आज मोदी सरकारने चाळीसेक वर्षांपासून भिजत पडलेला वन रँक वन पेन्शन हा मुद्दा मार्गी लावला.
या विषयावर माझे मत अजून पक्के झालेले नाही. पण काही प्रश्न मनात उभे राहिले आहेत.
१.
सैनिक हा इतर क्षेत्रातील लोकांपेक्षा फार लवकर निवृत्त होतो. सामान्य सैनिक (जे सरदारपदापर्यंत चढत नाहीत) ते चाळिशीच्या सुमारास निवृत्त होतात. सेनाधिकारी ५४ ते ५८ या वयोगटात निवृत्त होतात (८०% अधिकारी ५४ वर्षातच). हा माझ्यामते या आंदोलनामागचा खरा प्रश्न होता.
नव्या नियमानुसार प्रत्येक निवृत्त सैनिकाला आयुष्यभर पेन्शनवाढ मिळत राहील.
पण ८०-९० वर्षाच्या वृद्ध गृहस्थाला इतक्या पेन्शनची गरज नसते. त्याऐवजी जर ५४ ते ६४ या वयात त्याला वाढीव पेन्शन दिली आणि त्यानंतर ती अन्य कर्मचाऱ्यांच्या बरोबरीला खाली आणली, तर ते अधिक योग्य होणार नाही काय?
२.
वन रँक वन पेन्शनमुळे जे काही हजार कोटी वगैरे खर्च होणार आहेत त्याहून अधिक गंभीर बाब म्हणजे पूर्व सैनिकांचे झालेले उघड राजकीयीकरण. हे लोण पुढे नवनवे मुद्दे शोधत वाढत जाणार नाही याची खात्री काय?
३.
सेना आणि आय ए एस हे संपूर्ण वेगळे विभाग आहेत. त्यांनी एकमेकांशी तुलना करून हिशोब मांडावेत काय?
४.
अजय विक्रम सिंह समितीने शिफारस केली आहे की सैन्यातील शॉर्ट सर्व्हिस कमिशन (५ ते १० वर्षांचे) अधिक आकर्षक करावे, जेणेकरून तरुण रक्ताचे अधिकारी काही वर्षे सैन्यसेवा करून, काही अभ्यासक्रम वगैरे पूर्ण करून, तिशीतच सैन्य सोडून बाहेर जातील आणि इतर नोकरी-व्यवसायात सुलभरीत्या सुस्थापित होतील. वन रँक वन पेन्शनमुळे या उद्दिष्टाला खीळ बसणार नाही काय?
५.
सैनिकांबद्दल प्रत्येक भारतीयाला निर्विवादपणे आदर आहे. पण, देशसेवा फक्त आम्हीच करतो, इतरांनी त्याबद्दल बोलूही नये अशा प्रकारचा आव माजी सैनिकांनी आणणे योग्य आहे का? उद्या पोलिसांपासून रेल्वे कर्मचाऱ्यांपर्यंत सगळ्यांनी वन रँक वन पेन्शनसदृश मागण्या केल्या तर मोदी सरकार त्या कशा पूर्ण करणार?
वाचने
6294
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
सैनिकांबद्दल प्रत्येक
माझ्यामाहितीप्रमाणे,
इतर लोक
अशी मागणी बीएसएफ, सीआरपीएफ
In reply to इतर लोक by बोका-ए-आझम
तर मग द्यावी लागेल.
In reply to अशी मागणी बीएसएफ, सीआरपीएफ by सव्यसाची
आमदार न खासदारांना वाट्टेल ते
जीव धोक्यात घालुन काम करणार्
जेवढं काम तेवढा पगार अशी फुटपट्टी लावुन कपात करावी
केवळ सैनिकच देश सेवा करतात का?
वेतन आयोग आता बंद केले
डोळ्यासमोर अॅपलची
In reply to वेतन आयोग आता बंद केले by अभिजित - १
अभिजीत-१ साहेब,
मी OROP च्या विरुद्ध नाही.
अभिजित भाऊ… एकदम पटलं
चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या
महाराष्ट्र देखील गाळात आहे.
जनतेची कामे काडीचीही करणार
In reply to महाराष्ट्र देखील गाळात आहे. by अरुण मनोहर
बात निकली हैं तो..
+१
In reply to बात निकली हैं तो.. by चिगो
NPS मध्ये मार्केटशी संबंध न
In reply to +१ by अनुप ढेरे
हे घ्या
In reply to NPS मध्ये मार्केटशी संबंध न by चिगो
धन्यवाद..
In reply to हे घ्या by अनुप ढेरे
OROP चूक आहे हे मान्य आहेच.
In reply to NPS मध्ये मार्केटशी संबंध न by चिगो
रीटायरमेंटचा वय