जर्मनीतील स्त्रियांचे समाजजीवन

मधुरा देशपांडे's picture
मधुरा देशपांडे in विशेष
8 Mar 2015 - 1:35 am
महिला दिन

"पाश्चात्य संस्कृती" या दोनच शब्दात सर्वसाधारण पणे भारताबाहेरील, विशेषतः युरोप किंवा अमेरिकेतील देशांच्या संस्कृतीकडे बघितले जाते. जेव्हा स्त्रियांच्या बाबतीत हा विचार केला जातो तेव्हा आत्मविश्वास असणाऱ्या, हवे तसे राहण्याची, कपडे घालण्याची मुभा असणाऱ्या, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून समर्थपणे उभ्या असणाऱ्या स्त्रिया असे काहीसे चित्र ढोबळमानाने समोर येते. भारतातही अगदी खेड्यापाड्यातील स्त्रियांना जसे शहरातील स्त्री जीवनाचे अप्रूप असते, तसेच साधारण मोठ्या प्रमाणात भारत आणि कुठलाही विकसित किंवा पुढारलेला देश याबाबतीतही असते. कौतुक, असूया, आधुनिकता, स्वैराचार असे काही ना काही पूर्वग्रह डोक्यात असतात. पण प्रत्यक्षात जेव्हा वेगळ्या देशातील आयुष्य आपण अनुभवतो, तेव्हा काही पूर्वग्रह गळून पडतात तर काही नवीन बाबी कळतात, काही आश्चर्यकारक तर काही विदारक. गेल्या अडीच वर्षांपासून जर्मनीतील लोकसंस्कृती अनुभवता आली. नवीन लोक, नवीन भाषा, नवीन संस्कृती आणि त्यासोबतच येथील स्त्रियांचे सामाजिक स्थान, राहणीमान, लहान मुलींपासून तर वयस्कर आज्यांपर्यंत स्त्रियांची कुटुंबातील भूमिका हे देखील दिसले. यादरम्यान आलेल्या काही अनुभवांनी माझ्याही मनातल्या काही कल्पनांना धक्के दिले आणि या विषयावर अजून शोधाधोध करण्यास उद्युक्त केले. मग ही माहिती शोधताना अजून काही नवीन बाबी पुढे आल्या. पहिले आणि विशेषतः दुसरे महायुद्ध आणि २५ वर्षांपूर्वी झालेले पूर्व पश्चिम एकत्रीकरण अशा इतिहासातील घटनांचा जसा सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यावर परिणाम झाला, त्याचप्रमाणे स्त्रियांच्या आयुष्यावर, जडण घडणीवर देखील मोठा प्रभाव पडला. एकोणिसावे शतक ते आजपर्यंत घडलेले बदल, आजची स्थिती, कुटुंबातले स्थान, नोकरी किंवा व्यवसायाच्या क्षेत्रातील स्थिती आणि सामाजिक जीवन याविषयी थोडक्यात आढावा घेण्याचा हा प्रयत्न.

इथे आल्यानंतर बाहेरील लोकांबरोबर पहिल्यांदा संवाद सुरु झाला तो जर्मन शिकताना. स्पेन, ग्वाटेमाला, टर्की, कोरिया, जपान, क्रोएशिया, व्हिएतनाम अशा अनेक देशातील लोकांसोबत जर्मन शिकताना वेगवेगळ्या विषयांवर चर्चा व्हायच्या. एका अशाच कुठल्याशा कुटुंब आणि नाती याविषयावर बोलताना या सगळ्याच लोकांकडून सासुरवास, आमच्या देशात सुनांना कसे छळले जाते यावर जोरात चर्चा सुरु झाली. यापैकी बहुतेकांच्या मते (ज्यात मीही आले) हे प्रकार फक्त आपल्याच देशात जास्त होतात असे गैरसमज होते, जे साफ पुसले गेले. याशिवाय इतर विषयांवर बोलताना देखील जागतिक पुरुषप्रधान संस्कृतीचा अनुभव यादरम्यान अनेकवेळा आला. "मुलींनी कशाला नोकरी करायला हवी, घरी बसून मुलांना सांभाळावे", "बायकोने मी म्हणेल ते रोज खायला करावे, माझ्या आवडीचेच कपडे घालावे" असे बोलणारे काही लोक होते. सर्रास मिनीस्कर्ट घालणाऱ्या मुली जिथे दिसतात, तिथे बऱ्याच मुलांची अपेक्षा मात्र आपल्या बायकोने कमी कपडे घालू नये आणि इतरांच्या नजरेत येऊ नये अशी होती. या अनेक चर्चांमधून एक लक्षात आले की मुलींकडे बघण्याचा दृष्टीकोन हा केवळ ती सुंदर दिसावी, तिने छान कपडे घालावे, नवऱ्याला समाधानी ठेवावे असा होता. हे केवळ पुरुषांच्या दृष्टीकोनातून नाही, तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रगत देश म्हणवून घेणाऱ्या देशातील मुलींचेही हेच मत होते. स्त्री ही एक स्वतंत्र व्यक्ती आहे, तिला नवरा किंवा मुले, किटी पार्टीज आणि शॉपिंग यापलीकडे सुद्धा एक जागा असू शकते असा विचार करणारेही होते पण प्रमाण कमी. आणि याविषयी मी काही वेगळे बोलले की मग "तू तर भारतीय आहेस, तिकडे तर असे होते, तसे होते" असे मला ऐकवले जायचे. हे एकंदरीत जर्मनी शिवाय इतर देशांच्या लोकांबाबत. एकदा करीअर आणि स्त्रिया या विषयावर बोलताना अत्यंत अभिमानाने आमच्या शिक्षकाने सांगितले, "आमच्या जर्मनीत एकाच पोस्ट साठी जर एक स्त्री आणि एक पुरुष उमेदवार असेल तर पुरुषालाच प्राधान्य दिले जाईल आणि जर दोघेही एकाच पोस्ट वर असतील तर स्त्रीचा पगार निश्चित पुरुषापेक्षा कमी असेल" हे ऐकून मी अस्वस्थ तर झालेच पण हे खरे असेल यावरही पुढे अनेक दिवस माझा विश्वास नव्हता. परंतु जेव्हा अधिक सखोल माहितीचा शोध घेतला तेव्हा त्याच्या म्हणण्यात तथ्य होते हे कळले.

जेव्हा माझी नोकरी सुरु झाली आणि तीही नवरा जिथे काम करतोय त्याच कंपनीत, त्याच विभागात तेव्हा हे कळल्यानंतर बऱ्याच सहकर्मचारयानी त्याला विचारले की तू आणि तुझी बायको एकत्र एकाच ठिकाणी नोकरी करणार हे तुला कसे चालते? त्या व्यक्तीच्या म्हणण्याप्रमाणे बायकोसोबत नोकरी तर नकोच आणि तिचा पगार आपल्याएवढा हे तर नकोच नको. आमच्या दृष्टीने ही अगदीच सहज बाब होती पण आम्ही जणू खूप काही वेगळे करतोय असे बघितले जात होते. प्रत्येक कंपनीची संख्या, रचना वेगळी असते त्यामुळे इतकी ढोबळ तुलना होऊ शकत नाही पण तरीही ४० ते ४५ लोकांच्या विभागात अभियंता म्हणून काम करणाऱ्या आम्ही ५ मुली होतो. पाचही जणी अल्जेरिया, इराण, बल्गेरिया, मोरोक्को अशा त्यामानाने कमी विकसित आणि छोट्या देशांमधून आलेल्या. इतरत्र फक्त वित्त विभाग, प्रशासकीय कारभार, स्वागत कक्ष अशा ठराविक ठिकाणी महिला आहेत परंतु प्रमाण कमी. ज्या देशाचा कारभार गेल्या १० वर्षांपासून एका महिलेच्या हातात आहे, तिथेच इतर ठिकाणी स्त्रियांच्या बाबतीत दिसणारा काहीसा पारंपारिक दृष्टीकोन अजूनच विचारात पाडणारा होता.

याविषयी थोडे इतिहासात डोकावले असता काय दिसले? अगदी एकोणीसाव्या शतकापर्यंत जर्मनीमध्ये महिलांची स्थिती ही चूल, मुल, चर्च आणि कपडे अशी मर्यादित होती. यालाच जर्मन भाषेत "फिअर का" किंवा 'फोर के' (Vier K - Kinder, Kueche, Kirche & Kleidung) असे संबोधले जाते. १९१९ साली महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. हिटलरने जेव्हा सूत्रं हातात घेतली, तेव्हा त्याने या घडणाऱ्या बदलांना परत पूर्वपदावर आणले. पहिले आणि दुसरे महायुद्ध ही येथील स्त्रियांच्या सामाजिक स्थानात बदल होण्यात महत्वाची घटना ठरली. त्याच्या कारकिर्दीत स्त्रियांनी फक्त लग्न करावे आणि मुलांना जन्म द्यावा अशा पद्धतीचे नियम आणले. भविष्यकाळात आवश्यक असे मनुष्यबळ उभे करणे असा त्यामागचा उद्देश होता. नवीन लग्न झालेल्यांना विशेष सवलती दिल्या गेल्या. जेवढी मुले जास्त, तेवढ्या या सवलती जास्त असे असल्याने मुलांना जन्म देणे हे स्त्रियांचे एकमेव कर्तव्य समजले जाऊ लागले. शाळेपासूनच मुलींवर ही विचारसरणी बिंबवण्यात आली. परंतु काही वर्षातच याचेही अनेक तोटे लक्षात आले. मग स्त्रियांनी देशासाठी राष्ट्रसेवा म्हणून घर संसार सांभाळून शक्य ते काम करावे अशी भूमिका घेतली गेली. या कामाचा त्यांना मोबदला मिळेल याची मात्र शाश्वती नव्हती. स्त्रियांनी महायुद्धाच्या वेळी आणि नंतरही जखमी लोकांची शुश्रुषा करणे हे एक महत्वाचे काम केले. दरम्यानच्या काळात झालेल्या मनुष्यहानीमुळे काही ठिकाणी पुरुषी मक्तेदारीची कामे स्त्रिया करू लागल्या. एकूणच तोपर्यंत केवळ घरातील पारंपारिक कामातून स्त्रिया बाहेर पडू लागल्या.

महायुद्धानंतर प्रचंड मनुष्यहानी झाल्यामुळे स्त्रियांनी काम करणे ही गरज बनत गेली. परंतु तरीही पश्चिम जर्मनीत पुन्हा एकदा स्त्रियांचे जीवन हे चूल आणि मुल यातच बंद होत गेले. पुढे इतर देशातून बरेच जण पश्चिम जर्मनीत कामासाठी आले आणि अधिकाधिक बायका बाहेरच्या कामांपासून परावृत्त होत गेल्या. पश्चिम जर्मनी मध्ये १९४९ मध्ये कायद्याने स्त्री पुरुष समानता जाहीररीत्या मान्य झाली तरीही प्रत्यक्षात कायद्याचा स्वरुपात येण्यास १९५७ साल उजाडले. १९५० सालापर्यंत देखील लग्न झाले की स्त्रीला नोकरी वरून काढणे हे सर्वमान्य होते. तुलनेने पूर्व जर्मनीतील स्थिती अधिक बिकट असल्याने (जी आजही थोड्या प्रमाणात आहे) तिथे स्त्रियांनी घराबाहेर पडणे हे क्रमप्राप्त झाले. पूर्वेतून पश्चिमेकडे पळून येणार्यांमध्ये बहुतांशी पुरूषाच होते. त्यामुळे ही परिस्थिती अजूनच बिकट झाली. पुरुषांची संख्या महायुद्धामुळे इतकी कमी होती की बऱ्याच बायकांचे लग्न होणे कठीण झाले होते. एकूणच सामाजिक आणि आर्थिक स्थिती तेवढी चांगली नसल्या कारणाने तिथे बरेचसे कायदे महिलांसाठी बदलण्यात आले. कारण कामासाठी महिलांची गरज होती. राजकारणात अनेक स्त्रिया सक्रिय होत्या. या सगळ्यातून पुढील काही काही वर्षात पूर्व जर्मनी मधील महिलांचे सामाजिक स्थान पश्चिम जर्मनीच्या तुलनेत बरेच वरचढ होते.

यानंतर दशकभरानंतर म्हणजेच १९६० नंतर एकीकडे पश्चिम जर्मनीतील महिला या त्यांच्या अधिकारांविषयी जागरूक होत गेल्या. लग्नातील समान अधिकार, नोकरी करण्याची परवानगी आणि इतरही समान हक्कांसाठी मागण्या आणि आंदोलने सुरु झाली. अनेक वर्षांच्या लढ्यानंतर १९७७ मध्ये त्यांना स्वतंत्रपणे नवऱ्याच्या परवानगी शिवाय घटस्फोटाची मागणी करण्याचा अधिकार आणि लग्नानंतर नोकरी करण्याचा अधिकार मिळाला. सुरुवातील शालेय शिक्षण पूर्ण होणे इतपतच स्त्रियांच्या समान अधिकारात गणले गेले होते. १९८० नंतर विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी येणाऱ्या मुलींच्या संख्येत वाढ होऊ लागली. असे असूनही पारंपारिकतेचा प्रभाव असणाऱ्या अनेक जणींनी उच्च शिक्षण घेण्यात पुढाकार घेतला नाही. म्हणजेच ही स्थिती अगदी आता आता पर्यंत होती. पुढे १९९० मध्ये पूर्व पश्चिम एकत्रीकरण झाले. इतिहासातील अजून एक महत्वाची घटना घडली. पण पुर्व जर्मनीतील महिलांवर या एकत्रीकरणाचा अजून एक परिणाम झाला तो म्हणजे तेथील अनेक उद्योग बंद पडल्याने अनेकींचे रोजगाराचे साधन गेले. आर्थिक स्थिती पश्चिमेच्या तुलनेत तेवढीशी चांगली नव्हती. आणि त्यात पुन्हा नवीन संकटे समोर आली. पूर्वेकडील महिलांचे असे प्रश्न तर पश्चिमेकडील महिलांवर असलेला परंपरागत विचारसरणीचा प्रभाव अशा बाबतीत दिसणारा हा असमतोल कमी करण्यासाठी प्रयत्न होऊ लागले. आज युरोपातील सर्वात सामर्थ्यवान असणाऱ्या देशात ही परिस्थिती बऱ्याच अंशी बदलली असली तरीही अजूनही स्त्रियांची स्थिती पुरुषांच्या बरोबरीत आलेली नाही. आजही सरकार अनेक प्रकारे हा बदल घडवण्यासाठी कार्यरत आहे. आज २०१२ ते २०१४ दरम्यान मला माझ्या वर कथन केलेल्या अनुभवा व्यतिरीक्त काय दिसले?

आजूबाजूला बघताना सर्वसाधारणपणे असे आढळले की बेकरी, दुकाने, शाळेतील शिक्षिका, बँका, ऑफिसेसमध्ये फायनान्स, किंडर-गार्टन, पाळणाघरे, हेअर ड्रेसर, काही सामाजिक सेवा जसे की वयस्कर लोकांच्या घरी जाउन तिथे शुश्रुषा करणे, मतीमंद मुलांसाठी काम करणे, फार्मसी अशा ठिकाणी महिलांची मक्तेदारी किंवा संख्या जास्त आहे असे म्हणायला हरकत नाही. पाळणाघरे म्हणजे भारतात बरेचदा मध्यम वयीन बायकांसाठी उत्पन्नाचे साधन समजले जाते, पण इथे त्यासाठी सुद्धा विशेष शिक्षणाची आवश्यकता आहे. ते झाले की बऱ्याच तरुण मुली या व्यवसायात दिसतात. बेकरी किंवा दुकानांमध्ये काम करणार्यांमध्ये कॉलेज वयीन किंवा मग वयस्कर स्त्रियांचे प्रमाण जास्त दिसते. अभियांत्रिकी, वैद्यकीय, संशोधन, विद्यापीठातील प्रोफेसर, भाषाशास्त्र किंवा कुठल्याही क्षेत्रातील उच्च शिक्षण या क्षेत्रात स्त्रिया आहेत परंतु प्रमाण कमी. म्हणजेच अजूनही स्त्रियांचे आणि पुरुषांचे व्यवसायाचे स्वरूप भिन्न आहे. दोघांची क्षेत्रे वेगळी आहेत. कायद्याने अनेक समान अधिकार दिलेले असूनही, पारंपारिक स्त्रियांची मक्तेदारी असलेल्या व्यवसायातच शिक्षण घेणाऱ्या मुली जास्त आहेत. त्यातही लग्नानंतर किंवा मुले झाल्यानंतर नोकरी करायची इच्छा बरीच कमी दिसते आहे. किंवा पार्ट टाईम नोकरीला प्राधान्य दिले जाते. यासंबधी माहिती शोधताना असे दिसले की उच्च पदांवरील जागा किंवा प्रमुख व्यक्ती म्हणून एखादे पद भूषविणाऱ्या महिला, विशेषतः प्रोफेसर्स, खाजगी कंपन्यातील कार्यकारी मंडळ अशा उच्च पदस्थ ठिकाणी महिलांचे प्रमाण नगण्य आहे. काही ठिकाणी महिला असल्या तरी त्यातील बऱ्याच इतर देशातील स्थलांतरीत आहेत. विद्यापीठात शिक्षणघेणाऱ्या देखील स्त्रियांमध्ये परदेशी स्त्रियांचे प्रमाण जर्मन स्त्रीयांपेक्षा जास्त आहे. विद्यापीठात पदवी शिक्षण घेणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण आणि त्यानंतर नोकरी किंवा पुढील शिक्षण घेणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण यांच्यात प्रचंड तफावत आहे. यासाठी सध्या शासकीय पातळीवर प्रयत्न सुरु असले तरी प्रत्यक्षात बायकांना पुढे जाण्यात बरेच अडथळे येतात.

मग घर आणि पूर्णवेळ नोकरी हे दोन्ही सांभाळण्यासाठी इतके कष्टमय आयुष्य आहे का किंवा सवलती मिळत नाहीत का? यातील काही जणींना कदाचित आवड नसेल, काहीना आर्थिक गरज नसेल, तर काहींना मुले सांभाळणे हे जास्त महत्वाचे वाटते. पण बहुसंख्य महिलांना वर्किंग वुमन किंवा विशेषतः वर्किंग मदर नको आहे, केवळ नको आहे म्हणण्यापेक्षा बरेचदा त्यात अपराधीपणाची भावना आहे. पारंपारिक काळापासून जे चालू आहे तेच आताही चालू आहे. प्रत्यक्षात नोकरीच्या क्षेत्रात इथे महिलांना कायद्याने बऱ्याच सवलती आहेत. उदा. बाळंतपणाची रजा किंमान काही आठवडे असतेच, यात साधारण तीन महिने संपूर्ण पगार आणि नंतर वर्षभरा पर्यंत तुम्ही नोकरी सुरक्षित ठेवू शकता. शिवाय मुलांसाठी सरकार वेगळे पैसे देतेच. मुलांच्या आजारपणासाठी आई आणि वडील प्रत्येकी दहा दिवस सुट्ट्या वर्षाला आणि याशिवाय स्वतःच्या ३० सुट्ट्या. (शनि रवि सोडून) त्यातही मुलांच्या कारणासाठी सुट्टी पाहिजे म्हटले की विना कटकट मंजूर केली जाते. "कशाला हवी आहे सुट्टी", मागच्या आठवड्यात पण आजारी होता तुमचा मुलगा, तेव्हाच घेतली की, अजून कुणी नाहीये का त्याला सांभाळायला, माझ्या मुलाला माझी आईच नेते इ. इ. प्रतिप्रश्न विचारणे बॉसला गोत्यात आणू शकते. शिवाय बऱ्याच ठिकाणी कामाच्या फ्लेक्सीबल वेळा. कामाच्या वेळा नंतर ऑफिस मध्ये फार थांबावे लागत नाही. घरून काम करण्यासाठी बरेचदा परवानगी मिळू शकते. अशा अनेक सोयी असूनही एकंदरीत चाकोरीबाहेरचे काम किंवा तत्सम नोकरी करणाऱ्या बायकांचे प्रमाण इतके कमी का?

यामागची काही कारणे पहिली तर ढोबळमानाने खालील काही मुद्दे आढळले. (हीच आणि एवढीच करणे असतील असे नाही)
१. सारख्याच कामासाठी पुरुषांच्या तुलनेत मिळणारा कमी मोबदला. अजूनही महिलांना मिळणाऱ्या पगारात आणि पुरुषांना मिळणाऱ्या पगारात बरीच तफावत आढळते. ही तफावत बरेचदा ३५-४० टक्के कमी पगार इतकी असू शकते. मग कशाला हवीये नोकरी ही मानसिकता तयार होणे स्वाभाविक असू शकते.
२. पारंपारिक विचारसरणीने अजूनही मुले सांभाळणे हेच बायकांचे कर्तव्य मानले जाते. लहान मुलांना पाळणाघरात ठेवून नोकरी करणारी आई ही अजूनही सकारात्मक दृष्टीकोनातून पहिली जात नाही. एका वर्तमानपत्रात याविषयी काही उदाहरणे दिली होती. त्यात अशाच एका वर्किंग मदर ला प्रश्न विचारण्यात आला की नोकरीच करायची आहे तर मग मुलांना जन्म का दिला?
३. इथे असलेली किंडर गार्टनची वेळ बरेचदा अगदी २-४ तास एवढीच असते. त्यामुळे मग मुलांना उरलेल्या वेळात मुलांना कुठे ठेवायचे हा प्रश्न उद्भवतो आणि त्यातून पार्ट टाईम नोकरी किंवा मग नोकरी नकोच असे पर्याय निवडले जातात. शिवाय पाळणाघरांची संख्या कमी आहे. त्यामुळे तिथे नाव नोंदणीपासून प्रश्न निर्माण होतात. त्यांच्या वयाच्या मर्यादा, इतर अटी हे सगळे काहींना त्रासदायक वाटते.
४. अजूनही बऱ्याच पुरुषांना कमावती बायको नको आहे. विशेषतः मुले असतील तर नाहीच. आणि सोबत काम करतानाही सहकर्मचारी म्हणून सुद्धा पुरुषांना स्त्रिया नको आहेत. वरिष्ठ म्हणून तर नाहीच नाही.
५. येथील प्राप्तीकर नियमानुसार नवरा बायको किंवा पार्टनर हे दोघे जर कमावते असतील आणि दोघांच्या पगारात फार मोठी तफावत असेल तर कर आकारणी, आयुर्विमा आणि भविष्य निर्वाह निधी हे सगळे पैसे वजा होऊन हातात मिळणारा पगार खूप कमी होतो. अशा वेळी जर बायको नोकरी करत नसेल तर पुन्हा वेगळे नियम लागू होतात आणि नवऱ्याच्या कर आकारणीत सवलतही मिळू शकते. अशांसाठी मग त्यापेक्षा नोकरी नको हा विचार प्रबळ ठरतो.
६. बऱ्याच मुली या अगदी लहान वयात आई होतात. मग व्यवस्थित असे शिक्षण होत नाही आणि पर्यायाने याचा परिणाम नोकरी शोधण्यापासून तर बढतीपर्यंत सगळ्यावर होतो.
७. इतर अनेक देशांप्रमाणेच घरकाम करण्यासाठी नोकर चाकर नसल्यामुळे घरकामासाठी बराच वेळ द्यावा लागतो. पारंपारिक मानसिकतेतून स्वयंपाक, कपडे धुणे, स्वच्छता अशा कामांसाठी हातभार लावणारे पुरुष फार कमी आहेत. म्हणजे नोकरी आणि घर या दोन्हींचा समतोल सांभाळणे स्त्रियांसाठी अवघड आहे.

वरील कारणांचा परत मागोवा घेतला तर यातील बरीच ही बायकांनी घरापुरते मर्यादित राहावे या मानसिकतेतून येत आहेत. यात स्त्री-पुरुष सगळेच आले. ही एक बाजू झाली. दुसरी एक बाजू अशी सुद्धा आहे की अभियांत्रिकी किंवा संशोधन, वैद्यकशास्त्र किंवा पोलीस, सरकारी कार्यालये इथे काम करणाऱ्या महिला बर्याच आहेत. हळूहळू यात वाढ होताना दिसते आहे. क्रीडा क्षेत्रात यशस्वी झालेल्या अनेक बायका आहेत. पण त्याचबरोबर यांच्यापैकी अनेकींना वेळ काळाचे बंधन व्यवसायात पाळता येत नाही. मग अशांसाठी लग्न हा अजूनही अडथळा समजला जातो. म्हणजेच लग्नाच्या आधी काय करायचे ते करा, एकदा लग्न झाले की मग घर सांभाळणे ही जबाबदारी वरचढ ठरते. पण यातून ज्यांना बाहेर पडायचे आहे त्यांच्यासाठी मग दुसरी टोकाची भूमिका तयार होते ती म्हणजे लग्न न करणे, केले तरी मुलांना जन्म न देणे अशी. या सगळ्यातून जन्मदर अत्यंत कमी झाला आहे आणि पर्यायाने मनुष्यबळ कमी झाले आहे, इतर काही समस्या उद्भवत आहेत. बऱ्याच सिंगल मदर्स साठी नोकरी ही आर्थिक दृष्ट्या आवश्यक आहे पण या अशा अडचणींचा सामना करताना त्यांना इतरांपेक्षाही जास्त अडचणींचा सामना करावा लागतो. अधिकाधिक दरवाजे कागदोपत्री स्त्रियांसाठी खुले केलेले असले तरीही प्रत्यक्षात हे तेवढे साधे सरळ नाही. या सगळ्यात नोकरी करावी किंवा करू नये हा मुद्दा नाही. फक्त केवळ भारतातच असे नाही, तर जगात बऱ्याच ठिकाणी स्त्रीयांना स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी कमी अधिक प्रमाणात संघर्ष करावाच लागतो हे या सगळ्यातून दिसते.

नोकरी व्यतिरीक्त इतरत्र स्त्रियांची स्थिती काय? किंवा त्यांचे राहणीमान कसे आहे, रोजची कामे काय असतात, मुलगी, बायको, आई अशा नात्यातील स्त्री कशी आहे? यातील काही निरीक्षणे ही इतरत्रही अशीच असू शकतील.

जसा स्त्रियांची नोकरी किंवा कमावती असणे या बाबतीत जर्मनी हा इतर युरोपीय देशांमध्ये जरा कर्मठ प्रकारात मोडतो, तसा इतर बाबतीत दिसला नाही. अगदी जन्मापासून बघितले तर मुलगी जन्माला येणे हा आनंदाचा क्षण आहे. मुलगा मुलगी असा फरक, वंशाचा दिवा असे काही प्रकार नाहीयेत. मुलींना वाढवताना सतत तू मुलगी आहेस हे असे करू नये, तसे करू नये अशा काही मर्यादा घातल्या जात नाहीत. अर्थात यासाठी आजूबाजूचे वातावरण देखील त्यादृष्टीने योग्य आहे हा मुद्दा महत्वाचा आहे. शिक्षणा इतकाच खेळ हा देखील इतर मुलांप्रमाणेच मुलींच्या शालेय जीवनापासूनच महत्वाचा भाग आहे. लैंगिक शिक्षणाच्या बाबतीत मोकळेपणाचे वातावरण असल्याने, मुलींचे वयात येतानाचे प्रश्न, हार्मोनल बदल याविषयी मुले आणि मुली यांच्यातील जागरुकता शिकण्यासारखी आहे.

शरीरयष्टीच्या दृष्टीने जर्मन बायका म्हटले की सर्वसाधारण धिप्पाड, उंचपुऱ्या बायका डोळ्यांसमोर येतात. आणि बऱ्याचशा असतातही तशा. अगदी ६ फुट उंच वगैरे. स्टेफी ग्राफ हे अगदी योग्य उदाहरण. (कोण कोण उसासे टाकतंय) अति लठ्ठपणाच्या बळी सुद्धा अनेक आहेत. याउलट काही इतक्या बारीक की या काही खातात की नाही असा प्रश्न पडावा अशा. स्वतःच्या तब्येतीच्या बाबतीत जागरूक आहेत हे एक कारण आहे परंतु त्याचबरोबर धुम्रपान हे एक महत्वाचे कारण आहे. दिवसभर फक्त कॉफी आणि सिगारेट यावर जगणारे जसे पुरुष आहेत तशाच स्त्रिया देखील. याबाबतीत समानता आहे अगदी. कदाचित महिला आघाडीवर आहेत असेही म्हणणे पूर्ण गैर ठरणार नाही.

अगदी लहान वयात लग्न करणाऱ्या, मुलांना जन्म देणाऱ्या देखील बऱ्याच मुली आहेत. म्हणजे २०-२१ व्या वर्षी सुद्धा बऱ्याच मुलींची लग्नं झालेली असू शकतात. यात काही वेळा अजून शिक्षण देखील पूर्ण झालेले नाही, आणि चुकून नवऱ्याने धोका दिला, तो सोडून गेला तर अशा वेळी एकटीने सगळी जबाबदारी घेणाऱ्या देखील अनेक दिसतात. तरुण मुलींना मिळणाऱ्या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेणाऱ्या देखील अनेक जणी आहेत. या स्वैराचाराच्या बळी देखील आहेत. छोट्या छोट्या कारणांमुळे होणारे ब्रेक-अप्स किंवा कुठल्याही लहान सहान अडचणीतून येणारे औदासिन्य, त्यातून होणारा औषधांचा मारा, हरवलेला आत्मविश्वास अशी कारणेदेखील तरुण पिढीला शिक्षण पूर्ण करण्यापासून कधीकधी वंचित करताहेत.

कॉलेज वयीन मुली काय किंवा इतर बायका काय, यांचा मेकअप मात्र अचंबित करतो. सकाळी कुत्र्याला फिरायला नेताना किंवा ऑफिसला जाताना, अगदी घराशेजारच्या बेकरीत ब्रेड आणायला, प्रचंड रंगरंगोटी करून तरुण मुली, काकू, आज्या कुणीही दिसल्या की काय बोलावे कळतच नाही. आणि थोडा थोडका नव्हे, तर एकूण एक रंगसंगती कपड्यांशी जुळवणारा. नवऱ्याचा एका प्रवासात ट्रेनचा अपघात झाला आणि रात्री ८ ते पार २:३० पर्यंत सगळे जण ट्रेन मध्ये अडकले होते. तेव्हा रात्रीच्या एक वाजतासुद्धा बायका मेकअप करत होत्या. कपडे किंवा बाकी फॅशन याबाबतीत मात्र बऱ्याच गबाळ्या वाटल्या. कुठल्याही रंगाचा शर्ट, त्यावर भलत्याच रंगाची विजार, आणि अजून कुठल्यातरी वेगळ्याच रंगाचे केस. कुठेही दुकानात गेलो तर काळा, गडद निळा, करडा, पांढरा असे काही ठराविक रंग सोडून इतर रंगच दिसत नाहीत. आणि सगळ्या दुकानांमध्ये तेच तेच प्रकार. स्कार्फ किंवा स्टोल्स मध्ये जर विविधता दिसली पण इतर बाबतीत यथातथाच. हा फरक पॅरिस किंवा अशाच जवळच्या काही इतर देशातील शहरामध्ये फिरताना जास्त तीव्रतेने जाणवतो. आणि भारताशी तर तुलना होऊच शकत नाही. माझ्या भारतातून आणलेल्या कुठल्याही कपड्यांच्या बाबतीत 'रंग आणि डिझाईन मस्त आहे' असे काही जण आवर्जून सांगतातच. "आमच्या भारतात आहेच तेवढे वैविध्य, इकडे काय फक्त काळे, निळे कपडे" असं ऐकवताना मजा येते मग. भारताबाबत असे काही असले की लागली चान्स पे डान्स. :)

एक गृहिणी किंवा स्वतंत्र मुलगी म्हणून वावरताना प्रचंड आत्मविश्वास वाटतो या बायकांमध्ये. साफसफाई हे एक अत्यंत आवडते काम. अगदी वेड्या आहेत सगळ्या या बाबतीत. आणि ती कामे ठरल्या वेळी करणारच. लहानपणापसून तसेच शिकवले गेले आहे. शनि-रवि जेव्हा माझी सगळी कामं थंडावलेली असतात, विशेषतः हिवाळ्यात, अशा वेळी जेव्हा मी स्वयंपाक घरात असते, तेव्हा खिडकीतून दिसणारी समोरच्या इमारतीत राहणारी बाई हमखास सगळी साफसफाई करत असते. त्यातही ठरलेली कामे, बहुतांशी त्याच क्रमाने, सोफ्याचे कव्हर झटकणे, मग सगळे फर्निचर पुसणे, आणि मग सगळ्यात महत्वाचे, खिडक्या. आता या खिडक्या ती ज्या पद्धतीने स्वच्छ करते त्याप्रमाणे जर ही बाई भारतात राहिली तर किती वेळ घेईल याचा अंदाज घेणे कठीण आहे. चार वेगवेगळी फडकी वापरून, पार त्या खिडकीत बसून बाहेरून भिंती सुद्धा पुसते. मग लागली इस्त्री सुरु. स्वच्छतेच्या बाबतीत मी स्वतः प्रचंड आग्रही असले तरीही दिवसभर फक्त तेच करत बसणे हे अति वाटते. आजूबाजूच्या बऱ्याच घरांमध्ये हेच दृश्य दिसते. एका कार्यक्रमात तीन मिनिटात दहा वेळा एका बाईने 'खिडक्या पुसणे' चे पालुपद लावले तेव्हा मी हतबुद्ध झाले होते. विशेष म्हणजे बहुतांशी बायकाच दिसतात ही कामे करताना. गाडी साफ करण्यात मात्र पुरुष आघाडीवर. 'असे का' हे वेगळे सांगणे न लागे. ;)

आता अजून एक मुद्दा म्हणजे स्वयंपाक. काही अपवाद वगळता जर्मन खाद्यपदार्थ हे काही अगदी जगप्रसिद्ध वगैरे नाहीये. प्रसिद्ध आहे ते बेकिंग. ब्रेड, केक्सचे नानाविध प्रकार. आणि आपण जसे आजीच्या हातचे बेसनाचे लाडू, पुरणपोळ्या वगैरे अगदी खास आवडीने खातो, तसेच इकडे ओमा म्हणजेच आजीच्या हातचा केक खातात. अजूनही बऱ्याच प्रमाणात कुटुंब संस्था टिकून असल्याने, मुले सांभाळायला आजी आजोबांनी मदत करणे हे देखील सहज घडताना दिसते. या घरातल्या कामांव्यतिरीक्त मुलांना शाळेत सोडायला जाणे, घरी घेऊन येणे, त्यांचा अभ्यास घेणे ही सगळी कामे आईचीच समजली जातात. बाहेरून सामान आणणे हेही बरेचदा गृहिणींचे काम. गाडी असेल तर गाडीने अथवा सार्वजनिक वाहतूक सोयीची आहे त्यामुळे त्याने सुद्धा. मुले थोडी मोठी झाली की त्यांच्या शाळांच्या वेळात किंवा जमेल तसे स्वतःचा व्यायाम आणि काळजी, मैत्रिणींसोबत बाहेर जाणे अशा प्रकारे स्वतःसाठी वेगळा वेळ मात्र आवर्जून काढतात. पण २ वर्षांच्या आतल्या मुलांना डे केअर मध्ये ठेवायचे असेल तर बरीच बंधने आहेत. म्हणजे नोकरी करत असाल तर किंवा अगदी काही अडचण असेल तरच. घराशिवाय बाहेरचीही कामे मुली सहजतेने करतात. घर बांधणे, गाड्या दुरुस्ती, जड जड वस्तू उचलणे, बांधकामात मदत करणे वगैरे अनेक कामे करताना बऱ्याच बायका दिसतात. याबाबतीत फार कौतुक वाटते त्यांचे.

आई म्हणून दोन्ही टोके दिसली. काही वेळा वाटते की आईचा बाळाशी काही संवादच होत नाहीये. बरेचदा बाळे झोपलेली, जरी जागी असतील तरी आईचं काहीतरी वेगळंच चाललंय. मोबाइलशी खेळ, नवऱ्याशी चाळे किंवा केसांशी खेळ किंवा अजून काही. अजून एक म्हणजे लहान बाळांसमोर बिनधास्त जेव्हा सिगारेटी फुंकतात तेव्हा त्रासदायक वाटतं अगदी. अगदी प्रेमाने करणाऱ्या सुद्धा दिसतातच. आवडीने मुलांसाठी कपडे खरेदी, त्यांचे संगोपन हे सगळे करताना पण दिसतात.

आता आज्या किंवा वयस्कर बायका. कुठेही हॉटेल मध्ये जा, एक तरी अशा आज्यांचा ग्रुप असलाच पाहिजे. सगळ्या मिळून नुसती थट्टा मस्करी आणि गप्पा. यातही नवीन पिढी हा एक मुद्दा असतोच. सासू सुना हा सुद्धा आवडता टॉपिक. रस्त्यात सुद्धा अशा आज्या भेटल्या की काय खुसुरफ़ुसुर चालू असते माहीत नाही. असेच उन्हाळ्याच्या दिवसात एकदा आम्ही घराजवळच असलेल्या एका आइसक्रीमच्या दुकानात बसलो होतो. तिथली मालकीण आजी आणि एक ग्राहक आजी यांच्यातल्या गप्पा अगदी रंगात आल्या होत्या. बराच वेळ झाला, आइसक्रीम संपले, आजोबा कंटाळले, चला चला असे दोन तीनदा म्हणाले, दोन्ही आज्या आपल्याच धुंदीत गप्पा मारत होत्या. आजोबांनी पैसे दिले, अजूनही काही थांबेना. शेवटी आजोबांनी उठून गाडी काढली तेव्हा मालकीण आजी आता आपल्या मैत्रिणीला ठीक आहे आपण बोलू नंतर, तो थांबलाय असे म्हणाली. यावर आजी अजून पुढे जाउन, जाऊ दे गं, थांबेल तो जरा वेळ असे म्हणाल्या. आता आजोबांनी हॉर्न दिला आणि मग 'चल येते गं' करत आजी गाडीत स्थानापन्न झाल्या. आजोबांच्या चेहऱ्यावरचे भाव नवऱ्याने अगदी आपुलकीने टिपले होते. आता पुढे त्याने काही बोलायच्या आतच, 'बायका सर्व जगात कुठेही गेल्या तरी सारख्याच' असे मीच आधी म्हणाले म्हणजे पुढचे काही (वि)संवाद मला टाळता आले. पण बायकांचे काही स्वभावधर्म हे युनिव्हर्सल आहेत हे मला कळून चुकले. :D

मध्यंतरी टीव्ही वर "बी लाइक अ जर्मन" असा कार्यक्रम होता. त्यात एक ब्रिटीश कुटुंब इकडे काही दिवस सांस्कृतिक देवाणघेवाण म्हणून राहणार होते. यात इंग्लंड मध्ये ही स्त्री नोकरी करत होती आणि इकडे तिला गृहिणी म्हणून राहायचे होते. तर तिला घरातली कामे शिकवायला गृहिणींच्या एका संस्थेमार्फत एका बाईची नेमणूक केली होती. जर्मन बायका घरी नेमके काय आणि कसे काम करतात, ते कमीत कमी वेळात, कार्यक्षमता वाढवून कसे करावे हे शिकविण्यात आले. (ही संस्था खास करून महिलांसाठी कार्यक्रम राबवते. यात मग पैशांची बचत, नेटका संसार, मुलांची काळजी इत्यादी शिकवले जाते.) थोडी अतिशयोक्ती होतीच कारण टीव्ही वरचा कार्यक्रम होता. पण ब्रिटीश बाई शेवटी कंटाळली होती. एखादी स्त्री नोकरी करते म्हणजे ती आई म्हणून वाईट ठरते हा इथल्या लोकांचा दृष्टीकोन मला वेगळा आणि आश्चर्यकारक वाटला असे ती म्हणाली. बरेच काही शिकायला मिळाले पण ही स्वच्छता आणि ही कामे जरा अति आहे असे तिचे मत होते.

इथेही राज्यांप्रमाणे सुद्धा बायकांची काही वैशिष्ट्ये आहेत. दक्षिणेकडे असणाऱ्या स्टूटगार्ट (Stuttgart) या शहराजवळचा जो भाग आहे तेथील बायका म्हणजे श्वाबियन बायका. या अत्यंत काटकसरी आणि निगुतीने संसार करणाऱ्या म्हणून ओळखल्या जातात. बायकांनी असा संसार करायला हवा म्हणून यांची उदाहरणे दिली जातात. इतर काही राज्यांमधील लोकांच्या मते याला कंजुषी पण म्हटले जाते. चालायचेच. महाराष्ट्रातही आहेत अशी काही शहरे. :P आता ही कंजुषी की काटकसर यावर काथ्याकुट नको. ;) वयस्कर बायकांमध्ये पाहिले तर महायुद्ध आणि त्यानंतरची परिस्थिती अनुभवल्याने ही परिस्थिती जर्मनीत इतरत्र देखील दिसते. हा राज्या राज्यातील बदल सगळ्याच बाबतीत आहे. काही राज्यांमध्ये आजही बहुतांशी लोक पारंपारिक विचारधारेचे आहेत तर काही ठिकाणी झपाट्याने बदल होत आहेत.

एकूण पूर्वीच्या काळापासून तर आजपर्यंत अनेक बदल होत आहेत. महायुद्धाच्या काळात जिथे संपूर्ण देशानेच बिकट परिस्थितीत दिवस काढले, तिथे अशा घटनांचे परिणाम स्त्रियांच्या जडण घडणीवर, विचारसरणीवर होणे हे स्वाभाविक होते. अगदी अलीकडच्या काळात पाहिले तर २००७-०८ दरम्यान आलेली जागतिक मंदी, त्यानंतर युरो कोसळणे या बाबींचाही येथील तरुणांच्या मानसिकतेवर परिणाम झालेला दिसतो. तरीही इतर युरोपीय देशांच्या तुलनेत जर्मनीला कमी फटका बसल्याने थोडे स्थैर्य होते. मात्र काहीही अडचण आली तर उत्पन्नाचे दुसरे साधन देखील असावे अशा कदाचित आर्थिक सुरक्षिततेच्या कारणासाठी म्हणून असेल, पण बदल हवेत हे स्वीकारणे हीदेखील चांगली बाब आहे. राजकारणात अनेक महिला कार्यरत आहेत आणि हे प्रमाण दिवसेंदिवस वाढते आहे ही एक अत्यंत सकारात्मक बाब आहे. चाकोरीबाहेरचे शिक्षण घेण्याची, नवीन काहीतरी शिकण्याची महत्वाकांक्षा अधिकाधिक मुलींमध्ये दिसते आहे. केवळ सौंदर्य, संसार, शॉपिंग, पार्टीज आणि स्वयंपाक यापलीकडे देखील स्त्रियांची ओळख आहे हे दाखवून देणारी उदाहरणे दिसू लागली आहेत. परंतु शिक्षण, नोकरी, एक व्यक्ती म्हणून मिळणारा आदर, स्वतंत्र विचारसरणी, विकसित देशात मिळणाऱ्या इतर सोयी सुविधा अशा अनेक बाबी असूनही पारंपारिक कामांच्या बाबतीत स्त्रीने बाहेर पडण्यासाठी अगदी तरुण पिढीही पूर्णपणे तयार झालेली नाही. एकूण समाजाचा कल हा स्त्रिया आणि पुरुष यांच्या कामाच्या वेगवेगळ्या विभागण्या असाव्यात असा आहे. अर्थात त्यांचे मत याच्या विरुद्ध म्हणजेच स्त्रियांनी कमवावे आणि पुरुषांनी घर सांभाळावे असा नसून दोघांनीही कामाच्या समान जबाबदार्या घ्याव्यात असा आहे. परंतु ही मानसिकता बदलण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. हळूहळू अधिकधिक स्त्री पुरुषांना हे वाटत असले तरीही अनेक स्त्री-पुरुष हे पारंपारिक विचारसरणीचा पुरस्कार करणारे आहेत. एका सर्वेक्षणानुसार 'जेव्हा मुले लहान असतात तेव्हा बऱ्याच स्त्रिया हे आनंदाने स्वीकारतात परंतु जसजशी मुले मोठी होत जातात आणि आपल्या जगात रुळू लागतात, त्यावेळी काहींना आपण इतर पुरुष आणि मुले नसलेल्या स्त्रिया यांच्यापेक्षा कमी पडत आहोत ही भावना डोके वर काढू लागते. अशा स्त्रियांकडून मग पुढील पिढीत बदल व्हावेत म्हणून अधिक प्रयत्न केले जातात. समान शिक्षण असूनही स्त्रीयांना मिळणारे कमी वेतन, बढतीसाठी दिले जाणारे प्राधान्य, पारंपारिक विचारसरणी, अधिकधिक पाळणाघरांची सोय, या आणि अशा काही बाबतीत बदल व्हावेत म्हणून सध्याच्या सरकारतर्फे अनेक कार्यक्रम राबवले जात आहेत. गरोदर बायका, प्रसूती नंतर मिळणारी रजा, करातील सवलती, सिंगल मदर्स साठी विशेष सवलती यासाठी अधिकाधिक मदत व्हावी म्हणून काही संस्था कार्यरत आहेत. जर्मनीतील काही महत्वाच्या खाजगी कंपनीत कार्यकारी मंडळात ३० टक्के जागा स्त्रियांसाठी राखीव असाव्यात या सरकारच्या निर्णयाला २०१४ च्या शेवटी हिरवा झेंडा मिळाला आहे. २०१६ पासून याची अंमलबजावणी सुरु होईल अशी चर्चा आहे.

तर अशा या जर्मन बायका आणि त्यांचे समाजजीवन. युरोपियन आर्थिक अक्षाचा प्रमुख स्तंभ असलेला हा देश अँजेला मेर्केल सारख्या कर्तुत्ववान स्त्रीच्या नेतृत्वाखाली प्रगती करत आहे आणि अशाच अनेक स्त्रिया या देशाचे भविष्य घडवण्यात पुरुषांच्या बरोबरीने पुढे येतील अशी आशा आहे.

तळटीप - हा लेख लिहिताना माझे येथील वास्तव्यातील अनुभव, आंतरजालावरील माहिती, टीव्हीवर दाखवले जाणारे काही कार्यक्रम याद्वारे मिळालेली माहिती संकलित केली आहे.

प्रतिक्रिया

मितान's picture

8 Mar 2015 - 2:22 pm | मितान

उत्तम लेख मधुरा !

अनुप ढेरे's picture

8 Mar 2015 - 2:26 pm | अनुप ढेरे

मस्तं लेखन. खूप आवडलं. एकदम इंटरेश्टिंग आहे!

चौकटराजा's picture

8 Mar 2015 - 2:38 pm | चौकटराजा

लेख स्त्री वर लिहिला आहे पण माझी प्रतिक्रिया बाप रे बाप अशी आहे.मधुरा, माझे काही नातेवाईक परदेशात होते .काही मित्र तात्पुरते जाउन आले पण सगळे निरिक्षणात नापास. त्या पार्श्वभूमीवर हा लेख मला जास्तच आवडलेला आहे. एरवी
माणूस इथून तिथून सारखाच असे एक वाक्य एका कट्ट्यात श्रीरंग जोशी - रंगा याने सांगितले होते. आता मात्र परदेशातील माणूस त्याच्या कथा व्यथा हे ही वाचावयास मिळाले. गेल्या पंचवीस वर्षात स्त्री ला माणूस म्हणून वागण्याची अधिक संधी मिळत आहे. पण अजूनही फार प्रवास व्हायचा आहे. अर्थात मुलांचे लालन पालन कोणीतरी करायला लागणारच ! त्यात कमीपणा आईने व बापाने मानायचे कारण नाही. स्त्री ने देखील काही गोष्टीत आपले माणूसपण शीधावे.
उगीचच सुंदर दिसतेय म्हणून " आवाहन" करणारे कपडे नकोत व आपले पुढारीपण दाखविण्यासाठी शर्ट जाकिट चा आग्रहही नको. आजही आपल्या येथील स्त्री जनरल नॉलेज, वृत्तपत्र वाचन , राजकारण , अर्थ कारण हे पुरूषांचेच विषय आहेत असे मानताना दिसते.ते बदलले पाहिजे.

एक एकटा एकटाच's picture

8 Mar 2015 - 3:18 pm | एक एकटा एकटाच

मस्त लिहिलय
आवडेश

सविता००१'s picture

8 Mar 2015 - 3:27 pm | सविता००१

फार सुरेख लेख
आवडेश

सांगलीचा भडंग's picture

8 Mar 2015 - 3:56 pm | सांगलीचा भडंग

सुरेख लेख . आणि डिटेल माहिती

"आमच्या जर्मनीत एकाच पोस्ट साठी जर एक स्त्री आणि एक पुरुष उमेदवार असेल तर पुरुषालाच प्राधान्य दिले जाईल आणि जर दोघेही एकाच पोस्ट वर असतील तर स्त्रीचा पगार निश्चित पुरुषापेक्षा कमी असेल"

सर्वात जास्त आश्चर्य वाटले ते वरील माहितीचे . समान योग्यतेचे स्त्री आणि पुरुष असतील तर पुरुषांना पगार जास्त मिळतो ते पण जर्मनी सारख्या देशात हे बघून वाईट वाटले . भारतात वाक्याचा पहिला भाग जरी थोडाफार खरा असाल तरी पगाराच्या बाबतीत असा भेदभाव नाही असे वाटते

अन्या दातार's picture

8 Mar 2015 - 3:59 pm | अन्या दातार

बारकावे आणि त्यामागे असू शकणारी कारणमिमांसा देण्याची शैली आवडली. :)

अतिशय माहितीपूर्ण लेख ..खूप नवीन गोष्टी कळल्या ..

छान लेख मधुरा!जर्मन स्त्रीची छान ओळख करून दिलीस.

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Mar 2015 - 6:36 pm | डॉ सुहास म्हात्रे

लेख भयंकर आवडला आहे ! माहिती आणि त्यामागची कारणमिमांसा अप्रतिम !!

दोन महायुद्धांत बेचिराख होऊनही आजच्या दिसाला जागतिक स्तरावर सर्वात विकसित आणि स्थिर अर्थव्यवस्था असलेला जर्मनी माहित होता. तो बराचसा स्थितीवादी (conservative) आहे हे देखील ऐकून होतो... पण तेथे स्त्री-पुरुषांत इतका भेदभाव असेल असे वाटले नव्हते. अनेक जर्मनांबरोबर काम केले असताना तसे जाणवले नव्हते ! तेथे वास्तव्य करून तिथल्या जीवनाचे बारकाईने केलेले निरिक्षण लेखात पूरेपूर उतरलेले आहे !

मिहिर's picture

8 Mar 2015 - 9:13 pm | मिहिर

लेख फार आवडला. निरीक्षणे, निष्कर्ष, विवेचन सगळंच छान आणि रोचक आहे.

जुइ's picture

8 Mar 2015 - 9:42 pm | जुइ

इतिहासाचा आणि सद्य स्थितीचा जर्मन स्त्रीचा अतिशय उत्त्म आढावा घेतला आहेस मधुरा!! हा लेख जास्त परिणामकारक वाटतो काराण एका परक्या देशाच्या स्त्रीच्या नजरेतुन याचे विवेचन केले आहे.

जर्मनीतील स्त्री जीवनाच्य वेगवेगळ्या आयामांचा आढावा घेणारा हा लेख अतिशय आवडला. त्यामागे केलेला विचार अन जास्तीत जास्त माहिती देण्यासाठी घेतलेले कष्ट निश्चितच प्रशंसनीय आहेत. अनेक गैरसमजूतींचे निराकरण झाले .(एकूणच युरोपमधील स्त्रियांबद्दल माझे विचार वेगळे होते.) पण एकूणच स्त्रीपण हे म्हणजे "कोठेही जा पळसाला पाने तीनच " हे मात्र खरं.

परदेशातील स्त्रीजीवनाविषयी इतकी व्यवस्थित माहिती आणखी कुठेही मिळाली असती असे वाटत नाही. निरीक्षण, मुद्देसूद मांडणी, इ. सर्व बाजूनी उत्कृष्ट!!! अतिशय आवडला.

जर्मन स्त्री, पुरुषांच्या विचारसरणीबाबत असलेला लेख जमून आलाय.
लहान मुलांना पाळणाघरात ठेवून नोकरी करणारी आई ही अजूनही सकारात्मक दृष्टीकोनातून पहिली जात नाही.
लहान मुलांना पाळणाघरात ठेवून नोकरी करणार्‍या बापाकडे बघण्यास मात्र वेगळा दृष्टीकोन अजून नाही.

श्रीरंग_जोशी's picture

9 Mar 2015 - 7:34 am | श्रीरंग_जोशी

या विषयावरची निरीक्षणे अन त्यावरचे विवेचन आवडले.
जर्मनीबाबत अशी निरीक्षणे प्रथमच वाचली.

अमेरिकेत एवढ्या प्रमाणात अशी उदाहरणे कधीच दिसली नाहीत.
पण माझी निरीक्षणे सर्वसमावेशक असतील असे मला वाटत नाही.

पिशी अबोली's picture

9 Mar 2015 - 12:55 pm | पिशी अबोली

मधुराताई, दुसर्‍या देशात काय, शिक्षणानिमित्त केवळ दुसर्‍या राज्यात येऊनपण इथल्या समाजाबद्दल पूर्वग्रहदूषित विचारांच्या चौकटीत बसणारे तेवढेच विचार करणार्‍या मला, हा सखोल निरीक्षण आणि चिंतन करून लिहिलेला लेख झणझणीत अंजनासारखा वाटला. वेगवेगळ्या व्यक्ती, त्यांच्यासोबतची संभाषणे, आणि त्यातून उभे राहणारे समाजाचे चित्र किती सुंदर रेखाटले आहे!

प्रीत-मोहर's picture

9 Mar 2015 - 2:10 pm | प्रीत-मोहर

मधुरा मस्त लिखाण. आवडेश.

स्नेहल महेश's picture

9 Mar 2015 - 2:16 pm | स्नेहल महेश

उत्तम निरीक्षण

मस्त झालाय लेख मधुरा. :)

पेट थेरपी's picture

9 Mar 2015 - 3:44 pm | पेट थेरपी

लेख उत्तम आहे आणि अंक पण. कल्पना नाविन्यपूर्ण आहे. सर्व अनाहिता सभासदांना हार्दिक शुभेच्छा.

सस्नेह's picture

9 Mar 2015 - 3:50 pm | सस्नेह

जर्मनीसारख्या युरोपिअन देशातसुद्धा आशियाई देशांपेक्षा स्त्री-जीवन मागास असावे याचे आश्चर्य वाटले.
त्यामानाने आपण फारच प्रगत दिसतो.

नुकताच शेंगन व्हिसाच्या वेळी या वागणुकीचा अनुभव घेतलाय!युरोप काय आणि बिहार काय.मला एकटीने प्रवास करायला नवर्याची परवानगी आहे!!असं पत्र द्यावं लागलंय!!

सुचेता's picture

9 Mar 2015 - 7:30 pm | सुचेता

काय म्हणतेस? मनातून खरच वाईट वाट्ल अजुन किती पल्ला

भावना कल्लोळ's picture

9 Mar 2015 - 6:39 pm | भावना कल्लोळ

उत्तम निरीक्षण आणि लेख .

विशाखा पाटील's picture

9 Mar 2015 - 8:50 pm | विशाखा पाटील

दिसतं तसं नसतं...उत्तम लेख.
याच विषयाशी संबंधित आजच्या लोकसत्तेला हा लेख -
http://www.loksatta.com/sampadkiya-news/german-parliament-approves-gende...

स्वाती दिनेश's picture

9 Mar 2015 - 9:44 pm | स्वाती दिनेश

उत्तम आढावा मधुरा,
स्वाती

रुपी's picture

10 Mar 2015 - 1:29 am | रुपी

फारच उत्तम लिखाण आणि माहितीपूर्ण लेख! अगदी सविस्तर लिहिले आहे आणि त्यासाठी भरपूर मेहनत घेतली आहे.

बर्‍याच गोष्टी वाचून आश्चर्य वाटले आणि धक्काही बसला!

मधुरा देशपांडे's picture

10 Mar 2015 - 3:34 am | मधुरा देशपांडे

सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे अनेक आभार.

लेखाचा आवाका तसा बराच मोठा आहे. माझे ३ वर्षातील अनुभव आणि त्याला वाचन आणि इतर माध्यमांची जोड यावरुन लिहिलेला हा लेख परिपुर्ण नाही याची याची जाणीव आहे. याच अनुषंगाने अजुन काही लिहावेसे वाटते. मुळ लेख लिहिण्याचा उद्देश हा 'जर्मनी किती मागासलेला आहे', 'स्त्रियांनी नोकरी करावी की नाही', 'कुटुंब महत्वाचे की करीअर' असा नसुन, भारताबाहेरच्या देशातील स्थितीचा आढावा घेणे हा होता. भारतात असताना माझ्यासमोरचे चित्र काय होते आणि ते कसे दिसले याबाबतचे हे अनुभव. आजुबाजुला जे दिसले त्यात ज्या समान बाबी आढळल्या, ज्यावर माहिती शोधताना माझी निरीक्षणे जुळत गेली, त्यावरुन हा लेख लिहिला आहे. कुणाचे अनुभव वेगळे देखील असु शकतात, दृष्टीकोन देखील व्यक्तीगणिक बदलणार हे स्वाभाविक आहे.
यात नोकरी करणे म्हणजे लगेच स्त्रिया प्रगत झाल्या, मुक्त झाल्या असे होत नाही त्याचबरोबर हवे तसे राहणे याने देखील नाही. कठिण परिस्थितीत धडपडत शिक्षण घेणार्‍या, मुलीची, आईची, सुनेची सगळी कर्तव्ये सांभाळत घराचा आर्थिक डोलारा सांभाळायला मदत करणार्‍या भारतातील स्त्रिया या पार्श्वेभुमीवर जास्त आठवतात हे मात्र खरे. त्याचबरोबर इथल्या स्त्रियांच्या आवडलेल्या गोष्टी जसे फिटनेस, स्वतःसाठी वेळ काढणे हे कौतुकास्पद आहेच.

@चौराकाका,

अर्थात मुलांचे लालन पालन कोणीतरी करायला लागणारच ! त्यात कमीपणा आईने व बापाने मानायचे कारण नाही. स्त्री ने देखील काही गोष्टीत आपले माणूसपण शीधावे.

सहमत आहेच. कमीपणा नसावाच. फक्त जर केवळ स्त्री म्हणुन, ती मुलांना जन्म देणार अथवा दिला आहे या कारणास्तव बरेच ठिकाणी नाकारले जात असेल, तर ते होऊ नये. एक आई म्हणुन नोकरीतील जबाबदार्‍या कमी करुन मुलांचे उत्तम संगोपन करणार्‍या स्त्रीया आजुबाजुला दिसतात. त्यात चुकीचे असे काही नाही. पण शिक्षणक्षेत्र निवडीपासुन ते काही क्षेत्रात महिलांना होणारा विरोध, कमी कामाच्या वेळा घेणे हे स्त्रीनेच केले पाहिजे कारण पुरुषांची तेवढी मदत नसणे, हे वेगळे जाणवले.

@सांगलीचा भडंग, हे वाक्य या लेखासाठी, माझ्या शोधासाठी कुठेतरी ट्रिगर देणारे ठरले. परिस्थिती बदलते आहे पण हळुहळु. आणि त्यातही हे अभियांत्रिकी, मॅनेजमेंट या सो कॉल्ड पुरुषी मक्तेदारीच्या क्षेत्रात जास्त. लेखात आलंय त्याप्रमाणे बेकरी, दुकाने यात ही तफावत कमी आहे.

@रेवतीताई,

लहान मुलांना पाळणाघरात ठेवून नोकरी करणार्‍या बापाकडे बघण्यास मात्र वेगळा दृष्टीकोन अजून नाही.

मी यावर असे म्हणेन की मुलांसाठी वेळ काढणारे तसे बरेच बाबा लोक दिसतात. बर्‍याच केसेस मध्ये जर त्याने आर्थिक बाजु सांभाळायची असेल तर ते कदाचित चुकीचे ठरणारही नाही. तेव्हा त्याहीपेक्षा वाईट याचे वाटते की 'लहान बाळासमोर सिगारेट फुकणार्‍या आईला तेवढे अपराधीपण नाही, केवळ शाळांच्या वेळा पाळणे आणि त्यासाठी मुलांना तयार करणे हे करतानाच बाळाशी फारसा संवाद नसणे, भारंभार जंक फुडचा मारा करणे यात अपराधीपण नाही', मात्र 'पुरुषी मक्तेदारीच्या क्षेत्रात तिने नोकरी करणे चुकीचे' याचे वाईट वाटते.

अजयाताई, हो तुझा हा अनुभव अजुनच वेगळा. :(

@विशाखाताई, दुव्यासाठी धन्यवाद. :)

सर्वांना परत धन्यवाद. माझ्या पुढच्या वास्तव्यात या निरीक्षणांशी काही तफावत दिसली, नवीन अनुभव आले तर त्याबाबत लिहिण्याचा प्रयत्न करेन.

सानिकास्वप्निल's picture

10 Mar 2015 - 1:59 pm | सानिकास्वप्निल

लेखन खूप आवडले, ऊत्तम माहितीपूर्ण लेख आहे.
किप इट अप गर्ल.

स्पंदना's picture

10 Mar 2015 - 3:49 pm | स्पंदना

इतका ओघवता, मुद्देसुद आणि तौलनिक लेख!!
या लेखातले अनेक मुद्दे अक्षरशः अवाक करुन गेले. जर्मन आपल्या देशाला पितृभुमी मानतात हे ऐकुन माहीत होते, पण त्या पाठीमागे इतका स्त्रीला कमी समजण्याचा दृष्टिकोण असेल हे सांगूनही पटत नाही. खरच अस असेल?
बाकी स्वच्छता, घरकाम आणि मुलांच्या संगोपनाची जबाबदारी हे मी चायनिज स्त्रीयांच्यात पण पाहिलं आहे. आणि सिगारेटी आणि मुलांकडे पूर्ण दुर्लक्ष्य सुद्धा!!
मधूरा इतका सखोल आणि विवेचनयुक्त लेख वाचून बरीच माहीती कळाली.

भाग्यश्री's picture

11 Mar 2015 - 4:33 am | भाग्यश्री

खूप आवडला लेख!
जर्मनीतील स्त्रियांबद्दल असं कधीच वाचायला मिळाले नव्हते.उत्तम माहिती.

प्राची अश्विनी's picture

11 Mar 2015 - 9:00 am | प्राची अश्विनी

सुरेख लेख !
रोट्रीच्या स्टुडंट एक्स्चेन्ज प्रोग्रम तर्फे एक जर्मन मुलगी माझ्या दिरांकडे आली होती. वय १६ . तिचे ध्येय होते एका श्रीमंत अमेरिकन मुलाशी लग्न करायचे. ऐकून गंमत वाटली होती.

पद्मश्री चित्रे's picture

11 Mar 2015 - 3:23 pm | पद्मश्री चित्रे

आवडला लेख . किती बारीक निरीक्षण करून सोप्प्या शब्दात लिहिलं आहेस. !

भिंगरी's picture

13 Mar 2015 - 10:21 pm | भिंगरी

माहीतीपूर्ण लेख.

सुप्रिया's picture

14 Mar 2015 - 11:46 am | सुप्रिया

उत्तम माहितीपूर्ण लेख.जर्मनीतल्या स्त्रियांबद्द्ल एवढी माहिती अजिबात नव्हती.
एका वेगळ्याच विषयाची माहिती दिल्याबद्द्ल धन्यवाद.!!

त्रिवेणी's picture

14 Mar 2015 - 4:04 pm | त्रिवेणी

अतिशय सुंदर लेख मधुरा. बरेच गैरसमज दूर झाले हा लेख वाचल्यावर.

निवेदिता-ताई's picture

15 Mar 2015 - 11:11 pm | निवेदिता-ताई

उत्तम माहितीपूर्ण लेख.

मनुराणी's picture

15 Mar 2015 - 11:20 pm | मनुराणी

मस्त लेख मधुरा.

पैसा's picture

16 Mar 2015 - 5:07 pm | पैसा

अतिशय आवडले! एकूण घरोघरी त्याच परी हे खरे! मग जर्मनी असो की जपान की भारत.

कविता१९७८'s picture

19 Mar 2015 - 1:46 pm | कविता१९७८

उत्तम माहितीपूर्ण लेख.

मोहनराव's picture

19 Mar 2015 - 9:56 pm | मोहनराव

छान लेख!!

एस's picture

23 Mar 2015 - 2:54 pm | एस

उत्तम निरीक्षण आणि सखोल विचार करून लिहिलेला लेख. अगदीच धक्का बसला नसला तरी बर्‍याच वाक्यांमधून अंतर्मुख करून गेला. असेच अजून लेख येऊद्यात.

अंतरा आनंद's picture

26 Mar 2015 - 10:49 am | अंतरा आनंद

वेगळाच लेख. जर्मनीची करारी आणि युरोपियन देशसमुदायातील सर्वात प्रबळ देश या भूमिकेशी विसंगत वास्तव. कडक स्त्री पंतप्रधान असणार्या या देशाशी नकळत इइंदीरा गांधी पंतप्रधान असतानाच्या भारताच्या स्थितीशी तुलना झाली.

जूलिया's picture

16 Sep 2015 - 4:37 pm | जूलिया

आज हा लेख वाचला; मला मधुरा ताईचे लेख आवडतात पण हा पटला नाही फारसा. मी पण हाम्ब्रूग व ब्रेमेन ला गेली ७ वेर्श रहात आहे; पहिली २ वेर्श शिकत होते मग नोकरी. 'स्त्रीचा पगार निश्चित पुरुषापेक्षा कमी असेल'हि बाब सोड ता माझे अनूभव वेगळे आहेत. ''लहान मुलांना पाळणाघरात ठेवून नोकरी करणारी आई ही अजूनही सकारात्मक दृष्टीकोनातून पहिली जात नाही''- हे तर पटल नाही.
मुले झाल्यानंतर नोकरी करायची इच्छा बरीच कमी दिसते आहे; किंवा पार्ट टाईम नोकरीला प्राधान्य दिले जाते ( पहिली १-३ व्रशे ) नंतर बायका परत रुजू होताना दिसतात.....आणि मूळात नोकरी हेच काम ही कल्पना नाहीये; त्यामूळे आपापल्या छंदाना वेळ देणे, इथे स्त्री-पूरुष दोघानाही आवडते......आणि करायला ही मिळते.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

17 Sep 2015 - 5:43 am | निनाद मुक्काम प...

प्रतिसादाशी बाडीस
ह्यातील अनेक निष्कर्ष धक्कादायक वाटले.
जर्मन मधील स्त्रियांच्या समाज जीवनाबद्दल लिहितांना अनेक महत्वाच्या बाबी लिहिल्या गेल्या नाही आहेत.
जर्मन जावई ह्या नात्याने भारतीयांच्या पेक्ष्या जास्त जर्मन लोकांच्या मध्ये वावर असल्याने ह्या विषयावर काही मते मांडू शकतो.
महिलांना कमी पगार हा जगभरातील जगभरातील अनेक प्रगत व विकसित देशात असणारा मुद्दा आहे ते जर्मनीचे वैशिष्टे असू शकत नाही
अनेक स्त्री मुक्ती संघटना जगभरात परिषदा घेऊन ह्यावर आपले म्हणणे मांडतात
ह्या देशाची अध्यक्ष कर्तुत्ववान उच्च शिक्षित विदुषी आहे.
महत्वाचे म्हणणे येथे लग्न न करता एकत्र राहण्याचे प्रमाण भरपूर प्रमाणात आहे व ह्या प्रकारात महिला नोकरी करतात
माझ्या जर्मन आख्यानात एक प्रकरण जर्मन सोशल बेनिफिट ह्यावर आहे त्यामुळे आई झालेली जर्मन महिला काही वर्ष
घरी राहून मुले शाळेत जाऊ लागली की मग नोकरी करू लागतात , घटती लोकसंख्येवर मार्ग म्हणून मातेला जास्तीस्जास्त सरकारी लाभ देण्याकडे सरकार चा कल असतो.
अनेक जर्मन स्त्रिया अपत्य नको असतात ह्यामागे अनेक करणे आहे त्या सुद्धा नोकर्या करतात
माझ्या सासूने दोन पार्ट time नोकर्या करून आपल्या दोन मुलींचे संगोपन केले , त्यास माझ्या सासर्याची साथ लाभली आता माझी पत्नी व मी नोकर्या सांभाळून अडीच वर्षाच्या मुलीला खाजगी पाळणाघरात ठेवतो.
माझा अनुभव असा आहे कि बहुतांशी जर्मन पालकांना मुलगा का मुलगी हवी असे विचारले तर त्यांचे उत्तर मुलगी असते.
स्त्री व पुरुष ह्यांच्यात भेदभाव येथे मानला जात नाही , माझ्या पाहण्यात जर्मन महिला बॉस ही जर्मन पुरुष बॉस पेक्ष्या जास्त कडक असते ,उगाच नाही मर्केल पूर्ण युरोपियन युनियन ला आपल्या तालावर नाचवते .
बिचार्या ब्रिटन ला निर्वासित घ्यावेच लागतील असा दम देते.
जर्मन महिलांच्या बाबतीत अजून एक वैशिष्ट्ये म्हणजे जर्मन आज्या
जीन्स व टी शर्ट पाठीला bag व आपल्या नात किंवा नातवाला घेऊन शहारता प्राणी संग्रालय आणि इतर ठिकाणी दिवस भटंकती ला नेण्यार्या आज्या हे सर्रास दृश्य आहे.कितीतरी वेळा आजी आजोबा सोबत एकत्र ही भटकंती करतात ,
जर्मनी मध्ये स्त्रिया व नोकरी धंदा ह्या बाबत भारतीयांशी तुलना करायची तर आपल्या डोळ्यापुढे मुंबई व ठाणे उपनगरातील ७० ते ८० च्या दशकातील नोकरी करणारी महिला डोळ्यासमोर आणा , दोन अपत्ये असणारी नोकरी करणारी भारतीय महिला व जर्मन महिलांच्या मध्ये फारसा फरक नाही , मात्र जर्मन स्त्रीयंना त्या काळात सासू च्या मदतीशिवाय नोकर्या व मुलांचे संगोपन ह्यांची कसरत करावी लागली ,
माझा निष्कर्ष असा आहे की वेस्ट जर्मनी मध्ये अमेरिकेने भांडवल शाही घट्ट केली मुळात जर्मन कंपन्या दर्जेदार असल्याने त्यांची अर्थ व्यवस्था झपाट्याने वाढत जाऊन आजच्या घडीला युरोपात प्रथम स्थानी आहे मात्र हे होतांना येथील समाज जीवनावर अमेरिकन जीवन शैलीचा जास्त प्रभाव पडला , भांडवल शाहीने सुब्बत व चंगळवाद रुजवला , त्याने येथील समाज जीवन विस्कळीत झाले व इतर विकसित देशात होतात तसे कुमारी माता किंवा लग्न न करणे किंवा अपत्ये नको असणे किंवा तिशी उलटून गेल्यावर अपत्यांचा विचार करणे ह्यामुळे जन्म दर घटले. हे जगभरातील बहुतांशी भांडवलशाही असलेल्या देशात घडले अगदी आता भारतात माझ्या मित्रांना एकच अपत्य पुरेसे वाटते मी त्याला अपवाद नाही , मुलांकडे करियर पायी होणारे दुर्लक्ष किंवा घटस्फोट झालेली विभक्त कुटुंब व्यवस्था ड्रग्स व इतर व्यसन ह्यामुळे मुलांच्या संगोपनावर वाईट परिणाम झाले ते पाहता काही दशकांच्या पूर्वी येथील सरकार ने कुटुंब व्यवस्था पुनर्जीवित करण्यासाठी ज्या काही उपाय योजना सवलती समाजाला दिल्या त्याचे फळ म्हणून आता परिस्थिती चांगली आहे.

वरील दोन्ही प्रतिसाद नाण्याची दुसरी बाजू मांडणारे आणि रोचक आहेत. आवर्जून लिहिल्याबद्दल धन्यवाद!

मधुरा देशपांडे's picture

25 Sep 2015 - 7:25 pm | मधुरा देशपांडे

जुलियाताई आणि निनाद, प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

.......अजूनही सकारात्मक दृष्टीकोनातून पहिली जात नाही''- हे तर पटल नाही.

तुमचे अनुभव वेगळे असतील. पण म्हणुन असे होतच नाही असे नाही. अगदी एवढ्यातच टीव्हीवर कुठलातरी सपट परिवार महाचर्चा प्रकारचा कार्यक्रम सुरु होता. त्यात पुन्हा हाच विषय होता. त्यावेळी देखील एका बाईनेच "माझ्या घरचा बिझनेस जर मुलगा की मुलगी, दोघेही समान शिक्षण आणि अनुभव असलेले असतील, तरीही मी मुलालाच प्रीफर करेन असे सांगितले. असे अजुनही बरेच अनुभव आहेत ज्यातला प्रत्येक इथे लिहिणे सध्या शक्य नाही. लेखात लिहिलेल्या माझ्या अनुभवांव्यतिरीक्त देखील बर्‍याच इतर बाबी लक्षात घेऊन लेख लिहिला आहे. १०० टक्के बरोबर असा दावा मी करत नाही, पण त्यातले अनुभव खरे आहेत आणि निष्कर्ष काढताना त्यासोबतीने इतर बाबीही माझ्या परीने अभ्यासल्या आहेत.

ह्यातील अनेक निष्कर्ष धक्कादायक वाटले.

धक्कादायक असु शकतील. माझे अनुभवही धक्कादायकच होते. त्यातुनच या विषयाबद्दल उत्सुकता चाळवली गेली आणि शोध घेतला गेला. हा लेख म्हणजे फक्त माझे अनुभव एवढाच नाही. त्याला शक्य झाले तेवढ्या वाचनाची, टीव्हीवरील प्रोग्राम्स, इथे असणारे जर्मन आणि भारतीय स्नेही या सर्वांशी झालेली चर्चा अशा अनेक बाबींची जोड आहे. त्यातही प्रत्येक व्यक्तीचे अनुभव वेगळे असणार हे मी वरच्या प्रतिसादात देखील नमुद केले आहे. पण धक्कादायक निष्कर्ष असले तरीही मनाला वाटेल तसे टाकलेले नाही एवढेच म्हणायचे आहे. याबाबतच्या काही बातम्या, एक दोन सर्वेक्षणांचे रिझल्ट्स असलेले पेपर्स हे माझ्याकडे संदर्भ म्हणुन आहेत, जमेल तसे त्याचे दुवेही देते.

जर्मन मधील स्त्रियांच्या समाज जीवनाबद्दल लिहितांना अनेक महत्वाच्या बाबी लिहिल्या गेल्या नाही आहेत.

प्रचंड आवाका असलेल्या या विषयावरील लेख परिपुर्ण नाही हे मी आधीच्याही प्रतिसादात लिहिले आहे. तरीही, या दोन्ही प्रतिसादांमध्ये फक्त स्त्रिया आणि नोकरी या एकाच विषयाकडे लक्ष वेधल्यासारखे वाटले. फक्त नोकरी म्हणजे आधुनिकता अथवा समानता असे लेखात कुठेही म्हटलेले नाही. पण जेव्हा सरकारला इतर सोयी मुद्दामहुन द्याव्या लागत आहेत, बोर्डरुममधील महिलांचा सहभाग कमी आहे हे सहजपणे दिसते आहे आणि त्याबद्दलच लेखात लिहिले आहे. त्यासोबतीने इतर मुद्दे, मुलगा मुलगी भेदभाव होत नाही, जर्मन आज्या आणि आपल्याकडील आज्यांमधील समानता या बाबीदेखील लेखात आल्या आहेत. लहान मुलींपासुन तर आज्यांपर्यंतचे स्वयंपाक ते नातीगोती याबद्दल देखील थोडक्यात माहिती आली आहे. शिवाय लेखात सरसकटपणे जर्मन महिला अथवा इथल्या लोकांची मानसिकता वाईटच आहे असे कुठेही म्हटलेले नाही. त्यांच्या चांगल्या बाबींबद्दलही काही मुद्दे आलेत. तरीही काही राहिले असतील याबाबत वाद नाही.

महिलांना कमी पगार हा जगभरातील जगभरातील अनेक प्रगत व विकसित देशात असणारा मुद्दा आहे ते जर्मनीचे वैशिष्टे असू शकत नाही

नक्कीच. पण लेख जर्मनीबद्दल आहे. आणि दुसरे असे की युरोपातील प्रबळ महासत्ता म्हणवणार्‍या, प्रगत देशांमध्ये जर हे घडत असेल तर हे नोंद घेण्यासारखे वाटले, तसेच लेखात लिहिले. त्यातही अभियांत्रिकी शाखा किंवा तत्सम ठिकाणी, ज्या जर्मनीतील महत्वाच्या सिस्टीम्स आहेत, अशा ठिकाणी महिलांची संख्या कमी आहे हे निरीक्षण लेखात मांडले आहे.

असो. तुम्ही दोघेही इथे माझ्यापेक्षा जास्त वर्ष आहात, तेव्हा तुमचे अनुभव अमान्य नाहीच. मधल्या काळात भारतात असल्याने प्रतिसाद देण्यास उशीर झाला, पण माझी बाजु मांडण्यासाठी म्हणुन हा प्रपंच.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

26 Sep 2015 - 2:15 pm | निनाद मुक्काम प...

अगदी एवढ्यातच टीव्हीवर कुठलातरी
टीव्ही वरील रिया लिटी शोज वरून मते बनविणे म्हणजे
..... असो

जगभरातील बहुतेक हे शोज हे सेमी स्क्रीपटेड असतात त्यातही जर्मनी मधील असे शोज म्हणजे दांभिक पणाचा कळस असतो.
कुठल्याही प्रगत देशामंध्ये बोर्ड रूम मध्ये महिलांची संख्या कमी असते हे आंजा वर पहिले तर सहज कळून येईल त्याला जर्मनी अपवाद नाही ,
बाकी जगभरातील प्रगत देशांमध्ये काही शेत्रात महिलांचे तर काही शेत्रात पुरुषांचे प्राबल्य असते
उदा द्यायचे झाले तर भारतात मेकेनिकल इंजिनियरिंग मध्ये महिला पुरुषांच्या पेक्ष्या कमी असतात म्हणून जर्मनी मध्ये किंवा यु एस ए मध्ये त्या पुरुषांच्या बरोबरीने असतील अशी अपेक्षा करण्याची गल्लत करू नये असे मला वाटते ,
त्याच प्रमाणे हॉटेल्स मध्ये जगभरात हाउस कीपिंग ह्या विभागात महिलांचे वर्चस्व आहे
बाकी जर्मन महिलांचे जीवन हा लेख लिहितांना सर्व बाजूने लेख लिहिला असता किंवा विषयाचा अवाका पाहता काही भागांच्या मध्ये लिहिला असता तर तो लेख एकांगी होण्यापासून वाचला असता
हा लेख वाचून बहुतेक मिपाकर वाचकांनी ज्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या ते पाहता लेखातून त्यांना चुकीचा संदेश प्राप्त झाल्याचे स्पष्ट दिसून आले.
ह्या लेखातून जो निष्कर्ष निघतो त्याचे सार ह्या प्रतिसादातून मिळते
जर्मनीसारख्या युरोपिअन देशातसुद्धा आशियाई देशांपेक्षा स्त्री-जीवन मागास असावे याचे आश्चर्य वाटले.
त्यामानाने आपण फारच प्रगत दिसतो.
असा चुकीचा संदेश लेखातून दिल्या गेल्यामुळे तो वास्तवापासून दूर गेला असे मला वाटले ह्याचे दुक्ख झाले म्हणून मी माझ्या निरीक्षणातून मते मांडली.
खरे पाहता
कोणत्याही प्रगत देशाला साजेसे कायदे व न्याय व्यवस्था जर्मनी मध्ये प्रबळ आहे ह्यामुळे समाजात महिलांना आपली मते व भूमिका मांडणे अधिक सोयीचे ठरते.लहन वयापासून स्वतंत्र प्रवास करणे व स्वतंत्र पणे आपले निर्णय स्वताचे स्वतः घेणे ह्या गोष्टींमुळे त्या स्वावलंबी व कणखर असतात पण हे जगातील कोणत्याही प्रगत म्हणजे फ्रांस व ब्रिटन व यु एस ए ह्या जगातील देशांना लागू पडतात
मुळात भारतात अनेक संसार हे तडजोडीवर आधारीत असतात आणि ही तडजोड बहुदा महिलांनी करावी अशी समाजाची अपेक्षा असते म्हणून कुटुंब व्यवस्था बर्यापैकी टिकून राहिलेली भारतात दिसते मात्र जर्मनी व इतर विकसित देशात मी स्त्री आहे म्हणून नवर्याश एखाद्या मुद्यावर तडजोड केलीच पाहिजे असे बंधन नसल्याने अमेरिका सकट जर्मनी व इतर देशांमध्ये विभक्त कुटुंबे दिसतात कारण स्त्री असो व पुरुष माघार घेणे किंवा तडजोड करणे प्रत्येक वेळी शक्य होत नाही अनेक छोट्या मोठ्या मुद्यांच्या वरून घटस्फोट होतात व जर्मनी मध्ये
माझ्या पाहण्यात घटस्फोटाची कायदेशीर लांबलचक प्रकिया टाळण्यासाठी लग्न न करता एकत्र राहणारी अनेक जोडपी माझ्या पाहण्यात आहेत ५ ते २० वर्ष लग्न करता कुटुंब वाढवणारे पालक माझ्या ओळखीचे आहेत ,मात्र जर्मनी मध्ये महिला व पुरुषांना कायद्याने पोटगी लिविंग रिलेशन मध्ये सुद्धा लागू आहे म्हणजे
जर महिला पुरुषांच्या पेक्ष्या जास्त कमावती असेल व पुरुष बेरोजगार असेल तर क्वचित प्रसंगी त्याला सुद्धा पोटगी मिळते
, माझ्या पाहण्यात अनेक तरुण मुली सिंगल मदर्स आहेत त्यानं त्यांच्या प्रियकर किंवा नवर्याकडून जो पर्यंत त्या सिंगल आहेत तो पर्यंत पोटगी मिळते
सिंगल्स मदर्स ला सरकार तर्फे अनेक सोयी सुविधा असतात
जर्मनी मध्ये प्रत्येक पालकांना प्रत्येक मुलांच्या पाठी १८० युरो दर महिन्याला सरकार देते , अनेक तुर्की घरात ५ ते ६ मुले असल्याने १००० युरो सरकार तर्फे त्यांना मिळतात ,
मात्र सिंगल मदर्सला सरकार aधिक सोयी पुरवते
ह्या लिंक मधील हर्ट्झ ४ ही सोय जे स्वताला दिवाळ खोर जाहीर त्यांना मिळते अजूनही काही निकष असतील पण अश्या सरकर स्वस्तात घर व जगण्यासाठी जीवन भत्ता म्हणून महिन्याला जे काही मिळते ते पाहता दरवर्षी अश्या सोयी मागणार्यांची संख्या वाढत जात आहे त्यांच्या साठी सरकार दरवर्षी नवीन घरे बांधत आहेत
ह्या खेरीज निर्वासित लोकांना अनेक सुविधा देत असल्याने
सिरीया सहित अनेक देशांचे निर्वासित जर्मनी ला प्राधान्य देतात

बाकी जरी अनेक विकसित देशातील महिला व लोकांचे समाज जीवन सारखे असले तरी काही बाबतीत जर्मनी व इतर युरोपियन राष्ट्रे भिन्न आहेत
उदा समाजाचा नग्नता ह्या विषयाकडे पाहण्याचा दृष्टीकोन
हे माझ्या ह्या लेखात मी एक उदाहरण म्हणून लिहिले आहे
स्त्रियांच्या कडे पाहण्याचा जर्मन समाजाचा दृष्टीकोन एका पुढील उदाहरणामुळे स्पष्ट होतो
आमच्या घर्री जेव्हा माझ्या बायको बाळंत झाली तेव्हा तिच्या सोबत तिच्या प्रेगन्सी क्लासेस च्या काही मैत्रिणी आपापली २ महिन्यांची बाळ घेऊन आमच्या घरी जमल्या होत्या , असे गेट टुगेदर त्यांची ममा कम्युनिटी नेहमीच आखत असतात
ह्या सर्व स्तुत्य उपक्रमावर एक स्वतंत्र लेख येऊ शकतो
तेव्हा आम्ही घरात मी एकटा पुरुष व बाकी ह्या सर्व आया होत्या , माझी नेमून दिलेली घरातील कामे संपवून मी सुद्धा बाहेर मित्राकडे जाणार होतो तेवढाच मला मोकळा श्वास घेण्याची संधी मिळणार होती
तर घरात माझ्या बायकोच्या सर्व मैत्रिणींनी माझ्या समोर त्यांच्या बाळांना स्तनपान सुरु केले तेही कुठलाही आडपडदा न ठेवता कोणताही बाऊ न करता
पुढे माझ्या पाहण्यात असे आले कि ह्या आया मॉल असो कि ट्रेन मध्ये आल्या बाळाला स्तनपान सार्वजनिक ठिकाणी स्तनपान करतांना कुठेही आडपडदा बाळगत नाही ह्या अत्यंत नैसर्गिक गोष्टीचा तेथे नैस्रागिक पणे स्वीकार केला जातो
दुसरे उदाहरण म्हणजे
माझ्या पत्नीने एका महिलेस कामावरून बडतर्फ केले , पुढे २ आठवड्यांनी ती महिला परत कामावर आली व माझ्या पत्नीला
सांगितले तिला आताच कळले की ती २ महिन्यांची गर्भार आहे ,तेव्हा कायद्यानुसार तिला बडतर्फ करता येणार नाही
माझी पत्नी जर्मन असून तिला हा कायदा माहिती नव्हता , तिने एच आर मध्ये फोन केला ,त्या लोकांनी संभीत महिलेचे टेस्ट रिपोर्ट पहिले व तिला विचारले तू उद्यापासून कामावर येऊ शकते ,
त्या महिलेने डॉक्टर कडून अजून एक मिळालेले लेटर दखवले त्यात सदर महिलेला कामावर होणारा अतिरिक्त त्राण शाररीक व मानसिक दृष्ट्या होणारे कष्ट पाहता ती काम करू शकत नाही तेव्हा तिला वैद्यकीय रजा उरलेले सात महिने मिळत आहे ,
आता उरलेले सात महिने पूर्ण पगार त्यानंतर बाळंत पणाची
१ वर्ष तिच्या कमाईचा ६० टक्के पगार व ते झाल्यावर कंपनीला त्या महिनेला कामावर घेण्याची इच्छा नसल्याने दोन महिन्याचा नोटिशी चा आगाऊ पगार मिळाला ,सदर महिलेने हे सर्व झाल्यावर स्वतःची बेरोजगार म्हणून नोंद सरकार कडे केली ,
व पुढील अजून दीड वर्ष म्हणजे मुलगा अडीच वर्षाचा होई पर्यंत घरी बसून त्यास सांभाळले ,
अश्या कायद्याच्या अनेक सोयीचा लाभ घेण्याया महिला मला माहिती आहे , खुद माझ्या पत्नीने
६ व्या महिन्यापासून डॉ कडून असे पत्र घेतले
जे त्यांनी बिनासायास तिला दिले .
व ह्या आधी हे पत्र का नाही मागितले असे सुध्धा विचारले ,
अवांतर
जगभरातून जर्मनी मध्ये जे निर्वासित येतात त्यांना काही वर्षात ह्या सर्व सुविधा व निर्वासित म्हणून विशेष सुविधा मिळतात
माझ्या बायकोच्या शब्दात सांगायचे तर येथे निर्वासितांना मूळ
नागरिकांच्या पेक्ष्या जास्त सोयी सरकार देते ,
अर्थात जो पर्यंत येथील नागरिकांना त्यांचे अधिकार सोयी लाभ मिळत आहेत तो पर्यत ते सरकार आकडे ह्या गोष्टींच्या बाबत तक्रार करत नाहीत ,

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

26 Sep 2015 - 2:48 pm | निनाद मुक्काम प...

सिंगल पेरेंट बेनिफिट ची लिंक द्यायची राहिली होती .

मधुरा देशपांडे's picture

26 Sep 2015 - 5:21 pm | मधुरा देशपांडे

टीव्ही वरील रिया लिटी शोज वरून मते बनविणे म्हणजे
..... असो

हाहा. मुळात तो रिआलिटी शो नव्हता आणि त्या एका शोवरुन मी कुठलेही मत बनवले नाही. ARD वरचे चर्चासत्र होते. शिवाय हे इथे उदाहरण म्हणुन दिले आहे. लेखात हा एक शो बघुन फक्त लिहिलेले नाही हे नमुद करते.

कुठल्याही प्रगत देशामंध्ये बोर्ड रूम मध्ये महिलांची संख्या कमी असते हे आंजा वर पहिले तर सहज कळून येईल त्याला जर्मनी अपवाद नाही ,
बाकी जगभरातील प्रगत देशांमध्ये काही शेत्रात महिलांचे तर काही शेत्रात पुरुषांचे प्राबल्य असते
उदा द्यायचे झाले तर भारतात मेकेनिकल इंजिनियरिंग मध्ये महिला पुरुषांच्या पेक्ष्या कमी असतात म्हणून जर्मनी मध्ये किंवा यु एस ए मध्ये त्या पुरुषांच्या बरोबरीने असतील अशी अपेक्षा करण्याची गल्लत करू नये असे मला वाटते ,
त्याच प्रमाणे हॉटेल्स मध्ये जगभरात हाउस कीपिंग ह्या विभागात महिलांचे वर्चस्व आहे

पुन्हा एकदा, लेख जर्मनीविषयी आहे. त्यात युएस अथवा इतर कुठल्याही देशांबद्दल लिहिलेले नाही. शिवाय इथली स्त्रियांची मक्तेदारीची क्षेत्रे याबद्दलही लेखात मुद्दे आलेले आहेत.

बाकी जर्मन महिलांचे जीवन हा लेख लिहितांना सर्व बाजूने लेख लिहिला असता किंवा विषयाचा अवाका पाहता काही भागांच्या मध्ये लिहिला असता तर तो लेख एकांगी होण्यापासून वाचला असता
हा लेख वाचून बहुतेक मिपाकर वाचकांनी ज्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या ते पाहता लेखातून त्यांना चुकीचा संदेश प्राप्त झाल्याचे स्पष्ट दिसून आले.

वरच्या लेखात बहुतांशी निरीक्षणे आहेत. प्रत्येक बाबतीत माझे मत काय असे लिहिले नाही. जर्मनी मागास आहे असे माझ्या एकाही वाक्यातुन दिसलेले नाही. फक्त सो कॉल्ड पुरुषी मक्तेदारीच्या काही क्षेत्रात इथे महिलांचे प्रमाण नगण्य आहे हे निरीक्षण, त्यासाठी माझ्या आजुबाजुला मला दिसणार्‍या, भेटलेल्या काही लोकांची मते याबद्दल लिहिले आहे. आणि त्यावरुन जर माझी काही मतं झाली असतील, तर तिही प्रामाणिकच आहेत. असो. हे असुनही लेखात काही मुद्दे राहिले असतील हे आधीच सांगितले आहे पण तुझा प्रतिसादही लेखातल्या काही मुद्द्यांवरच जोर देतो आहे असे दिसते.

सिंगल मदर्स आणि बाळंतपण, आईपण, सुविधा, लग्न करणे-न करणे, सरकारी सवलती याबाबत

दोन्ही प्रतिसादात सिंगल मदर्स हाच मुद्दा सतत अधोरेखित केलेला दिसतो आहे. तर या सोयी सुविधा, एकटीने सगळे मॅनेज करणार्‍या मुलींबद्दल कौतुकाचे लिहिलेले शब्द, आणि यासंबंधीचे काही मुद्दे आलेले आहेत लेखात. फक्त अधिक विस्तारला नाही एवढेच. किंबहुना इथे असणारा वर्क लाईफ बॅलन्स, सगळ्यांनाच मिळणार्‍या सुट्ट्या आणि सवलती, आणि मग त्यातही पालकांना, आयांना मिळणार्या सोयी याबद्दल मला व्यक्तीशः नेहमीच कौतुक वाटतं. पण हे सगळे असुनही त्यामानाने कमी स्त्रिया वेगळ्या क्षेत्रात दिसत आहेत असे निरीक्षण लेखात नोंदवले आहे. शिवाय या सुविधा देण्यामागची भुमिका, त्यामागची पार्श्वभुमी आणि अजुनही त्यातील काही सवलतींना दिसणारा विरोध हे देखील विचार करण्यासारखे आहे.

शिवाय हा लेख अनाहिता विशेषांकाचा एक भाग आहे. त्यामुळे त्याचे भाग केलेले नाहीत.

तु दिलेल्या लेखातुनच काही इथे देतेय.

However, Germany has one of the lowest birthrates in Europe, and German mothers tend not to work. Some accuse German culture of being unfairly hard on working moms, and of designing policies that push mothers to stay at home.

German Labor Minister Ursula von der Leyen, mother of seven children, recalled: "All my colleagues at the hospital where I worked were disappointed that I was pregnant because they thought that I would never ever come back." When she did return, however, "they were disappointed in me and questioned whether I would be a good mom. It was awful."

मी फक्त हीच निरीक्षणे लेखात मांडायचा प्रयत्न केला आहे. यात बदल होत आहेत हेही लिहिले आहे.

याचसंबंधीचे अजुन काही दुवे: एक, दोन

निर्वासितांचा मुद्दा

या लेखासाठी अथवा चर्चेसाठीही अवांतर आहे. नंतर कधीतरी.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

26 Sep 2015 - 7:54 pm | निनाद मुक्काम प...

ARD वरचे चर्चासत्र होते
उद्या एका जर्मन ने भारतीय वाहिन्यांवरील चर्चासत्र पाहून मते बनवली तर काय होईल ह्याची कल्पना केली आणि हसू आले
हाहा
लेख जरी जर्मन स्त्रियांच्या बद्दल असला तरी ज्या गोष्टी सर्व जगत एक वैश्विक सत्य म्हणून प्रस्थापित आहे त्या केवळ जर्मन स्त्रियांचे जर्मनी मधील स्थान म्हणून खपवणे योग्य नाही
जगभरातील उच्च पदांच्या वर महिलांचे कमी असलेले प्रमाण हि काही लपून राहिलेली गोष्ट नाही आहे त्या संधर्भात
प्रसार माध्यमांतून नेहमीच चर्चा होते
ही आजची ताजी बातमी
जर्मन मागास आहे असे एकही वाक्यातून आले नसले तरी जर्मनी मध्ये स्त्रियांची अवस्था किंवा जागा अत्यंत ,,,,,अश्या धाटणीच्या प्रतिक्रिया
तुझ्या लेखांवर मिपाकारानी दिल्या त्यांचा तसा ग्रह लेखातून झाला ह्यात मी त्यांना दोष देत नाही .
फक्त सो कॉल्ड पुरुषी मक्तेदारीच्या काही क्षेत्रात इथे महिलांचे प्रमाण नगण्य आहे हे निरीक्षण

परत तेच उत्तर देतो ज्या शेत्रांना तू सो कोल्ड पुरुषी मक्तेदारी समजते त्या शेत्रात जगभर जर महिलांचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत नगण्य आहेत
प्रगत देश म्हणून तुझ्या भारतातून येउन जर्मनी बद्दल ज्या कल्पना असाव्यात त्या जर्मनीच काय जगाच्या कोणत्याही पाठीवर पूर्ण होऊ शकत नाही
काही शेत्रे हे महिलांचे तर काही शेत्रे पुरुषांचे राखीव कुरण असते. तर काही शेत्रांच्या मध्ये असा प्रश्न उद्भवत नाही
आता जगभरात काही शेत्रात तृतीय पंथी लोकांचा भरणा जास्त असतो म्हणून आता ह्या शेत्रात जर्मनी मध्ये भरपूर समलैंगिक आढळले असे निरीक्षण नोंवण्यात काय हशील
आता लष्कर हे पुरुषी मक्तेदारी चे शेत्र त्यात जगभरात महिलांचे प्रमाण नगण्य व ठराविक कामे अपवाद वगळता जगभरातील लष्करात महिला करतात तेव्हा जर्मनी मध्ये लष्करात महिलांची स्थिती ........ असे निरीक्षण कोणी नोंदविले तर ते संयुक्तिक होईल का
तुझ्या लेखनावर आलेल्या काही प्रतिसाद पाहून चुकीचा संदेश वाचकांच्या पुढे गेल्याचे पाहून मी प्रतिसाद लिहिला म्हणूनच सर्वच्या सर्व मुद्यांवर विस्तृत लिहिता आले नाही कारण ते प्रतिसाद होते लेख नव्हता .
बाकी सिंगल मदर्स वर भर ह्यासाठी होता की ते एक प्रातिनिधिक उदाहरण होते की हा मुद्दा जर्मन महिलांना इतर देशांपासून वेगळा करतो म्हणजे त्यांना पुरविण्यात येणाऱ्या सोई व सुविधा व त्यांच्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन
हे इतर देशांच्या पेक्ष्या उजवे आहे हे मी लिंक देऊन स्पष्ट केले
जर्मन महिला जगभर नोकर्या करतात अनेक मिपाकर हे जर्मन महिलांना कामासंबंधी भेटले असतील पण तुझ्या लेखातील व्यथा त्यांच्या बोलण्यातून मला नाही वाटत त्यांनी कधी मांडल्या असतील .
भारतीय अनिवासी महिलेला जगभरात कुठेही भारतीय पुरुष प्रधान संस्कृती वर मत विचारले तर त्यांचे मुद्दे व मत ही बहुतांशी प्रमाणात सारखी असतील पण असे काही पुरुषप्रधान संस्कृती व आम्हास मिळणारे कमी स्थान ह्यावर जर्मन काय तर युरोपियन महिलांना सुद्धा मते व्यक्त करतांना पहिले नाही ,
असो तू दिलेल्या पहिल्या दुव्यात
जर्मनी मध्ये १० ते २० वर्षापूर्वी नोकदार महिलांच्या स्थितीवर भाष्य केले असून पुढे सध्याचा जर्मनी मधील स्त्रियांची परिस्थिती वर सुद्धा सकारात्मक भाष्य केले आहे जे माझे निरक्षण आहे
त्यांनी एक दोन्ही काळातील महत्वाचा बदल थोडक्यात असा मांडला आहे
The spread of all-day schooling in Germany, a trend she considers “irreversible,” is a sign of the times, Ms. von der Leyen said in an interview. “The 21st century belongs to women.”
माझी मुलगी अजून एक वर्षाने पूर्णवेळ शाळेत जाणार असून
आम्हाला तिच्या शाळांच्या वेळा सांभाळून नोकर्या कराव्या लागणार आहे व हे सध्याच्या जर्मनी चे नोकरदार महिलांचे खरे वास्तव आहे
माझी मुलगी अजून एक वर्षाने पूर्णवेळ शाळेत जाणार असून
आम्हाला तिच्या शाळांच्या वेळा सांभाळून नोकर्या कराव्या लागणार आहे व हे सध्याच्या जर्मनी चे नोकरदार महिलांचे खरे वास्तव आहे
दुसरा दुवायाबाद्द्ल बोलायचे झाले तर
जर्मनी मध्ये जन्म दर खूपच कमी आहे त्यासाठी नोकरदार महिला हे कारण अजिबात नाही आहे तसे असते तर मुंबई पुण्यात व इतर महानगरात अनेक दशकांच्या पासून नोकरी करणाऱ्या महिलांमध्ये माता बनण्याचे प्रमाण कमी दिसले असते
जर्मनी मध्ये जन्म दर कमी असण्याचे कारण सामाजिक व इतर अनेक मुद्यांची निगडीत आहे , म्हणूनच येथील सरकार महिलांना माता झाल्यावर इतर देशांच्या हून जास्त अधिक सोशल बेनिफिट्स देते, बहुतांशी जगभरातील जनता ही चरितार्थासाठी नोकर्या करतात त्यातील खूप कमी करियर गाभिर्याने घेतात , २००० युरो महिन्याला मिळवणारी एक स्त्री घरबसल्या १४०० युरो सरकार कडून मिळत असेल तर ती दुसरा पर्याय स्वीकारेल ,
आणि ती तिने तो स्वीकारावा म्हणूनच तिला भरपूर सोयी सरकार देते ,
बाकी निर्वासितांचा मुद्दा येथे एवढ्यासाठी मांडला की येथे निर्वासितांना सुद्धा बक्कल सुविधा दिल्या जातात ,
फ्रांस व ब्रिटन मध्ये सोशल बेनिफिट एकंदरीत जनतेला महिलांना कमी आहेत नोकरी करण्यापासून पर्याय त्यांना नसतो .
व असेही निरक्षण नोंदले आहे कि
उत्पादन शेत्रात पुरुषांच्या नोकर्या ह्या सेवा शेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या शेत्रापेक्ष्य जास्त प्रमाणात गेल्या ,

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

26 Sep 2015 - 9:04 pm | निनाद मुक्काम प...

जर्मनी मध्ये ब्रिटन व फ्रांस पेक्ष्या उच्च पदांवर महिलांचे प्रमाण कमी असण्यामागे कारण जर्मन अर्थव्यवस्थेचे मॉडेल
आहे.
दुसर्या दुव्यात जो निष्कर्ष मांडला गेला आहे त्यामागील कारण आर्थिक आहे
जगभरात उत्पादन शेत्रात पुरुषांची मक्तेदारी पूर्वापार आहे व आजही ती कायम आहे सर्विस व इतर उर्वरीत शेत्रात महिलांचा टक्का वाढत आहे , जर्मन अर्थव्यवस्था ही निर्यातप्रधान असून ती उत्पादन शेत्रात अग्रेसर आहे हे उघड सत्य आहे म्हणूनच पुरुषांचे ह्या शेत्रात वर्चस्व आहे व तेच उच्च पदावर सुद्धा दिसून येते ,
म्हणूच की काय महिलांचे पुरुषांच्या तुलनेत काम करण्यास कमी असले तरी जर्मनी युरोपातील नंबर १ ची अर्थव्यवस्था आहे , उत्पादन शेत्रात आजही उत्पादन शक्य असेल तर जर्मनी मध्ये करण्याचा त्यांचा भर असतो .

मधुरा देशपांडे's picture

28 Sep 2015 - 7:27 pm | मधुरा देशपांडे

दोन व्यक्तींमध्ये मतभेद असु शकतात, त्यांचे अनुभव वेगळे असु शकतात, पण म्हणुन हा लेख म्हणजे "खपवणे" हा जो सुर या प्रतिसादात दिसतो आहे तो प्रचंड खटकला. मी पुन्हा पुन्हा हे सांगते आहे की फक्त मला २ अनुभव आले म्हणुन लगेच लेख लिहायला घेतला असे झालेले नाही. मी माझ्या ब्लॉगपुरते मर्यादित हे लेखन ठेवले असते, तरीही त्याला काहीतरी वाचन, अजुन दहा जणांशी चर्चा, त्यांचे अनुभव या सगळ्याची जोड दिलीच असती. मग त्यात जेव्हा हा लेख मी सुज्ञ मिपाकरांसमोर ठेवते आहे, तोही महिला विशेषांकाचा भाग म्हणुन, तेव्हा मला आलेले अनुभव असे आणि म्हणुन सगळे तसेच आहे, असे म्हणणार्‍यातली मी नाही. लेख २-४ दिवसात पटापटा वाचुनही लिहिलेला नाही. त्यासाठी बराच वेळ दिला आहे. या सगळ्या स्पष्टीकरणाची तशी गरज नव्हती, पण लेखातुन काहीही लिहिले गेलेले नाही हे सांगायचे आहे. आता मी एकाच टीव्ही प्रोग्रामवरुन मत ठरवले असा गैरसमज होत असेल, आणि त्यातही हसु येण्याइतकी त्याची खिल्ली उडवली जात असेल तर नाईलाज आहे. अशा अजुनही कित्त्येक लिंक्स आहेत ज्यात मी मांडलेल्या निरीक्षणांशी साधर्म्य दिसेल. काही मिपाकरणींनी, ज्या जर्मनीत राहिल्या आहेत, त्यांनीही अनाहितावर झालेल्या चर्चेत याला दुजोरा दिला होता. हा लेख जेव्हा इतरत्र प्रकाशित केला, तेव्हाही काहींकडुन याच निरीक्षणांशी मिळतेजुळते अनुभव आहेत अशा प्रतिक्रिया आल्या. वेगळा अनुभव असणारे इतर लोकही मला भेटलेत, आम्हीही चर्चा केली, परंतु म्हणुन लेखात जे लिहिले आहे, ते कसे चुकीचे खपवले आहे असे नाही.

जगभरात जरी बोर्डरुममध्ये स्त्रियांचे वर्चस्व कमी असले, तरीही त्यात इतर प्रगत देशांच्या तुलनेत जर्मनी मागे आहे हे देखील आंतरजालावर शोधल्यास सहज दिसुन येईल, आणि हे वाचुन मगच ते लिहिले आहे. गृहिणी म्हणुन मिळणारा आदर ही जशी चांगली गोष्ट आहे, तसेच चाकोरीबाहेरचे शिक्षण घेण्यात दिसणारा कमी सहभाग, अनेकांना बायको कामावर जायला नको असे वाटणे आणि ते अभिमानाने, स्पष्टपणे त्यांनी मांडणे याबाबत मला जे आश्चर्य वाटले, ती माझी मते लेखात व्यक्त झाली आहेत. इतिहासाबद्दल लिहिलेल्या बाबी देखील, विकिवर दिसले आणि मराठीत लिहिले असे केलेले नाही. त्याला जेव्हा चार वेग्वेगळ्या दुव्यांवर, जर्मन क्लासच्या एका चर्चासत्रात पुष्टी मिळाली तेव्हाच लिहिले आहे. जर्मन स्त्रिया नोकरी करत नाहीत असेही लेखात कुठे आलेले नाही. परंतु इतर प्रगत देशांच्या तुलनेत हे प्रमाण कमी आहे, किंवा पार्ट टाईम नोकरीला प्राधान्य असणे ही निरीक्षणे, त्यामागचा त्यांचा दृष्टीकोन, इतिहातील कारणे, त्याची कारणे ज्यात सरकारी सुविधा हे देखील एक आहे या सगळ्याचा यातुन आढावा घेतलेला आढावा लेखात मांडला आहे.

सरकारी सुविधा, सिंगल मदर्स हा माझ्यासाठी सपोर्टिंग मुद्दा होता. प्रतिसादातुन त्याबद्दल अधिक माहिती पुरवल्याबद्दल आभारी आहे. अजुनही जे मुद्दे अजुन यात आले नाहीत, त्यावर वाचायला मिळाल्यास नक्कीच आवडेल.
इति लेखनसीमा.

सूड's picture

16 Sep 2015 - 4:41 pm | सूड

वाखुसा

पद्मावति's picture

16 Sep 2015 - 7:51 pm | पद्मावति

अतिशय उत्तम लेख. जर्मन स्त्री जीवनाविषयी इतक्या सखोल माहिती पहिल्यांदाच वाचतेय. मस्तं.

मारवा's picture

17 Sep 2015 - 5:21 pm | मारवा

शरीरयष्टीच्या दृष्टीने जर्मन बायका म्हटले की सर्वसाधारण धिप्पाड, उंचपुऱ्या बायका डोळ्यांसमोर येतात. आणि बऱ्याचशा असतातही तशा. अगदी ६ फुट उंच वगैरे. स्टेफी ग्राफ हे अगदी योग्य उदाहरण. स्वतःच्या तब्येतीच्या बाबतीत जागरूक आहेत हे एक कारण आहे
जर्मन बायका असतातच दमदार महत्वाच एकमेव कारण फिटनेस विषयी जागरुकता आणि दुसर दुय्यम जेनेटीकल.
नाहीतर आपल्या भारतीय स्त्रीया बघा जर्मन पेक्षा सुंदर असुनही ( आपल्याकडे सौंदर्यात वैविध्य आहे ) फिटनेस च्या बाबतीत अतीशय उदासीन असतात. विशेष म्हणजे ज्यांच्या कडे सुविधा व सुबत्ता आहे त्या अधिकच उदासीन असतात. त्यामुळे सौंदर्य असुनही फिटनेस ची काळजी न घेतल्याने त्यावर आवश्यक ते परीश्रम व्यायाम आहार नियंत्रण आदि न घेतल्याने. मुळच्या सौंदर्याला ग्रहण लागते व जोम हि लोप पावत जातो.
उंची वगैरे जेनेटीकल आहे
मात्र "जोम"च्या बाबतीत आजतरी भारतीय स्त्री जर्मन स्त्री च्या तुलनेत किस झाड की पत्ती ?

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

17 Sep 2015 - 7:27 pm | निनाद मुक्काम प...

मात्र "जोम"च्या बाबतीत आजतरी भारतीय स्त्री जर्मन स्त्री च्या तुलनेत किस झाड की पत्ती ?
महिलाच नाही पण आपले पुरुष सुद्धा फिटनेस चा बाबतीत कमजोर आहोत मुळात खोट आपली शिक्षण पद्धती व जीवनशैली मध्ये आहेत
पढोगे लीखोगे तो बनोगे नवाब ,खेलोगे कुदोगे तो बनोगे खराब ही मानसिकता बदलली पाहिजे खेळ फिटनेस योग ह्यांचे बाळकडू शालेयजीवनात पाजले पाहिजे
मात्र मानसिक कणखरता व सहनशक्ती ह्या बाबतीत भारतीय पुरुष व त्याहून जास्त भारतीय स्त्रिया ह्या युरोपियन लोकाहून अधिक सरस ठरतात . म्हणूनच देव न करो मंदी किंवा आर्थिक संकट जगावर आले तर भारतीय लोक युरोपियन लोकांचा पेक्ष्या चांगल्या रीतीने परिस्थितीला सामोरे जातील असे मला वाटते ,
कंधार वों अपहरणात एका परदेशी प्रवाशाचे वक्तव्य आहे
इतके दिवस हे भारतीय लोक तणावाखाली परिस्थिती एवढ्या शांततेने कसे राहू शकतात ह्याचे नवल वाटते ह्यांच्या जागी इटालियन असते तर मी कल्पना करू शकत नाही काय झाले असते.

म्हणुन पुरुषांबद्दल बोललो नाही इतकचं
जीवनशैली त आहे च संस्कृतीत ही आहे भारतीय अध्यात्मात शरीरा ला साधन समजल जात जणु ते मनापासुन काहीतरी वेगळ आहे. शंकराचार्य बघा विवेक चुडामणीत शरीरावर कीती कीळसवाण्या कॉमेंट्स करतात. आणि ते वैराग्य भावना वगैरे अगदी ४० शीत च आपल्याकडे माणुस म्हणतो आता काय राहीलय आमच मुलांच बघु इ. इ.
भारतीय स्त्रीयांना देहभान दोन एक्स्ट्रीम केस मध्ये येत एक जेव्हा त्यांचा नवरा दुसरीच्या प्रेमात पडतो तेव्हा
किंवा त्या स्वतः कोणा दुसरयाच्या प्रेमात पडतात अर्थात हे जनरली अशा अर्थाने घ्या
इतर ही अनेक सोशियो इ़कॉनॉमीक कारणे गरीबी स्त्री ला मिळणारी दुय्यम वागणुक, इ. इ. आहेत असो या धाग्याचा मुळ विषय जर्मन बायका हा आहे भारतीय बायका नाही

पद्मावति's picture

17 Sep 2015 - 7:53 pm | पद्मावति

मात्र मानसिक कणखरता व सहनशक्ती ह्या बाबतीत भारतीय पुरुष व त्याहून जास्त भारतीय स्त्रिया ह्या युरोपियन लोकाहून अधिक सरस ठरतात

..या वाक्याला सहमत.
मला वाटतं अतिशय कमी सहानशक्ति अमेरिकन लोकांमधे असते. सहानशक्ति म्हणजे शारीरिक नाही तर मानसिक.
अमेरिकन माणूस सगळे ऑल वेल असेल तर अतिशय हसरे, बडबडे आनंदी असतात पण कुठल्याही ताणाखाली मग तो ताण म्हणजे अगदी ट्रेन लेट होणे, एलेक्ट्रिसिटी जाणे( तशी ती फार क्वचित जाते), ग्रोसरि ची न संपणारी लाइन आणि ट्रॅफिक जाम असा असेल तरी फार टेन्शन घेतात त्यामानाने ब्रिटीश/ युरोपियन बरेच संयमी वाटतात.

श्रीरंग_जोशी's picture

17 Sep 2015 - 10:17 pm | श्रीरंग_जोशी

मी अमेरिकेत गेली अनेक वर्षे राहत आहे. कॅलिफोर्निया, मिसुरी, फ्लोरिडा या राज्यांत राहिलो आहे अन आता मिनेसोटामध्ये राहत आहे. अमेरिकेतली इतरही मोठी शहरे प्रवासादरम्यान व पर्यटनादरम्यान पाहिली आहेत.

ट्रॅफिक जॅम नसणारे बहुधा एकही मोठे शहर अमेरिकेत नसावे. पण त्यात अडकलेले लोक कधीही अशांत वाटले नाही. वादळामुळे आमचीही वीज ३० तास गेलेली आहे पण त्या दरम्यान शेजारी नेहमीप्रमाणेच वाटले.

पर्यटन स्थळे व काही सार्वजनिक ठिकाणी रांगेत अनेकदा उभा राहिलो आहे पण तिथेही स्थानिक लोकांचे वागणे खटकले नाही.

पद्मावति's picture

18 Sep 2015 - 12:03 am | पद्मावति

बरोबर आहे तुम्ही म्हणता ते सुद्धा. पण मला वाटतं की अमेरिकेत कुठे राहाता त्यावरही थोडं अवलंबुन असते. मिसुरी, मेनेसोटा या भागात किंवा फ्लोरिडा मधे खरोखर लोक तुम्ही म्हणता तसे असतात म्हणजे शांत आणि खूप पेशंट. सार्या मिडवेस्ट मधे तर तर लोक अतिशय प्रेमळ आणि शांत. पण न्यू जर्सी, कनेक्टिकट एकूणच tri state एरिया मधे लोकांच्या आटिट्यूड मधे फरक अगदी जाणवतो.

श्रीरंग_जोशी's picture

18 Sep 2015 - 1:05 am | श्रीरंग_जोशी

ट्राय स्टेट्समध्ये आजवर राहिलेलो नाहीये. गेल्या वर्षी कनेटिकटमध्ये एक दिवस घालवला होता.

बरेच मिपाकर ट्राय स्टेट्समध्ये राहतात. बघुया कुणी त्यांचे अनुभव इथे लिहितं का?

कनेटिकटातील मिपाकराला तेथील लोक हे अशांत वाटले हे त्याने सांगितले हो पंत. इतकच काय त्याची पत्नी तेथील कारभारावर वैतागली होती. तिला सांगितले की पाऊण तासावर म्यास्याच्युसेटसची बॉर्डर आहे तर या राज्यात येऊन रहा. ;)

अप्रतिम लेख. इतर देशातील सामाजिक परिस्थितीचे वर्णन करणारे लेख येतिल हि अपेक्षा.

बॅटमॅन's picture

18 Sep 2015 - 5:02 pm | बॅटमॅन

एक नंबर मस्त लेख!!!!

जूलिया's picture

27 Sep 2015 - 2:03 pm | जूलिया

निनाद +११११११११११११...................

जूलिया's picture

27 Sep 2015 - 3:43 pm | जूलिया

@ मधुरा, तुमचे अनुभव वेगळे असतील. पण म्हणुन असे होतच नाही असे नाही - खर तर असे होते हे पटत नाही....सकारात्मक किंवा नकारात्मक दृष्टीकोन आणि manage करता येण या दोन वेगल्या गोश्ती आहेत अस मला वाटत.....manage करता येत नाही हे खर आहे.......पण ते पारंपारीक दृष्टीकोनामूळे नसून मानसिक कणखरता व सहनशक्ती/ कामाचा उरक या मूळे आहे अस मला वाटत ज्या विकसनशील देशातील लो़कानमध्ये जास्ती असतात.

त्यावेळी देखील एका बाईनेच "माझ्या घरचा बिझनेस जर मुलगा की मुलगी, दोघेही समान शिक्षण आणि अनुभव असलेले असतील, तरीही मी मुलालाच प्रीफर करेन असे सांगितले. याबद्दल माझा अनूभव पूर्ण वेगळा आहे. माझाच नाही तर इतरां चे पण...

मला तूम्ही काहीही लिहील आहे अस म्हणायच नाही ये, पण खुप मिपाकरां चे स्त्री-पुरुषांत इतका भेदभाव बापरे, जर्मनीसारख्या युरोपिअन देशातसुद्धा आशियाई देशांपेक्षा स्त्री-जीवन मागास,आपण बरे, स्त्रीपण हे म्हणजे "कोठेही जा पळसाला पाने तीनच " अश्या comments दिसल्या आणि हे वास्तव नाहीये नक्कीच.......

किंबहुना इथे असणारा वर्क लाईफ बॅलन्स, सगळ्यांनाच मिळणार्‍या सुट्ट्या आणि सवलती, आणि मग त्यातही पालकांना, आयांना मिळणार्या सोयी याबद्दल मला व्यक्तीशः नेहमीच कौतुक वाटतं. पण हा मूद्दा कमी लिहीला गेला आणि तेच सागायचे आहे. ईथे कामाच्या थिकाणी कधिही स्त्रि/पूरुष भेदभाव/ घाण comments /
Sexual assulation from boss या गोश्टी घडत नाहीत आणि हेही लेखात हव होत अस मला वातत.

Germany has one of the lowest birthrates in Europe - हे ख र आहे, प ण या बा ब त बा य का ना Career करता येत नाही हा एकच महत्वाचा मूद्दा नाहीये. दूसर्या महायुद्धा चे तिथल्या लोकनव्र्र झालेले परीणाम हाही एक मूद्दा आहे जो कधिच TV वर बोलला जात नाही पण वास्तव आहे. कित्येक पूरुषांना मूल नको असते जरी Gf/बायको तयार असेल व तो या मानसि क परीणामाचा ही भाग आहे. या वाईताने भर्लेल्या जगात मी बाळाला क आणू अश्या type चा. मूख्यताहा सध्या ४०+ चा....२५+ लोकांचे विचार वेगळे आहे.

दूसर्या महायुद्धा नंतर पूरुषांची संख्या प्रचड प्रमाणात कमी झाल्यावर जर्मन बायका नीच सर्व पूरुषाची काम केलि आहेत, घर बाध्न्यापासून ते Industryt कामकरन्या पर्यत. स्त्रीयानीच हा देश बाधाला परत........

मधुरा देशपांडे's picture

28 Sep 2015 - 7:27 pm | मधुरा देशपांडे

मधुरा, तुमचे अनुभव वेगळे असतील. पण म्हणुन असे होतच नाही असे नाही - खर तर असे होते हे पटत नाही

मी असे होतच नाही असे म्हटलेले नाही. मी तुमचे अनुभव अमान्य करत नाहीये, पण म्हणुन मी लिहिलेले अजिबातच पटत नाही असे होत असेल तर मीही काही करु शकत नाही. मी आता हे वरही लिहिलंय की मला असे दिसले म्हणुन लिहिले नाही. त्याला काहीतरी वाचनाची जोड आहे. आता नक्कीच हा अभ्यास पीएचडीचा आहे असा दावा नाही, पण जर प्रामाणिक अनुभवकथन, त्याला तशाच अनुभवांची जोड, तिही भारतीय, इतर देश आणि जर्मन लोकांसोबत झालेल्या चर्चेतुन, आणि इतर मिळवलेली माहिती संकलित करुन लिहिली आहे. जर ती वाचकांपर्यंत नीट पोचत नसेल, तर मी लेखक म्हणुन ती माझी मर्यादा समजते. असो.

ईथे कामाच्या थिकाणी कधिही स्त्रि/पूरुष भेदभाव/ घाण comments /
Sexual assulation from boss या गोश्टी घडत नाहीत आणि हेही लेखात हव होत अस मला वातत.

अशाही गोष्टी माझ्यासमोर घडल्या आहेत. माझ्याबद्दल नाही, पण ऑफिसमधल्याच काही स्त्रियांकडे बघताना एक दोन कलीग्सने ज्या कमेंट्स केल्या त्या खरंच वाईट होत्या. माझ्याच काही स्त्री सहकर्मचार्‍यांना देखील हा अनुभव थोड्या प्रमाणात आहे. इतर देशांच्या तुलनेत हे कमी आहे आणि इथे मुलगा मुलगी भेदभाव नाही वगैरे बर्‍याच सकारात्मक बाबी लेखात लिहिल्या आहेत. दुसरे महायुद्ध आणि तेव्हाची सामाजिक स्थिती याबद्दलही वर लेखात लिहिले आहेत. अजुनही काही ठिकाणी कौतुकच केले आहे. याशिवायचा प्रत्येक मुद्दा मला तेवढ्याच विस्ताराने लिहिणे शक्य नव्हते. तो अजुन परिपुर्ण होण्याच्या दृष्टीने, माझ्याही माहितीती अजुन भर पडण्याच्या दृष्टीने, त्याबद्दल इतरांकडुन वाचायला नक्कीच आवडेल.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

29 Sep 2015 - 12:50 am | निनाद मुक्काम प...

ज्युलिया
हा मुद्दा माझ्या लिहिण्यातून निसटला
दुसर्या महायुद्धा नंतर ह्या क्रूर जगात मुले जन्माला घालायला नको , ह्या विचित्र मानसिकतेचा पगडा काही काळ माझ्या सासूवर होता ,पुढे तिला दोन मुली झाल्या. पण हे विचार काही अंशी कुठेतरी माझ्या पत्नीच्या डोक्यात सुद्धा होता अन लंडन अबुधाबी ते काही भारत भेटीत तिने लोकांना प्रतिकूल परीस्थित जगतांना पहिले , त्या मानाने जर्मनी मध्ये राहणीमान व सामाजिक जीवन खूपच चांगले आहे
तेव्हा ह्याची जाणीव स्वताच्या देशाच्या बाहेर पडली तेव्हा झाली.
उत्पादन शेत्रात जगभरात पुरुषी वर्चस्व आहे तर सेवा व इतर शेत्रात महिलांचे प्रमाण अधिक आहे व त्यातही काही शेत्रात महिलांचे अधिराज्य आहे हे आहीच लिहिले होते थोडे अजून उदाहरण देतो . मुंबईत पूर्वी गिरणगावात नोकर्या ह्या फक्त मिल पुरत्या मर्यादित असल्याने बायकांचे अस्तित्व खानावळी चालवणे एवढेच मर्यादित होते संपाच्या काळात पुरुष घरी बसले पण महिलांना रोजगाराच्या संध्या नव्हत्या
सध्या गिरणगावातून महिला व पुरुष दोन्ही सुद्धा खाजगी शेत्रात मॉल ते अनेक कंपन्यांच्या मध्ये काम करतात.
जर्मनी मध्ये उतप्दन शेत्राचे प्राबल्य जास्त असल्याने पुरुष जास्त प्रमाणात काम करतांना दिसतात.

७० च्या काळात मुंबई व पुण्याकडे नोकरी करणारी सून हवी हा ट्रेंड सुरु झाला ह्याचे एकमेव कारण वाढती महागाई होते त्या काळात सरकारी नोकर्या हाच उत्पन्नांचा मुख्य स्त्रोत असल्याने महिलांना नोकरी करायची संधी होती ,पण जर गावाकडे एखाद्या ठिकाणी खाण प्रकल्प उभा राहिला तर पुरुषांना बायकांच्या तुलनेत जास्त रोजगाराच्या संधी प्राप्त होणार हे साहजिकच आहे ,
ज्युलिया ने म्हटले त्याप्रमाणे दुसर्या महायुद्धात एक पिढी गारद झाल्याने महिलांनी देशात व बाहेर ब्रिटन मध्ये जाऊन नोकर्या करून घरची परिस्थिती सांभाळली , प्रत्येक स्त्रीला नोकरी करून आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र व्हायचे येथे वेध लागले असतात , जर्मनी मध्ये काही लोकांच्या मते २००२ नंतर इयु बनल्याने महागाई वाढली मात्र त्यामानाने पगार वाढले नाहीत कारण स्किल व अन्स्कील असे दोन्ही प्रकारचे कामासाठी लोक बाहेरच्या देशातून जर्मनी मध्ये आली ,थोडक्यात मिनिमम वेज ही संकल्पना अनेक वर्ष स्थिर राहिली
महागाई वाढतच गेली तेव्हा , महिलांनी त्या एकट्या असो किंवा विवाहित नोकरी करणे अपरिहार्य झाले, आणि इट्स मे लाइफ माय रुल्स हे प्रगत देशातील महिलांचा स्थायी भाव आहे त्याला जर्मन महिला अपवाद नाही ,

.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

29 Sep 2015 - 3:15 am | निनाद मुक्काम प...

नुकताच प्रहार मध्ये जर्मनी मधील आभासी जगतातील मैत्रिणीने तिच्या अनुभवावर आधारीत जर्मनी मधील शिक्षण व्यवस्था ह्यावर लेखमाला दिली आहे तिचे दोन भाग इथे मी देत आहे.
जर्मनी मध्ये येणाऱ्या व यायची इच्छा असलेल्या अनेक पालकांना व खुद्द जर्मनी मध्ये राहणाऱ्या अनेक पालकांना भाषेच्या अडचणी मुळे प्रचंड महागड्या आंतराष्ट्रीय शाळांमध्ये प्रवेश घेतात त्यांच्यासाठी व एका वेगळ्या धाटणी च्या शिक्षण पद्धतीची तोंड ओळख ह्या द्वारे होईल

जूलिया's picture

29 Sep 2015 - 2:24 pm | जूलिया

अशाही गोष्टी माझ्यासमोर घडल्या आहेत. माझ्याबद्दल नाही, पण ऑफिसमधल्याच काही स्त्रियांकडे बघताना एक दोन कलीग्सने ज्या कमेंट्स केल्या त्या खरंच वाईट होत्या. माझ्याच काही स्त्री सहकर्मचार्‍यांना देखील हा अनुभव थोड्या प्रमाणात आहे. इतर देशांच्या तुलनेत हे कमी आहे आणि इथे मुलगा मुलगी भेदभाव नाही वगैरे बर्‍याच सकारात्मक बाबी लेखात लिहिल्या आहेत. दुसरे महायुद्ध आणि तेव्हाची सामाजिक स्थिती याबद्दलही वर लेखात लिहिले आहेत. अजुनही काही ठिकाणी कौतुकच केले आहे. याशिवायचा प्रत्येक मुद्दा मला तेवढ्याच विस्ताराने लिहिणे शक्य नव्हते. तो अजुन परिपुर्ण होण्याच्या दृष्टीने, माझ्याही माहितीती अजुन भर पडण्याच्या दृष्टीने, त्याबद्दल इतरांकडुन वाचायला नक्कीच आवडेल.

@ मधुरा - खर तर माझ हेच म्हणण आहे;१-२ वर्षांत ५-१० अनुभव म्हणजे किती कमी % आहे; जिथे पूण्या-मूंबइ कडे दिवसाला १०-३० प्रमाण असत.जर्मन लोक देव आहेत आणि १००% समानता आहे असा दावा नाहीये; पण लेखात निगेटिव्ह मूद्दे जास्ती व व पॉझिटिव एका परिछेदात उरक्ल्याचे वाटले म्हणून लिहीले. मिपाकरां चे comments तश्याच दिसल्या आणि हे वास्तव नाहीये नक्कीच.....

मधुरा देशपांडे's picture

29 Sep 2015 - 2:36 pm | मधुरा देशपांडे

लेखात निगेटिव्ह मूद्दे जास्ती व व पॉझिटिव एका परिछेदात उरक्ल्याचे वाटले म्हणून लिहीले.

ओके. हरकत नाही, लेखातुन नकारात्मक मुद्दे जास्त आले आहेत असे वाटल्यास मी ती माझ्या लेखाची मर्यादा समजते. वरच्या काही प्रतिसादातुन असे नाहीच आहे, पटत नाही वगैरे आणि २-४ अनुभवांवर काहीही लिहिले आहे, त्याबद्दल माझा मुख्य प्रतिवाद होता. मनाला येईल ते, या चार अनुभवांवरुन आता तेच वास्तव असा दावा नाहीये हे वरतीही लिहिले आहे, त्याबद्दल पुन्हा स्पष्टीकरण देत नाही.
तुमचे अनुभव वाचायला आवडतीलच.

लेख वाचुन जर्मनितल्या स्त्रियांची जीवन शैली समजली. मस्त लिखाण.

नवशिक्या's picture

29 Sep 2015 - 5:13 pm | नवशिक्या

भावनिक दृष्ट्या घातलेले गेलेले वाद जमिनीवर पडलेलं रॉकेल जसं हवेत विरून जातं तसे विरून जातात.
त्यामुळे कोणत्या हि लेखावर वाद घालण्यापूर्वी किमान आपण आपल्या मुद्द्याला पुराव्यांचे अथवा वस्तुस्थिती चे पाठबळ देऊ शकतो काय हे एकदा पहावे.
वरील लेखक अथवा लेखिका काय म्हणत आहे ...आपण काही तरी सुसंबद्ध बोलतोय ..का उगाचच "generalisation " करतोय हे प्रश्न मनाला विचारावेत.
लेखात जर्मनी मध्ये " हे असं हि असता बरं का " असं सांगितलं आहे.
आणि श्री निनाद " अरे असं तर सगळीकडेच असतं ...तुम्ही चुकीची माहिती पुरावाताय ....इथे आधी महायुद्ध झालय वगरे वगरे ..." असं म्हणत आहेत.
तुम्ही कृपया तुमचा मत " हे असं हि असता बरं का " च्या अनुषंगाने द्यावे . तुम्हाला काय वाटतंय ? हे असं होतं का नाही ?
जर होतंय तर वाद का घातलाय ? आणि जर होत नसेल तर पुरावा आहे का?
बाकी जगात काय चालते ...असे होण्या मागची कारणे ...वगरे लांबड लावायची असेल तर दुसरा धागा उघडणे उत्तम नाही का?

प्रभाकर पेठकर's picture

29 Sep 2015 - 5:46 pm | प्रभाकर पेठकर

सहमत.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

30 Sep 2015 - 12:44 am | निनाद मुक्काम प...

नवशिके
तुम्हाला प्रतिसादातून नक्की काय म्हण्यायचे आहे त्याबद्दल माझा गोंधळ उडाला आहे , पण जेवढे कळले त्यावरून प्रतिसाद देतो
वरील लेखक अथवा लेखिका काय म्हणत आहे .
सदर लेख मधुरा ने लिहिला आहे तेव्हा लेखिका एवढा उल्लेख चालला असता .
लेखात जर्मनी मध्ये " हे असं हि असता बरं का " असं सांगितलं आहे.
ह्या वाक्याबद्दल खास धन्यवाद , हा लेख वाचून तुम्ही असा ग्रह करून घेतला की मधुरा ह्यांना जर्मन महिलांचे जीवनाबद्दल माहिती देण्याच्या नावाखाली प्रगत देशात असेही होते हे सुचवायचे होते , तुमचा असा निष्कर्ष काढलेला पाहून ती सुद्धा थक्क होईल.माझ्या मते मधुरा च्या चुकून सुद्धा मनात असे आले नसेल कि हा लेख लिहितांना तेथील समाज जीवनावर शिंतोडे उडवावे ,
तेव्हा ह्या लेखातून तुम्ही असा ग्रह करून घेतला त्याबद्ल मंडळ आभारी आहे.

एखाद्या देशातील एखाद्या वर्गाचे समाजजीवन लिहितांना विशेतः ती संस्कृती आपल्या संस्कृतीहून भिन्न असतांना प्रत्येक त्या देशाच्या भूतकाळ सरकारी धोरणे सामाजिक राजकीय आर्थिक सर्व बाबींच्या विचार करून लिहिणे आवश्यक असते
असो नवशिके तुम्ही कोणाचे डू आयडी असावे असे मला वाटते सबब ह्याहून अधिक स्पष्टीकरण देत नाही,
पण एक उदा देतो
बटाट्याची चाळ वाचले तर १९४० ते १९६० च्या दरम्यान मुंबई मधील चाळीत राहणाऱ्या मध्यमवर्गीय माणसांचे जीवन दाखवले आहे त्यात सुद्धा ते दाखवतांना तत्कालीन राजकीय सामाजिक आर्थिक परिस्थिती पु ल ह्यांनी चितारली आहे त्याशिवाय एखाद्या समजा चे वर्णन अथवा चित्रण अपूर्ण ठरते .

बिन्नी's picture

29 Sep 2015 - 9:06 pm | बिन्नी

लेख आवडला.
शिवाय प्रतिसाद लिहिताना जावयबापूनी मनात म्हटलेले ' जे जे जर्मण उदात्त उन्नत....' हे गाणेही आवडले ;)

प्यारे१'s picture

29 Sep 2015 - 9:17 pm | प्यारे१

बापूंच्या प्रतिसादावेळी तेव्हा 'कोल्ह्यांनीभरलेलीगाडी' (आम्ही असंच म्हणतो) आली नव्हती काय?

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

30 Sep 2015 - 12:54 am | निनाद मुक्काम प...

बिन्नी
सदस्य कार्यकाळ
३ आठवडे ४ दिवस
मिपावर नवीन आहात किंवा नवीन अवतार घेतला असावा
असो
मिपावर स्वागत आहे.

स्वतःला पुढे जाता येत नाही मग दुसर्याचे पाय ओढून त्याला मागे खेचायचं हेच तत्व सगळ्या पुरुष (?) जातीत दिसतं . जळतात हो ते स्त्रियांवर
:-)