बाप्पाचा नैवेद्य : खरवस
खरवस ( गाईच्या/म्हशीच्या ) चिकाची वडी-
गाय किंवा म्हैस व्यायल्यावर सुरुवातीचे काही दिवस घट्ट दूध देतात, त्याला चीक असे देखील म्हणतात. या दुधात जास्त प्रमाणात प्रथिने असतात. साधारण पहिल्या, दुसर्या, तिसर्या दिवसाचा चीक खरवसाच्या वड्या करण्या साठी वापरतात. पहिल्या दिवसाचा चीक घट्ट असतो. खालील कृतीत त्याच दिल्या आहेत. दुसर्या, तिसर्या दिवशीचा करताना साधे दूध कमी प्रमाणात वापरावे.
साहित्य -
गाईचे अथवा म्हशीचे खरवसाचे दूध (चीक)१/२ लिटर, गाईचे किंवा म्हशीचे साधे दूध १/२ लिटर
१०० ते १२५ ग्रॅम साखर किंवा गूळ, याचे प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता.
केशर काड्या १०-१२,
वेलची पूड
कृती-
गाईचा चीक पातळ असतो पण म्हशीचा घट्ट असतो, त्यामुळे म्हशीच्या दुधाचा करताना साध्या दुधाचे प्रमाण वाढवावे लागते.
गाईचा करताना जेवढं चीक तेवढाच दूध वापरायचं.
१/२ लि चिकाला १/२ ली दूध मिक्स करायचं त्यात चवीप्रमाणे गुळ किंवा साखर घालायची. गूळ जास्त छान लागतो. चांगलं ढवळून विरघळवायचा.
मग गाळून घ्यायचं. आणि वेलची पूड घालून परत ढवळायचं .
कूकरच्या डब्यात हे दूध अर्ध्यापर्यंत ओतायचे, वरून केशर काड्या पसरवाव्यात. नंतर मोठ्या पातेल्यात पाणी तापत ठेवायचं त्यात स्टँड ठेऊन कुकरचा डबा ठेवायचा. पातेलं वरून झाकायचं. (water bath) झाकणावर जड वस्तू ठेवायची म्हणजे वाफेवर चांगलं शिजेल. १५ मि. चांगले उकडायचे. नंतर डबा बाहेर काढून गार होऊ द्यायचा. मग वड्या कापायच्या. गाईच्या वड्या मऊ होतात. चीक पातळ असेल तर दूध न घालता केल्या तरी चालतात. म्हशीच्या वड्यांना दूध लागतेच. नाहीतर वड्या कडक होतात. गरम खायच्या नाहीत तोंड येते. उष्ण पडतात.


वाचने
17445
वाचनखूण
प्रतिक्रिया
33
आहाहा!!!!सकाळी सकाळी खरवस!!!!
मस्तच!सुरेख सोपी पाककृती आणि
काय कहर फोटो आलाय. प्रचंड
In reply to काय कहर फोटो आलाय. प्रचंड by स्रुजा
फोटो ?
In reply to फोटो ? by सस्नेह
फोटो कुणीतरी पळवला...
मस्त ग भूमी.लय भारी
आलेच ग खरवास khyala.
आहाहा... लयं भारी ! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ganpati Aarti :- रमा माधवखरवस अगदी आवडता.छान सोपी पाकृ
अनबिलिवेबल!!!
नांव काढू नका त्या खरवसचे....
आवडीचा पदार्थ. हाच खरवस थोडा
वा भूमी तै वा !
या लेखात फोटो आहे? मला का
Aha kharvas......atyant
फोटू?
ज्या कोणी खरवस (फोटो) पळवून
खरवस..
मस्तच गं भुमी, मला खुप आवडतं
अत्यन्त आवडता पदार्थ
खरवस.
खरवस खाण्याची आवड बेताची आहे.
सर्वांचे
मस्त खरवस !!!
फोटो बघायला आलतो खास. पण तोच
मस्तच!
खरवस आवडत नाही पण घरी मी
आवडता पदार्थ
(No subject)
(No subject)
In reply to (No subject) by भुमी
(No subject)
लय भारी.
एकच नंम्बर :)