अर्ध्या तासापूर्वी online चतुरंग किंवा लोकरंग मध्ये मकरंद अनासपुरेचा एक लेख वाचताना माझ्या मनात जो विचार आला तो मी आता आपल्या सर्वाना सांगू इच्छितो. खर तर नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे हे चांगले अभिनेते आहेत किंवा नाहीत हा आजचा विषय नाही. पण दोन हजार किमी अंतरावरून मी जेंव्हा त्यांच्या नाम फौन्डेशन च्या कामाविषयी वाचतो तेंव्हा मला आपणपण आपल्या राज्यातील दुष्कालग्रस्तासाठी मनापासून काही तरी मदत नक्कीच करू शकू असे वाटते .
कालच माझ्या एका सहकाऱ्याचा वाढदिवस होता. सात जणांचे पूर्णपणे शाकाहारी जेवणाचे बिल रु २२०० झाले . देणारालाही फार काही वाटले नाही व कदाचित मलाही फार काही वाटले नसते. आपण सर्वजण सुशिक्षित व बर्यापैकी सुस्थितीत आहोत. पण विदर्भ व मराठवाड्यातले तरणे तांड शेतकरी अवघ्या ४०-५० हजारासाठी आपले जीवन अकाली संपवत आहेत. खरेच आपल्या संवेदना मेल्या आहेत काय ? आपण या शेतकऱ्यांना मानसिक व आर्थिक मदत देवू शकतो का ?
मिपा कटुंब खूप मोठे आणि विचारी पण आहे. या सूचनेला आपण नक्कीच आणखी फाईन ट्यून करू . मदत द्यावयाची का? कशी? म्हणजे नाम फौन्डेशन की मुख्यमंत्री निधी? का इतर काही जास्त समर्पक पर्याय आहे ? हा सर्व साधक बाधक विचार आपण करूच .
आणि हे आपण सर्व काही प्रसिद्धी किंवा अगदी आयकर सवलतीसाठी सुद्धा करणार नाही .
आपण सर्वजण (डू आयडी सोडून अंदाजे ५००० जण) आपला दोन दिवसांचा पगार याकामी देवू शकतो का ? मी स्वतः काही रक्कम (२ ते ३ हजार रुपये ) देवू शकतो.
सहानुभूती नको , आपण काहीतरी करू .
अशा कामामधील जाणकार व्यक्तींना कार्य पूर्णत्वास नेण्यास मदत करण्याची आग्रहाची विनंती.
याआधीच असा काही विचार मिपा वर झाला असेल तर कृपया माहिती कळवावी .
संपादकीय डिस्क्लेमरः सदर धाग्यातील आवाहन हे लेखकाचे स्वत:चे असून मिसळपाव.कॉमचा त्यात काहीही संबंध नाही किंवा सहभागही नाही. केवळ चर्चेसाठी मंच उपलब्ध आहे. आर्थिक व्यवहार सदस्यांनी आपापल्या जबाबदारीवर करावेत. मिसळपाव.कॉम त्यासंदर्भात कुठल्याही व्यवहाराला जबाबदार राहणार नाही.
वाचने
5048
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी १००० तरी करू शकतो.
मदत जरूर केली पाहिजे
मा. प.
>>> मला स्वताला मुख्यमंत्री
In reply to मा. प. by दा विन्ची
प्यारेजी व इतर,