Skip to main content

येशूचे चित्र - येशू खरेच असा दिसत असावा काय?

लेखक सुनील
Published on शुक्रवार, 12/12/2008

वाचन संख्या 1344
प्रतिक्रिया 42

प्रतिक्रिया

तुम्हाला हेच चित्र अभिप्रेत आहे का? तुमच्या मतात तथ्य दिसतं.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मला लास्ट सपर हे चित्र हवे होते. पण मुद्दा मांडण्यासाठी वरील चित्रही चालू शकेल. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

(संपादकांना विनंती: माझा पहिला प्रतिसाद संपादीत करुन हा फोटो तिकडे डकवता येईल का?)

हा दुवा पहा. बाकी काही वर्षांपूर्वी अशीच चर्चा हिंदू देवदेवतांबद्दलही झाल्याचे आठवते. (रविवर्मांच्या चित्रांवरून) मत पहिल्या पर्यायाला दिले आहे.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी


In reply to by नंदन

दुव्याबद्दल धन्यवाद. संपूर्ण वाचला नाही अजून पण बराच रंजक दिसतो आहे. त्यातून पॉप्युलर मेकॅनिक्सवर असली चर्चा पाहून थोडी मौजही वाटली. मनुष्यप्राण्याची गंमत हीच की त्याला आपले आदर्श हे आपल्यापेक्षा वेगळे, उच्च असावेसे वाटतात (शिवाजी महाराज ५ फूट ४ इंच उंच होते पण बहुसंख्य चित्रात, चित्रपटात, नाटकात, ते होते त्यापेक्षा बरेच उंच दाखवले जातात). माया (किंवा इंका असू शकेल चुभुद्याघ्या) संस्कृतीत राजाच्या मुलाचे डोके लहानपणापासूनच घट्ट बांधून ठेवीत, जेणेकरून त्याचा चेहरा अगदीच लांबूडका दिसेल (सामान्यजनांपेक्षा वेगळा!). (स्वगत - महंमद पैगंबर फारच दूरदृष्टी होते असे वाटते!) Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

पॅलेस्टाईन आणि आसपासच्या प्रदेशातील लोक कसे दिसतात याबाबत काही माहिती नाही. भूप्रदेश आणि चेहरेपट्टी यांचा आपण लावत असलेला संबंध बरोबर वाटतो. होय येशू असा दिसत असावा = तुम्ही म्हणत आहात तसा की सोनेरी केसांचा? ते समजले नाही. -- लिखाळ.

कारण, आत्तापर्यंत आपण येशूची चित्रेच पाहिलेली असल्यामुळे, आपल्या डोळ्यासमोर येशू कुठल्यातरी एखाद्या चित्रातलाच असणार. समजा, आत्ता अदितीने डकवलेल्या चित्रात जसा येशू दिसतो, तो तसाच दिसत असावा - असे म्हणणे अतार्किक असू शकते आणि योग्यसुध्दा असू शकते. कुठल्या तर्काने/संदर्भाने आपण ठरविणार, कि येशू कसा दिसत असावा ?

In reply to by दत्ता काळे

आपण युरोपियन लोकांसारखे दिसता की चायनीज लोकांसारखे? कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

इतर (कृपया स्पष्टीकरण द्यावे)
काय फरक पडतो? (नथुराम आणि येशु.. दोघांच्याहि चित्राने) -(गोंधळलेला) ऋषिकेश

मधे एकदा अफ्रिकन अमेरिकन मन्थ च्या निमित्ताने एका विद्यापिठात लावलेली पोस्टर्स पाहीली होती त्यात येशू ख्रिस्तच काय पण गौतम बुद्धपण अफ्रिकन होता असे सांगितले होते (लालूला विचारले पाहीजे काय मत आहे ते :) ) . त्यामुळे दोघांचे चेहरे वेगळे दाखवल्याचे आठवते. दा विन्चीने देखील कुणाचा तरी संदर्भ घेतलेला असू शकतो असे वाटते.

येशू हा मूळचा आज जो प्रदेश सिरिया / पॅलेस्टाईन / ईस्राईल वगैरे आहे त्या प्रदेशातील. आजही तिथले लोक हे गोरे, उंच आणि धष्टपुष्ट असतात. सिरियन्स / लेबानीज हे रंगरूपाने खूपसे युरोपियनांच्या जवळ जाणारे असतात. गोरा वर्ण, सोनेरी केस, भरपूर उंची वगैरे. बरेच पॅलेस्टिनियन्स हे गोरे असले तरी त्यांच्या वर्णात थोडी वेगळी झाक असते. आणि केस बरेच वेळा काळे / कुरळे असतात. वरची दोन्ही चित्रं जरी युरोपियन प्रभावाखाली काढली गेली आहेत हे उघड आहे तरी येशू मूळात ह्या रूपाच्या बराच जवळपास जात असावा असे मानायला हरकत नसावी. पण इथिओपियामधे (जिथे ख्रिश्चॅनिटी २००० वर्षे जुनी आहे आणि संस्कृति पूर्णपणे ख्रिश्चनबहुल आहे) मात्र जीझस टिपिकल आफ्रिकन तोंडावळ्याचा असतो!!! शेवटी काय, देव जर का आपल्या सारखा वाटला नाही तर आपल्याला देवासारखे होता येत नाही. बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

शेवटी काय, देव जर का आपल्या सारखा वाटला नाही तर आपल्याला देवासारखे होता येत नाही. हे आवडले!

तो असा दिसत नसला आणी नेल्सन मंडेला सारखा दिसत असला तरी आपणास काहि फरक पडणार आहे का ? फादर ख्रिस्तोफर देशपांडे |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य

In reply to by वाहीदा

वाहीदा (बाई का बुवा?), देव निराकार असेल हो, पण येशू हा देवाचा प्रेषित होता, खुद्द देव नव्हे! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

देवत्व पावलेला होता ना... आणि वाहिदा म्हणतेय तेही खरंय... तो आला त्याचं काम करून निघून गेला बिचारा... बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

हो पण म्हणून तो कसा बरं दिसत असेल याचा अंदाज करु नये का? मधुबाला आणि माधुरी दीक्षित मधे कोण सुंदर दिसतं यावर चर्चा होऊ शकते तर डोक्याला चालना देणारी चर्चा व्हायला काय हरकत असावी? अवांतरः वाहिदाजींनी लिहिलेलं वाक्य त्यांची स्वाक्षरी असेल म्हणून मी पण दुर्लक्षित केलं होतं.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

सहमत. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

यमूतै, माधुरी-मधुबाला यांच्या सौंदर्यावर चर्चा करताना कुठलीच गोष्ट कल्पनाशक्तीवर सोडावी लागत नाही. हे चित्र पाहा आणि ते चित्र पाहा असा सरळ सरळ मामला आहे. इथे म्हणजे कवट्या शोधा, १०० संगणकीय आज्ञावली लिहा आणि एक चित्र तयार करा आणि त्यावर पुन्हा लोकांचे जोडे खा असा प्रकार आहे. शिवाय जे शेवटी तयार होईल ते बरोबरच असेल याची खात्री देणारी कुठलीच गोष्ट अस्तित्वात नाही. मग करायचे काय असली वांझोटे धंदे? २ हातवाला काय किंवा ४ हातवाला काय, देव कुठेतरी आहे (तसा सध्या एक देव अमेरिकेतही आहे म्हणा ;)) असा विश्वास असल्याशी कारण. कसें? --घाटावरचे (मठ्ठ) भट आम्ही मठ्ठ असल्याकारणाने आम्हांस मराठीखेरीज इतर भाषा समजत नाहीत. क्षमस्व.

In reply to by घाटावरचे भट

२ हातवाला काय किंवा ४ हातवाला काय, देव कुठेतरी आहे (तसा सध्या एक देव अमेरिकेतही आहे म्हणा Wink) असा विश्वास असल्याशी कारण. कसें? भटोबा का महामठ्ठोबा? (मि.भ. तुम्हास ह.घ्या सांगण्याची गरज नसावीच) ;-) येशू हा देव नव्हता, तो एका माणूस-बाईच्या(?) पोटी जन्माला आलेला माणूस होता(?). तेव्हा त्याचं रंग-रूप नक्की कसं होतं असा प्रश्न डोक्यांत किडे असल्यामुळे खाजेस्तव आला तर त्यात गैर काय? त्यामुळे येशूच्या रंगरूपाचा विचार करण्यासाठी देवाचं अस्तित्व मान्य करावंच असं का? बाकी कवट्या उकरणे, १०० ओळींची आज्ञावली लिहिणे (+ जोडे खाणे?) हे छंद असल्यामुळे आवडतं. शिवाय ते उत्तर बरोबर आलं तर पुढे करायला काही रहातच नाही. त्यामुळे ते काम उत्तम! एकदा केलं तरी पुन:पुन्हा करण्याचे पैसे मिळतात हो! ;-) (स्वानुभव) बायकांच्या फोटोंकडे बघण्याची आवड नसल्यामुळे ते आवडत नाही... शिंपल!

messenger चा अर्थ कळत नाहि वाटते तुम्हाला ?? संपादित : व्यक्तिगत अपमानकारक मजकूर.

In reply to by सुनील

हा कदाचित जुन्या अँग्लो-सॅक्सन डायलेक्ट्स मधील शब्द असावा...बघा ना, उच्चार करताना थोडासा ऍक्सेंट पण जाणवतोय...

In reply to by घाटावरचे भट

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by वाहीदा

अहो लिपीच कळत नाही तर वाचणार तरी काय? शिकवणी द्याल? (आज ख्रिसमसपूर्व वीकएन्ड मूड्मध्ये असलेला) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by वाहीदा

पार्टीच्या शुभेच्छा!! माझा मूड मात्र प्रतिसादागणिक अधिकाधिक चांगला होत होता! (आज पबमध्ये मजा येणार!!) Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by वाहीदा

वाहीदाजी (पाहा, बाई का बुवा हा प्रश्नच मिटवून टाकला), म्हराटीत लिहिलं तर आम्हा पामरांना कळावयास सोपे जाईल. संताप व्यक्त करायला मातृभाषा अधिक उपयोगी आणि योग्यपण, असे आमचे निरीक्षण आहे. कळावे (आपण लिहिलेले आम्हाला), भटोबा

In reply to by वाहीदा

बिपीन सर ... आमचा पण रामराम घ्यावा ... अरे काय लावलंय काय? नको तिथं नको त्या कारणावरून भांडणं .. ते पुरलं नाय म्हणून प्रतिसादांत हाय-बाय ? १. भट साहेब जेवण झालं का ? , परवा तुम्हाला चाट वर एक व्हिडीयो लिंक दिलेली, ज्यात मोबाईल्स "चिप लेव्हल" ला कसे रिपेर करावे असं दाखवलं होतं .. कसा होता ? २. सुनील साहेब ... आपल्याला चॉलकेट मधे "चिप" दिलं होतं ते कसं होतं ? ३. उर्वरित सर्व जणांना हाय बाय . ४. टार्‍या तुला ही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा - चिपाराम चिपटे (आम्ही ष्टोव्ह आणि सायकल पंप्चर चिप लेव्हलला जाऊन रिपेर करतो)

वाहीदा रहमान नावाची बाई शिनेमामंधी कामकरायची

देव आणि त्यांचे आकार्/तोण्डे..... हा सगळाच मला माणसाचा मठ्ठ प्रकार वाटतो..... उत्क्रान्तीच्या टप्प्यात माणूस हा शेवटी उत्क्रान्त झालेला प्राणी आहे.... म्हणजे सृष्टीच्या आरम्भीच्या काळात माणूसच नव्हता, भाषाही नव्हत्या ... मग त्या काळात असणार्‍या देवाचे स्वरूप काय होते ? त्याचे नाव काय असायचे ? मला हा वार्.वार भेडसावणारा प्रश्न आहे...... देव माणसा सारखाच दिसला पाहिजे हा आपलाच अट्टाहास ! त्यातूनच या सगळ्या प्रतिमा तयार झालेल्या आहेत.... कुठलाच धर्म याला अपवाद नाही...... आपण जर डायनासॉरसारखे दिसलो असतो, तर आपले देवही तसेच तयार झाले असते..... ए. आय. ( आर्टिफिसियल इन्टेलिजन्स ) पिक्चरमधला तो रोबो मुलगादेखील रोबोसाऱखीच दिसणारी देवी तयार करतो आणि तिची प्रार्थना करतो असे दाखवले आहे, आपले माणसांचे देव ( हाच तो येशु आणि त्याची मेरीमाता) तो नाकारतो ...... आणि दोन हजार वर्षापूर्वीचा येशु कसा दिसत होता /५००० वर्षपूर्वीचा राम कसा दिसत होता , हे आता आपण कसे सांगणार ?

In reply to by JAGOMOHANPYARE

अहो रोमन लिपीवाले जा.मो.प्या.,
  • येशू हा देव नव्हता, तो प्रेषित होता.
  • ही चर्चा थोडीफार डोक्याला काहीतरी खाद्य म्हणून सुरु केली असावी, आणि याच धर्तीवर "अजून पाच हजार वर्षांनी तेव्हाचा किंवा जुनाच देव/प्रेषित कसा दिसेल" अशीही चर्चा सुरु करता येईल.
  • आणि दोन-पाच हजार वर्षांपूर्वीचं काय घेऊन बसलात, इथे वैज्ञानिक पृथ्वीवरचा पहिला सजीव कसा दिसत असेल याचे अंदाज घेतात, माणसाच्या उत्क्रांतीच्या स्थितीमधली चित्र बनवतात!
बाकी देव तत्कालिन, एतद्देशीय माणसासारखा का असला पाहिजे ते वर बिपिनदाने सांगितलंच आहे. (देव/प्रेषित ही काही/बर्‍याचशा माणसाची मानसिक गरज असू शकते यावर बर्‍यापैकी विश्वास असणारी नास्तिक) अदिती

युरोपिअन आणि मध्य्-पूर्वेकडील लोकांच्या ठेवणीत असलेल्या फरकामुळे सुनील च्या मताशी सहमत. अवांतरः येशूचा म्रुत्यू भारतात झाला असण्याची शक्यता आहे अस सांगणार हे व्रूत्त

तुम्हि दिलेल्या दुव्यावर केलल विष्लेशण मला १००% पटल. तसच दोन एक वर्षांपुर्वि मेरि (येशु चि आई) हि गव्हाळ वर्णाचि, काळ्या डोळ्यांचि आणि काळ्या केसांचि बाई होति अस सी एन एन वर बघितल होत, ते सुध्दा तेन्व्हा पटल होत. त्या दुव्यावरच्या प्रतिक्रिया मात्र बर्‍याच मनोरंजक होत्या. 'पळसाचि तिन पाने' दिसल्या सारख वाट्ल. काहि वर्षांपुर्वि 'लोकसत्ता' मध्ये 'येशु चा मृत्यु काश्मिरात झाला' यासंबंधिचा एक लेख वाचला होता. हि मात्र निव्वळ एक शक्यता वाटते. एका रशियन लेखकाने (नाव आठवत नाहि) हि थिअरि सगळ्यात आधि मांडलि पण त्यासंबंधिचे पुरावे मात्र उपलब्ध नाहित.