पावसाळा सुरु झाला की, गरमागरम कांदाभजी,भाजलेले कणीस, मसाल्याचा चहा,कॉफी यांचे वास दरवळू लागतात. याच्यासोबतच अट्टल मासेखाऊंच्या मनात मात्र वेगळेच वास दरवळू लागतात.
त्यात एक महत्वाचा म्हणजे सुक्या माशांच्या कालवणाचा वास.सोडे-बटाटे,बोंबील –बटाटे,तव्यावरची काड,सुका कोलिम (जवळा)बांगड्याची किस्मोर(कोशिम्बिर), सुकवलेली तिसऱ्याची माष्टं, पावसाळा आला की,कांदाभजी ,कणीस,चहासोबत अट्टल मासेखाऊंच्या मनात सुक्या बाजाराच्या पदार्थांचे खारवलेले सुरमई,,दाढा(रावस),पापलेट,हलवा,वाकट्या,खाड्यायांची कालवणं आणि कांद्यावर परतलेली चटणी या गोष्टी अट्टल मासेखाऊंच्या जिवात, पावसाळा संपून ओले मासे मिळू लागेपर्यंतपर्यंत,धुगधुगी राखून ठेवतात.
ओल्या व सुक्या खोबऱ्याच्या;कच्च्या आणि भाजलेल्या अशा दोन्ही पद्धतीच्या वाटणात हे पदार्थ करता येतात.तव्यावर किंवा कढईत तर नुसत्या कांद्यावर,मिरचीपूड आणि लसूण ठेचून घालून,परतून करता येतात. हवी असेल तर कोथिंम्बीर,नसली तरी बिघडत नाहीच.बोंबील,सोडे, काड आणि कोलिम यांची भाजलेल्या वाटणात (तिसऱ्याचाच्या आमटीमध्ये याची कृती सापडेल.) तर बटाटेही आगळ्याच चवीचे लागतात.
इथे मी आता तुम्हाला ही पाककृती सांगणार आहे ती माझ्या सासूबाईंची आहे,त्यांचे माहेर डहाणू.त्याच्या माहेरची ही पाककृती.मी सासरी येईपर्यंत कच्च्या आणि त्याही सुक्या खोबऱ्याच्या वाटणातले सुके मासे कधी खाल्ले नव्हते.या प्रकारच्या वाटणात कोणताही मासा घालू शकता. ही चव मला तर आवडलीच पण आता माझ्या माहेरीही आवडू लागली आहे.
चला, आठवणीनीच तोंडाला पाणी सुटलेय. पटापट साहित्य गोळा करून कृतीकडेच जाऊ.
साहित्य:-
१. सहा/सात सुके बोंबील.
२. वाटीभर सुके खोबरे.
३ .दोन मिरच्या
४. बारा ते पंधरा लसूणपाकळ्या.
५. पेरभर आले.
६. अर्धी वाटी कोथिंबीर.
७. मीठ.
८. पाव वाटी,तेल.
९.. अर्धा चहाचा चमचा हळदपूड.
१०. एक चहाचा चमचा संडे मसाला.
११.. १५/२० मेथीदाणे.
१२..तीन/चार कोकमे.
कृती:-
१. बोंबील साफ करून दोन तुकडे करून,तव्यावर थोडे गरम करून अर्धा तास कोमट पाण्यातभिजत घालावेत.
२. दो/तीन लसूणपाकळ्या वगळून खोबरे,मिरची,कोथिंबीर,आले यांचे वाटण करून घ्यावे.
३. बोंबील पाण्यातून निथळून घ्यावेत.निथळत घालताना बोंबील पाण्यातून वरच्य्यावर उचलावेत व पुन्हा एकदा वाहत्या पाण्याखाली धरावेत.(सुक्या बोंबलांना सहसा रेती असत नाही.पण असलीच तर ती तळाशी बसलेली असते.)
४. कढईत तेल गरमगरम करून त्यात मेथी दाणे आणि ठेचलेल्या लसूणपाकळ्या घालून फोडणी करावी.
५. त्यात बोंबील परतून घ्यावेत.
६. त्यावर वाटण घालून परतावे.हळदपूड आणि संडे मसाला घालून परतावे.
८. चार वाट्या गरम पाणी घालावे.
९. मीठ,कोकमे घालावीत.
१०. उकळी आली की उतरावे.
कोसळणारा पाऊस आणि वाफाळणारा भात यांच्यासोबत हाणावे.
वाचने
11979
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्तच,
मस्त! ताजी मासळी नसली की ह्या
मी कधीच ट्राय केले नाही
वा मस्तच आहे हि पण पद्धत.
शतशः धन्यवाद या पा कृ बद्दल. आता बांगड्याची किस्मोर(कोशिम्बिर)
वाचून गेले!
मीपण
In reply to वाचून गेले! by अजया
सुंदर रेसिपी! करुन बघितलीच
धागा वाचून अजिबात जळजळ झाली नाही...
हाय हाय !!
tai
वा काय मस्त दिसतय. असे फोटो
एकदा ट्राय केलं होतं बोंबील!!
या अल्ला!
क्या बात है!
सुक्या बोंबलाचे कालवण.
सगळ्यांचे आभार.
ताई ताई वाह वाह.. क्या बात है