माणसाचं मन ही मोठी अजब आणि व्यामिश्र गोष्ट आहे. ते शरीरात नक्की कुठं असतं ह्यावर बराच उहापोह देशोदेशीच्या शास्त्रज्ञानी केलेला आहे परंतु ठोस असा निष्कर्ष निघालेला नाही. एवढं असूनही त्याचा प्रभाव माणसाच्या आयुष्यात जन्मापासून मरणापर्यंत कायम आणि प्रचंड असतो. मनासंदर्भात हजारो म्हणी विविध भाषेत अस्तित्वात आहेत. मराठीतसुद्धा "चोराच्या मनात चांदणं", "मन चिंती ते वैरी न चिंती", "मनात मांडे खाणे" आणि अशा अनेक म्हणी आहेत.
मनाची (म्हणजेच पर्यायाने अंतर्मनाची ) ताकद प्रचंड असते आणि ती एका व्यक्तीचं आयुष्य आमूलाग्र बदलू शकते पण हेच मन कमकुवत किंवा द्विधा अवस्थेत असेल तर एकही काम सुरळीत अथवा आत्मविश्वासाने पार पडत नाही . एखादी गोष्ट करू कि नको करू ह्या "ग्यानबा तुकाराम" पद्धतीमुळे हातातला मौल्यवान वेळ निघून जातो आणि शेवटी काहीच उरत नाही. अतिविचार करणे हे म्हटलं तर फायदेशीर किंवा म्हटलं तर विनाशक ! अंतर्मनाचा कौल बर्याचदा योग्य मार्ग दाखवतो पण त्याच्यावर कितपत विश्वास ठेवायचा ते मेंदू ठरवतो. ह्या दोघांच्या झटापटीत होणारा निर्णय अंतिम असतो पण तो झाला तरच… मनाला पटलेलं मेंदूला पटतंच असं नाही. त्यामुळे कधी असं करावं तर कधी तसं करावं असं वाटत राहतं आणि ह्यामुळे माणसाला दोन्ही बाजूने बोलायची सवय लागते. आपल्या नकळत आपण बऱ्याचदा विसंगत गोष्टी बोलून जातो पण त्या विसंगत आहेत हे आपल्याला जाणवत नाही. हळूहळू हीच सवय आपल्या वागण्यालाही लागते आणि मग इतर लोक आपल्याला दुतोंडी, डबल ढोलकी असली शेलकी विशेषणं चिकटवतात.
मग प्रश्न असा आहे की ही मनाची नैसर्गिक परिस्थिती आहे की स्प्लिट पर्स्नलिटि डीसऑर्डर किंवा स्किझोफ्रेनियाची सुरुवात ? ह्या दोन्ही प्रकारात नक्की काय होतं ? हा आजार आहे की मनाची अवस्था ? असा मनुष्य रोजच्या जगण्यातली सगळी कामे साधारण पद्धतीने करू शकतो का? विज्ञान ह्यावर काय म्हणतंय ?
जाता जाता… मिपाच्या डू आयडींना ह्याचा धोका कितपत आहे ????
वाचने
10735
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
मिपाच्या डू आयडींना ह्याचा धोका कितपत आहे ????
अख्ख्या लेखाचे सार शेवटच्या
असं वाटू शकतं....
In reply to अख्ख्या लेखाचे सार शेवटच्या by उगा काहितरीच
व्यवहारात ( नेहमीच यशस्वी
कार्यकारण संबंध समजला नाही !! / ?? आणि कौतुक
-तणावाखाली असलेल्या व्यक्तीची
कोणतीही व्यक्ती ही मुळात
संपूर्ण असहमत.
In reply to कोणतीही व्यक्ती ही मुळात by द-बाहुबली
इंटरेस्टिंग चर्चा ;)
थांबा जरा
व्हाईट लिली नाईट रायडर या नाटकात
In reply to थांबा जरा by पैसा
जिज्ञासू व्यक्तींसाठी एक सोपे
In reply to थांबा जरा by पैसा
सहमत!
In reply to थांबा जरा by पैसा
काहीही हं पै !!
In reply to थांबा जरा by पैसा
लहानपणी ज्यांचे फाजिल लाड
स्प्लिट पर्सनालिटी होते का
अत्यंत जड मनाने हे म्हणावं लागतंय....
स्प्लिट पर्सनालिटी बद्दल