✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मिपावर विडंबने वाढत आहेत

श
श्रीगुरुजी यांनी
गुरुवार, 09/03/2015 - 20:22  ·  लेख
लेख
आपल्या मिपावरील विडंबनांची संख्या बघुन मन भरून येते. मागच्या काही वर्षापासून आपल्या मिपावर वेगाने विडंबनांची संख्या वाढते आहे. मिपा सारख्या संस्थळावर जिथे चांगल्या लेखकांना मखरात सजवले जाते, तिथे अशा प्रकारची विडंबने बघुन मन अस्वस्थ होते. खरच आपण इतके पुढारलेले आहोत का की आज आपल्याला जेन्युइन लेखन दुरापास्त होत आहे. ज्यांनी मिपाला उत्तमोत्तम प्रतिसादांनी सजवले, आपला वेळ देउन मोठे केले तेच आज (असल्या विडंबनकारांमुळे) मिपापासुन दूर गेलेले पाहून मन दु:खी होते. सामान्य वाचक अशी आशा करतात की चांगले लेखक उत्तमोत्तम लेख देत राहतील. चांगल्या लेखकांना फक्त दोन डझन चांगल्या प्रतिसादांची अपेक्षा असते व वाचकांचे प्रेम हवे असते. प्रत्येक विडंबनकाराने हा विचार करावा की ज्यांनी मिपाच्या भल्यासाठी पुर्ण वेळ दिला त्यांच्यावर आपल्यामुळे मिपापासुन दूर जाण्याची वेळ येऊ नये. एवढे बोलुन मी माझा निबंध संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5144 वाचन

💬 प्रतिसाद (18)

प्रतिक्रिया

खिक्क!

दमामि
गुरुवार, 09/03/2015 - 20:27 नवीन
खिक्क!
  • Log in or register to post comments

मामोऑ- अरे दमाम्या मी पयला

जेपी
गुरुवार, 09/03/2015 - 20:41 नवीन
मामोऑ- अरे दमाम्या मी पयला संघटना कदीचीच बुडाली रे. असो अरे श्रीगुरुज्या बोलले असते पण.. जाऊदे इतकेच बोलते. का हि हं श्री..- मामोऑ.
  • Log in or register to post comments

हा हा हा.

माईसाहेब कुरसूंदीकर
गुरुवार, 09/03/2015 - 20:52 नवीन
परत वेगळा धागा काढू नकोस असा ह्यांचा आग्रह त्यामुळे- आपल्या मिपावरील भक्तांची संख्या बघुन मन भरून येते. मागच्या काही वर्षापासून आपल्या मिपावर वेगाने भक्तांची संख्या वाढते आहे. मिपा सारख्या संस्थळावर जिथे चांगल्या विरोधकांना मखरात सजवले जाते, तिथे असे भक्त पाहून बघुन मन अस्वस्थ होते. खरच आपण इतके भाजपाळलेले आहोत का की आज आपल्याला जेन्युइन विचार करणे दुरापास्त होत आहे. ज्यांनी मिपाला उत्तमोत्तम प्रतिसादांनी सजवले, आपला वेळ देउन मोठे केले तेच आज (असल्या भक्तांमुळे) मिपापासुन दूर गेलेले पाहून मन दु:खी होते. सामान्य वाचक अशी आशा करतात की चांगले विरोधक उत्तमोत्तम लेख देत राहतील. चांगल्या लेखकांना फक्त दोन डझन चांगल्या प्रतिसादांची अपेक्षा असते व वाचकांचे प्रेम हवे असते. प्रत्येक भक्ताने हा विचार करावा की ज्यांनी मिपाच्या भल्यासाठी पुर्ण वेळ दिला त्यांच्यावर आपल्यामुळे मिपापासुन दूर जाण्याची वेळ येऊ नये. एवढे बोलुन मी माझा निबंध संपवते.जय हिंद
  • Log in or register to post comments

+१००

कपिलमुनी
गुरुवार, 09/03/2015 - 23:22 नवीन
माईंचा षटकार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

1+

पगला गजोधर
Fri, 09/04/2015 - 08:30 नवीन
ठ्ठो, या वेळी माईंनी पदर खोचून,काष्टा खवून, बांगड्या कोपऱ्यापर्यंत मागे सारून, गगनभेदी फटका मारल्यामुळे चेंडू नागपुरात पोहोचला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

हे आवडले !!! कुठल्याही

कैलासवासी सोन्याबापु
Fri, 09/04/2015 - 10:49 नवीन
हे आवडले !!! कुठल्याही अतिरेकामुळे नुकसानच होणार मग ती मोदींची अंधभक्ति असो किंवा त्यांना अतिशय खालच्या पातळी वर जाऊन केलेला विरोध असो, धार्मिक टोकदार भावना असो वा सेक्युलर विचारअसो, अतिरेक वाईटच (अतिरेकी सरासार)बाप्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

बेक्कार हसतोय जबरदस्त...!!!

असंका
Fri, 09/04/2015 - 08:54 नवीन
बेक्कार हसतोय जबरदस्त...!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

>>> परत वेगळा धागा काढू नकोस

श्रीगुरुजी
Fri, 09/04/2015 - 15:07 नवीन
>>> परत वेगळा धागा काढू नकोस असा ह्यांचा आग्रह त्यामुळे- माईसाहेब, जबरी षटकार मारलात. चेंडू एकदम मैदानाबाहेर. परंतु षटकार मारला तुम्ही आणि धावा मात्र तुमच्या 'ह्यां'च्या म्हणजे नानांच्या नावावर जमा होतील की काय असं वाटतंय. तुम्ही नानांच्या पदराआड किती लपणार? कधीतरी बाहेर या. तुमच्या 'ह्यां'चे आजवर असंख्य आयडी झाले, त्यांनी असंख्य धागे काढले पण तुम्ही एकही धागा काढायची 'ह्यां'ची परवानगी नाही हे खूप खटकतंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

लिखाण आवडले. धन्यवाद.

द-बाहुबली
गुरुवार, 09/03/2015 - 21:31 नवीन
लिखाण आवडले. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

हे एकसारखेच लेखन वाटते आहे.

आस्तिक शिरोमणि
Fri, 09/04/2015 - 00:54 नवीन
हे एकसारखेच लेखन वाटते आहे.
  • Log in or register to post comments

पळून जाणारे विडंबनाला घाबरून

कंजूस
Fri, 09/04/2015 - 07:23 नवीन
पळून जाणारे विडंबनाला घाबरून पळून जात आहेत हे हे सिद्ध करा.
  • Log in or register to post comments

काकूस

नाखु
Fri, 09/04/2015 - 08:33 नवीन
इथे वरीजनल मालाचीच वानवा तिथे विडंबन काय पडणार कप्पाळ !~!!! लाट (कर) आल्यासारखे रतीब लेख येतायत आणि लोकं त्यात काठाकाठाने भिजतायत झालं इतकच काय ते ही "ज्योत" ही फडफडून जावू नये हीच अपेक्षा ! अभामिपाभरताडखोगीर्भरतीरद्दीसुमार्लेखन्हटाव्सासंसचालीत्लेखकाडवालिखाणजिरवा अभियान अंतर्गत मिपाकर चाचक पत्रेमधून साभार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

नुसती लांबी बघूनच खिदळत

असंका
Fri, 09/04/2015 - 08:55 नवीन
नुसती लांबी बघूनच खिदळत सुटलोय...वाचायची हिंमत होत नैये....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

अभामिपाभरताडखोगीर्भरतीरद्दीसु

अद्द्या
Fri, 09/04/2015 - 10:22 नवीन
अभामिपाभरताडखोगीर्भरतीरद्दीसुमार्लेखन्हटाव्सासंसचालीत्लेखकाडवालिखाणजिरवा जिभेला गाठ बसली वाचता वाचता =]]]
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

या लेखाचे विडंबन नाही आले

खटपट्या
Fri, 09/04/2015 - 10:44 नवीन
या लेखाचे विडंबन नाही आले म्हणजे मिळवली...
  • Log in or register to post comments

हे घ्या -

आनन्दा
Fri, 09/04/2015 - 11:36 नवीन
हे घ्या -
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

अरारारा! एवढ्या लवकर तर

खटपट्या
Fri, 09/04/2015 - 11:44 नवीन
अरारारा! एवढ्या लवकर तर हाटेलात ऑर्डर दीलेला चहा पण येत नाय वो. काय ती तत्परता ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

अडचण काय आहे ?

सामान्यनागरिक
Fri, 09/04/2015 - 12:31 नवीन
मला तर विडंबने आवडतात. आणि ती योग्य त्या खेळीमेंळीच्या स्पिरीट ने वाली तर आनंददायक असतात ।
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा