चित्रकृती
लेखनप्रकार
{खुला"सा! :- (माझी १४ वर्षानंतर सुरु झालेली ही चित्र[कला] अजुन अत्यंत प्राथमिक अवस्थेत आहे. फक्त एक आयड्या लोकांपर्यंत पोहोचवावी..एव्हढ्याच हेतूने हे सादर करत आहे.. :) त्यामुळे चित्राकडे दुर्लक्ष करावे. __/\__ ) }
काय मि.पा.करांनो??? शिर्षक वाचून एकंदर अंदाज आला नसेल ना? किंवा आलाच असेल,तर तो खालिल चित्र-कृती पाहिल्यावर चुकेल! ( कारण ही कोणती विशिष्ट चित्रकृती नसून्,फक्त तेलताटावर चित्र काढण्याची-कृती आहे! ;) ) काय आहे,की चित्रकला हा माझा अवडता विषय.पण प्रसंगचित्र आणि व्यंगचित्र याच्या बाहेर मी फारसा कधिही गेलेलो नाही. (शालेय स्पर्धांमधे वरील दोन्ही विषयात दोनदा ३रा, आणि तिनदा उत्ते-जनार्थ ;) क्रमांक मिळवला आहे मी! ) आणि, ९२ ला दहावी नंतर माझा वेदपाठशाळा..नावाच्या अ'भयारण्यात प्रवेश झाल्यावर पुढे ६ वर्ष ,माझा या सगळ्या (माझ्या ;) ) मूळ जगाशी संबंध तुटलेलाच होता. त्यामुळे ही कला तशी कोपर्यातच पडून होती. पुढेही हे भटजीगिरीचे काम करायल्या लागल्या नंतर वास्तुशांतीचे वेळी दरवाज्यावर कुंकवानी शुभ्/लाभ/स्वस्तिक्/ओंकार या पलिकडे उडी मारायला मिळालेली नव्हती! (हां...पण दरवाज्यावरचा ओंकारातला गंपतीबाप्पा मात्र बेश्ट काढायचो हां मी! )
अश्यातच पहिली ३/४ शिकाऊ वर्ष गेली,आणि मग ही सगळी कला फुलांच्या रांगोळ्यांमधून डोकं वर काढायला लागली. यामुळे मात्र माझा एक फायदा झाला .तो असा,की ..माझ्याकडे,बरेचसे कलाआसक्त यजमान वाढले..(किंवा आले त्यांच्यातली आसक्त-कला वाढली! ;) ) त्यामुळे, अश्या अनेक प्रकारच्या गोष्टी ..या लोकांकडे पहायला मिळू लागल्या. अजुनंही मिळत आहेत. एकदा एका गुज्जु क्लायंट कडे एका महिलेनी आरतीचं ताट सजवून आणलं. मी पहिल्यांदा ते पहातच राहिलो. कारण आतली २ कलात्मक निरांजनं मला नविन नव्हती पण त्याखाली वेलव्हेट्चा नाजुक हात लावावा,असं काहितरी दिसत होतं. मी आरती झाल्यावर त्यात सहज हात लावला ,तर बोट चटकन पुढे घसरलं..आणि ते वेलव्हेट् पुसलं गेलं . मला काहि क्षण काहि कळलं नाही. नंतर मात्र माझा प्रश्नार्थक चेहेरा पाहून ,सदर महिलेनी ते ताट बाजुला ठेवलं आणि मला...
महिला:- ओ पंडित जी.. ये दोखो
मी:- क्या जी?
महिला:- ये थाली को ऐसे तेल लगाके उसपर ये कुंकूम ऐसा डाल के... ( वगैरे वगैरे)
असं करून मला हे पहिलं काम शिकवलं .. मी ही लगेच त्यावर फुलाच्या डेखानी भला मोठा ओंकार काढून त्यांना गुरुदक्षिणा दिली.. आणि तेंव्हापासून मला मूड आला आणि हतात वेळ असला तर आमच्या कामात मी असली काहितरी चित्र (वि)चित्र पद्धतीनी जमतील तशी काढून माझी ही,मागे पडलेली चित्रकलेची हौस भागवून घेतो...
(हुश्श्श्श्श्श्श्श्श्!!!!!!!!!!! झाली एकदाची ती प्रस्ताव'ना! ;) ) आता मूळ गोष्टीकडे वळू या... तर आपण ही छोटीशी चित्रकृती टप्प्या ट्प्प्यानी पाहू...
१) हे साहित्य... एक ताट्,तेल,फुल,काडी,हळद/कुंकू (किंवा आपण तसे इतर रंगंही घेऊ शकतो.फक्त ते तेलावर-बसणारे हवे.तेलात--जाऊन बसणारे नको! ;))
२) ताटात २ थेंब गोडेतेल टाकून/फुलानी नीट पसरविणे.

३) आता ,ताटाच्या साइडपट्टीवर हळद पेरुन घ्यायची.पण जास्त मधे अजिबात पडू द्यायची नाही.कारण मग परत ती हळद पुसा..तिथे तेलानी पॅचअप करा..अश्या नसत्या कटकटी होऊन बसतात.
४)मग कणकेला चाळण मारल्यासारखं,ताट हलकं हलकं हलवायचं. आणि नंतर एकदम पलटी मारून खाली(घेतलेल्या) पेपरावर हलकेच अपटायचं.म्हणजे,एक्स्ट्रो लागलेली हळद -पडते.
५) आता..हळद-कृती प्रमाणेच ..मधल्या मोकळ्या ग्राऊंडवर कुंकू-लावणी करायची.
६) मग हळद/कुंकवाच्या मधून बोट मारून...
घेतलं..
की ही अशी तयार होते..ती आपली चित्रखरडपाटी!
७) आणि मग काय.. ? जसा आपला हात तसा सापडेल जगन्नाथ.. करायची मग खेळायला सुरवात
८) "आता ह्याचं करायचं काय हो मग???" सांगतो ना..! एकतर त्यात निरांजनं ठेऊन आरतीसाठी वापरा,अथवा अगदी ओवाळणीचं ताट म्हणूनही वापरा... किंवा मग आंम्ही करतो तसलं काहि तरी करा.
"काय करता हो तुम्ही?" :- पहा खाली...
(लघुरुद्र असल्यामुळे शंकराच्या फोटो ऐवजी पुजे मागे ठेवणे )
९)आरती करताना प्रसन्नतेत भर पडायला हे ही एक..उपयोगी!
१०) निसर्गही का नाही बरं प्रसन्नतेत सामिल होणार मग? :)
००००००००००००००००००००००००००००========================००००००००००००००००००००००००००००००
म्हणा बरं मग आता....

२) ताटात २ थेंब गोडेतेल टाकून/फुलानी नीट पसरविणे.
४)मग कणकेला चाळण मारल्यासारखं,ताट हलकं हलकं हलवायचं. आणि नंतर एकदम पलटी मारून खाली(घेतलेल्या) पेपरावर हलकेच अपटायचं.म्हणजे,एक्स्ट्रो लागलेली हळद -पडते.
५) आता..हळद-कृती प्रमाणेच ..मधल्या मोकळ्या ग्राऊंडवर कुंकू-लावणी करायची.
८) "आता ह्याचं करायचं काय हो मग???" सांगतो ना..! एकतर त्यात निरांजनं ठेऊन आरतीसाठी वापरा,अथवा अगदी ओवाळणीचं ताट म्हणूनही वापरा... किंवा मग आंम्ही करतो तसलं काहि तरी करा.
"काय करता हो तुम्ही?" :- पहा खाली...
(लघुरुद्र असल्यामुळे शंकराच्या फोटो ऐवजी पुजे मागे ठेवणे )
९)आरती करताना प्रसन्नतेत भर पडायला हे ही एक..उपयोगी!
१०) निसर्गही का नाही बरं प्रसन्नतेत सामिल होणार मग? :)
हरं हरं महादेव!!!!!!!!!!!!!!!!

वाचने
19060
वाचनखूण
प्रतिक्रिया
67
एकच नंबर हो गुरुजी!
क्या बात है आत्मूस..!!!!!
जबरी!
In reply to जबरी! by आदूबाळ
मस्त मस्त मस्त !
बुवा.....
कैच्या कै जबराट कलाक्रुती !!
In reply to कैच्या कै जबराट कलाक्रुती !! by खटपट्या
करून पहाणे.
In reply to करून पहाणे. by अत्रुप्त आत्मा
ओके
नेहमी सारखेच आकर्षक आणि सुंदर
शेवटचे मस्त ..
मस्त...
साधी पण सुंदर
+१
मस्त!
फारच कलात्मक!
चित्रकलेचा फंडा ब्येश्टच...
सुंदर
माणुसआत्मा म्हणजे बुवा :) मी आता "बुवा आणि वल्ली" नावाचे व्यक्तीचित्रण लिहायला घेणार आहे :DIn reply to सुंदर by प्रसाद गोडबोले
भाग दोन चे शीर्षक..
In reply to भाग दोन चे शीर्षक.. by नाखु
"बुवा का वल्ली?
In reply to "बुवा का वल्ली? by सूड
हुच्च कोटी लै भारी
In reply to "बुवा का वल्ली? by सूड
मराठी आणि..
स्वगतः हिंदीची प्रस्तावना सूड्पंताना लिहायला देऊ यात का म्हणजे पुस्तकाचे "चिरफाड" समीक्षण लिहिणार नाहीIn reply to "बुवा का वल्ली? by सूड
ठ्ठो =))
In reply to भाग दोन चे शीर्षक.. by नाखु
"का बुवा वल्ली" असे पण ल्ह्या
मस्त
छान
आवडल्या
गेलं
आहे.
तुमच्या
अंगात
अजुन किती
कला आहेत
हो गुर्जी?
लै भारी ...
छानच... चला यावर एखाद्द फोटु
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बॅक मारता है,करंट मारता है...देखो ये लडका करंट मारता है ! ;) :- Police Officer (1992)In reply to छानच... चला यावर एखाद्द फोटु by मदनबाण
२००९ साली आमच्या गुरुजींनी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बॅक मारता है,फरंट मारता है...देखो ये लडका करंट मारता है ! ;) :- Police Officer (1992)In reply to २००९ साली आमच्या गुरुजींनी by मदनबाण
व्वाह! ये भी झ्याक है।
एकच नंबर!!!!
उत्कृष्ट कलाकृती __/\__
गुरुजी, नेहमी करत असलेल्या
In reply to गुरुजी, नेहमी करत असलेल्या by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
+१
In reply to गुरुजी, नेहमी करत असलेल्या by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
+१
बुवा
शेवटचा फोटो जास्त उजवा वाटला.
छान समजावून सांगीतलेत.करून
In reply to छान समजावून सांगीतलेत.करून by भाग्यश्री कुलकर्णी
माम्लेदारचा पन्खा
In reply to माम्लेदारचा पन्खा by अत्रुप्त आत्मा
स्वॅप्स,वल्ली,आदूबाळ,पियुशा
In reply to स्वॅप्स,वल्ली,आदूबाळ,पियुशा by टवाळ कार्टा
अनुल्लेख?
In reply to अनुल्लेख? by सूड
तुका तस्ले धन्यवाद मिळत
In reply to तुका तस्ले धन्यवाद मिळत by टवाळ कार्टा
तसले नाका? मागीर कित्यां जाय
In reply to तसले नाका? मागीर कित्यां जाय by सूड
@कुरुकटकासि पाहता तो उत्तर
In reply to अनुल्लेख? by सूड
@हे बघ की राव!! >> +++१११
मस्त हो बुवा
मस्त प्रकार!
In reply to मस्त प्रकार! by पैसा
व्हय जी! जन्मजात डावरे.
In reply to मस्त प्रकार! by पैसा
पण बुवा तुम्ही डावरे अहात का?
In reply to पण बुवा तुम्ही डावरे अहात का? by अन्या दातार
(No subject)
In reply to (No subject) by अत्रुप्त आत्मा
बुवा...
खूपच सुंदर!!
+ १
चित्रकृती
In reply to चित्रकृती by अत्रुप्त आत्मा
मस्तच
In reply to चित्रकृती by अत्रुप्त आत्मा
थांकू...संपादक.
ये आज सुबहे का खेला.. संपादक
आत्मूगुर्जी हाय हाय!
छानेकी !
फारच सुंदर.
हा धागा आत्ता पाह्यला. आयडीया
वा, सुरेख हो गुर्जी!
अरे वा.. मस्तच चित्रे काढता
नवं काही तरी
In reply to नवं काही तरी by श्रीरंग_जोशी
धन्यवाद. :)
मस्त गुरूजी. छान चित्रकला.
मस्त आयडिया आहे.सोपी आणि छान!
गुर्जी, भारी कलाकृती आहेत !
(No subject)