मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

लहानपणीच्या गमती जमती

तुडतुडी · · मिपा कलादालन
आमचं गाव सातारा तालुक्यातलं . दर वर्षी उन्हाळी सुट्टीत गावाकडे जायचा नेम . हा किस्सा साधारण मी दुसरीत असताना घडलेला . दुसरीची परीक्षा संपल्यावर आम्ही (म्हणजे आमचं कुटुंब , चुलत भावाचं कुटुंब ) गावाकडे गेलो . गावाकडे मोठ्या काकाचं कुटुंब , आजी आजोबा असतात . आम्हा लहान मुलांना म्हशींना रानात चरायला घेवून जायची फार हौस . पण मोठी माणसं असलं काही करू द्यायची नाहीत . पण १ दिवस मला आणि माझ्या चुलत भावाला मोठ्या (गावाकडच्या ) भावाबरोबर रानात पाठवलं .मोठा भाऊ म्हशींना चरायला सोडून कैतरी गोष्टीचं पुस्तक वाचत बसला . तो त्यावेळी यत्ता चौथीत होता. इकडे मी आणि माझा शहरी चुलत भाऊ म्हशींच्या मागे गेलो . आम्हाला काय माहित त्यांना शांतपणे चरून द्यावं . आम्ही आपलं हाईक हाईक करत त्यांच्या मागे चालू लागलो . हातातल्या काठीने त्यांना पुढे जाण्यासाठी ढकलू लागलो .कदाचित त्याच वैतागानं एक म्हैस उधळली आणि पळू लागली . आम्ही दोघं तिच्या मागे .तिच्या मागे पळता पळता कुठे गेलो काही कळलंच नाही . आम्हाला काही गावातले रस्ते माहित नवते . मग खूप घाबरलो . त्यात ती म्हैस काही ऐकत नव्हती . मधेच शिंगं उगारून अंगावर यायची . मग दोघांनी भोकाड पसरलं . तिथून जाणार्या एका भल्या माणसाने ते बघितलं . २ च पोरं ह्या रानात कशापायी रडत बसलीत म्हणून चौकशी केली . मग त्याने आम्हाला घरी आणून सोडलं (अर्थातच म्हशीसकट). इकडं काका काकू आम्हाला शोधत बसले होते . इतका वेळ झाला पोरं आली नाहीत म्हणून . बिचार्या मोठ्या भावाला पण बोलणी खावी लागली . मग आल्यावर आम्हा दोघांना आजीचे फटके पडले . मित्रांनो / मैत्रिणींनो तुमच्या पण लहानपणी तुम्ही असे उद्योग केले असतीलच . (ज्याने नसतील केले तो / ती कधी लहानच नव्हते). मग येवू द्या कि तुमचे पण किस्से .

वाचने 3150 वाचनखूण प्रतिक्रिया 13

पैसा Fri, 08/28/2015 - 15:07
लै भारी किस्सा! धन्याचा म्हशीचा किस्सा पण आठवला.

प्यारे१ Fri, 08/28/2015 - 16:59
तुडतुडे, सातारा तालुका म्हणजे लिम्ब खिंड का नागठाणे का अपशिंगे मिल्ट्री?

भिंगरी Sat, 08/29/2015 - 19:28
मी लहान असताना गावी गेल्यावर नदीवरून कळशी कळशीने पाणी आणायचे. (हंडा डोक्यावर घेतला की मान डुगडुगत असे.)एकदा हिम्मत करून जरा बर्‍यापैकी मोठा हंडा घेऊन डुगडुगत येत होते.समोरून येणार्‍या बायका मला हसत होत्या.मागून येणार्‍या मला सांभाळून जाण्यासाठी 'ए पोरी, ए पोरी' असा हाकारा देत होत्या.मध्येच हा आवाज वाढला. आणि मला काही कळायच्या आत डोक्यावरचा हंडा खाली आणि मी जमिनीवर पडलेली.म्हैस मला ओलांडून पुढे गेल्यावर मला कळले की मला म्हशीने तिच्या रस्त्यात मी आडवी आल्याने हळूच ढुशी दिली होती.

तुडतुडी Mon, 08/31/2015 - 13:04
व्हय व्हय प्याऱ्या. अगदी बरोबर . म्हशीने म्हशीला ढुशी देणे हा तर फारच विनोदी प्रकार.>>> हा हा हा . १ नंबर . आयला पण एकंच किस्सा ? लहानपणी 'नसते उद्योग ' कुणी केले नाहीत का ?