एक होती रातराणी
त्याच असं झालं kvitaa लिहली आणि नावच सुचतं नव्हतं. मग तरी घाई घाईत तशीच चिकटवली. काही वेळाने बघितलं तर वेल्लाभट म्हणाले पहिल्याच कडव्यात यमक चुकलंय. अर्रर झालं एकदम! तस आम्ही निमित्त शोधतचं असतो हवापालट करून यायच! आता ही आयती संधी का सोडा म्हणून आम्ही सध्या "ताण" मुक्त होण्यासाठी "एक ब्रेक घेतलाच पाहिजे" या निष्कर्षाप्रत पोचलो आहे. तर ही जिलबी वाचून कुणालाही ताण आल्यास तुम्हीही घ्या एक ब्रेक. काय म्हणता पाल्हाळ वाचूनचं आला ताण. बर सॉरी बरं का. तरी आई सांगत असते माणसाने कसं नेमकं बोलावं. कधी जमेल काय माहिती! थांबाव आता नाहीतर जनांतल मनातलं मधे हाकलतील मला. ( नॉट दॅट इट इज बॅड... अर्रर ताण हो ताण) तर घ्या जिलबी गोड मानून. लोभ असू दया आमची मुक्ताफळं वाचल्यावरही.
त्याच काय झालं आज पहिल्याच कडव्यात यमक चुकलं
जमून आलेल्या बेतात मीठ जरा कमी पडलं
घाई झाली? लक्ष नव्हत? बेक्कार चीरफाड़ करून झाली.
आरोपी मीच!पोलीस मीच! आई म्हणते तुझी झोप नाही झाली?
ताणून द्यावी मस्त आता खरच आलाय शीण
इथे कसली झोप यायची? अनिवार्य आता गावी जाण!
हवापालट आता हवाच आहे थकलेल्या मनाला,
खूप काही सांगायचंय कुशीत शिरून आजीला
फडताळांत अजून आजी बघायचय ठेवते का पाव
चहात बुडवून खाताना विसरायची आहे प्रतिक्रियांची हाव
साध सरळ काम, व्यक्त कुठेतरी व्हायचं होतं
तेच करताना मग का बरं खोल काही रूतत होतं
आभासी जगात ह्या, ना कुणाशी ओळख ना मैत्री
आज बोलले म्हणून उद्या बोलतील याची नाही खात्री
अखंड बडबड करणार्या मला झेपत नाही इथली शांतता
आजी माझी बेस्ट आहे कळली नाही कविता तर विचारते भाकरी येतात का थापता?
काही म्हणा तुम्ही आज येतेय आजीची आठवण
हवापालटासाठी आता अनिवार्य आहे गावी जाण
नाहीच झालं येणं परत तर सांगाल ना माझी कहाणी
साधीसोपी आहे नाव तिच एक होती रातराणी
वा वा वा!
Haha...chhaanach.
जिल्बी गोड आहे आजीच्या मायेची
स्नेहा ताई +++१११
होती वगैरे म्हणू नका हो!!!
+1
नाही हो जात :) उग्गीच आहे ते
अटेन्शन सीकिंग?
कविता आवडली +
सर्वांचे धन्यवाद!
मस्त लिहिलीय
ताई/भाऊ
आवडले 'रॅण्डम' विचार !!
.
साधीसोपी गोड कविता .
सरळ साधी सोपी मांडणी ....छान
आता ही आयती संधी का सोडा
आधीचे आम्ही हे आदराथी बहुवचन
_/\_ धन्यवाद!
आगे नही पिछे नाही मधेच
फारच बारीक वाचू र्हायले माय
येती कवा कवा हुक्की राणीसारखं