त्यातील काही छायाचित्र पुढे देत आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
हुश्श....केवढे ते मनमोहक नजारे म्हणून सांगू? जितकी छायाचित्र काढावीत तितकी कमी होती, शेवटी मोह आवरला आणि घरी परत आलो कारण दुपारचा १ वाजला होता आणि भावाच्या पोटात कावळ्यांनी ओरडून थकल्यावर शेवटी संप पुकारला होता.
गावचं घर आणि जेवण म्हणजे तर स्वर्गच जणू.
आमच गावचं घर हे माझ्या मावशीच्या घराच्या भिंतीला चिकटून बांधलेलं आहे सेकंड होम सारखं, घरी सर्व सोयी करून ठेवलेल्या आहेत. मावशीच घर आणि परिसर बराच मोठा आहे, त्यात मोठी आंब्याची बाग आहे, आंब्याच्या रोपांची नर्सरी आहे, मोठी विहीर आणि पाण्याची टाकी आहे. घराच्या बाजूने लाल मातीचा रस्ता आणि पावसाळ्यात तर रस्त्याच्या दुतर्फा मस्त पाण्याचे पाट वाहत असतात. समोरच मोकळ मैदान आहे तर मागील बाजूला मध्यम आकाराचा ओढा सुद्धा आहे. खरंतर हे घर आमचं मूळ घर नव्हे, आमच मूळ घर आहे आधी उल्लेख केलेल्या गिर्ये ह्या गावात त्याबद्दल तपशीलवार माहिती पुढे देईनच.
बर तर अश्याप्रकारे घरी आल्यावर गरमागरम वरण-भात, भाजी-पोळी आणि ताज्या आंब्यांच लोणच असा मेन्यू आईने तयार करून ठेवला होता, त्यावर चांगलाच आडवा हात मारून फुगलेलं पोट घेऊन छान ताणून दिली. झोप झाल्यावर प्रवासाचा शीण आणि जेवणाची गुंगी दोन्ही ओसरली होती. मग काय संध्याकाळचा चहा घेतल्यावर परत भटकंतीला बाहेर पडलो अर्थातच कॅमेरा पण आला आमच्या बरोबर. बाहेर आलो आणि ठरलं कि काजूच्या कारखान्यात जाऊन ताजे काजू घ्यावेत, जाता जाता रस्त्यात दोन-तीन देवळ आहेत ती पण बघून घ्यावीत.
पहिलं देऊळ आहे मुंबई-गोवा महामार्गावरच हनुमान मंदिर, हे आधी अगदी घुमटीवजा मंदिर होते. गावकर्यांनी देणगी जमा करून ह्या देवळाचा जीर्णोद्धार केला. देवळात खोलगट भागात मारुतीची मूर्ती आहे. मंदिराच्या कठड्यावर बसलो कि अगदी चिकटून महामार्ग आहे. त्यामुळे संध्याकाळची झुळझुळ हवा खात आणि रस्त्यावरच्या गाड्या बघण्यात अर्धा तास कधी उलटला ते कळलच नाही.
मारुतीची मूर्ती
माझ्या भावाचा मुलगा देवळात बसलेला असताना
मी स्वतः
मग पुढे गेलो काजू कारखान्यात, नेमके मसाला आणि खारे काजू नाही मिळाले मग साध्या काजुंवरच भागवल आणि पुढे निघालो. इथून पुढे महामार्गावरून आतल्या रस्त्यावर दुसर एक देऊळ आहे, हे देऊळ गच्च झाडीत आहे. चारही बाजूनी मोकळ असून आठ खांबांवर कौलारू छप्पर उभारलेल आहे. आजूबाजूच्या वनराईमुळे भरदुपारी सुद्धा इथे छान गार वारा सुटलेला असतो. आतमध्ये काळ्या पाषाणातील विष्णूची आणि अजून एक कुठल्याश्या देवाची मूर्ती आहे. (जाणकारांनी मूर्ती बघून कोणता देव आहे हे सांगितल्यास बरे पडेल.)
रस्त्यातील देऊळ
देवाची मूर्ती
ह्या देवच दर्शन घेऊन पुढे गेल्यावर एका सरडे महाशयांनी खास छायाचित्रासाठी पोझ दिली होती मग काय त्यांना पण खुश करून टाकल आणि पुढील रस्ता धरला.
सरडा
गावातील देवी नीनु नवलादेवीच देऊळ पुढेच आहे, देवळात जाण्यासाठी हिरव्यागार शेतमळ्यातून चालत जाव लागत.
शेतमळा
हे देऊळ बर्यापैकी मोठे असून सभामंडप आणि गाभारा अशी ठेवणीतली रचना आहे. सर्व देऊळ दगडी भिंतींवर आणि आतील बाजुनी लाकडी खांबांवर तोललेले आहे. आतमध्ये मोकळ्या गाभार्यात काळ्या पाषाणातील सुंदर अशी देवीची मूर्ती आहे.
शेतमळ्यातील देवीच देऊळ
नीनु नवलादेवीची मूर्ती
देवळाचा सभामंडप
कोकणातील देवळांमध्ये आढळणारी धीरगंभीर शांतता आणि जाणवणारे पावित्र्य मला आजपर्यंत कुठल्याही प्रसिद्ध आणि गजबजलेल्या देवळात जाणवलेल नाही. “शांततेत देवाचा आवाज ऐकू येतो” हे वाक्य मी गगनगडावर वाचल आणि मला तंतोतंत पटलं देखील.
देवीच्या देवळातून पुढे दुसर्या शेतमळ्यात असलेल्या ब्रम्हदेवाच्या मंदिराकडे आपसूकच पावले वळली. क्वचितच आढळणार देऊळ म्हणजे ब्रम्हदेवाच देऊळ.
पुढील शेतमळ्यातील ब्रम्हदेवाच देऊळ
हे देऊळ अलीकडेच गावकर्यांनी नव्याने बांधल आहे. देवळाच्या एका बाजूला खळखळणारा छोटासा ओढा आहे तर बाकी तीन बाजूला हिरवागार शेतमळा. देवळाच दार उघडल कि लगेचच समोर उंचावर ब्रम्हदेवाच दर्शन होत. गोलाकार जांभ्या दगडातील ब्रम्हदेवाच रूप बघून मनाला शांतता प्राप्त होते.
ब्रम्हदेवाच पाषाण रूप
खळाळणारा ओढा
खळाळणारा ओढा १
कोकणातील बहुसंख्य देवालयांचे व्यापारीकरण न झाल्यामुळे कुठेही “फोटो काढण्यास सक्त मनाई” असले फालतू फलक दिसत नाहीत, त्यामुळे त्या देवांचे/देवालयांचे रूप हृदयासोबत कॅमेरामध्ये पण सहजच साठवता येते.
सर्व देवांचे यथासांग दर्शन घेऊन दिवस मावळताना परतीचा मार्ग धरला, दुसर्या दिवशी परत पुढच्या गावी प्रस्थान करायचे होते नां!
रानफुल
रानफूल १
क्रमश:

वाचने
16110
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान फोटो
फार सुंदर सफर चाललीय. अशी रमत
तुम्ही बरोबरच फोटो बघताय
In reply to फार सुंदर सफर चाललीय. अशी रमत by पद्मावति
छान लेख! पिंडीच्या रूपातील
मस्तच खुप मस्त
बिनभिंतीच्या देवळातल्या मूर्त्या...
पैलवान साहेब …. प्रतिसाद आणि
In reply to बिनभिंतीच्या देवळातल्या मूर्त्या... by गामा पैलवान
गावाची सफर मस्त चाललिये.
तो रानफुलाचा
सुंदर फोटो
फोटो सुंदर आलेत. मस्तच....
सुंदर फोटो आणि लिखाण.हिरवागार
वाचक मित्रहो! सर्व
मेघनाद भौ! सफर मस्तच चाललीये!
त्या त्या देवालयांशी संबंधित
In reply to मेघनाद भौ! सफर मस्तच चाललीये! by मांत्रिक
त्या त्या देवालयांशी संबंधित
In reply to मेघनाद भौ! सफर मस्तच चाललीये! by मांत्रिक
राजे, ते नवलाईदेवीचं देऊळ फार
डोळे निवले.
सुंदर
फोटो आणि वर्णन आवडले....
उत्तम लेख आणि सुंदर फोटो..
चित्रसुंदर सफर ! मजा आली
खुप सुंदर फोटो आणि लिखाण!
फार सुंदर!!!