माज्या आज्याचा दारूचा धंदा
माजा आजा दारु कती पेत आसल ते तुमाला येगल सांगाची गरज नाय. यका गुत्तेवाल्याला फुल गब्बर करून मगच दुसर्या गुत्याव जाईल आसा परोपकारी मानूस.
यकदा आसच झिपर्या न आजा पेत बसलवत. (झिपर्या आमचा गडी हाय)
'शेट तुमी रोच्ची कती दारू पीताव ?'
'मना क म्हाईत र ? आनी कनाला मोजाची ? गल्यापातुर आली क बास कराची.' आजा
'तस नाय वो शेट, मना म्हनाच हाय क कती रुपयाची पीताव ?'
'आसा बग सकाली पीवला गांधी खिचान आसल त सांजच दोन हिरव गांधी उरतान' आज्यासचा तोंडी हिशेब.
'आर बाबा तिनशे रूपए !'
'मग ? म्हागाय कती वारलीय र . नव्वद ची यक बाटली येती. सकाल दूपार न राच्च. तीन टाईम' आजा
'आवशिद झेताव जनू'
'तर तर ! आवरा कड्क कनाला हाय मग?'
'पन मी क म्हन्तो आपल गाव पाउनशे ऊंबर्याच, घरटी यक मानुस तरी टुन होत आसल आवरेज पन्नास रुपये रोच्च धरल
तरी साडेतीन हजाराव रोच्चा गल्ला जातुय. मंग आपूनच का न टाकावा गुत्ता? पैशे बी मिलतील न दारू बी'
'धंदा कराचा ? चालल क र?' आजा आगरी आसला तरी मराटी व्हता.' पन ह्यान प्रापीट कती व्हईल र'
'त्याच आस बगा' झिपर्यान जवल येऊन आज्याचे खांद्याव हात टाकला
खाडकन गां*वर लात बसली.
'पायरीवर बस वर येव नको.' आजा फुगारला
'आवो समझुन सांगत व्हतो न्हव ' कलवलत झिपर्या बोल्ला
'त्याच क हाय सोनपाड्यान भीम्या कातकरी भट्टी लावत. त्याजेकडशी दारूच फुग हानाच. पीव्वरच. दिड हजाराला येक फुगा त्याच्यान धा बाटल्या व्हतान.'
आजान पाच मीन्ट ईचार केला
'भडव्या धा बाटलीच नवशे जाले. साशे रुपये लास?'
'ती त गंमत हाय न शेट. आवो धा च्या तीस कराच्या. शंबर टक्के प्रापीट ' झिरप्यान प्रोजेक्ट रीपोर्ट बनवला.
'आस हाय क ? तरीच तो शेट्टी आन्ना हाटीलावर हाटेल काडतं. आपून पक्का गुत्ता टाकाचा बग'
दूसर्या दीशी सकालीच सकाली दोगव नींगाले सोनपाड्याला. येक फुगा झेतला. ' नवा धंदा हाय जरा दमान झेऊ यकदा का चाल्याय लागला मग झेव पायजे तेवरी' झिपर्यान
मान डोलवली
नव वाजता गावान परत.
चींचेच्या झाडाखाली धा च्या तीस केल्या. टेबल मांडुन गूत्ता बनवला
झिपर्याला कई धीर नीगना.
'शेट गिरायकाला आपन बेस्ट माल द्याला हवा आनी बेस्ट माल द्याचा तर आदी टेस्ट कराया हवा'
आजा बी सोकवला व्हता.
पंद्रा मिन्टात दोन बाटल्या रिकाम्या केल्या.
तेवड्यात माजा बा न चुलता धडकले. कूटना खबर लागली कोनास ठाव.
'बा ह्ये बर नाय केलस. यका शब्दान बोल्ला नाईस. आमचा बा हाईस क कोन ?'
'आर सांगनारच होतू . संद्याकाली सगला गल्ला तुजे आयशीकड देनार हाय.'
'ते काय नाय. आता आमाला पीवाला पायजेल.' काशान बा कड हट्ट धरला (?)
झ्या रे पोरावु, पन सांबालुन पीवा. बा न समजुत काडली
सा बाटल्या आडव्या करून पोरांनी बा शी बट्टी केली, चार संद्याकालसाटी पार्सल केल्या न शेक्यंड करून गेले.
घा वाजले तरी गिराईक नाय. 'क कराच र झिपर्या ?'
'कशे येतील लोक ? कशे येतील ? सगली सात वाजताच जातान गुत्त्यावर. आपुन नव वाजता धंदा खोलला. मी आता जातय न आक्के गावान सांगुन येतय.' झिपर्या भेल़कांडत
पलाला.
थोड्या येलान रम्या, म्हाद्या, भीक्या न सूक्या येउन पोचले
'शेट ह्ये लई बेस केलास बग. आता आमाला लांब जाला लागनार नाय, कामाचा येक फुकट जात व्हता न.
पन यक हाय. शेट्टीआन्नाकड आमच खात व्हत. कती पीव दे पन पैशे नाय मागाचा. तु खात ठीवशील तर रोच्च तुजेकड यीउ. जमत आसन त बग.' रम्या
आजान झिपर्याकड बगीतल.
'शेट धंदा वाडवाचा आसल त क्रेडीट द्या लागतय. तर गिराईक यील.'
आज्यान मान डोलवली.
चवगांनी उदारीत धा बाटल्या मारून खात खोलल.
दुपार जाली. गिराईक नाय. परत आज्यान आनी झिपर्यान यकक बाटली पील्ली. जरा डोले जड जाले. म्हुन डुलकत व्हते येवड्यान...
थडाक.. ढूम..फटाक.. थडाक.. ढुम.. फटाक
आवाज कुटन येतोय ताच कलना. डोले जरा ऊगडले तर खाकी प्यांट न दांडके. हवालदार आपल्याला तुडीवतान ह्ये समजालाच धा मीन्ट लागली.
दम लागला म्हुन हवालदार थांबले.
'कार भडव्याउ , दारु ईकता? लायसन हाय क र? चला खडी फोराला पाटवतो तूमाला.'
हवालदारांचे पाय पडाला दोगांनाव तरास नाय झाला. खालीच लोळलेवते. नीस्ती कूस बदलली
'सायेब पाया पडतू आमाला सोडा.आमावर दया करा. ' आज्यान कस बस तोंड उगडल
सा बाटल्या पीउन हवालदारांनी आज्यावर दया केली न नीगुन गेले.
दोगव मार खाउन दमलेवते. आज्यान कायव न बोलता स्टाक चेक केला. दोन बाटल्या ऊरल्यावत्या. झिपर्याकड बगीतल. दोगांनी यकक बाटली उचलली. टाप टू बाटम.
टाईट झाले न तीतच झोपुन गेले
तीस बाटल्या संपल्या
गल्ल्यात पैशे शुन्य
टोटल लास
धंदा बंद
मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)
याद्या
34540
प्रतिक्रिया
59
मिसळपाव
आला ब्रिटीश आला
पेग
खात
जेथे प्रकाशराव तेथे खुशी.
In reply to खात by प्रकाश घाटपांडे
असंच
In reply to जेथे प्रकाशराव तेथे खुशी. by कलंत्री
मस्तच!
In reply to खात by प्रकाश घाटपांडे
भारी गोष्ट!
झिपर्याच
In reply to भारी गोष्ट! by रेवती
ही ही ही
In reply to झिपर्याच by ब्रिटिश
सावधान
In reply to ही ही ही by रेवती
कं लिवलंस रे बाला! मज्जा आली.
हलू बोल बाला!
In reply to कं लिवलंस रे बाला! मज्जा आली. by इनोबा म्हणे
:)
In reply to हलू बोल बाला! by चतुरंग
मस्तच रं बाला!
असंच
In reply to मस्तच रं बाला! by चतुरंग
असंच
In reply to असंच by कोलबेर
असंच म्हणतो
In reply to असंच by अवलिया
झकास !!
आजा तं आजा,
येक्दम
+१
In reply to येक्दम by भडकमकर मास्तर
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
+१
In reply to +१ by नंदन
+३
In reply to +१ by मुक्तसुनीत
४
In reply to +३ by घाटावरचे भट
५
In reply to ४ by धनंजय
६
In reply to ५ by सहज
७
In reply to ६ by सखाराम_गटणे™
८
In reply to ७ by विसुनाना
९
In reply to ८ by मैत्र
१०
In reply to ९ by प्रदीप
११
In reply to १० by ३_१४ विक्षिप्त अदिती
१२
In reply to ११ by शेखर
१३
In reply to १२ by खरा डॉन
य बाला
मिथन्या
आला रे आला
दादूस...
एकदम झ्याक रं बाल्या
लै भारी
++१
आमच त
In reply to ++१ by अनिल हटेला
ब्रिटिश, आत
आतापर्यंत
In reply to ब्रिटिश, आत by येडा खवीस
वाह वाह,
झकास रे
शुद्ध आगरीचा आनंद
वाचलां आनि हसुन पोट दुकलां
सुक्या
In reply to वाचलां आनि हसुन पोट दुकलां by पिवळा डांबिस
भास्करराव
कंदी बी या
In reply to भास्करराव by ब्रिटिश
>>>संगती
In reply to कंदी बी या by विसोबा खेचर
आता कळले
>>>तुम्ही
र बाल्या
बाल्या सगले जुने धागे ईस्कटना-या मित्रांन्ला थांकू
अगदी उत्तम, कसदार लेखन!!
र बाला. कुटे हाय रे तु ? कुटं
+1
In reply to र बाला. कुटे हाय रे तु ? कुटं by विजुभाऊ
हा .... हा ...... हा .......