Skip to main content

बाप्पाचा नैवेद्य : रोझ कलाकंद

लेखक सानिकास्वप्निल यांनी गुरुवार, 24/09/2015 02:49 या दिवशी प्रकाशित केले.
. साहित्यः २२५ ग्रा. ताजे पनीर, किसलेले १ कंडेन्स्ड मिल्क टिन ( मी ३/४ वापरला, आपल्या चवीप्रमाणे प्रमाण कमी-जास्तं करावे) २ टेस्पून रोज सिरप (रंग आणि चवीसाठी) १/२ टीस्पून पिस्तापूड १/२ टीस्पून वेलचीपूड पिस्त्याचे काप सजावटीसाठी . पाकृ: नॉन-स्टीक पॅनमध्ये पनीर व कंडेन्स्ड मिल्क एकत्र करावे. मिश्रण मध्यम आचेवर सतत ढवळत रहावे. १५-२० मिनिटांनी मिश्रण थोडे दाट होईल, तेव्हा त्यात रोझ सिरप मिक्स करावे. . सतत ढवळत रहा. मिश्रणाला घट्टपणा येईल आणि मिश्रण कडेने सुटू लागेल, छान रवाळ दिसू लागेल तेव्हा गॅस बंद करावा. मिश्रण अति कोरडे करु नये, पनीर चिवट होईल नाहीतर, त्यात थोडा ओलसरपणा हवा. त्यात पिस्तापूड व वेलचीपूड घालून मिक्स करणे. . तुपाने ग्रीझ केलेल्या थाळीत मिश्रण ओतावे व चमच्याने छान पसरवून घ्यावे. त्यावर पिस्त्याचे काप लावून हलके दाबावे. थोडे गार झाल्यावर सुरी फिरवून चौकोनी आकारात कापावे पण कलाकंद लगेच उचलू नका, सेट होऊ द्या. पूर्ण गार होऊ द्या. . हा रोझ कलाकंद खाण्यासाठी तयार आहे. फ्रिजमध्ये ठेवल्यास ३-४ दिवस चांगला राहतो. आवडत असल्यास ह्याला मोदकांचा आकार ही देता येईल. पाककृतीत कंडेन्स्ड मिल्कचा गोडवा पुरेसा आहे. . . गणपती बाप्पा मोरया !! __/\__

वाचने 20450
प्रतिक्रिया 40

प्रतिक्रिया

In reply to by अजया

देव सानिकेच्या पाकृ खरंच खात असावा!
.....अगदी, अगदी. काय सुरेख रंग आलाय. मस्तं सुटसुटीत पाककृती.

तोंडाला पाणी सुटलंय, प्रतिसाद टंकणं कठीण जातंय..

खूप आवडली पाककृती.

चवदार असणार ह्यात शंकाच नाही.

सुरेख दिसतो आहे कलाकंद! स्वाती

मला नाव वाचतानाच माहित असतं की हा पदार्थ कधी करणार नाही. पंण तुमचं सादरीकरण आणि खास करुन फोटो आवडतात म्ह्णून धागा उघड॑ते आणि कधीच निराशा होत नाही. नेहमी प्रमाणेच सुंदर .

In reply to by एस

साखरेऐवजी कंडेन्स्ड मिल्क वापरले आहे, ते ही गोडचं असतं :) (भारतात मिठाई-मेट किंवा मिल्कमेड मिळतं ते वापरु शकता) रोझ सिरप ही गोड असतं पण वरील पाककृतीत कंडेन्स्ड मिल्कचा वापर गोडव्यासाठी केलेला आहे.

काय त्रास आहे या बाईंचा. फोटू बघुन खूप त्रास होतो हो. एकदा म्मिपा कट्टा करुन सगळ्यांनी असे पदार्थ खायला घाला मग द्या काय पाकृ द्यायच्या त्या

जबरदस्त रंग उतरलाय.. सध्या तरी फक्त रंगाबद्दलच बोलू शकतो.. आय्य्याया.. :*(

भारी आहे रेसिपी. पण 2टे. स्पून रोझ सिरप खूप जास्त आहे का? मी मँप्रोचं घेतलंय.