कुछ अनमोल लोगो से रिश्ता रखता हूँ…
धाकट्या भावाने हरिवंशराय बच्चन यांची "कुछ अनमोल लोगोंसे रिश्ता रखता हूं" ही कविता पाठवली आणि कळवलं, 'दादा, मराठीत रुपांतर कर!'. प्रयत्न केलाय, त्याच्यासाठी, आणि मिपासाठी. सांभाळून घ्या.
***************
फतकल मारून मातीत बसतो बरेचदा, कारण मला समाधान देतं माझ्या लायकीत असणं
सागराकडून शिकलोय जगणं, खळबळणं शांतपणे, तरी मजेत राहणं
निर्दोष मी नक्कीच नसेन, पण फसवणूक नाही माझ्यात, कळू देत
कित्येक वर्षांत बदललंय ना प्रेम ना सोबती, शत्रू जळतात लकबीवर, जळू देत
एक घड्याळ मनगटावर काय बांधलं, वेळच मागे लागली आहे
घर बांधून सुख मिळेल वाटलं, गरजांनी भ्रमंतीच मागे लागली आहे
फुरसतीच्या बाता करू नकोस रे गालिब, लहानपणचा रविवार आता येत नाही
छंद आई-बापांच्या पैशावरच होते, माझ्या पैशांनी फक्त गरजा भागतात, बेत नाही!
का जगण्याच्या धावपळीत हरवते मजा, आनंदी आयुष्ये साधीशी होऊन जातात?
कधी काळी मी रोज सकाळी हसत जागा होई, न हसता आता कित्येक दिवस संपतात
कुठे दूर पोचलोय नाती सांभाळतांना, सर्वांना आपलंसं करतांना स्वत्वच विसरलोय
लोकांना मी हसरा वाटतो खूप, दु:ख लपवता-लपवता किती थकून गेलोय
आनंदी राहतो, आनंदी ठेवतो सार्यांना, बेजबाबदार असूनही मन जबाबदारी पेलते आहे
माझं स्वतःचं असं काही मोल नसेलही, पण काही अनमोल लोकांशी माझे नाते आहे
*************
हरिवंशराय बच्चन यांची मूळ कविता
बैठ जाता हूं मिट्टी पे अक्सर क्योंकि मुझे अपनी औकात अच्छी लगती है..
मैंने समंदर से सीखा है जीने का सलीक़ा, चुपचाप से बहना और अपनी मौज में रहना ।।
ऐसा नहीं है कि मुझमें कोई ऐब नहीं है पर सच कहता हूँ मुझमे कोई फरेब नहीं है
जल जाते हैं मेरे अंदाज़ से मेरे दुश्मन क्यूंकि एक मुद्दत से मैंने न मोहब्बत बदली और न दोस्त बदले .!!.
एक घड़ी ख़रीदकर हाथ मे क्या बाँध ली.. वक़्त पीछे ही पड़ गया मेरे..!!
सोचा था घर बना कर बैठुंगा सुकून से. . पर घर की ज़रूरतों ने मुसाफ़िर बना डाला !!!
सुकून की बात मत कर ऐ ग़ालिब….बचपन वाला ‘इतवार’ अब नहीं आता |
शौक तो माँ-बाप के पैसो से पूरे होते हैं, अपने पैसो से तो बस ज़रूरतें ही पूरी हो पाती हैं..
जीवन की भाग-दौड़ में – क्यूँ वक़्त के साथ रंगत खो जाती है? हँसती-खेलती ज़िन्दगी भी आम हो जाती है..
एक सवेरा था जब हँस कर उठते थे हम, और आज कई बार बिना मुस्कुराये ही शाम हो जाती है..
कितने दूर निकल गए, रिश्तो को निभाते निभाते.. खुद को खो दिया हमने, अपनों को पाते पाते..
लोग कहते है हम मुस्कुराते बहोत है, और हम थक गए दर्द छुपाते छुपाते..
“खुश हूँ और सबको खुश रखता हूँ, लापरवाह हूँ फिर भी सबकी परवाह करता हूँ..
मालूम हे कोई मोल नहीं मेरा, फिर भी, कुछ अनमोल लोगो से रिश्ता रखता हूँ…
प्रांजल अभिव्यक्ती चा सुंदर अनुवाद
प्रांजल अभिव्यक्ती चा सुंदर अनुवाद
अगदी हेच वाटलं.
भावानुवाद आवडला.
मारवाजी आणि रेवतीताई
दुसर्या कडव्यातील 'जळू देत' व चौथ्यातील 'बेत नाही' हे तुम्ही मुद्दाम अॅडवलय का?हो.छानच झालाय भावानुवाद...
मस्त ! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ganpati Aarti :- रमा माधवछान अनुवाद. आवडला.
भावानूवाद आवडला बहुगुणीसाहेब.
सुंदर. आत्ता संपादन करताना
सुंदर! अप्रतिम काव्य!
उमदा ! बेहतरीन
लहानपणचा रविवार आता येत नाही..
यादो के सब जुगनु जंगल मे रहते है
:-)
मूळ कविता आणि भावानुवाद
मूळ कविता अप्रतिमच आहे पण
चांगली जमलीय
अप्रतिम....
माझाही एक प्रयत्न
क्या बात है!
एक प्रयत्न केला आहे
वाह
और भी आने दो!
मस्तच!
कुर्निसात!!!
बहुगुणी सर नमस्कार...
छानच
जम्या, सौ फीसदी जम्या!
धन्यवाद बहुगुणी सर
मस्त संदीप!
धन्यवाद बोका-ए-आझम!
ही एक ओळ
काय बहार उडवली आहे सर्वांनीच!
आम्ही उरलो प्रतिसादापुरते!!!