Skip to main content

रॉयल राइड... रॉयल एन्फ़िल्ड.... प्रश्नोत्तरी धागा

लेखक कैलासवासी सोन्याबापु यांनी गुरुवार, 02/10/2014 18:26 या दिवशी प्रकाशित केले.
मिपा परीवारात बरेच रॉयल एन्फ़िल्ड उर्फ़ बुलेट चे चाहते अन मालक आहेत, ह्या धाग्याचा हेतु कुठल्या ही दुसर्या ब्रॅंड च्या बाईक ची खिल्ली उडवणे, किंवा पातळी उतरुन टिका करणे हा मुळीच नाही, फ़क्त स्टॅंड अलोन बायकिंग करण्यापेक्षा , एक ऑर्गनाईझ्ड बायकींग एफ़र्ट म्हणुन हा लेखन प्रपंच, मोदक ह्यांनी प्रथम ह्या धाग्याची कल्पना मांडली... इथे अपेक्षित काय आहे ?? आर .ई. उर्फ़ बुलेट मालक असाल तर आपले अनुभव, कथन, मेंटेनंस टिप्स, इत्यादी आदान प्रदान, नसाल अन रॉयल एन्फ़िल्ड मधे रस असेल तर इथे प्रश्नोत्तराची हक्काची जागा, विकत घेण्यात रस नसेल तर कुठे ह्या बाइक्स उत्तम कंडीशन मधे भाड्याने मिळतील, कुठ्ली एक्स्पिडीशन आर ई वर केली तर मजा , आराम अन ऍडव्हेंचर द्विगुणीत होईल ही चर्चा इथे आपण करुयात. तर श्रीगणेशा स्वरुप, काही योगदान माझे (मोदक ह्यांनी मला, आर ई ची ३५० च का घेतली, एकंदरीत अनुभव काय इत्यादी कथन करण्याची विनंती केली त्याला अनुसरुन) १. मी क्लासिक ३५० का घेतली ?? अ. उत्तम संगम, ३.५ रॉ ताकद अन त्यातल्यात्यात बरे माईलेज (माझ्या पेशात खुप फ़िरावे लागते) ब. जरासा ओल्ड वर्ल्ड चार्म, सदरहु मॉडेल हे रॉयल एन्फ़िल्ड ह्या अगदी सुरुवातीच्या डीझाईन्स वर आधारीत आहे क. रोबस्ट बिल्ड, कमी देखभालीचा खर्च २. क्लासिक ३५० चे फ़ायदे ?? अ. मजबुत तरीही जास्त जड नसणे ब. ट्रेडीशनल कार्ब्युरेटर टेक्नॉलोजी (बायकिंग मधे हे मला महत्वाचे वाटले, ई एफ़ आय मधे फ़्युल पंप वापरले जातात ते ही इलेक्ट्रॉनिक चिप्स ने कंट्रोल्ड, त्यात पेट्रोल ही जास्त जाते, अन आडवळणाला काहीही प्रॉब्लेम आला तर लोकल मेकॅनिक त्यात काहीच करु शकत नाही, ह्या उलट कार्ब्युरेटर असला तर अगदी मेकॅनिक नसला तरी जुजबी माहितीवर आपण स्वतः डॅमेज कंट्रोल करुन परत ती बाईक वर्कशॉप पर्यंन्त आणु शकतो) क. स्पेयर पार्ट्स ची निट अवेलेबिलिटी अन सर्विस सुलभ असणे, ९० मिनिट एक्स्प्रेस सर्विस मधे शोरुम ला हिची व्यवस्थित निगा घेतली जाऊ शकते. ड. उत्तम मायलेज (बायकींग ला हे असणे बरे असते) ई. उत्तम ट्रॅक रेकॉर्ड, शिवाय मायलेज उत्तम असल्याने सायलेंसर चेंज अन इतर अस्थेटीक मॉडीफ़िकेशन्स (हॅंडल बार चेंज, रीम व्हिल्स ) नंतर ही खिशाला काही विषेश चाट बसत नाही ३. क्लासिक ३५० चे तोटे ?? १. जास्तच पॉवर हवी असल्यास ती नाही, "भारताची कल्ट हार्ले सम बाईक" असली तरीही ३५० सी सी आहे. २. ८० किमी/ तास नंतर पुर्ण बाईक कंप पावते ३. कंपनी ने दिलेले टायर भंगार आहेत (बदलल्यावर काही प्रॉब्लेम नाही ड्राय अन वेट दोन्ही ट्रॅक्शन एन्वॉयरमेंट मधे) ४. कंपनी सायलेंसर साधा घेतला तर बरेचदा खड्ड्यातुन काढताना घासतो खालुन, ऑफ़ रोड घ्यावा तर कंपनी पॉलिसी मधे बाय बॅक किंवा एक्स्चेंज बसत नाही, दोन्ही बोकांडि बसतात सायलेंसर्स ५. कंपनी सायलेंसर चा आवाज ’बुले्ट आली बे’ अशी घोषणा करत नाही ६. फ़िटिंग्स अन बोल्ट्स मधे रस्टींग प्रॉब्लेम येतो ३-४ पावसाळ्यां नंतर मला तरी मायलेज हा फ़ायदा इतर तोट्यापेक्षा मोठा वाटला सो मी घेतली, सद्ध्या ३-४ महिनेच झालेत, १५०० किमी झाले आहेत. मोदक भाई, अन इतर , एकंदरीत हे फ़ायदे अन तोटे पाहुन मी क्लासिक ३५० घेतली आहे. :)

वाचने 150746
प्रतिक्रिया 648

प्रतिक्रिया

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

सहमत. नवी बुलॅट घ्यायची आणि त्याम्च्याकडे द्यायची.

Slope Of Hell ही पुण्याजवळ कामशेटपासून साधारण ५ किमी वर असलेले ठिकाण आहे . अत्यंत तीव्र चढ आणि कच्चा रस्ता या वरून एक खिंड आणि एक चढण चढायची आणि पलिकडे उतरायचा तिथे ( बहुधा) बी एस एन एल च टॉवर आहे . तिथे मस्त पोडीयम बांधला आहे . तिथे विश्रांती घेउन परतायचे. बायकिंगची मजा आणि थ्रिल अनुभवायचा असल्यास नक्की जावा अशी जागा ( अर्थात सर्व काळजी घेउन )

अवांतरः आयशर मोटार म्हटल की फक्त टेंपोच नजरेसमोर येतात. रॉयल एन्फिल्ड हा आयशर मोटरचा ब्रँड आहे हे आज कळले. आयशर मोटारचा स्टॉक वर्षभरात एवढा का वर चढला याची कारणं शोधताना ही माहिती झाली.

बुलेट म्हणजे माज आहे राव... आहाहा ! काय मझा येतो आवाज ऐकूनच... घेईन केंव्हा माहीत नाही. पण कडक्क गाडी. अरे आवा.......ज कुणाचा ? बुले........टगडगडग चा

बुलेटला AMP मीटर का असतो? त्याचे नक्की काय काम असते? फ्युएल गेज वगळून याला जागा दिली आहे इतके काय महत्वाचे असते?

In reply to by मोदक

जुन्या बुलेट मध्ये आधी हलकीशी किक मारून काटा ० (zero)वर आणावा लागायचा व नंतर जोरात किक मारून बुलेट सुरु व्हायची, नाहीतर किक मारली जात नसे. आताही नवीन बटन स्टार्ट बुलेट मध्ये विजेरी चार्ज/डिस्चार्ज होत आहे कि नाही हे कळण्यासाठी हे मीटर उपयोगी आहे. विजेरी चार्ज झाली नाही व किक स्टार्ट ची सवय नसल्यास मात्र खूप अवघड होईल.

In reply to by कपिलमुनी

हा RPM मीटर असलेला फार चांगला...गिअर कधी बदलायचे ते बर्रोब्बर समजते

In reply to by टवाळ कार्टा

बुलेट चालवताना पार्किन्सन झाल्यासारखी भरपूर थर थर जाणवायची सोडून आता गाडीवरून आपण फेकले जातो की काय असं वाटायला लागलं की वरचा गिअर टाकायचा.

In reply to by आदिजोशी

एवढे हाल कशाला करता ;) गाडीच्या मन्युअलमध्ये गेअरवाइज किती वेग ठेवावा दिल असेलच. साधारण १५ च्या टप्प्यात ठेवत असतात बहुतेक. इंजिन खुश आणि तुम्हीपण.

नमस्कार . ही गाडी मिळते १०००० किमी चाललेली, १३०००० रुपयात। लाल रंगाची आहे, निट वापरलेली. मला आर ई ची फार आवड नाही पण ही गाडी आवडली. घ्यावी का? सल्ला द्या

१) किंमत योग्य आहे का? २) चालवायचा खर्च साधारणतः किती येईल? ३) कोणी ही गाडी वापरली असेल तर काही सल्ला? ४) जुनी घेत असल्यामुळे काही नेमक्या गोष्टी ज्या चेक केल्या पाहीजेत या गाडीसाठी?

In reply to by खंडेराव

१. माझा पास २. continental gt २० चा अ‍ॅवरेज देते बहुतेक ३. टुरींग साठी नाहिये...स्पोर्टी पोझिशन आहे बसण्याची ४. पुण्यात असाल तर कपिलमुनींच्या ओळखीत एक मेकॅनिक आहे बहुतेक आणि नुस्ते धन्यवाद नक्को...घेतली तर १ राउंड मारायला देणार कै? ;)

In reply to by टवाळ कार्टा

...आणि इतके करून सिंगल सीट आहे. सिंगल सीट ऐवजी डबल सीट बसवली तर त्या गाडीचा लूक जातो असे माझे वैयक्तीक मत आहे. (किंवा कदाचित मी पाहिलेल्या लोकांनी टुकार सीट बसवली असेल)

In reply to by मोदक

आणखीन एक घोळ आहे..नवीन घ्यावी लागेल डबल सीट.. आणि चांगली/ टुकार अशी नाही, आहे ती एकच आहे कंपनीची :-) ती टुकारच दिसते. किमतीची चवकशी केली, ५२०० रु, सीट आणि फुट रेस्ट. हा अजुन खर्च, आणि तो करावाच लागेल.

In reply to by खंडेराव

१) किंमत योग्य आहे का? किंमत व्यवस्थित वाटतेय, सध्या किंमत २+ लाखाच्या घरात आहे. २) चालवायचा खर्च साधारणतः किती येईल? ५००+ सीसी इंजिन आहे त्यामुळे मायलेज येवढा मिळणार नाही २० - २५ च्या आसपास मिळू शकेल. बाकी ऑइल, रेग्युलर चेकअप एन्फिल्ड स्टाइल. १०००० किमी झालेत म्हणजे फ्री सर्विसिंग संपल्यातच जमा. सो दर ३ महिन्यांनी त्याचा खर्च. ३) कोणी ही गाडी वापरली असेल तर काही सल्ला? टेस्ट राईड घेतली होती, स्पोर्टी आहे. इतर बाबतीत रायडींग पोझिशन मला कम्फर्टेबल नाही वाटली. तुम्ही किमान ५ - १० किमी चालवून निर्णय घ्या. ४) जुनी घेत असल्यामुळे काही नेमक्या गोष्टी ज्या चेक केल्या पाहीजेत या गाडीसाठी? गाडी तुम्ही म्हणता तशी जर एक्स्पाटची असेल तर किती कालावधीत १०००० किमी झाले ते बघा. एन्फिल्डचा सुरुवातीचा ३००० - ४००० किमीचा टप्पा फार महत्वाचा. जर त्यात गाडी व्यवस्थित चालली असेल तर ती पुढे जास्त कटकट करत नाही. ह्या गृहस्थांनी कुठे कुठे फिरवली आहे त्याचा पण विचार करा. नवीन गाडी १०K च्या आधी लडाख, किंवा इतर हिली भागात फिरून आली असेल तर इंजिन, क्लचप्लेट सगळ चेक कराव लागेल. सगळ्यात महत्वाच, जाणकार मेक्यानिकला दाखवूनच घ्या. ते अजून डिटेल सांगू शकतील.

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

बरोबर..गाडी चालवुन बघतो, त्याशिवाय रायडींग पोझिशन किती सुट होते कळणार नाही, बरीच वेगळी आहे आत्तापर्यंत वापरलेल्या गाड्यांपेक्षा. बरेच रिव्यु वाचले, दोन्ही बाजुची मते आहेत. ज्यांच्याकडे आहे त्यांनी २५ ते ३९ पर्यंत अ‍ॅवरेज क्लेम केलय वेगवेगळ्या परिस्थितीत. सध्याच्या मालकाने १०,००० मधले ४५०० एका ट्रिप मधे केलेत साउथच्या..त्यामुळे चेक करुन घेतो मेक्यानि़क कडुन फायनल झाल्यास.

In reply to by खंडेराव

२० - २५ - जास्तीत जास्त ३० रिअलीस्टीक वाटते, पण ३०+ ५०० सीसी इंजिनमधून मिळेल हे जरा जास्त वाटत. मिळत असेल तर चांगलाच! अजून एक, तुम्हाला GT ही GT म्हणून घ्यायची आहे की, बुलेट म्हणून? कारण ही बुलेटसारखी नाही. त्यामुळे बुलेट घेतली हा फील राहणार नाही. बरेच बुलेट घेणारे त्या बाबतीत इमोशनल असतात, त्यामुळे जर बुलेटचा इमोशनल ऐंगल असेल तर परत विचार करा :) एकंदरीत ठेवण आणि गाडी आवडली तर घ्या! एन्फिल्डच टॉप एन्ड मॉडेल आहे, बेस्ट इन लाइन!

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

किंमत हा मेन फॅक्टर आहे, उद्या भेटतोय विकणार्याला, बघुया काय होतेय. मार्केट रेटपेक्षा कमी सांगतोय तो. बुलेटची इमोशनल आवड अशी नाही, त्यामुळे तो अपे़क्षाभंग होणार नाही. फक्त २ लोकांना किती आरामात बसता येते हे मात्र एकदा बघुन घेतो.. अ‍ॅवरेजचे खरे आहे, प्रत्येकाचे आकडे वेग वेगळे..२५-३० मिळण्याचेच चान्सेस जास्त आहेत इतक्या मोठ्या मशीनला. अर्थात अगदी ४०चेही दिलेत लो़कांनी हायवेला ८५च्या वेगाला.

In reply to by खंडेराव

गाडी स्वस्त मिळते म्हणून घेउ नका. आरामदायी, आवड आणि गरज यांचा मेळ घालून मगच गाडी घ्या.

In reply to by कपिलमुनी

सध्या जुपीटर वापरतोय बायकोसाठीची..मोटारसायकल घ्यायची आहेच आज ना उद्या, त्यामुळे ही बघीतली आणि विचार सुरु झाला. व्यवस्थित चालवुन बघितल्याशिवाय घेणार नाही!

In reply to by खंडेराव

तुम्ही या आधी मोटरसायकल चालवली आहे की बुलेटवरच श्रीगणेशा करणार आहात..? (कोणत्याही खवचटपणे प्रश्न विचारलेला नाही. बुलेट चालवण्यासाठी किंवा ५५० CC इंजीन पेलण्यासाठी विशेष सराव लागतो.) ज्युपीटर वरून डायरेक्ट ट्रांझीशन होणार असेल तर पुन्हा विचार करा.

In reply to by मोदक

१२ वर्षे मोटारसायकल वापरली आहे, वि़क्टर, नंतर सुझुकी हयाते..लेह लदाख पासुन इतरही अनेक लांबच्या फेर्या केल्या आहेत.७०-८०००० किमी चालवली असेल. फक्त गेल्या सहा महिन्यापासुन मोटारसायकल नाही. हो, पण बुलेटचा मात्र अनुभव नाही. कधीतरी मित्रांची वगैरे चालवली आहे तेवढेच.. वजन ( माझे ) १०० किलो च्या पुढेमागे आहे, त्यामुळे गाडी जड होणार नाही असे वाटतेय.

In reply to by खंडेराव

सेकन्डहँड गाडी घेताना पहिला प्रश्न तो गाडी का विकत आहे? कुछ तो बात होगी वरना वो यूंही बेवफा नही होता

In reply to by कपिलमुनी

तो परत चाललाय अमेरिकेला..आधी घेउन जाणार होता, आता नेत नाहीये..

In reply to by खंडेराव

खंडेराव एक अनाहूत सल्ला गाडी दाखवायला मेक्यानिक जवळचा नका शोधू. जितकी गाडी खराब तितका त्याचा फायदा जास्त. लांबचा मेक्यानिक मित्राच्या ओळखीचा असेल तर पहा. कारण यातून त्याला फार फायदा होत नसल्याने तो तुम्हाला चांगला सल्ला देईल.

In reply to by सुबोध खरे

दुरदर्शी सल्ला :-) हो, एखादा दुरचा शोधतो, किंवा सरळ एनफिल्ड सर्विस सेंटरला नेतो. अर्थात त्यांच्याविषयी लोकांचे मत फारसे चांगले नाहीये! आणि खरे सर, सल्ला अनाहुत कसला, त्यासाठीच तर इथे आलोय..धन्यवाद!

BULLET 500 आणि classic 500 चे इंजिन एखादा अपवाद वगळता सारखे आहे . मुख्य फरक म्हणजे क्लासिक मध्ये ईएफआय ( fuel injection ) आणि BULLET 500 मध्ये carburetor आणि throttle position sensor (TPS) आहे. या दोन्ही सीस्टमच्या फायद्या- तोट्याबद्दल माहिती कळेल का ?

In reply to by कपिलमुनी

नेकेड + कॅफे रेसर असं काहीस कॉम्बो दिसतंय ... ड्युकसे टक्कर होणेवाली है मतबल

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

कॅफे रेसर नसावी ही ऑफ़ रोड क्रुजिंग बाइक आयला कसले प्रकरण आहे राव! प्रेमात पडलो हिच्या! आवडली मला तरी तूफ़ान

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

मला सुद्धा ही बाईक आवडली आहे . ऑन रोड कशी आहे ते बघून घेता येइल :)

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

टाकी तसलीच आहे न तिची! त्यामुळे वाटते! एकुणात धूम इष्टैल बाईक काढतंय एन्फिल्ड ... ४१० सीसी इंजिन, म्हणजे पूर्णपणे नवीन बाईक असणारे ... इकडल इंजिन तिकडे असले प्रकार नाहीत! आणि हे अजूनही स्पोक्स काय ... असला ढासू लुक्स दिलाय, अलॉय तरी हवेत ... स्पोक्स नक्को.

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

एन्डुरो हाय. स्पोक्स असणारच. kb लै आधी कावासाकीने काढली होती एन्डुरो नावानेच. (टीव्ही अ‍ॅड भारी होती) त्याला केबी १०० इंजिन होते. नाही चालली बाजारात. फायबरचे मोठे मडगार्ड अन रिस्पॉन्सिव्ह ईंजिन होते. २० वर्षानी हिरोने ईंपल्स काढली. h ती पण १५० चे सीबीजीचे ईंजिन लावलेली. त्याला पण स्पोक्स आहेत. अजून आहे मार्केटात. tr पॅशनचे पण असेच एक मॉडेल काढलेय रफ युज साठी. इन्फील्डचे हे सेम स्टाईल असणार. फक्त ईंजिन आरई असणार. रिसॉन्सिव्ह ईंजिन आणि पिकप असला तरच असले मॉडेल चालेल. सध्या दोन्हीत तरी आरई नाही यशस्वी.

In reply to by अभ्या..

Enduro motorcycle चा क्लास आरई पेक्षा पूर्ण वेगळा आहे. हे फ्युजन कसे चालतय ते बघू या

In reply to by अभ्या..

भारतीय मार्केटमध्ये चालेल? ते फार स्पेसिफिक मॉडेल वाटतंय! मलातरी ड्युक टार्गेट वाटतेय :D कारण सध्या ड्युक अपील वाढत चाललाय. पल्सारदेखील ह्या रेंज आणली आहे. रफ युजसाठी बुलेट आहेच. बाकी इंजिन नवीन आणत आहे आरई.

आमचे वजन छटाकभर असल्याने आम्ही कधीही रायल यनफिल्डचा सीरीयसली विचार केला नाही ... पण ही गाडी राजेशाही दिसते ह्यावर आमचे दुमत नाही ... असो असते एकेकाचे नशीब ... आम्ही आपले गरीबाची के टी एम घावी म्हणतो , आम्हाला तेवढीच झेपु शकेल =))

In reply to by प्रसाद गोडबोले

वजनाचे काय नाय प्रगो! घ्या रॉयल एनफील्ड!

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

हेच म्हणतो, वजनाचं काय नसतं. कीत्येक सडपातळ माणसे बुलेट चालवतात.

In reply to by प्रसाद गोडबोले

अरे घेऊन टाका ... मग काय केटीएम न काय ... एकदा धडधड व्हायला सुरुवात झाली की वजनाचा प्रश्नच नाय ;) बाकी केटीएम छान बाईक आहे, कम्फर्टपण मस्तय आणि इंजिन स्मूथ, मख्खन ... शिवाय टेकनिक अडव्हांस आहे एकदम. पल्सार २०० पण चांगलीय, ड्युकच्या इंजिनात थोडेसे बदल करून बनलीय! इन्फिल्ड नाय तर ड्युक ३९० करून टाका बुक! वेटिंग पण नसेल

मी कालच क्लासिक ५०० बुक केली. थंडरबर्ड की क्लासिक यामधे खुप कनफ्युजन होतं. शेवटी क्लासिक घेतली.

In reply to by Dhananjay Borgaonkar

धन्यवाद मित्रांनो. वैद्य साहेब मला १७ सप्टेंबरला मिळते आहे. मिपाच्या वाढदिवसाच्या दिवशी ;)