मिपावर निलंबने वाढत आहेत
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
आपल्या मिपावरील निलंबनांची संख्या बघुन मन भरून येते. मागच्या काही वर्षापासून आपल्या मिपावर वेगाने निलंबनांची संख्या वाढते आहे. मिपा सारख्या संस्थळावर जिथे चांगल्या चांगल्या प्रतिसादकर्त्यांना मखरात सजवले जाते, तिथे अशा प्रकारची निलंबने बघुन मन अस्वस्थ होते. खरच आपण इतके असहिष्णु आहोत का की आज आपल्याला चांगले विरोधी लेखन दुरापास्त होत आहे.
ज्यांनी मिपाचे उत्तमोत्तम धागे हायजॅक केले, आपला वेळ देउन पंचशतकी केले तेच आज (असल्या निलंबनकारांमुळे) मिपापासुन दूर गेलेले पाहून मन दु:खी होते. सामान्य वाचक अशी आशा करतात की चांगले धागा-अपहरणकर्ते उत्तमोत्तम काड्या टाकत राहतील. चांगल्या धागाअपहरणकर्त्यांना फक्त दोन शतक प्रतिसादांची अपेक्षा असते व साहेबांचे प्रेम हवे असते.
प्रत्येक निलंबनकाराने हा विचार करावा की ज्यांनी मिपाच्या भल्यासाठी पुर्ण वेळ दिला त्यांच्यावर आपल्यामुळे मिपापासुन दूर जाण्याची वेळ येऊ नये. आणि प्रत्येक धागाअपहरणकर्त्याने देखील मनाशी ठरवावे की माझे निलंबन झाले म्हणून काय झाले, डु-आयडीने पुनरागमन पुनर्गमनाय करीनच करीन.
एवढे बोलुन मी माझा निबंध संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र.
प्रतिक्रिया
ज्यांनी मिपाचे उत्तमोत्तम
मस्तच हो आनंदाभाऊ! अगदी
हॅ हॅ हॅ
हायला मनात आले आणि धागा आला.
आजचा
चांगल्या धागाअपहरणकर्त्यांना
मस्त लिहिलंय!
धन्यवाद. तुम्हीच आम्ची
टकाटक! एकदम ब्येष्ट!!