बेरोजगार(कथा)
लेखनविषय (Tags)
अज्या तणतणतच रुमवर आला. रागारागाने शुज फेकुन देत बोलु लागला...
"नाय रे योग्या, नाय होणार आपलं पुण्यात काही! च्यायला या पण कंपनीत तिसर्या राउंडनंतर बाहेर!"
योग्या निवांत मोबाईलवर गेम खेळत होता. त्याने लक्षच दिले नाही. "ए भाड्या तुला बोलतोय!" योग्याने मोबाईल खाली ठेवला अन बोलला - "हं बोल काय झालं?" "काय व्हायचय ? तिसर्या राउंड्मध्ये बाहेर! च्यायला यांच्या , दिवसभर काही खाल्ल नव्हतं , सकाळी नऊ ला बोलवलं होतं, अकरा वाजता अॅप्टी घेतली, दोन वाजेपर्यंत बसवुन घेतलं, नंतर अजुन एक टेक्निकल, ती पण केली क्रॅक, चार वाजता जीडी घेतला, बारा मधुन दोनच घेतले.
"सोडरे!" योग्या बोलला. "एवढी काही खास नव्हती कंपनी." "नाय रे लागलो असतो तर जमलं असतं ना राव! आठ हजार तर आठ हजार, केलं असतं वर्षभर, च्यायला तिन महिने होत आले रिझल्ट लागुन, काय फायदा राव डिश्टींशनचा, घरी पैसे पण मागावेसे वाटत नाहियेत."
अज्या जवळजवळ रड्कुंडीला आला होता. "ए गपे!" काय तुलाच एकट्याला नाहिए डिश्टींशन, तुझ्यापेक्षा जास्तच मार्क्स आहेत मला, तरी घासतोय ना सहा हजारावर ?" अज्या थोडा शांत झाला. बोलला- "काय फायदा राव पिजी करुन? बॅकऑफिसवाले येउ देत नाहीत, अन आयटीवाले अनुभव मागत आहेत." "जाउ देरे! लागेल आज ना उद्या, च्यायला येड्या येड्या पोराला लागली तुला नाही लागणार का ? चल जेवण करुन येऊ"
अजय आणि योगेश दोघे फर्स्ट इयर पासुन रुममेट्स. अगदी जिवाला जिव देणारे मित्र. फायनलची परीक्षा झाल्यापासुन दोघांचाही दिनक्रम झाला होता. सकाळी उठणे, फॉर्मल घालणे आणि ओपनींग दिसेल तिथे जाणे. सुरुवातीला मजा वाटत होती. पण नंतर नंतर चिडचिड वाढत होती. वर्गातले मित्र हळुहळु लागर होते, पण हुशार असुनही अजय कुठे लागत नव्हता.
जेवण करुन थोडं फिरून रुमवर आल्यावर नेहमीप्रमाणे अजयने मेल चेक केले. व बोलु लागला- " उद्या कुठं विशेष ओपनींग नाही दिसत राव! त्या दिवशी त्या बिपीओतुन फोन आला होता, जाउन पाहु कारे?" " पहा जाऊन तर ये , करा वाटली तर कर नाही तर नको करू." योग्या बोलला. "ठिक आहे जाउन तर येतो" अज्या झोपता झोपता बोलला.
दुसर्या दिवशी अजय सकाळीच गेला त्या बिपीओत. पहिला राउंड त्याच्या अपेक्षेपेक्षा सोपाच निघाला, म्हणुन तो क्रॅक झाल्याचं त्याला विशेष काही वाटलंच नाही. दुसर्या राऊंडला इंटरव्ह्यु संपल्यावर मॅनेजर म्हणाला - "काँग्रॅजुलेशन्स अजय , यु आर सिलेक्टेड, युवर सिटीसी वुड बी १.४४ लॅक पर अॅनम!"
पुणे विद्यापिठातुन अभियांत्रीकीचे पद्व्युत्तर शिक्षण घेतलेल्या अजयला हसावे का रडावे तेच कळेना !
प्रतिक्रिया
धागा वाचुन मलाही हसावे का
ऑ! थोड्या वेळापूर्वी तर इथं
छु: मंतर :)
हे असं कसंकाय झालं याचा तपास
छान लिहिलय.
अशी परिस्थिती आहे खरी... पण
इतकाच पेशेंस आहे तर ही पोरे
बापुसाहेब mpsc,upsc सोपी
एम्पीयेस्स्शी आन युपीएश्शी