Skip to main content

ठाणे ' मिपा ' कट्टा ( २ )

लेखक श्रीयुत संतोष जोशी यांनी मंगळवार, 16/12/2008 11:20 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, आपण सर्वांनी जो भरघोस प्रतिसाद दिलात त्याबद्दल प्रथम मी आपला आभारी आहे . त्यामुळे आता हा येणारा ' मिपा ' कट्टा अतिशय यशस्वी होईल यात शंका नाही. स्थळ : 'लक्ष्मी केशव कार्यालय' प्रताप सिनेमा समोर ; कोलबाड रोड ; खोपट ठाणे (प.) सर्वांनी दुपारी ४.०० पासून जमावयास सुरूवात करावी पण ५.०० पे़क्षा जास्ती उशीर करू नये ही विनंती . कट्ट्याला वेळेचे बंधन नसेल. जेवणात सामिष आणी निरामिष अशा दोन्ही पदार्थांचा अंर्तभाव असावा का ? याबद्दल आपले मत द्यावे. अन्य काहीही प्रश्न असल्यास तसेच येण्याचे नक्की आहे हे कळविण्यासाठी पुढील क्रमांकावर संपर्क करावा. संतोष जोशी ९८२०० ६२१३३ तात्या अभ्यंकर ९८२०४ ९४७२० हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

वाचने 2654
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

सगळे पदार्थ असावेत. मजा येयील. ---- सखाराम गटणे

सगळे पदार्थ असावेत. मजा येयील.

पदार्थ सगळे असले तरी ते अन्ननलिकेतून खाली उतरण्यासाठी वंगणाची व्यवस्था असेल काय, हा प्रश्न आहे! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

आपले वंगण आपल्याबरोबर असते. पेठकर काकाना विचारा. त्याना माहित आहे.

In reply to by विनायक प्रभू

आपल्या पापात मला भागीदार करू नका ही नम्र विनंती. निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!

अरे सहि ना!!!!!!!!!!! नक्की येणार......... फक्त जेवणचं?????????????????????

पुढ्च्यावेळी आम्हि देखिल येवू.....

येवां !!!! कट्टा आपलाच असां. ५.०० चे ६.०० वाजले तरी चालतील. फक्त सगळे वेळेत जमले म्हंजे जास्ती मजा येईल एव्हढंच . मी लिहिलेच आहे की कट्ट्याला वेळेचे बंधन नाही. हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.