत असतात.
छोटू--हे सर्व माझ्या डोक्यावरून जाते बाबा!मला कांहीं समजत नाही नीट समजाऊन सांग.
गोटू--तुला आता कसे समजाऊन सांगावे बरे?
शेअर बाजार म्हणजे एक असा बाजार आहे ,जो आपले बाबाह रोज खेळत असतात.
छोटू--हं ! हं ! इन्फोसीस ,टाटा स्टील, रिलायन्स,ईपीएस्,पीई रेशो असे म्हण नारे भाऊ !
आपले बाबा ते पिवळे वर्तमानपत्र डोळे फाडफाडून (टॉयलेट मध्ये सुध्दा) वाचत असतात, आणि
टीव्ही वर सारखे सि. एन्. बी. सी. बघत असतात,आपल्याला कार्टून किंवा सि आय्. डी. कधीच बघून देत
नाहीत तेच नां? हं ! हं ! आता आले लक्षात. ! तुला बघाचा आहे कां त्यांचा शेअर बाजार ?
चल माझ्याबरोबर,अर इकडून नव्हे इकडून.---------
(पुलंची क्षमा मागून दारू म्हणजे काय रे भाऊ या धर्तीवर)
प्रतिक्रिया
अतिशय वाईट्ट धागा
पिवळे वर्तमानपत्र???? खिक्क.
अतिशय वाईट्ट धागा
किती 'घुसलेत' ओ?