✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

नवमी

स — सूड, Wed, 10/07/2015 - 17:58
वडे घारगे पुर्‍या कधी नाजूकशा सांजोर्‍या दिंडे निवगर्‍या तूप काठोकाठी खमंग अळवड्या कधी तांदुळ कुरवड्या सुरळी पाटवड्या कधी देठीगाठी अबोली वळेसर कधी केवडा त्यावर अनंत नि तगर मोगर्‍याची दाटी असोल नारळ ओटी इंद्रायणी तांदूळ सुपारी तांबूल खण जरीकाठी जितेपणी याचा कधी केला नाही सोस आज सारे खास अविधवेसाठी

प्रतिक्रिया द्या
11322 वाचन

💬 प्रतिसाद (63)

खासच !

सस्नेह
Wed, 10/07/2015 - 18:01 नवीन
अविधवा म्हणजे अहेवपणाची का ?
  • Log in or register to post comments

होय!

सूड
Wed, 10/07/2015 - 18:49 नवीन
होय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

सुपर्ब!

एस
Wed, 10/07/2015 - 18:02 नवीन
सुपर्ब!
  • Log in or register to post comments

च्च..

जेपी
Wed, 10/07/2015 - 18:40 नवीन
च्च..
  • Log in or register to post comments

टोचली!!

जव्हेरगंज
Wed, 10/07/2015 - 18:53 नवीन
टोचली!!
  • Log in or register to post comments

प्रत्येक शब्द अगदी योग्य तोच

रेवती
Wed, 10/07/2015 - 18:55 नवीन
प्रत्येक शब्द अगदी योग्य तोच वापरलाय. कवितेचा मूड आवडला नसला तरी कविता आवडली.
  • Log in or register to post comments

जितेपणी याचा

कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 10/07/2015 - 18:57 नवीन
जितेपणी याचा कधी केला नाही सोस आज सारे खास अविधवेसाठी
टोचली.
  • Log in or register to post comments

नि:शब्द!

प्राची अश्विनी
Wed, 10/07/2015 - 19:00 नवीन
नि:शब्द!
  • Log in or register to post comments

मिपा वालो तुम्हारे प्रतिभा का

दिवाकर कुलकर्णी
Wed, 10/07/2015 - 19:05 नवीन
मिपा वालो तुम्हारे प्रतिभा का जबाब नहीं ,
  • Log in or register to post comments

___/\___

प्यारे१
Wed, 10/07/2015 - 19:05 नवीन
___/\___
  • Log in or register to post comments

त्रास करुन घेऊ नये एवढंच

प्यारे१
Wed, 10/07/2015 - 19:09 नवीन
त्रास करुन घेऊ नये एवढंच सांगतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

'अनुभव' पुन्हा वाचला.

प्यारे१
गुरुवार, 10/08/2015 - 00:52 नवीन
'अनुभव' पुन्हा वाचला. पुन्हा डोळ्यातनं पाणी आलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

नि:शब्द! शेवटच्या चार ओळी तर

मधुरा देशपांडे
Wed, 10/07/2015 - 19:08 नवीन
नि:शब्द! शेवटच्या चार ओळी तर अगदी नेमक्या.
  • Log in or register to post comments

नि:शब्द...

सतिश गावडे
Wed, 10/07/2015 - 19:14 नवीन
मन भुतकाळाच्या प्रवासाला निघाले की वाटेत कोणत्या आठवणींचे गांव लागेल आणि मन कुठे हळवे होईल हे सांगता येत नाही.
  • Log in or register to post comments

हम्म

पैसा
Wed, 10/07/2015 - 19:17 नवीन
हम्म. नेमके.
  • Log in or register to post comments

भावस्पर्शी कविता!

चांदणे संदीप
Wed, 10/07/2015 - 19:18 नवीन
भावस्पर्शी कविता! नेमकी भावना पोचवण्यात यशस्वी! 'असोल' शब्द चपखल तर 'अविधवा' शब्द अत्यंत परिणामकारक! सूड्भौ! ___/\____
  • Log in or register to post comments

___/\____

अनन्न्या
Wed, 10/07/2015 - 19:21 नवीन
___/\____ शब्दच सुचत नाहीत.
  • Log in or register to post comments

कवितेची कल्पना आणि रचना केवळ

पद्मावति
Wed, 10/07/2015 - 19:41 नवीन
कवितेची कल्पना आणि रचना केवळ अप्रतिम! कवितेचा आशय..अस्वस्थ.. निशब्द करणारा....
  • Log in or register to post comments

अस्वस्थ

प्रचेतस
Wed, 10/07/2015 - 19:50 नवीन
शब्दरचना आवडली.
  • Log in or register to post comments

आसूड!

अत्रुप्त आत्मा
Wed, 10/07/2015 - 19:50 नवीन
आसूड!
  • Log in or register to post comments

शेवटचे कडवे एकदम जबराट. मान

बॅटमॅन
Wed, 10/07/2015 - 19:58 नवीन
शेवटचे कडवे एकदम जबराट. मान गये!!!!
  • Log in or register to post comments

अशक्य अप्रतिम

टवाळ कार्टा
Wed, 10/07/2015 - 20:08 नवीन
अशक्य अप्रतिम
  • Log in or register to post comments

सुंदर !

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 10/07/2015 - 20:42 नवीन
सुंदर ! शेवटचा धक्का कवितेला वेगळ्याच उंचीवर घेवून गेला आहे !
  • Log in or register to post comments

+१

टिवटिव
Wed, 10/07/2015 - 20:55 नवीन
अनुमोदन..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

"अविधवेसाठी" ऐवजी

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 10/08/2015 - 14:01 नवीन
"अविधवेसाठी" ऐवजी "सवाष्णीसाठी" असते तर शेवटच्या ओळीचा अर्थ लावताना लागणारी छोsssटीशी ठेच चुकली असती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

+१

स्रुजा
गुरुवार, 10/08/2015 - 19:27 नवीन
+१ :( शेवटच्या कडव्यापर्यंत पत्ता लागला नाही, अस्वस्थ करुन गेली कविता तुमची. खरंच शेवटच्या कडव्याने अगदी वेगळी उंची गाठली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

छान कविता

अजया
Wed, 10/07/2015 - 21:18 नवीन
असे विचार मनात येऊन जात असतात खरे.त्यांना चपखल शब्दात पकडून कवितेत नेमकेपणाने व्यक्त झालंय.कविता आवडलीच.
  • Log in or register to post comments

कविता आवडली.

रातराणी
Wed, 10/07/2015 - 23:03 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments

अप्रतिम रे सूडक्या.

अभ्या..
गुरुवार, 10/08/2015 - 00:12 नवीन
अप्रतिम रे सूडक्या. च्यायला तुझ्या शब्दसंग्रहाला अन अचूक प्रक्शेपणाला आपला सलाम है.
  • Log in or register to post comments

खर तर अप्रतिम म्हणण योग्य

ज्योति अळवणी
गुरुवार, 10/08/2015 - 00:58 नवीन
खर तर अप्रतिम म्हणण योग्य नाही. कारण भाव आत मनात टोचले. म्हणून.... 'मनापासून दुखावून गेली ही कविता.'
  • Log in or register to post comments

सुरेख रचना !

मदनबाण
गुरुवार, 10/08/2015 - 03:25 नवीन
सुरेख रचना ! मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Ittage Recchipodham... ;) :- Temper
  • Log in or register to post comments

प्रभावी....

नीलमोहर
गुरुवार, 10/08/2015 - 10:43 नवीन
या दिवसाशी, प्रथेशी व्यक्तिगतरित्या जोडले गेल्याने जास्त दुखावून गेली. अश्वत्थामा सारखी ती ठसठसती जखम आयुष्यभर मिरवण्याशिवाय इतर पर्याय नाही..
  • Log in or register to post comments

नेमकं. छान रचना.

प्रीत-मोहर
गुरुवार, 10/08/2015 - 10:51 नवीन
नेमकं. छान रचना.
  • Log in or register to post comments

.

नाव आडनाव
गुरुवार, 10/08/2015 - 10:53 नवीन
.
  • Log in or register to post comments

...

नाखु
गुरुवार, 10/08/2015 - 11:10 नवीन
जितेपणी याचा कधी केला नाही सोस आज सारे खास अविधवेसाठी
_________________/\__________________________
  • Log in or register to post comments

प्रभावी काव्य

सौंदाळा
गुरुवार, 10/08/2015 - 13:56 नवीन
प्रभावी काव्य अविधवा नवमीलाच आल बरोबर
  • Log in or register to post comments

हे सर्व काय आहे कोणी समजावून

तर्राट जोकर
गुरुवार, 10/08/2015 - 14:05 नवीन
हे सर्व काय आहे कोणी समजावून सांगेल काय? म्हणजे आम्हालाही रसग्रहण करता येइल....
  • Log in or register to post comments

म्हण्जे नवमी, अविधवा... हे

तर्राट जोकर
गुरुवार, 10/08/2015 - 14:05 नवीन
म्हण्जे नवमी, अविधवा... हे काय कळलं नाही.
  • Log in or register to post comments

सध्या पितृपक्ष सुरु आहे.

प्यारे१
गुरुवार, 10/08/2015 - 14:13 नवीन
सध्या पितृपक्ष सुरु आहे. गणपतीनंतरच्या पौर्णिमे नंतर प्रतिपदेपासून ते अमावस्येपर्यंत. पितरं म्हणजे आपले पूर्वज यांना श्रद्धांजलि वाहण्याचा एक प्रकार. यात पितरांना जेवू घालतात. नवमी तिथीला स्पेशली ज्या स्त्रिया नवरा जिवंत असताना मेल्या त्यांचं श्राद्ध असतं. त्याला अविधवा नवमी म्हणतात. काही कारणानं या धाग्यावर कृपया अवांतर चर्चा करु नये असं वैयक्तिक मत आहे. बाकी मिपाकर सूज्ञ आहेत असा विश्वास आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

नवमी तिथीला स्पेशली ज्या

तर्राट जोकर
गुरुवार, 10/08/2015 - 14:42 नवीन
नवमी तिथीला स्पेशली ज्या स्त्रिया नवरा जिवंत असताना मेल्या त्यांचं श्राद्ध असतं. त्याला अविधवा नवमी म्हणतात.
ह्याबद्दल माहिती नव्हती. धन्यवाद! आता कळले कवीला काय म्हणायचे ते. इतरांच्या वरील सर्व प्रतिसादांमधे जो भाव आहे तो माझाही.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

हो मलाही समजले नाही.

पिलीयन रायडर
गुरुवार, 10/08/2015 - 14:26 नवीन
हो मलाही समजले नाही. कवितेची लय आवडली.. पण अर्थबोध झाला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

.

नंदन
गुरुवार, 10/08/2015 - 14:48 नवीन
...
  • Log in or register to post comments

अविधवा नवमी काय आणि पितृपक्ष काय !

विवेक ठाकूर
गुरुवार, 10/08/2015 - 19:10 नवीन
कधी बाहेर पडणार लोक या मानसिकतेतून?
  • Log in or register to post comments

फार छान. फारच...

आदूबाळ
गुरुवार, 10/08/2015 - 22:43 नवीन
फार छान. फारच...
  • Log in or register to post comments

हम्म्म..

चतुरंग
Fri, 10/09/2015 - 01:46 नवीन
नेमकी, जिव्हारी लागणारी...._/\_
  • Log in or register to post comments

खूप भावली, टोचली..काय बोलावे

खटपट्या
Fri, 10/09/2015 - 09:34 नवीन
खूप भावली, टोचली..काय बोलावे कळत नाही. एवढे प्रभावी शब्द क्वचितच वाचायला मिळतात. _/\_
  • Log in or register to post comments

सुन्न.

शिव कन्या
Fri, 10/09/2015 - 10:45 नवीन
सुन्न.
  • Log in or register to post comments

:(

मीता
Fri, 10/09/2015 - 10:47 नवीन
:( माझी आजी आठवली . खूप टोचली कविता.
  • Log in or register to post comments

नेमकं रे सूड!

किसन शिंदे
Fri, 10/09/2015 - 12:11 नवीन
नेमकं रे सूड!
  • Log in or register to post comments

कशाला रे लिहितोस असले काही?

ज्ञानोबाचे पैजार
Fri, 10/09/2015 - 14:03 नवीन
कशाला रे लिहितोस असले काही? असे काही लिहायचे असे ठरवुन लिहिली होतीस का? पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा