नमस्कार मंडळी,
मी मराठीत थोडेफार लेखन व थोडेफार संपादन-संकलन करीत आहे - दोन्ही हौशी पध्दतीचे. संपूर्ण शालेय शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले असले तरी मराठी वाचनाची प्रचंड व दांडगी आवड असल्यामुळे एकंदरीत शुध्दलेखनाचा तेवढा त्रास नाही आहे. मराठी शुध्दलेखनावर बर्यापैकी नियंत्रण आहे, मात्र काही विशिष्ट शब्दांबाबतीत नक्की काय बरोबर याबद्दल (की ह्याबद्दल?) प्रश्न पडतो. उदाहरणार्थ ...
'या' बरोबर की 'ह्या'? (संदर्भ : 'यांना पारितोषिक मिळाले' की 'ह्यांना पारितोषिक मिळाले'? किंवा 'या डोळ्यांची दोन पाखरे' की 'ह्या डोळ्यांची दोन पाखरे' बरोबर?)) थोडक्यात, 'या / यांना / यांच्याकडून' बरोबर की 'ह्या / ह्यांना / ह्यांच्याकडून' बरोबर?
'की' बरोबर की/कि 'कि'? (संदर्भ : 'उजवे की डावे' बरोबर की/कि 'उजवे कि डावे' बरोबर?)
'लिहिणे' बरोबर की 'लिहीणे'? 'लिहिन' बरोबर की 'लिहीन'? 'लिहिताना' की 'लिहिताना'?
'पहाणे / पाणी वहाणे ('flow' या/ह्या अर्थाने / 'carry' या/ह्या अर्थाने नाही) / घरी रहाणे' बरोबर की 'पाहणे / पाणी वाहणे / घरी राहणे'?
शुध्दलेखनाला सरळ फाट्यावर मारण्याचा पर्याय स्वीकारता येत नाही, कारण व्यक्तिशः मला भाषेच्या शुध्दीबद्दल आत्मीयता आहे तेव्हा कोठे (की कुठे) चुकत असल्यास सुधारण्याची इच्छा आहे.
वरील काही उदाहरणात दोन्ही पर्याय बरोबर असल्यास कोणता पर्याय आधुनिक/साठोत्तरी मराठीत वापरला जातो हेही सांगितल्यास बरे.
- दिपोटी
वाचने
5378
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
माझ्या मते:
हा दुवा बघावा
तुमची शुद्धलेखनाची तळमळ आवडली
इथे मिळेल
In reply to तुमची शुद्धलेखनाची तळमळ आवडली by कंजूस
शुद्धलेखन
धन्यवाद! तरीही काही मुद्दे ...
In reply to शुद्धलेखन by सुधांशुनूलकर
स्पष्टीकरण
In reply to धन्यवाद! तरीही काही मुद्दे ... by दिपोटी
'अल्पसंख्याक'
In reply to स्पष्टीकरण by सुधांशुनूलकर
परत एकदा धन्यवाद!
In reply to स्पष्टीकरण by सुधांशुनूलकर
शुद्धीकरण ...
In reply to परत एकदा धन्यवाद! by दिपोटी
सुधांशु जी
In reply to शुद्धलेखन by सुधांशुनूलकर
सर्वच जण असं लिहितात.
In reply to सुधांशु जी by बाबा योगिराज
वर प्रतिसाद दिलेल्या सर्वांना धन्यवाद!
नूलकर काकांचे सर्वच प्रतिसाद
+१
In reply to नूलकर काकांचे सर्वच प्रतिसाद by प्रचेतस
धन्यवाद @सुधांशुनूलकर
@ सुधांशुनूलकर
'हे' वरून 'ह्यांचे' हा शब्द
एकदा ठरवा...
आमच्या मालवणात बाकी "ह्यां
In reply to एकदा ठरवा... by अत्रुप्त आत्मा