श्रीगणेश लेखमाला
सर्व मिपाकरांना आणि वाचकांना गणेश चतुर्थीच्या आणि मिपा वर्धापनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आठ वर्षांपूर्वी गणेश चतुर्थीला मिपाची मुहूर्तमेढ रोवली गेली. ".. लोग आते गए, कारवाँ बनता गया" हे मिपाला शंभर टक्के लागू पडतं. वैविध्यपूर्ण लेखन करणारे वेगवेगळ्या क्षेत्रातले तज्ज्ञ सदस्य हे कायमच मिपाचं बलस्थान राहिलेलं आहे. इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीस ते भाषाशास्त्रज्ञ ते गुरुजी ते दंतवैद्य आणि स्पेशालिस्ट डॉक्टर्स, मॅनेजर्स, असा (आणि याहीपलीकडचा) विस्तीर्ण पट मिपाकरांनी व्यापला आहे.
मिपाचं हे वैशिष्ट्य झ़ळकून उठावं, म्हणून यंदा आम्ही मिपाच्या काही सदस्यांना त्यांच्या व्यवसायाविषयी लिहितं केलं. त्यांना स्वतःच्या व्यवसायाविषयी लिहिण्यासाठी मुक्तहस्त दिला. शिक्षणाचं स्वरूप, शिकतानाचे बरे-वाईट अनुभव, काम करतानाचे अनुभव, हा विशिष्ट व्यवसाय करण्यासाठी लागणारे गुण, आजवरचा प्रवास, अशा बहुविध पैलूंवर या लेखकांनी लिहिलं आहे. श्रीगणेश ही बुद्धीची देवता. त्यामुळे श्रीगणेश लेखमालेत व्यवसायांवर आधारित लेख यावेत हे औचित्य साधलं गेल्याचा आनंद आहे.
मिपावर यापूर्वीही 'अकादमी', 'गुरुजींचं भाव-विश्व', 'राजाराम-सीताराम', 'पूर्वेच्या समुद्रात', 'प्रांतांच्या गोष्टी' अशा कार्यक्षेत्राशी निगडित लेखमाला आल्या आहेत, लोकप्रिय झाल्या आहेत. अशीच लोकप्रियता याही लेखमालेला मिळो, ही श्रीगणेशाचरणी प्रार्थना.
ही लेखमाला प्रत्यक्षात आणण्यात संपादक मंडळाचे आणि साहित्य संपादक मंडळाचे श्रम कारणीभूत आहेत. तरी या लेखांचं श्रेय सर्वस्वी लेखकांचंच आहे. 'फोडिलें भांडार धन्याचा हा माल । मी तंव हमाल भारवाही ॥' अशीच संमंची आणि सासंमंची भावना आहे.
मिपासंवाद या नवीन मंचाद्वारे जुन्या जाणत्या मिपाकरांनी आणि काही माजी संपादकांनी खूप छान सूचना केल्या आणि लेख गोळा करण्यात मदत केली. सुधांशु नूलकर यांनी मुद्रितशोधनाचं मोठं काम करून मालिकेतील लेख दिवाळी अंकाप्रमाणेच सुव्यवस्थित करून दिले आहेत. त्यांना सर्वांना विशेष धन्यवाद!
उद्यापासून (ता० १८ सप्टेंबर) ते अनंत चतुर्दशीपर्यंत रोज एक लेख प्रसिद्ध होईल.
***************
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटीसमप्रभ|
निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा||
***************
याद्या
6592
प्रतिक्रिया
39
मिसळपाव
श्रीगणेश लेखमालीकेला शुभेच्छा
मेजवानीची सुरुवात! लेखांच्या
हे असे काही उत्तम, इथे वाचायला मिळते....
गणपती बाप्पा मोरया!
या बात! एक नंबर!
मेजवानी च्या प्रतिक्षेत !!!
म्हणा म्हणा. छान ऊकडलेलेच
In reply to मेजवानी च्या प्रतिक्षेत !!! by कैलासवासी सोन्याबापु
खिक्कं. सोलापुरी मोदक किती
In reply to म्हणा म्हणा. छान ऊकडलेलेच by अभ्या..
शुभेच्छा!
+१
In reply to शुभेच्छा! by पैसा
लोल! माझ्या बॉसला तुझा नंबर
In reply to +१ by अन्या दातार
गणेशवंदना आवडली.
प्रास्ताविक आवडले
येउदे.
स्वागत आणि कौतुक.
+१
आदुबाळ
भन्नाट होणार ही लेखमाला
वाचणार.
याचिसाठी केला होता अट्टाहास..
उत्तमोत्तम लेखांच्या
मस्त
संमं आणि सासंमं चे विशेष
सं.मं. मनःपूर्वक आभार..
धन्यवाद!
In reply to सं.मं. मनःपूर्वक आभार.. by लाल टोपी
अटी - नियम.
आहे ना!
In reply to अटी - नियम. by प्रभाकर पेठकर
पाहतो.
In reply to आहे ना! by पैसा
नाही नाही!
In reply to पाहतो. by प्रभाकर पेठकर
श्रीगणेश लेखमालेसाठी
गणेश लेखमालेमधे लिहिणारे सर्व
श्री गणेश लेखमाला
संमंचे, आणी आदूबाळ आणी
संपादक मंडळाचे आवर्जून आभार..
संपादक मंडळाचे आवर्जून आभार..
In reply to संपादक मंडळाचे आवर्जून आभार.. by सुहास झेले
मस्त लेखमाला....
लेखमाला आवडली . असे लेख
या लेख मालेची लिंक पुढच्या
सुंदर उपक्रम, काही लेख खरोखरच