Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by पगला गजोधर on Mon, 08/24/2015 - 13:10
लेखनविषय (Tags)
शब्दक्रीडा
लेखनप्रकार (Writing Type)
माध्यमवेध
आपण पुन्हा कधीच जागं न येण्याकरिता या तुरुंगात झोपलोय आज, हे त्या सर्वांना कळलंही होतं एव्हाना…… घरदार दुरावलं, सगेसोयरे दुरावलें...... हिरवे डोळे आणि सुंदर मुलायम केसांचा एकेकाळचा तिचा सगळा राजस रुबाब धुवून निघाला होता, तरीही जगण्यातली सारी झुंज पुन्हा एकवटून, तुरुंगाचे गज आपल्या पकडीत घेऊन, त्या एका निकराच्या क्षणी आभाळाकडं पाहत ती ओरडते … मी अशी हरणार नाही...मी इथून निसटून जाईन.. कोठडीतल्या प्रत्येकाला एकएक करून नेलेलं पाहताना होणाऱ्या, हृदयाचा चावा घेतल्यासारख्या वेदनेमुळे, इतरांचा स्वतःच्या चैतन्यशक्तीवरचा ताबा निसटून गेलेला आतापावतो, येणारा अटळ मृत्यू त्यांनी स्वीकारलेला,…… जगण्याची इतकी आसक्ती तिला का असावी? ती कशासाठी झुंजत होती? याचं मूकआश्चर्य करत होते ते आपापसात …. . fight
  • Log in or register to post comments
  • 2338 views

प्रतिक्रिया

Submitted by gogglya on Mon, 08/24/2015 - 15:20

Permalink

हटके विषय

बाकी छायाचित्रामुळे सगळी उत्सुकता संपुन जात आहे नाही तर उत्तम गूढ निर्माण झाले असते.
  • Log in or register to post comments

Submitted by पगला गजोधर on Mon, 08/24/2015 - 15:23

In reply to हटके विषय by gogglya

Permalink

चीनमधल्या

मिट-फेस्टिवल (मांस उत्सव/सण ) च्या वरून प्रेरित धागा, हजारो मांजरे कुत्री यांची कत्तल होते अश्या सणांना तिथे.
  • Log in or register to post comments

Submitted by मांत्रिक on Mon, 08/24/2015 - 15:31

In reply to चीनमधल्या by पगला गजोधर

Permalink

अरेरे हे चीनी लोक! मांजरं आणि

अरेरे हे चीनी लोक! मांजरं आणि कुत्रे कसे खाऊ वाटतात या नतद्रष्टांना! कुत्रा मांजर हे तर माणसाचे फार चांगले मित्र!
  • Log in or register to post comments

Submitted by gogglya on Mon, 08/24/2015 - 15:57

In reply to अरेरे हे चीनी लोक! मांजरं आणि by मांत्रिक

Permalink

कुत्रे खाणे भारतात पण चालते - अती पुर्वेकडील राज्यांमध्ये

आणी पद्धत खुपच क्रुर आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on Mon, 08/24/2015 - 16:05

In reply to कुत्रे खाणे भारतात पण चालते - अती पुर्वेकडील राज्यांमध्ये by gogglya

Permalink

बाप्रे! मला चित्र दीसत

बाप्रे! मला चित्र दीसत नसल्यामुळे काहीच कळत नव्हते. आता अंदाज आला कसले चित्र असेल ते.
  • Log in or register to post comments

Submitted by माम्लेदारचा पन्खा on Mon, 08/24/2015 - 16:21

Permalink

हे चीनवाले काहीही खातात म्हणून

देव बाप्पा त्यांना पाप देतो.... आजची त्यांची बाजारपेठेची आणि निर्देशांकाची स्थिती पहा.....पापी मेले !
  • Log in or register to post comments

Submitted by तुडतुडी on Mon, 08/24/2015 - 16:22

Permalink

काय आहे हे ?

काय आहे हे ?
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com