देव आणि वेदना (शरण तुला भगवंता वरुन काही शंका)
आज ही कथा वाचली. अगदी छान लिहिली आहे लेखकानं. परंतु खालच्या ओळी अजूनच अस्वस्थ करुन गेल्या.
तोः आता परत यायचं नाही बरं का इथे. या सगळ्या दुःखांचा वेदनेचा शेवट झालाय. मी तुला माझ्यापासून दूर कुठेच जाऊ देणार नाही आता.इथे तो म्हणजे कोणी माणूस नसून देव तिला परलोकात घेऊन जायला आलाय असा संदर्भ आहे. कथाविषय म्हणून ही गोष्ट सोडून दिली तरी ही एक प्रश्न इथे येतो तो म्हणजे, आपण इथे देव या संकल्पनेतला विरोधाभास का नाही पहात.. का परलोक वगैरे गोष्टी इथे मांडल्या जातात. ही विधवा स्त्री आयुष्यभर दु:खं सहन करत बसली. तिच्या कुटुंबापासून दूर भीक मागत बसलीय आणि शेवटी तिला न्यायला देव आलाय. म्हणजे तिच्या वाईट दिवसात तो कोठे होता? आता तो तिला त्याच्यापासून कुठे जाऊ देणार नाहीय पण मग आजवर कोणी रोखलं होतं त्याला. गेल्या जन्माचे भोग, पाप-पुण्याचे हिशेब या सर्व तकलादू सबबी आहेत असं वाटतं. देवावर विश्वास असण्या/नसण्यापेक्षा आपली ही त्याच्याआडून इतर गोष्टींसाठीची भलामण पटत नाही. आणि कर्म-फल इतकाच जन्माचा अर्थ असेल तर मग देवळात कशाला जायचं त्याच्या दर्शनासाठी तरी ? तो काय एक्ष्ट्रा बोनस देतो काय पुण्याचा ? मग देवळाची दुकानदारी केलेल्यांना काय देतो ? पुण्य + संपत्ती ? एक तर जीवनाबद्दलचा हा पॅसिव्ह निराशावादी दृष्टीकोन, देवाच्या नावावर चालणारा हा बाजार अन चुकीच्या कल्पनांचे समर्थन खटकतं. या कथेच्या संदर्भात तरी समाजाला, देवाला (असेल तर) माफ करावंसं वाटत नाही. ======= खरं तर या विषयावर आधीही बर्यापैकी इथे तिथे चर्चा झालेली असेल परंतु तरीही विषय मांडावासा वाटतोय म्हणून लिहितोय.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
. सहमत
तुम्ही सगळीकडे ज्या भाषेत
चर्चा ??????
तुमच्याशी बिनशर्त सहमत.
इतके दिवस कुठे होता बे सच्चया
सगा मोड ऑन - देव हा मनाचा खेळ
:)
प्यारे भाऊ, इतकं वैतागायला
सच्चिदानंद चा नेमका अर्थ काय
सच्चिदानंद म्हणजे सत, चित आणि
सच्चिदानंद चा नेमका अर्थ काय
अग्नोस्तिक म्हणजे काय ?
तुम्ही तर राहूच द्या दरेकर.
माई मोड ऑन
मी आमच्या ' ह्या'ंच्यामध्येच
तुम्हला कथेवर चर्चा करायची
गेल्या जन्माचे भोग, पाप
या जुन्या धाग्यावरचे बहुतेक