Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by चांदणे संदीप on Fri, 10/02/2015 - 16:27
नमस्कार मिपाकरांनो! बापू आणि शास्त्रीजींच्या स्मृतीला विनम्र अभिवादन! ___/\___ चित्राविषयी: हे चित्र मी दोन वर्षांपूर्वी पेन्सिलने रेखाटलेलं आहे! तसा मी बरे चित्र वगैरे काढतो. माध्यम कुठल, कागद कुठला, पेन्सिल वा ब्रश असल्या फंदात कधी(च) पडत नाही. बरयाचदा पेनही चालतो. वही, Notepad च पानही चालत. याचं कारण म्हणजे कुठलही अधिकृत शिक्षण घेतलेलं नाही. तरी आवड आहे म्हणून एके दिवशी मनावर घेऊन दुकानातून एक चांगली मोठी चित्रकलेची वही घेऊन आलो. 'आता हे अजून एक खूळ', ह्या बायकोच्या तुसड्या नजरेला झेलत आजवर दोन पान वापरण्यात यशस्वी झालोय! त्या एका दिवशी चित्र कशाच काढू या विचारात असताना त्याच दिवशी गांधीजींबद्दल काहीतरी वाचनात आलेलं असल्याने गांधीजीच डोक्यात घोळत होते. मग त्यांच्यावरच काहीतरी काढायचं ठरवलं आणि हे चित्र साकार झाल! यातला फक्त गांधीजींचा चेहरा मी ट्रेस केलेला आहे बाकी सर्व हातानेच रेखाटलेल आहे! आज गांधीजींच्या जयंतीनिमित्त हे चित्र तुमच्यासमोर सादर करत आहे. चित्र कस वाटतय नक्की सांगा. त्यातल्या उणिवाही सांगितल्या तर बरे होईल! इथे चित्रातली बरीच जाणकार मंडळी आहेत त्यांचे मार्गदर्शन लाभल्यास मी धन्य होईन! - संदीप चांदणे
  • Log in or register to post comments
  • 5266 views

प्रतिक्रिया

Submitted by चांदणे संदीप on Fri, 10/02/2015 - 16:35

Permalink

:(

बराच वेळ खेळ करूनही मला हे चित्र इथे चिकटवता आलेले नाही. एवढा निराश/हताश मी फर्स्ट इयरला केटी लागल्यावरही झालो नव्हतो! :( ही माझी चित्राची लिंक आहे, संमंना विनंती आहे कृपया मदत करावी! फ्लिकर : https://www.flickr.com/photos/126879521@N02/21872264182/ किंवा https://www.flickr.com/photos/126879521@N02/21872264182/in/dateposted-public/ धन्यवाद!
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Fri, 10/02/2015 - 16:48

In reply to :( by चांदणे संदीप

Permalink

लिंक्स पब्लिक नाहित.

लिंक्स पब्लिक नाहित.
  • Log in or register to post comments

Submitted by चांदणे संदीप on Fri, 10/02/2015 - 16:53

In reply to लिंक्स पब्लिक नाहित. by कॅप्टन जॅक स्पॅरो

Permalink

मी आताच चेक केल

मी आताच चेक केल, पब्लिक आहे ही लिंक! माझ्या मित्रांना वगैरे पाठवून खात्रीही करून घेतली! :(
  • Log in or register to post comments

Submitted by चांदणे संदीप on Fri, 10/02/2015 - 16:54

In reply to मी आताच चेक केल by चांदणे संदीप

Permalink

दुसरया लिंक

त्या दुसरया लिंक मध्ये शेवटी
dateposted-public/
हे दिसतंय की!
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Fri, 10/02/2015 - 16:58

In reply to दुसरया लिंक by चांदणे संदीप

Permalink

तुमच्या शेअर करण्यात काही

तुमच्या शेअर करण्यात काही समस्या आहे. तुमचा फोटो फ्लिकरवर लॉगइन केल्याशिवाय दिसणार नाही (अर्थात, फ्लिकरचे सभासद नसलेल्यांना तो कधीच दिसू शकणार नाही असे दिसते).
  • Log in or register to post comments

Submitted by चांदणे संदीप on Fri, 10/02/2015 - 16:59

In reply to तुमच्या शेअर करण्यात काही by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

दिसला दिसला! :)

दिसला दिसला! :)
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Fri, 10/02/2015 - 17:02

In reply to दिसला दिसला! :) by चांदणे संदीप

Permalink

ती पद्धत येगळी हाय ;)

ती डिस्प्ले पद्धत येगळी हाय ;) मिपाकरांसाठी कायपण :)
  • Log in or register to post comments

Submitted by चांदणे संदीप on Fri, 10/02/2015 - 17:04

In reply to ती पद्धत येगळी हाय ;) by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

:)

धन्यवाद काका! :)
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Fri, 10/02/2015 - 19:08

In reply to ती पद्धत येगळी हाय ;) by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

रेखाटन मस्तं आहे हे सांगायचं

रेखाटन मस्तं आहे हे सांगायचं राहिलंच की !
  • Log in or register to post comments

Submitted by मधुरा देशपांडे on Fri, 10/02/2015 - 17:00

In reply to तुमच्या शेअर करण्यात काही by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

नाही, मी फ्लिकरची सदस्य नाही

नाही, मी फ्लिकरची सदस्य नाही पण मला दिसत होतो फोटो, लॉगइन न करता. मी नेहमीच्याच पद्धतीने टाकला.
  • Log in or register to post comments

Submitted by मधुरा देशपांडे on Fri, 10/02/2015 - 16:59

In reply to दुसरया लिंक by चांदणे संदीप

Permalink

आता दिसतंय मला चित्र. मी आणि

आता दिसतंय मला चित्र. मी आणि कॅप्टन बहुतेक एकाच वेळेस काम करत होतो असे वाटते.
  • Log in or register to post comments

Submitted by चांदणे संदीप on Fri, 10/02/2015 - 17:03

In reply to आता दिसतंय मला चित्र. मी आणि by मधुरा देशपांडे

Permalink

आभारी आहे

आभारी आहे तुमचा आणि कॅप्टनसाहेबांचाही! धन्यवाद!
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Fri, 10/02/2015 - 17:10

Permalink

आयडिया चांगलीय.

आयडिया चांगलीय. नोटेचे रेंडरिंग जमेश.
  • Log in or register to post comments

Submitted by चांदणे संदीप on Fri, 10/02/2015 - 17:16

In reply to आयडिया चांगलीय. by अभ्या..

Permalink

थ्यांकू अभ्यादादा!

थ्यांकू अभ्यादादा! एक आख्खी रात्र घालवली ती नोट काढायला! झोपच येईना पुर्ण केल्याशिवाय! आज मात्र इथे फोटो टाकताना इतका दमलोय की आताच झोप यायला लागलीये! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by शिव कन्या on Fri, 10/02/2015 - 18:18

Permalink

कल्पना चांगली आहे. अजून

कल्पना चांगली आहे. अजून चित्रे टाका. पाहायला आवडतील.
  • Log in or register to post comments

Submitted by चांदणे संदीप on Fri, 10/02/2015 - 18:36

In reply to कल्पना चांगली आहे. अजून by शिव कन्या

Permalink

धन्यवाद तर्रीताई!

धन्यवाद तर्रीताई! अहो, हे चित्रही इथे टाकण्याआधी दहादा विचार केला मी इवढी इथे खरी चित्रकार मंडळी आहेत. केवळ आजच्या दिवसाला समायोचित म्हणून हे चित्र आज इथे टाकण्याचे धाडस केले. मागे इथे कुणीतरी पुलंचे स्केच टाकले होते. कसले भारी काढले होते. खूप आवडले होते. कधीतरी हिंमत करून माझेही टाकेन!
  • Log in or register to post comments

Submitted by जव्हेरगंज on Fri, 10/02/2015 - 18:44

Permalink

नोट अगदी खरी वाटतेय...!!

नोट अगदी खरी वाटतेय...!! मस्तच.!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by मांत्रिक on Fri, 10/02/2015 - 20:47

Permalink

वा! काय खतरा नोट काढल्या!!!

वा! काय खतरा नोट काढल्या!!! मस्तच!
  • Log in or register to post comments

Submitted by चांदणे संदीप on Fri, 10/02/2015 - 21:26

Permalink

धन्यवाद!

म्हात्रेकाका, जव्हेरगंज आणि मांत्रीकजी धन्यवाद! नोट काढायला वेळ लागला पण ते काम अवघड नव्हत जेवढ, चित्र काय काढायचय हे ठरवण म्हणजेच चित्राचा विषय निवडणं! खर सांगायच तर, इतक काही चांगल काढलय अस मला नाही वाटत! पण जी कल्पना मनात आली ती निदान कागदावर उमटवू शकलो (कसाबसा) याचा खूप आनंद आहे! पुन्हा एकदा सर्वांचे आभार! ____/\____ Sandy
  • Log in or register to post comments

Submitted by विवेकपटाईत on Fri, 10/02/2015 - 21:34

Permalink

आवडले.

आवडले. बाकी गांधीचा फोटू आणि मंत्र्याची शिफारीश लायकीपेक्षा असते भारी
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभू-प्रसाद on Fri, 10/02/2015 - 22:21

Permalink

नोटेवर नंबर

नोट छान जमाली आहे. सँडी..नोटेवर नंबर रेखाटला असता तर .....
  • Log in or register to post comments

Submitted by चांदणे संदीप on Sat, 10/03/2015 - 06:09

In reply to नोटेवर नंबर by प्रभू-प्रसाद

Permalink

नोटेचा नंबर

नोटेचा नंबर मुद्दाम टाळला आहे कारण कुठल्याही प्रकारच्या कायद्याचा अजाणतेपणी भंग नको व्हायला म्हणून! प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
  • Log in or register to post comments

Submitted by द-बाहुबली on Sat, 10/03/2015 - 17:03

In reply to नोटेचा नंबर by चांदणे संदीप

Permalink

नोटेवर नंबर रेखाटला म्हणून

नोटेवर नंबर रेखाटला म्हणून कोनत्या कायद्याचा भंग होतो बरे ? अहो कला आहे ही. तुम्हाला कोणत्याही नोटेचे हुबेहुब स्केच, पोट्रेट करायचा नक्किच अधीकार आहे असे वाटते, असे चित्र केल्यावर त्यावर सही ठोकायलाही बिचकु नका.
  • Log in or register to post comments

Submitted by चांदणे संदीप on Sat, 10/03/2015 - 19:58

In reply to नोटेवर नंबर रेखाटला म्हणून by द-बाहुबली

Permalink

बरोबर आहे!

बाहुबलीसाहेब तुमच बरोबर आहे पण चित्र काढत असताना अशी शंका आली मनात आणि जास्त तपास वगैरे करत बसलो नाही, मग नाही काढला नंबर इतकेच! पण इथल्या प्रतिसादानंतर वाटतय आता की काढायला पाहिजे होता का??
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Sat, 10/03/2015 - 20:16

In reply to बरोबर आहे! by चांदणे संदीप

Permalink

जोपर्यंत तुम्ही नोटेचा प्रिंट

जोपर्यंत तुम्ही नोटेचा प्रिंट काढून चलन म्हणूण खपवत नाहीत आणि ते चित्र आहे हे दिसते आहे तो पर्यंत नोटेच्या चित्रात नंबर असायला काही समस्या नाही. नोटांच्या फोटोतही दिसतातच की त्यांचे नंबर.
  • Log in or register to post comments

Submitted by चांदणे संदीप on Sat, 10/03/2015 - 20:23

In reply to जोपर्यंत तुम्ही नोटेचा प्रिंट by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

हा..हा

खरय म्हात्रेकाका! :) पुन्हा कधी नोट काढलीच तर नंबर नक्की काढीन! हाकानाका! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by द-बाहुबली on Fri, 10/02/2015 - 22:47

Permalink

मस्तच.

मस्तच.
  • Log in or register to post comments

Submitted by चौथा कोनाडा on Sat, 10/03/2015 - 08:07

Permalink

आवडली कलाकृती ! कल्पनाही

आवडली कलाकृती ! कल्पनाही सुरेख ! नोट जबरदस्त जमलीय. एकंदरीत तुम्ही भारी कलाकार दिसताय ! मिपा-दिवाळी अंकातही तुमची चित्रे जरुर द्या. ! << बघा, फॅन तयार व्हायला लागले इथे :-) >>
  • Log in or register to post comments

Submitted by चांदणे संदीप on Sat, 10/03/2015 - 20:02

In reply to आवडली कलाकृती ! कल्पनाही by चौथा कोनाडा

Permalink

धन्यवाद!

चौथा कोनाडा, धन्यवाद! असे काही (मिपा भाषेत) "चान चान" प्रतिसाद मिळतील अशी आजिबात अपेक्षा नव्हती! पण दिवाळी अंक वगैरे... मला नाही झेपणार!
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Sat, 10/03/2015 - 08:44

Permalink

मस्त...

मस्त...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Once Again - 2011 :- Hang Massive
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Sat, 10/03/2015 - 08:55

Permalink

मस्त हो...

कला आहे तुमच्या हातात.
  • Log in or register to post comments

Submitted by नीलमोहर on Sat, 10/03/2015 - 16:49

Permalink

कल्पना छान..

नोटेवरील एवढं अवघड डिझाईन हाताने काढलेलं असेल तर __/\__
  • Log in or register to post comments

Submitted by चांदणे संदीप on Sat, 10/03/2015 - 20:09

In reply to कल्पना छान.. by नीलमोहर

Permalink

नीलमोहर ____/\____

हो ती नोट हातानेच काढली आहे आख्खी! प्रतिसादाबद्दल धन्यवाद! सर्वांसाठी: इथे बहुतेक जणांना नोट आवडल्याचे नोट केले आहे. त्याचा आनंद आहेच पण चित्राचा विषय आणि त्यातील चुका किंवा सुधारणा याविषयीही चित्रातलं कळणा-या मंडळींकडून मार्गदर्शन/सल्ला/टिप्स अपेक्षित होत्या आणि आहेत! बरेच बोलायचे आहे, सांगायचे आहे, विचारायचे आहे पण ऐनवेळी शब्द सुचत नाहीत"
  • Log in or register to post comments

Submitted by नीलमोहर on Mon, 10/05/2015 - 16:31

In reply to नीलमोहर ____/\____ by चांदणे संदीप

Permalink

तुमचं चित्र आणि विषय दोन्ही वेगळे आणि छानच आहेत,

तरीही विचारत आहात तर काही बेसिक गोष्टी असतात जसे की, चित्रातील विषय (फोकल पॉईंट) प्रामुख्याने समोर यावा आणि तो पुरेसा सुस्पष्ट असावा. चित्राचं alignment, position, size, clarity, sharpness या गोष्टींकडे लक्ष असावं. मुळात गांधीजी त्या नोटेवर असण्याबद्दलच आमचे दुमत आहे त्यामुळे इतर गोष्टींबाबत पास. (चित्रातलं मलाही फार काही कळत नाही, डोकं आणि डोळे वापरून थोडंफार काम चालून जातंय एवढंच.) याच चित्रात फटाफट थोडे बदल केलेत, फरक वाटत आहे का सांगा.. Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by चांदणे संदीप on Mon, 10/05/2015 - 17:16

In reply to तुमचं चित्र आणि विषय दोन्ही वेगळे आणि छानच आहेत, by नीलमोहर

Permalink

नीलमोहर :)

तरीही विचारत आहात तर काही बेसिक गोष्टी असतात जसे की, चित्रातील विषय (फोकल पॉईंट) प्रामुख्याने समोर यावा आणि तो पुरेसा सुस्पष्ट असावा. चित्राचं alignment, position, size, clarity, sharpness या गोष्टींकडे लक्ष असावं.
नोटेड! चित्रातला तुम्ही केलेला बदल आवडला! फक्त ती ओळ तुम्ही लिहिलेली सरधोपट वाटतीये. धन्यवाद! Sandy
  • Log in or register to post comments

Submitted by नीलमोहर on Mon, 10/05/2015 - 17:22

In reply to नीलमोहर :) by चांदणे संदीप

Permalink

:)

ते लिहायचं म्हणून लिहीलंय, केवळ तुमच्या चित्रात आहे म्हणुन ठेवलंय एवढंच, त्यामागे काहीही भावना नाहीत म्हणून असेल.
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Sat, 10/03/2015 - 16:55

Permalink

मस्तच जमलंय!

मस्तच जमलंय!
  • Log in or register to post comments

Submitted by बबन ताम्बे on Mon, 10/05/2015 - 17:51

Permalink

नोट छान जमलीय.

नोटेसाठी मेहनत घेतल्यचे दिसतेय. हुबेहुब आलीय. गांधीजी स्पष्ट दिसत नाहीत. बाकी निलमोहर यांच्याशी सहमत. पुढच्या चित्रांस शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

Submitted by चांदणे संदीप on Mon, 10/05/2015 - 18:42

In reply to नोट छान जमलीय. by बबन ताम्बे

Permalink

धन्यवाद...

धन्यवाद बबन ताम्बेजी! तुमची चित्रे पाहिली आहेत मी. खूपच आवडलीयेत. त्याबद्दल काही बोलण्याइतकही मी काही कमावलेलं नाही अजून. चित्र पाहून बहुमुल्य प्रतिसाद दिल्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद! Sandy
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com