अनादि काळापासून मानवी समाजात काही वस्तून्च्या सेवनाला "व्यसन" म्हणून त्याज्य ठरवले जाते ... त्या गोष्टीन्चा मोरल ग्राउन्ड्स वर निषेध केला जातो ... यात दारु ,तंबाखू, गांजा-भांग-चरस -एल एस डी इत्यादी गोष्टी येतात
उघड आहे की या गोष्टीना नैतिक /सामाजिक व कायदेशीर दॄष्ट्या त्याज्ज्य अथवा प्रतिबंधित करण्यामागे काही ठोस कारणे आहेत . सामाजिक अथवा नैतिक दॄष्ट्या धोकादायक ठरेल असे वर्तन ही द्रव्ये सेवन करणारुया व्यक्तींकडून घडते ,तसेच आरोग्यावर देखील विपरीत परिणाम होतो . हे १००% मान्य आहे ... परंतु......
जे लोक काही मानसिक /आर्थिक अथवा सामाजिक परिस्थितींची शिकार होवून अथवा आध्यात्मिक / सुपरनॅचरल अनुभवांच्या शोधात अशा द्रव्यांचे संयमित स्वरूपात सेवन करतात ,तेव्हा अशा व्यक्तींचे अनुभव निराळे असू शकतात ...
अमेरिकेतील अनेक संघटनांचे / संस्थांचे / संशोधक लोकांचे असे म्हणणे आहे की कॅनाबिज अथवा भांग / गांजा या वनस्पतींचा वापर करून बनवलेली औषधे कॅन्सरवर रामबाण उपाय आहेत . तसेच कॅनाबिज /इन्फेक्टेड मश्रूम / एल एस डी यासारख्या गोष्टींचा वापर "मेडिटेशन बूस्टर" म्हणून करता येतो व त्यामुळे अध्यात्मिक साधना करणार्या व्यक्तीना उच्चतम अनुभव येतात .
परंतु अमेरिकेतील प्रभावी फार्मा कंपन्या , ज्या कॅन्सरवरील पेनकिलर औषधे विकून अब्जावधी डॉलर वर्षाला कमावतात, अशा क्कंपन्यांच्या दबावामुळे सरकार कॅनाबिज ला प्रतिबन्धित ड्रग कॅतेगरी मध्ये टाकत आहे................
आपल्यापैकी कोणाला अशा "प्रतिबन्धित ड्रग"चा अनुभव आहे का? असल्यास कसा?
मला स्वतःला भांग वापरून अतिशय उच्चतम आध्यात्मिक अनुभव आलेले आहेत आणि हे सांगायला मला अजिबात भीती /लाज वाटत नाही
धन्यवाद
वाचने
6115
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
बैल,गाय,म्हैस व शेळी
अहो फक्त हेच नाही तर गाढव,
In reply to बैल,गाय,म्हैस व शेळी by हेमंत लाटकर
आपल्यापैकी कोणाला अशा
@मला स्वतःला भांग वापरून
म्मी ५ वर्षाअपूर्वी उत्तर
In reply to @मला स्वतःला भांग वापरून by अत्रुप्त आत्मा
अहो खटोला महोदय
In reply to म्मी ५ वर्षाअपूर्वी उत्तर by उडन खटोला
मग आता काय परिस्थिती आहे?
In reply to म्मी ५ वर्षाअपूर्वी उत्तर by उडन खटोला
उडन खटोला जी
भांग वापरून अतिशय उच्चतम
http://luxury.rehabs.com
http://tusharnatu2013
अतिशय भितीदायक वर्णन आहे
In reply to http://tusharnatu2013 by सुबोध खरे