पुरवठ्याची काजू कतली.
आईकडे गौरीच्या दिवशी मोठ्या आरतीच्या वेळी पूर्वी आवर्जून केली जाणणारी पाककृती देतेय.नंतर माझ्यापेक्षा धाकटा भाऊ कमवायला लागल्यावर काजूकतली विकत आणू लागला.पण तरीही त्याला चिडवत सगळे म्हणायचे,’’माईच्या हातची सर नाही हां.’’कारण वडीचे आकारमानही मोठे न् जाड असायचेच.चवही आगळीच.रवा घातलाय याची शंकासुद्धा येत नाही.चला तर बनवा यंदाच्या गणपतीला.
खालील प्रमाण हवे तवढे कमी जास्त करून घ्या.
साहित्य:-
१. १ वाटी रवा.(शक्यतो फाईन रवा घ्यावा०)
२. १ वाटी तूप.
३. ३ वाट्या दूध सायीसकट.
४. ४ वाट्या साखर.
५. १ वाटी रवाळ काजूपूड.
६. वासासाठी ७/८ वेलचांची पूड.
७. १०/१२ केशर धागे ऐच्छिक.
कृती:-
१. वाटीभर रवा जाड असेल तर कोरडाच रंग बदलू न देता भाजावा. थंड झाल्यवर मिक्सर मधून फिरवून घ्यावा.फाईन असेल तर नुसताच भाजावा.
२. त्यात अनुक्रमांक दोन ते चार चे साहित्य नॉनस्टिक पॅनमध्ये एकत्र करून अंदाचे २०/२५ मिनिटे मोठ्या आचेवर आटवावे.
३. खाली उतरल्यावर काजूपूड व केशर घालून ढवळत रहावे. गार झाल्या त्याचा गोळा होऊ लागतो.
४. त्यात वेलचीपूड घालावी.
५. तूप लावलेल्या ताटात अगर ट्रे मध्ये थापावे.वड्या पाडाव्यात.
६. दोन्ही बाजूला प्लास्टिक घालून लाटूही शकता.
(हा फोटो जालावरचा असला तरी तो माझ्या एका मामेभावानेच टाकला आहे.)
(हा फोटो जालावरचा असला तरी तो माझ्या एका मामेभावानेच टाकला आहे.)
वाचने
9618
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुंदर सोपी रेसिपी.छानच!
वॉव!
वा सुंदर ! किती सोपि आनी
वॉव...काय मस्तं दिसताहेत
वा !
मत्त्त्त्त!
आवडती काजुकतली.
छान..
झकास पाकृ. पुढच्या गणपतीला
अग..
In reply to झकास पाकृ. पुढच्या गणपतीला by अजया
वाह. काजूकतली भयंकर आवडते. हा
मस्तच सुगरण ताई
१. वाटीभर रवा जाड असेल तर
पाकृ आवडली, नक्की बनवणार.
फोटू व पाकृ आवडली. रवा व
सूड,तुझे बरोबर आहे."त्यात" हा
छान आहे पाककृती.
छान झाल्यात वड्या!