"वार्याने पण सकाळीच उच्छाद मांडलाय !" ती पुटपटली. पण खरंच वैताग बाहेरच्या घोंघावणार्याबद्दल का मनातल्या , नीट समजेना.
महिनाभरातल्या अनाकालनीय घडामोडी आणि हा असा ह्ट्टी..नको म्हटलं तरी कालची भेट आठवलीच.
"मग सांगीतेलस ना तुझ्या घरच्यांना ?"
.....
"धडाधडा बोल घुमेपणा सोड आता."
"मला धीरच होत नाही, सांगायला"
" पण कधीतरी कळणारच ना मग तूच सांगीतलेले चांगले ,तेही लगेचच"
"अरे याचे परिणाम काय होतील माहीतीयत ना ? तू सांगीतल का त्यांची संमती ?"
" सांगीतल्येय आणि मी स्वछंदी माझा निर्णय मीच घेतो, माहीतेय घरच्यांनाही !"
...
पडद्याच्या धक्क्याने पडलेली तस्वीर उचलताना डोळ्यातील पाणी बोटांबरोबर तस्बीरीला कधी लागले ते तीलाही कळले नाही.
तस्बीरीतले दोघे खरे आपल्यालाच बघतायेत का भास आहे नुसता.
============
उत्तरार्ध :
तस्बीरीत कसे अगदी एक्मेकांत विरघळल्यासारखे आणि उमलणार्या फुलासारखे प्रसन्न. पण आता इतकी टोकाची फरपट ? परतीचे दोर तर मागे नाहीतच या प्रेमविवाहात. मग पुढे ? दाराची बेल कर्कश्श वाजत राहीली. "आई $$$$ तुम्ही !!! या ना, पण तो नसतो इथे हल्ली !" "माहीत्येय म्हणूनच आलेय " "पण इथला पत्ता..." "ते महत्वाच नाही तुझे कपडे आवरून सामान घे आणि चल घरी" "घरी ? कुठे?? आणी तुम्हाला कुणी....." "सगळं घरी गेल्यावर सांगते. माझ्या लेकाला तुला मुक्त करायचं ना मग तूच त्याला सोड कायमचा, आणि ..." पण आई मी कुठे जाऊ ? कुठे म्हणजे? माझ्याकडे, लेक आपल्या आईकडेच येणारना ! घट्ट मिठीत आईच्या मायेचा रंध्रानुभव डोळ्यातल्या अश्रूंनी बाहेर पडत होता तर "अहो आई" स्वतःच्या डोळ्यातील अश्रूंना मुक्त करीत होत्या
वाचने
3167
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
सा सं
खासच! सतराशे साठ खाष्ट
:)
छान आहे.
उत्तम समारोप.
+१
In reply to उत्तम समारोप. by प्रचेतस
आवडली
+१
In reply to आवडली by बहुगुणी
उत्तम.
आवडली कथा.
आवडली..
ही सासू पाहून माझी आई आठवली.
ओह्ह.. खरेच.. ही कथाही आवडली
In reply to ही सासू पाहून माझी आई आठवली. by नूतन सावंत
अनपेक्षीत पण आनंदी शेवट.
:)
+१
आवडली
+१
मस्त अश्या गोष्टी
+१ सकारात्मक गोष्ट आवडली
सुन्दर ! +१ +१