Skip to main content

आपण नक्की कोठे चाललो आहोत?

बुधवार, 30/09/2015 या दिवशी प्रकाशित केले.
गेली काही वर्षे पर्यावरण, हवामान, हरित गृह परिणाम, ऋतुमानातील अनियमितता, जल/ वायू/ अन्न प्रदूषण इ. विषयी आपण ऐकत आहोत आणि संपूर्ण जगात एक मोठा वर्ग या विषयी अतिशय गंभीर असून या विषयी सतत जागृती करीत असतो. कारण याचा थेट परिणाम पृथ्वीवरील समस्त जीवमात्रांवर होणार आहे. याला संपूर्णपणे जबाब्रदार मानव जात असून आपल्या येणाऱ्या पिढ्या कदाचित आपल्याला यासाठी कधीच माफ करणार नाहीत. भारतामध्ये केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, विविध NGO , विचारवंत, शास्त्रज्ञ या विषयी प्रबोदन करीत आहेत तसेच वेगवेगळे कायदे, नियम, मानके, शिक्षा यांच्या तरतुदी सुधा आहेत. पण एकूणच या विषयाचा जितका व्हावा तितका गंभीर विचार आणि कृती या विषयी भारतात आणि बहुतांश जगात फारशी होताना दिसत नाही. नाही म्हणायला प्रगत राष्ट्रांमध्ये बहुतांश नागरिक तिथल्या सरकारने, स्थानिक प्रशासनाने आखून दिलेल्या नियमावलीचे पालन करताना दिसतात याचे कारण त्यांना मिळालेले बाळकडू आणि जागरूक असलेले तिथले प्रशासन. नोकरी निमित्त या विषयाशी बराच संबंध आला. मध्यपूर्वेत , युरोपात विविध प्रकल्पांवर काम करताना हा विषय प्राधान्याने समोर आला. याविषयावरील तज्ञ मंडळींचे विचार, व्याख्याने ऐकायला मिळाली, या अनुषंगाने बऱ्याच चर्चा हि घडल्या. आजकाल भारतातही काही प्रमाणात या विषयी जागरूकता येताना दिसते आहे. एकूणच हा प्रकार फारच गंभीर आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि विज्ञान एका बाजूने प्रगती करत असतांना त्याचे होणारे दीर्घकालीन दुष्परिणाम टाळू शकत नाहीये. पण त्याहूनही भयंकर आणि गंभीर प्रकार हा आहे कि या उत्पादनानामधून आणि संशोधनामधून येवू घातलेले अनेक गंभीर दुष्परिणामांची कल्पनाच सर्वसामान्यांपर्यंत पोचविली जात नाहीये. अर्थात आज एकूणच सगळे तंत्रज्ञान, उत्पादन आणि संशोधन हे व्यवसायाभिमुख ( commerce centered) असल्याने मुख्य उत्पादन हे "डंके कि चोट पर" जाहिरातबाजी करून जगभर खपवले जाते ( त्याचे दुष्परिणाम उघड न करता.) आणि प्रत्येक गोष्टीची तांत्रिकता आपल्याला माहिती नसल्याने आपण काही प्रश्नही विचारू शकत नाही. याशिवाय अजून एक मोठी मानसिकता आपल्याकडे दिसून येते ती म्हणजे म्हणजे प्रगत राष्ट्रांकडून जे जे आलं ते म्हणजे अत्यंत शुद्ध, अद्ययावत आणि उच्चतम असणारच. आपले राजकारणी आणि राज्यकर्ते या विषयी कितपत जागरूक आहेत या विषयी शंकाच आहे. तसेच गेल्या काही दशकातील एकूण आंतरराष्ट्रीय व्यापार संबंधी करार आणि घडामोडी पाहिल्या तर (प्रगत) आंतरराष्ट्रीय समूहाचे प्रचंड दडपण ( त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी) आपल्या सरकारवर आहे आणि ते आपण झुगारून देवू शकत नाहीये हे स्पष्ट दिसते आहे. . असो हा मुद्दा वेगळा आहे. आधुनिक मानवाने वैज्ञानिक प्रगती करताना अत्यंत गंभीर भविष्याला जन्म दिलेला आहे. आधुनिक यन्त्रिकिकरणचे युग सुमारे ३०० वर्षापूर्वी सुरु झाले असं मानूया. जागतिकीकरणाचे युग कदाचित तेव्हाच सुरु झाले असावे. पण विशेषतः गेल्या ७०- ७५ वर्षात जगभरात विज्ञानाने ज्या वेगाने मुसंडी मारली आहे ती पाहताना समस्त मनुष्य जमात थक्क झाली आणि त्याचे कौतुक करण्यात गुंग झाली, इतकी कि हे होतांना या सर्वाचे दुष्परिणाम आपल्याला दिसलेच नाहीत. (माझ्यासारख्या १९६०च्या दशकाच्या उत्तरार्धात किंवा ७०च्य सुरवातीला भ्हारतात जन्मलेल्या पिढीने विज्ञानिकारणाचा हा टप्पा खूप जवळून पहिला आहे.) अति महत्वाकांक्षी व्यावसायीकारणाने हे सर्व दुष्परिणाम हेतू पुरस्सरपणे तसेच पुरेशा अभ्यास आभावी दुर्लक्षित केले. आज आपण सर्व ( मानव) या व्यावसायीकरणाचा एक भाग आहोत आणि या मार्गावर इतके पुढे आलो आहोत कि आता परत फिरणे अशक्य आहे. रासायनिक औषधे, जंतुनाशके, कीड आणि कीटक नाशके, रासायनिक खते, प्लास्टिक, संगणक कचरा, स्वयंचलित वाहने, विद्युत निर्मिती, जंगल तोड यातून झालेला हरित गृह परिणाम, रासायनिक कचऱ्याच्या विल्हेवाटिचा प्रश्न या सर्वातून झालेले जल वायू आणि जमिनीचे प्रदूषण, जमिनीचे नपिकेपण, अन्नधान्यात मिसळलेलि रसायने, यासार्वांवर कडी म्हणून जैवतान्त्राज्ञानातून निर्माण झालेले जेनेटिकली मोडीफायीड अन्नधान्य प्रजाती, मांस निर्मिती तसेच दुग्ध निर्मिती साठी निर्माण केलेल्या संकरीत प्रजाती, या सर्वांमुळे आणि यांच्या संक्रमणामुळे आपोआप निर्माण होणार्या किडी, विषाणू, जीवाणू आणि रोग, हवामान बदल हे आपण कसे नियंत्रित करणार आहोत? आपल्याला जे तंत्रज्ञान दिसते तेच सगळे नाही कारण प्रगत राष्ट्रांमध्ये असणारी महाभयानक सत्तास्पर्धा अजून भयंकर संशोधनाला जन्म देत आहे. अत्यंत वेगाने विकसित होणारे कम्युनिकेशन तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान, इलेक्ट्रोनिक्स आणि मेकॅनिकल तंत्रज्ञान भयन्कारी आयुधं आणि शस्त्रांना विकसित करत आहे जी अजून जगासमोर आलेलीही नाहीत. क्लोनिंग, सायबोर्ग, स्वतः शिकणारी ( सेल्फ लर्निंग) आणि त्यातून स्वतः एकटेपणाने निर्णय घेवू शकणार्या यंत्रमानवांच्या विकसिकारणात मिळत असलेले यश पाहता काही वर्षात मनुष्य जातीवर The Matrix, Terminator , सारखी परिस्थिती मानव जातीच्या विनाशाचे करण बनेल, का पर्यावरणाचा संपूर्ण ऱ्हास होवून अखिल जीव मात्र संपुष्टात येतील? मानव जातीचा इतिहास काही लाख वर्षांचा आहे असं गृहीत धरलं तर ज्या विज्ञानाचे गोडवे गात आपण मोठे झालो तेच विज्ञान येत्या काही शे वर्षात संपूर्ण पृथ्वीवरील प्राणीमात्रांचा नायनाट करेल? हे सगळंच आता आपल्या नियंत्रणा बाहेरचं दिसतंय. तुम्हाला काय वाटते? आज पासून ५०-१०० -२००-३०० वर्षांचा फक्त विचार केला तर मानवी जीवन कसे असेल? पृथ्वीवरील इतर प्राणिमात्रांची आणि पर्यावरणाची काय परिस्थिती असेल?

वाचने 4872
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

बाप रे! दणका दिलात एवढंच बोलेन! फार निष्काळजी आहोत आम्ही! हे अंजन चांगलंच झोंबणारे आहे.

In reply to by मांत्रिक

मी एक सामान्य माणूस! एक वचन देतो की उद्यापासून प्लॅस्टीक पिशवी मागणे बंद! घरची कापडी पिशवीच वापरणार! किमान हे तरी करु शकतो!!!

धागाप्रसृताने अतिशय गहन विचार मांडला आहे. लेखकाने फारच अभ्यास करुन विवेचन केले आहे. मला तरी डोळ्यासमोर फक्त अम्धार दिसु येतो.. फक्त अंधार... पुढच्या पिड्या आता आपणाला कधीही माफ करणार नाहीत... कट्।ओर शिक्षा देणार :( हे आकाशातल्या देवा धाव....

सायबोर्ग म्हणजे काय? माणूस २००/३०० वर्षात कदाचित अन्य ग्रहावर वस्ती करेल, निसर्गाकडे सेल्फ करेक्टिग मोड असेल शास्त्रामुलं होणारी प्रगती कि अधोगती कशी रोखणार? टक्कुर जाम चालत नाही

In reply to by दिवाकर कुलकर्णी

माणूस २००/३०० वर्षात कदाचित अन्य ग्रहावर वस्ती करेल हा असला भारी विचार बरेचदा मलाही पडतो. सोबत तो दिवस बघायला कदाचित आपण जिवंत नसणार याचेही वाईट वाटते. पण मग वाटते किती जण जातील, कितींना परग्रहवारी परवडेल.. उरलेले कित्येक लाचार या पृथ्वी नामक तेव्हाच्या दलदलीत खितपत पडतील.. माझे वारस वंशज माझे नाव घेऊन तिथे जातील की इथेच संपुष्टात येतील..

सायबोर्ग हि एक साय-फाय संकल्पना आहे. त्याचे बरेच अर्थ आहेत. उदा. अर्धा यंत्रमानव अर्धा माणूस. असे सायबोर्ग बनवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. नुकतेच ( अर्थात) यु एस ए मध्ये शास्त्रान्यांच्या एक चमूने काही वनस्पति, बुरशी च्या जिवंत पेशी आणि काही इलेक्ट्रोड तसेच इलेक्ट्रोनिक सेन्सर बरोबर दि फ्युज करण्यात यश मिळवले आहे. इंजेक्शन च्या साह्याने अशी सायबोर्ग उती ( tissue ) प्राण्याच्या शरीरात सोडता येते म्हणे. तसेच मानवी आणि काही कीटकांच्या नर्व्हज मध्ये न्यानो ( अतिशय छोटे) इलेक्ट्रोड घुसवून बाह्य इलेक्ट्रोनिक यंत्रणा वापरून प्राण्याच्या हालचाली किंवा प्रतिक्रिया काही प्रमाणात नियंत्रित करण्यात यश आहे आहे. यातला दुसरा प्रकार म्हणजे काही इलेक्ट्रोनिक चीप शरीरात (मज्जा तंतुंवर) बसवून बाह्य जगतातील काही यंत्रणा मेंदूच्या साह्याने ( विचाराने) नियंत्रित करण्यातही यश मिळाले आहे. ( उदाहरणार्थ बिनतारी संदेश पाठवून दिवे चालू बंद करणे, एल इ डी चे रंग बदलण्याचे आदेश देणे वगैरे.) आज यंत्रांची कृत्रिम बुद्धिमत्ता, निर्णय क्षमता , चाचण्यातून/ प्रयोगातून मिळालेले अनुभव लक्षात ठेवून योग्य ते घेणे आणि त्याचा वापर पुढच्या चाचणीत/ प्रयोगात किंवा कामात करणे तसेच या यंत्रांनी आपले अनुभव (चाचण्यातून/ प्रयोगातून मिळालेले) एक मेकांबरोबर शेअर ( data / results ) करणे वगैरे अल्गोरिदम लिहिण्यात ( आणि अश्या प्रकारची यंत्रे बनवण्यात) मानवाने सहज यश मिळवले आहे. जेव्हा असे तंत्रज्ञान आणि सायबोर्ग तंत्रज्ञान एकत्र येईल तेव्हा त्यांचा वापर मानवी प्रगती पेक्षा विनाशासाठीच जास्ती केला जाईल असा विचार मनात येतो. करत हे सगळे प्रयोग संरक्षण नि आयुध यंत्रणा केंद्रित आहेत. कॉलेज मध्ये असताना संगणक हाताळायला मिळणे म्हणजे कोण पर्वणी वाटायची. DOS पद्धतीवरील काळे पांढरे स्क्रीन असलेले संगणक. बेसिक, फोर्ट्रान पासून सुरु करून पास्कल ते C ++ चे काही अल्गोरिदम इतकाच भाग अभ्यासक्रमात असायचा. आपले काम साठवण्यासाठी चुंबकीय तबकड्या (९० मिमी x ९० मिमी आकाराच्या, जास्तीत जास्त २.८८ MB इतकी प्रचंड(!) साठवण क्षमतेच्या floppy disk ) असायच्या. ६४/ १२८ MB RAM असलेले संगणक म्हणजे जादूचे पेटारे वाटायचे. आज जे तंत्रज्ञान सांभाळतोय त्याच्या तुलनेत हे अगदीच म्हणजे अगदीच प्राथमिक होते. आणि हे सगळे फक्त २५ -२६ वर्षांपूर्वी. या वेगाने अजून जेमतेम १५० ते २०० वर्षानंतर तंत्राद्नाय्नाची काय परिस्थिती असेल? मानवी समाजाची काय अवस्था असेल , सुधारत जाणारे तंत्रज्ञान आणि खालावत जाणारे पर्यावरण यांची काय परिस्थिती असेल याची खरच कल्पनाच करवत नाही.